Home Blog Page 274

Success Story : या तरुणाने इंजिनिअरिंग न करता मिळवली Googleमध्ये नोकरी; पॅकेजचा आकडा ऐकून थक्क व्हाल!!

Success Story Harshal Juikar

करिअरनामा ऑनलाईन । जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी (Success Story) म्हणून गुगलची गणना होते. काम आणि पगारासोबत गुगल कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा देते त्यामुळे या कंपनीत काम करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की इंजिनिअरिंग न करता देखील एका तरुणाने गुगlमध्ये नोकरी मिळवली आहे. एकूण आश्चर्य वाटेल; पण हे खरं आहे. पुण्यातील हर्षल जुईकर (Harsha Juikar) या विद्यार्थ्याने अभियांत्रिकीची पदवी नसतानाही गुगलमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळवली आहे.

50 लाखाचं पॅकेज
हर्षलचे कौशल्य आणि दृढनिश्चयामुळे त्याला 50 लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे, अशी बातमी न्यूज18 ने दिली आहे. विशेष म्हणजे हर्षलने अभियांत्रिकी क्षेत्राबाहेरील पदवी घेऊन शिक्षण पूर्ण केले आहे. अभियांत्रिकी पार्श्वभूमी असेल तरच टेक कंपन्यांमध्ये नोकरी मिळते हा समज तोडून हर्षलने गुगलमध्ये (Google) नोकरी मिळवली आहे.

नेमकं काय शिकला हर्षल?
हर्षलने संगणक कोडिंग आणि प्रोग्रामिंगमचे कौशल्य आत्मसात केले आहे. तो एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे तिथे त्याने ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये (Success Story) एमएससी पूर्ण केले आहे, हा एक अपारंपरिक अभ्यासक्रम आहे जो अनेकजण निवडत नाहीत. कौशल्य आणि अथक प्रयत्नाच्या जोरावर त्याने Google मध्ये नोकरी मिळवली आहे.

Google ने हर्षलमध्ये काय पाहिलं
नाविन्यपूर्ण कल्पनांचा पाठपुरावा करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या Google ने हर्षलमध्ये कोडिंगची क्षमता पाहिली. त्याची उल्लेखनीय प्रतिभा ओळखून, Google ने त्याला आकर्षक पगाराच्या पॅकेजसह नोकरीची ऑफर दिली आहे.

विद्यार्थ्यांसाठी काही टिप्स (Success Story)
ज्यांना आयुष्यात यशस्वी होण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हर्षलने (Harshal Juikar) काही टिप्स शेअर केल्या आहेत. तो म्हणाला, “जिज्ञासू राहा, चिकाटी ठेवा आणि अज्ञात प्रदेश शोधण्यास घाबरू नका. आपल्या आवडीच्या शोधातच आपल्याला आपला उद्देश सापडतो. टेक कंपन्या सहसा नवीन महाविद्यालयीन पदवीधरांना मोठ्या पगाराच्या पॅकेजवर घेतात.”

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अलीकडील अहवालानुसार, फेसबुकची (Facebook) मूळ कंपनी मेटा (Meta) आणि गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट या तीन सर्वाधिक पगार देणाऱ्या कंपन्यांमध्ये मोडतात. मेटा सरासरी पगाराच्या बाबतीत दुस-या क्रमांकावर आहे, कंपनी कर्मचार्‍यांना सुमारे $3,00,000 (अंदाजे रु. 2.46 कोटी) सरासरी पगार देते. अल्फाबेट $2,80,000 (अंदाजे रु. 2.29 कोटी) च्या सरासरी पगार देते. टेक कंपन्या अशा मोठ्या पगाराच्या पॅकेजवर कर्मचार्‍यांना कामावर घेत असल्या तरी ते त्यांच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये कपात करत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NDA Preperation : NDA परीक्षा कशी क्रॅक करायची?? एक्झाम पॅटर्नसह पहा काही महत्वाच्या टिप्स

NDA Preperation (1)

करिअरनामा ऑनलाईन । भारताच्या (NDA Preperation) सशस्त्र सेनेमध्ये (Indian Armed Forces) जल सेना (Navy) थलसेना (Army) आणि वायुसेनेचा (Airforce) समावेश होतो. भारतीय सेनेत भरती होणं हे अनेक तरुणांचं स्वप्न आहे. बाकी करिअर्सच्या तुलनेत सैन्यात भरती झालेल्या लोकांना एक विशेष आदर आणि प्रतिष्ठा मिळत असते तसेच आपल्या देशाप्रती कार्य करण्याची ही एक अनमोल संधी आहे. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय रक्षा अकादमी म्हणजेच NDA  (National Defence Academy) तर्फे वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतली जाते या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरुणांना सर्विस सेलेक्शन बोर्ड (SSB) यांच्या तोंडी परीक्षेला उत्तर द्यावे लागते.

