Home Blog Page 281

Anganwadi Bharti 2023 : राज्याच्या ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस भरती!! शिक्षण फक्त 12 वी पास

Anganwadi Bharti 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र (Anganwadi Bharti 2023) पुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी पालघर (नागरी) जि. पालघर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्याकरिता पालघर जिल्हयातील (मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी या तालुक्यातील) स्थानिक रहिवाशी असलेल्या महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक महिला उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर  ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे.

प्रकल्प – एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजना
भरले जाणारे पद – अंगणवाडी मदतनीस
पद संख्या – 08 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार महिला 12 वी पास असणे आवश्यक आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – पालघर
वय मर्यादा – (Anganwadi Bharti 2023)
1. किमान 18 वर्षे
2. कमाल 35 वर्षे
3. विधवा उमेदवारांसाठी वय मर्यादा कमाल 40 वर्षे राहील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – C/o जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास दालन क्र.005, नवीन जिल्हा परिषद इमारत, कोळगाव, तळमजला, ता. पालघर, जिल्हा – पालघर
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (स्वतःचे नावाचे), अनुभव प्रमाणपत्र, विधवा ( अटी व शर्तीमधील क्र. ६ नुसार दाखला) अनाथ महिला असल्यास (अटी व शर्तीमधील क्र. ७ नुसार दाखला) इ.च्या सक्षम प्राधिका-याकडून साक्षांकित (Anganwadi Bharti 2023) केलेल्या प्रती जोडणे आवश्यक आहे, जोडले नसल्यास अगर साक्षांकित नसल्यास याबाबतचे गुण दिले जाणार नाहीत.
3. उमेदवारांनी अर्ज मुदतीच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स – (Anganwadi Bharti 2023
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – palghar.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! मुंबईच्या ‘या’ कॉलेजमध्ये नोकरीसाठी अर्ज सुरु

Job Notification (68)

करिअरनामा ऑनलाईन । बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई अंतर्गत (Job Notification) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता पदांच्या एकूण 18 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2023 आहे.

संस्था – बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई
भरली जाणारी पदे –
1. प्राचार्य – 01 पद
2. प्राध्यापक – 01 पद
3. सहयोगी प्राध्यापक – 04 पदे
4. सहायक प्राध्यापक – 08 पदे
5. व्याख्याता – 04 पदे (Job Notification)
पद संख्या – 18 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
असा करा अर्ज – (Job Notification)
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करताना आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.bcp.edu.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

VSSC Recruitment 2023 : ISRO मध्ये नोकरीची संधी; विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ‘या’ पदांवर भरती

VSSC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये विविध (VSSC Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सायंटिस्ट/ इंजिनियर-SD, सायंटिस्ट/ इंजिनियर-SC पदाच्या एकूण 61 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

संस्था – विक्रम साराभाई स्पेस सेंटर
पद संख्या – 61 पदे
भरली जाणारी पदे –
1. सायंटिस्ट/ इंजिनियर-SD – 04 पदे
2. सायंटिस्ट/ इंजिनियर-SC – 57 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (VSSC Recruitment 2023)
1. सायंटिस्ट/ इंजिनियर SD – M.E/M.Tech/MA (Science)/M.sc/ B.E/B.Tech/ B.Sc/Ph.D.
2. सायंटिस्ट/ इंजिनियर SC – M.E/M.Tech/MA (Science)/ M.sc/ B.E/B.Tech/B.Sc/Ph.D
वय मर्यादा –
किमान 28 वर्षे
कमाल 35 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी –
पद क्र.1 – फी नाही.
पद क्र.2 – ₹750/- (Refundable)

मिळणारे वेतन –
1. सायंटिस्ट/ इंजिनियर-SD – 67,700/- रुपये दरमहा
2. सायंटिस्ट/ इंजिनियर-SC – 56,100/- रुपये दरमहा
निवड प्रक्रिया –
1. ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.
2. मुलाखतीसाठी बोलावलेल्या (VSSC Recruitment 2023) उमेदवारांना हिंदीत प्रश्नांची उत्तरे देण्याचा पर्याय असेल.
3. मुलाखतीतील उमेदवारांच्या कामगिरीवर आधारीत अंतीम निवड केली जाईल.
नोकरी करण्याचे ठिकाण – तिरुवनंतपुरम/संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.vssc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Teachers Recruitment : शिक्षकांची तब्बल 50 हजार रिक्त पदे भरणार!! राज्य सरकारची मोठी घोषणा 

