B Pharmacy Admission : B. Pharmacy प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन; इथे पहा वेळापत्रक

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता बारावीनंतर औषध निर्माण शास्‍त्र (B Pharmacy Admission) शाखेतील पदवी अभ्यासक्रम असलेल्‍या बी. फार्मसीच्‍या प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. सीईटी सेलने सविस्‍तर वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणीची मुदत दि. 20 जुलै पर्यंत दिलेली आहे. ऑगस्‍ट महिन्‍यात कॅप राउंडच्‍या प्रक्रियेला सुरुवात होईल.

व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झालेली असताना बी. फार्मसीच्‍या प्रवेशाची प्रक्रिया बारगळली होती. एमएचटी-सीईटी या प्रमुख प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर (B Pharmacy Admission) होऊन अनेक दिवस उलटूनही प्रवेश प्रक्रिया सुरु होत नसल्‍याने विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. अखेर सीईटी सेलने सविस्‍तर वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना दि. 20 जुलै 2023 पर्यंत नोंदणी करता येईल. इ-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनीद्वारे कागदपत्रे पडताळणीसाठी दि. 21 जुलै 2023 पर्यंत मुदत असणार आहे. दि. 23 जुलै 2023 ला प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
हरकती नोंदविण्यासाठी दि. 24 ते दि. 26 जुलै 2023 पर्यंत मुदत असेल. दि. 28 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असून, त्‍याआधारे पुढील प्रवेश दिले जातील. प्रवेशाच्‍या एकूण तीन फेऱ्या घेण्याचे नियोजित आहे.

असे आहे कॅप राउंडचे वेळापत्रक – (B Pharmacy Admission)
1. पहिल्‍या कॅप राउंडसाठी नोंदणी – दि. 29 ते 31 जुलै
2. या फेरीसाठी वाटप यादी प्रसिद्धी – दि. 2 ऑगस्‍ट
3. प्रवेश घेण्यासाठीची मुदत – दि. 3 ते 5 ऑगस्‍ट
4. दुसऱ्या कॅप राउंडसाठी नोंदणी – दि. 7 ते 9 ऑगस्‍ट
5. या फेरीसाठी वाटप यादीची प्रसिद्धी – दि. 11 ऑगस्‍ट
6. प्रवेश घेण्यासाठी मुदत – दि. 12 ते 1 ऑगस्‍ट
औषधनिर्माणशास्‍त्र पदवी व पदविका अभ्यासक्रमांच्‍या नोंदणी सध्या सुरु आहेत. या क्षेत्रात संशोधनाला वाव असून, करिअरचे चांगले पर्याय उपलब्‍ध आहेत. विद्यार्थ्यांनी (B Pharmacy Admission) मुदतवाढीचा निर्णय न घेता, तातडीने आपली नांव नोंदणी करुन प्रवेश प्रक्रियेत सहभाग घ्यावा; असं आवाहन करण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com