एनडीएच्या लेखी तसेच एसएसबीच्या तोंडी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर काही वर्षांसाठी IMA सारख्या ट्रेनिंग अकॅडमी मध्ये निवड झालेल्या तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी तयार केले जाते. हे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर थल सेनेमध्ये(Army) लेफ्टनंट,जल सेनेमध्ये(Navy) सब लेफ्टनंट तर वायुसेनेमध्ये(Airforce )फ्लाईंग ऑफिसर म्हणून नियुक्ती केली जाते. दोन वर्षांच्या सेवापूर्तीनंतर सैनिकांना थल सेनेत कॅप्टन, जलसेनेत लेफ्टीनंट आणि वायुसेनेत फ्लाईट लेफ्टनंट अशा रँकवर बढती मिळते. जनरल, एडमिरल तसेच एअर चीफ मार्शल ही तीनही या श्रेणीतील उच्च पदे आहेत.

NDA परीक्षेचा अभ्यासक्रम आणि एक्झाम पॅटर्न कसा असतो? (NDA Preperation)
एनडीएच्या परीक्षेची तयारी करत असता यूपीएससीने (UPSC) निर्धारित केलेला अभ्यासक्रम आणि परीक्षेचा पॅटर्न सुरुवातीलाच समजून घेणं फार महत्त्वाचा आहे. upsc.gov.in या वेबसाईटवर जाऊन NDA Exam Notification वरुन लेटेस्ट एक्झाम पॅटर्नविषयी माहिती मिळू शकते. या परीक्षेत 2.3 तासांचे दोन पेपर द्यावे लागतात, त्यातील पहिला पेपर हा गणिताचा असतो ज्यामध्ये बारावीच्या अभ्यासक्रमातील 120 प्रश्न विचारले जातात. दुसरा पेपर हा जनरल अबिलिटी टेस्ट (GAT) या विषयाचा असतो ज्यामध्ये 150 प्रश्न विचारले जातात. या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुणांचे निगेटिव्ह मार्किंग देखील असते.

या परीक्षेची तयारी कशी कराल?
1. कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यासाठी योग्य नियोजन असणे फार महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रम आणि एक्झाम पॅटर्न व्यवस्थितपणे समजल्यानंतर एक स्टडी प्लॅन तयार करावा ज्यामध्ये आपल्या वेळेनुसार पूर्ण अभ्यासक्रम सामावला जाऊ शकतो.
2. एखादी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी त्यातील कन्सेप्ट योग्यरित्या माहीत असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे एनडीएच्या परीक्षा देताना सुद्धा अभ्यासक्रमातील प्रत्येक कन्सेप्ट विद्यार्थ्यांना समजली पाहिजे. अडचण आल्यास कोचिंग क्लासेस ची मदत घेता येते, तसेच ऑनलाईन दुनियेत इंटरनेटवरून (NDA Preperation) स्पेशल सेशन चालवली जातात.
3. परीक्षा देताना मागील काही वर्षांचा आढावा घेतला पाहिजे. गेल्या पाच वर्षात घेतल्या गेलेल्या परीक्षा आणि यूपीएससीद्वारे घोषित केलेली गुण पाहून कट ऑफ लिस्ट तयार करावी यामुळे किमान किती अंक प्राप्त केल्यानंतर आपली निवड होऊ शकते हे ठरवता येईल.
4. एनडीएच्या परीक्षेत जनरल अबिलिटी टेस्ट(GAT) ची देखील विशेष तयारी करावी लागते गणिताचा पेपर पेक्षा जीएटीला जास्त गुण दर्शवलेले आहेत त्यामुळेयामध्ये इंग्रजी, जनरल नॉलेज आणि सायन्स सारख्या विषयांची आखणी करुन तयारी करावी लागते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

D.Pharm Result 2023 : डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘कॅरी ऑन’चा लाभ; पहिल्या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