Teachers Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक भरतीसाठी आतुर असलेल्या (Teachers Recruitment) राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात लवकरच तब्बल 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची पदे भरली जातील व यासंदर्भात लगेचच जीआर काढण्यात येईल, असे देखील केसरकर म्हणाले आहेत.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, औरंगाबाद हाय कोर्टचा स्टे या भरतीच्या संदर्भात होता. त्यामुळे या भरतीचं काम लांबलं होतं. पण सध्या काही जिल्ह्यांमध्ये शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकच नाहीत; अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हाय कोर्टचा स्टे उठल्याने (Teachers Recruitment) आता शिक्षक भरतीला सुरुवात होणार असून, व त्यासोबतच नवीन शिक्षक म्हणून जॉईन करणाऱ्यांना आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये जाणार आहोत, याची चॉईस सुद्धा द्यावी लागते. यामुळे या प्रक्रियेला साधारण एक महिना लागणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे.

भावी शिक्षकांना मोठा दिलासा
शिक्षणमंत्री केसरकर यांच्या घोषणेमुळे शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच याआधी केसरकर यांनी राज्यातील शिक्षकांच्या बदल्या रद्द (Teachers Recruitment) करुन गणवेश वाटप करण्याची जबाबदारी ही स्थानिक शालेय समितीवर असणार असल्याचे सांगितले होते. अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने त्यांच्यावर अधिकचा भार येत असल्याचं चित्र सध्या आहे. त्यामुळे राज्यात शिक्षक भरती होणं अत्यंत गरजेचं होतं.
शिक्षकांच्या बदली विषयी काय आहे नवीन धोरण? (Teachers Recruitment)
नव्या धोरणानुसार, एकाच शाळेवर किमान पाच वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांचा बदली प्रक्रियेत समावेश केला आहे. या एकूण बदल्यांमध्ये संवर्ग एक मधील 6 हजार 690 आणि संवर्ग दोनमधील 3 हजार 400 शिक्षकांचा समावेश केला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PM Rojgar Mela 2023 : 70 हजार तरुणांना मिळणार रोजगार, कसा करायचा अर्ज? पहा मेळाव्याची तारीख

PM Rojgar Mela 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारने सुरू केलेल्या (PM Rojgar Mela 2023) पीएम रोजगार मेळाव्यात 22 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 70,000 तरुणांना नियुक्ती पत्र देणार आहेत. यापूर्वी अनेकवेळा पीएम मोदींनी तरुणांना नियुक्तीपत्र दिले आहे. यामध्ये आतापर्यंत देशातील साडेतीन लाखांहून अधिक तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.
दि. 22 जुलै रोजी 7 व्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. PM रोजगार मेळा अंतर्गत कोणती पदे उपलब्ध आहेत आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा? याविषयी जाणून घेऊया….

रोजगार मेळाव्यासाठी अशी करा नोंदणी –
1. रोजगार मेळाव्यात नोंदणी करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट pmrpy.gov.in वर जावे लागेल.
2. तुम्हाला ज्या विभागासाठी अर्ज करायचा आहे त्याचा फॉर्म भरा.
3. आवश्यक पात्रतेचे (PM Rojgar Mela 2023) तपशील भरून नोंदणी करा.
4. नोंदणी केल्यानंतर, तुम्ही अर्ज भरू शकता.
5. अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.

या विभागांमध्ये नोकऱ्या उपलब्ध – (PM Rojgar Mela 2023)
पीएम रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य मंत्रालयाच्या 38 विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची संधी आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि पात्रतेनुसार पोस्ट निवडू शकता. पीएम रोजगार मेळ्याअंतर्गत, पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांना नियुक्ती पत्र देतात. यामध्ये विविध राज्यातील तरुण सहभागी होतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुम्ही या वर्षाच्या अखेरीस या योजनेसाठी अर्ज करू शकता.
देशातील बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना अनेक टप्प्यांत नियुक्ती पत्रांचे वाटप (PM Rojgar Mela 2023) करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत 6 टप्प्यात नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले आहे. 7 व्या टप्प्यात 22 हून अधिक राज्यांमधील 45 केंद्रांवर रोजगार मेळावा आयोजित केला जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : राज्याच्या ‘या’ महापालिकेत शिक्षक भरती सुरु; थेट द्या मुलाखत!!

