MPSC Update : MPSC वर ताण वाढतोय; आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC Update) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा MPSC मार्फत होत आहेत. दरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आरोग्य विभागाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

अ आणि ब गटाच्या परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून घेतल्या जातील, असे सांगण्यात येत आहे. अधिक्षक, डॉक्टर अशा मोठ्या पदांचा यामध्ये (MPSC Update) समावेश आहे. असे असताना आरोग्य विभागातील क आणि ड गटाच्या परीक्षा या नियमित जशा होतात तशाच असतील; असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com