Job Notification (67)

करिअरनामा ऑनलाईन । नागपूर महानगरपालिकेच्या (Job Notification) माध्यमिक शाळांसाठी तसेच कनिष्ठ महाविद्यालयांकरिता माध्यमनिहाय व विषयनिहाय कंत्राटी पद्धतीने निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात निश्चित मानधनावर पात्र शिक्षक पदांच्या 83 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दि. 17 ते 21 जुलै 2023 दरम्यान थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

संस्था – नागपूर महानगरपालिका माध्यमिक शाळा, नागपूर
भरली जाणारी पदे – शिक्षक
पद संख्या – 83 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – दि. 17 ते 21 जुलै 2023
मुलाखतीची वेळ – सकाळी 9:30 ते 12:00 पर्यंत

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – 65 वर्षे (Job Notification)
मुलाखतीचा पत्ता – शिक्षण विभाग, नागपूर महानरगपालिका, सिव्हील लाईन, नागपूर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 
1. शिक्षक B.Sc, BA, MA, B.Ed
मिळणारे वेतन – Rs.25,000/- दरमहा

महत्वाची सूचना –
1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीने होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
3. मुलाखतीसाठी उपस्थित (Job Notification) राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
4. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे.
भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Cochin Shipyard Recruitment : 10 वी पाससाठी खुषखबर!! कोचीन शिपयार्ड अंतर्गत 300 पदांवर भरती

Cochin Shipyard Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत (Cochin Shipyard Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 300 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे.

संस्था – कोचीन शिपयार्ड लिमिटेड
भरली जाणारी पदे –
1) फॅब्रिकेशन असिस्टंट
i) शीट मेटल वर्कर – 21 पदे
ii) वेल्डर – 34 पदे
2) ऑउटफिट असिस्टंट
i) फिटर – 88 पदे
ii) मेकॅनिक डिझेल – 19 पदे
iii) मेकॅनिक मोटार व्हेईकल – 05  पदे
iv) प्लंबर – 21 पदे
v) पेंटर – 12 पदे (Cochin Shipyard Recruitment)
vi) इलेक्ट्रिशियन – 42 पदे
vii) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 18 पदे
viii) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 34 पदे
ix) शिपराइट वुड – 05 पदे
पद संख्या – 300 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. फॅब्रिकेशन असिस्टंट – उमेदवार 10वी उत्तीर्ण, ITI (शीट मेटल वर्कर/फिटर/वेल्डर) तसेच 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
2. ऑउटफिट असिस्टंट – उमेदवार 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI तसेच 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – जनरल/ओबीसी/600/- [SC/ST/PWD: फी नाही]
मिळणारे वेतन – (Cochin Shipyard Recruitment)
1st year – दरमहा एकत्रित वेतन 23,300/- रुपये (कामाच्या अतिरिक्त तासांसाठी ₹ 4900/-)
2nd year ₹ – दरमहा एकत्रित वेतन 24,000/- रुपये (कामाच्या अतिरिक्त तासांसाठी₹ 5000/-)
3rd year – दरमहा एकत्रित वेतन₹ 24,800/- रुपये (कामाच्या अतिरिक्त तासांसाठी₹ 5100/-)

निवड प्रक्रिया – 
निवड पद्धतीमध्ये टप्पा I – वस्तुनिष्ठ प्रकार ऑनलाइन चाचणी आणि दुसरा टप्पा प्रात्यक्षिक चाचणी यांचा समावेश असेल
नोकरी करण्याचे ठिकाण – कोची
काही महत्वाच्या लिंक्स – (Cochin Shipyard Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : गोव्याच्या क्रिकेट असोसिएशनमध्ये ‘या’ पदावर भरती; पहा कोण करू शकतं अर्ज

Job Alert (40)

करिअरनामा ऑनलाईन । गोवा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिजिओथेरपिस्ट, स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2023 आहे.

संस्था – गोवा क्रिकेट असोसिएशन, गोवा
भरली जाणारी पदे – 
1. फिजिओथेरपिस्ट
2. स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच
पद संख्या – 02 पदे
अर्ज करण्याची पध्दत –  ऑनलाईन (E-Mail)/ऑफलाईन
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा
वय मर्यादा – 50 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
1. फिजिओथेरपिस्ट –
Essential:
Bachelor of Physiotherapy Minimum 3 years experience of working with any Cricket Team / High performance sports team.
Desirable:
Masters in Sports Physiotherapy Minimum 3years Experience of
working with a State Senior Men’s Cricket team / high-performance cricket players.
2. स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच –
Essential:
A qualification specializing in S & C or Sports science.
Minimum of 3 years of experience in the provision of S & C services.
Experience of working with elite athletes/teams. (Job Alert)
Experience in design & implementation of programs to elite athletes.
Desirable:
Certified by NSCA CSCS/ASCA Level 2/UKSCA.

असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी ऑनलाईन (ई-मेल) किंवा पोस्टाद्वारे अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://goacricketassociation.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Business Success Story : पतीची आत्महत्या… हजारो कोटींचं कर्ज… माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीनं बुडालेला कॉफी ब्रँड पुन्हा नावारुपास आणला

Business Success Story (2)

करिअरनामा ऑनलाईन । कॉफी म्हटलं की ‘कॅफे कॉफी डे’ची आठवण (Business Success Story) झाल्याशिवाय राहत नाही. तुमच्यापैकी अनेकांनी CCD रेस्टॉरंटला नक्कीच भेट दिली असेल. हे असे रेस्टॉरंट आहे जिथे क्लासिक कॅपिचिनो, फिल्टर कॉफी आणि आय-ओपनर एक्सस्प्रेसो यासारख्या लज्जतदार कॉफीचा आस्वाद तुम्ही घेता. देशातील वाढती कॉफी संस्कृती पाहून 1996 मध्ये कर्नाटकचे रहिवासी व्ही. जी. सिद्धार्थ यांनी ‘CCD’ ची स्थापना केली. कॉफी स्टोअरच्या या चेनने देशात  चांगली कामगिरी केली. व्यवसाय अगदी तेजीत सुरु होता पण नंतर कंपनीला अनेक चढउतार पहावे लागले. दरम्यान कंपनी कर्जात बुडाली आणि मग आणखी एक वाईट बातमी येवून धडकली.
Business Success Story Malavika Hegade

CCD एक परिपूर्ण कंपनी दिसत होती पण त्याच्या व्यवस्थापनात बऱ्याच समस्या होत्या. CCD ब्रँड हजारो कोटींच्या कर्जात बुडाला आणि मग व्ही. जी. सिद्धार्थ यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. मंगळूरजवळील नेत्रावती नदीत उडी मारुन त्यांनी आपले आयुष्य संपवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार CCD वर एकूण 7 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते.
Business Success Story Malavika Hegade
पत्नीने हाती घेतली सूत्रे (Business Success Story)
कंपनी कर्जात बुडाली होती . सिद्धार्थच्या निधनानंतर कंपनी बंद होईल; असं सर्वांना वाटत असताना सिद्धार्थची पत्नी मालविका हेगडे यांनी कंपनीची सूत्रे हाती घेत CCD चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार सांभाळला. मालविका हेगडे ही कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांची मुलगी आहे. मालविका यांचा जन्म 1969 मध्ये बेंगळुरू येथे झाला. 1991 मध्ये सिद्धार्थ यांच्याशी त्यांचे लग्न झालं.
Business Success Story Malavika Hegade

पतीचे निधन आणि कर्जाचा डोंगर
सिद्धार्थ जेव्हा कॉफीचा व्यवसाय सुरू करत होते तेव्हा तो फार काळ चालणार नाही, असं सगळे बोलत होते. परंतु CCD सुरु झाले आणि दोन दशकात कंपनी देशातील सर्वात मोठा कॉफी ब्रँड म्हणून नावारुपास आली. मात्र, काही त्रुटींमुळे कंपनीची पडझड सुरु झाली आणि कंपनी मोठ्या (Business Success Story) कर्जात बुडाली. यादरम्यान 2019 मध्ये व्ही. जी. सिद्धार्थच्या आत्महत्येचे वृत्त समोर आले. 6 तासांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह नदीपात्रात सापडला. त्यानंतर प्रतिकूल आणि अत्यंत वाईट परिस्थितीत मालविका हेगडे यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली. त्यांची मेहनत फळाला आली आणि दोन वर्षातच कंपनी पुन्हा आपल्या पायावर उभी राहिली.
Business Success Story of Malavika Hegade

मालविकाने जिद्द सोडली नाही
पती सिद्धार्थच्या निधनाने मालविकाला मोठा धक्का बसला होता कारण तिचे आनंदी घर उध्वस्त झाले होते. पतीच्या मृत्यूचा धक्का… करोडोंच्या कर्जात बुडालेली कंपनी… स्वतःला आणि व्यवसायाला सांभाळणे… सर्वच कठीण होवून बसले होते. पण CCD ला पुन्हा उभे करण्याच्या जिद्दीने मालविकाने न डगमगता पुढे पावले टाकण्यास सुरवात केली.
Business Success Story Malavika Hegade

CCD ब्रँड पुन्हा उदयास आला
31 मार्च 2019 च्या आकडेवारीनुसार CCD वर सुमारे 7 हजार कोटींचे कर्ज होते, पण मालविका यांनी हिम्मत सोडली नाही.  त्यांनी न डगमगता ब्रँडला पुन्हा सोनेरी दिवस आणले. CCDला यशस्वी बिझनेस मॉडेल बनवण्याचे पतीचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली (Business Success Story) आणि व्यवसायात कमाल करण्यास सुरूवात केली. त्यांनी CCD मध्ये काम करणार्‍या हजारो कर्मचार्‍यांच्या जबाबदाऱ्या आणि परिस्थितीही चांगल्या प्रकारे समजून घेतल्या. डिसेंबर 2020 मध्ये मालविका हेगडे कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडच्या CEO बनल्या आणि बिकट आर्थिक परिस्थितीशी लढा देत त्यांनी अल्पावधीतच कंपनी पुन्हा उदयास आणली.
Business Success Story of Malavika Hegadeअधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 Agnipath Yojana : ट्रेनिंग मध्येच सोडून पळताहेत अग्निवीर; काय आहे कारण? बेशिस्त अग्निवीरांवर होणार कारवाई

Agnipath Yojana (9)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्कराच्या अग्निपथ योजनेअंतर्गत (Agnipath Yojana) लवकरच अग्निवीर वेगवेगळ्या युनिट्समध्ये सामील होणार आहेत. अग्निपथ योजनेअंतर्गत पहिल्या बॅचचे प्रशिक्षण संपले असून दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. पुढील महिन्यात पहिली तुकडी भारतीय लष्करात दाखल होणार आहे. मात्र, प्रशिक्षणादरम्यानच अनेक तरुण मधूनच प्रशिक्षण सोडून गेले आहेत. विविध कारणं देऊन ट्रेनिंग मधेच सोडणाऱ्या तरुणांवर कारवाई केली जाऊ शकते. तरुणांच्या प्रशिक्षणासाठी खर्च झालेली रक्कमही त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे.

पहिल्या बॅचच्या 50 हून अधिक जणांनी सोडली ट्रेनिंग
लष्कराचे ट्रेनिंग घेत असताना अग्निवीरांना मधूनच बाहेर पडायचं असल्यास काही नियम नाहीत, पण सध्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार आता नवे नियम बनवण्याच्या तयारीत आहे. ‘नवभारत टाईम्स’च्या एका रिपोर्टनुसार, मधूनच ट्रेनिंग सोडून जाणाऱ्या तरुणांना दंड आकारण्यात (Agnipath Yojana) येणार आहे. रिपोर्टमध्ये एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, पहिल्या बॅचमधून 50 पेक्षा अधिक तरुणांनी ट्रेनिंग मधूनच सोडली आहे, तर दुसऱ्या बॅचमध्येही काहीशी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता मधूनच ट्रेनिंग सोडून जाणाऱ्यांकडून दंड आकारण्याचा लष्कराचा विचार आहे.  जे भारतीय लष्करात भरती होण्यासाठी खरोखरच इच्छुक आहेत, अशाच तरुणांवर भविष्यात लक्ष दिले जाणार आहे.

काय आहेत ट्रेनिंग सोडण्याची कारणे? (Agnipath Yojana)
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मधूनच ट्रेनिंग सोडणाऱ्या तरुणांकडून विविध कारणं देण्यात येतात. काही जण 30 दिवस किंवा त्याहून अधिक मेडिकल लिव्ह  घेवून बाहेर पडले तर काहींनी दुसरीकडे चांगली संधी मिळाल्याचं सांगून ट्रेनिंग मध्येच सोडली आहे. . सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे सैन्यात असा नियम आहे की, जर कोणी 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस ट्रेनिंगला गैरहजर राहिला तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो.
1 जानेवारीला पहिल्या बॅचमध्ये 19 हजारांहून अधिक अग्निवीरांना सामील करुन घेण्यात आलं होतं ज्यांची देशभरातील 40 वेगवेगळ्या सेंटर्सवर ट्रेनिंग झाली होती. सहा महिन्याच्या (Agnipath Yojana) ट्रेनिंगमध्ये अग्निवीरांसाठी बेसिक आणि अॅडव्हांस्ड मिलिट्री प्रोग्राम्स करुन घेतले जातात. सहा महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर अग्निवीरांना विविध युनिट्समध्ये तैनात केलं जाणार आहे आणि 4 वर्षांनंतर यातील 25 सैनिकांना नोकरीत कायम केलं जाणार आहे. भारतीय लष्कर 50 युवकांना नोकरीत कायम करु इच्छिते, त्यासाठी भारतीय लष्कराने केंद्रासमोर प्रस्ताव देखील मांडला आहे.
धिक माहितीसाठी पहा – https://careernama.com