D.Pharm Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । यंदा औषधनिर्माणशास्त्र पदविका (D.Pharm Result 2023) अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षेचा प्रथम वर्षाचा निकाल अत्यंत कमी लागला. याबाबत राज्य सरकारने फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर औषधनिर्माणशास्त्र पदविका प्रथम वर्षात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवून ‘कॅरी ऑन’ (Carry on) करण्याची फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्यावर्षी औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाला विलंब झाला. हा अभ्यासक्रम वार्षिक आहे. फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या मानकानुसार किमान 180 दिवसांच्या शैक्षणिक कालावधीची पूर्तता झाली नाही. केवळ शंभर ते एकशेवीस दिवसांचाच शैक्षणिक कालावधी मिळाला होता. त्याचा (D.Pharm Result 2023) परिणाम प्रथम वर्षाच्या निकालावर होऊन उन्हाळी परीक्षेचा निकाल पन्नास टक्क्यांपेक्षा कमी लागला. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
निकाल कमी लागल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाल्याबाबत तोडगा काढण्यासाठी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाला शैक्षणिक वर्ष 2022-23  मध्ये प्रवेश घेतलेल्या, प्रथम वर्षाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना 2023-24 मध्ये द्वितीय वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) या बाबत नुकतेच परिपत्रकही प्रसिद्ध केले. प्रथम वर्षातील जे अनुत्तीर्ण विद्यार्थी हिवाळी परीक्षा 2023 मध्ये उत्तीर्ण होतील, ते विद्यार्थी (D.Pharm Result 2023) उन्हाळी परीक्षा 2024 पासून द्वितीय वर्षाची परीक्षा देण्यास पात्र होतील. संबंधित विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक अध्यापन प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MahaTransco Recruitment 2023 : 10 वी पाससाठी खुषखबर!! महापारेषण कराड अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; ऑनलाईन करा Apply 

MahaTransco Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (MahaTransco Recruitment 2023) कंपनी मर्यादित, कराड अंतर्गत शिकाऊ उमेदवारांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वीजतंत्री पदाच्या एकूण 46 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, कराड
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
पद संख्या – 46 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑगस्ट 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – कराड, जि. सातारा

वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथिलक्षम)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MahaTransco Recruitment 2023)
1. शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –
ऑनलाईन अर्ज प्राप्त उमेदवारांना दस्तऐवज / शैक्षणिक कागदपत्रे पडताळणी करीता ई-मेलव्दारे दिनांक, वेळ व स्थळ कळविण्यात येईल. त्याकरीता खाली नमूद केलेल्या दस्तऐवजांसह व शैक्षणिक कागदपत्रांसह उमेदवारांनी उपस्थितीत रहायचे आहे.
1. पासपोर्ट साईज फोटो – 2 (रंगीत)
2. ऑनलाईन नोंदणीचे दस्तऐवज व शैक्षणिक कागदपत्रे (मुळ प्रती)
3. शाळा सोडल्याचा दाखला, बोर्ड प्रमाणपत्र.
4. आय. टी. आय गुणपत्रक (चारही सत्र)
5. मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र. (नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र)
6. आधारकार्ड, बँक पासबुक (मुळ प्रत )
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरुन अर्ज करायचा आहे.
4. शिकाऊ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर फोटो, मुळ प्रमाणपत्राची सुस्पष्ट स्कॅन करुन योग्य रितीने ऑनलाईन अर्ज सादर करावा. फोटो अथवा मुळ प्रमाणपत्र सुस्पष्ट नसेल तर अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
5. ऑनलाईन अर्ज सादर करताना एस. एस. सी. उत्तीर्ण गुणपत्रिका व आय. टी. आय उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमुद केलेले नाव व आधारकार्ड नमुद केलेले नाव सुसंगत असावे. (MahaTransco Recruitment 2023)
6. ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवाराने सद्य:स्थितीत कार्यान्वित असणारा ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक कार्यान्वित नसल्यामुळे संपर्क करणे शक्य झाले नाही तर त्याची पुर्ण जबाबदारी उमेदवारावर राहील.
7. दिलेल्या मुदतीनंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF जाहिरात 1

PDF जाहिरात 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Recruitment 2023 : केंद्र सरकारची नोकरी!! UPSC ने जाहीर केली नवीन भरती; पहा भरतीचा तपशील 

UPSC Recruitment 2023 (6)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारची नोकरी करू इच्छिणाऱ्या (UPSC Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध पदावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैमानिक अधिकारी, प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ग्रेड-II, शास्त्रज्ञ ‘बी’, सहाय्यक भूभौतिकशास्त्रज्ञ” पदांच्या एकूण 56 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.

आयोग – संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Comission)
भरली जाणारी पदे –
1. वैमानिक अधिकारी – 26 पदे
2. प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक अधिकारी – 01 पद
3. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ग्रेड-II – 20 पदे
4. शास्त्रज्ञ ‘बी’ – 07 पदे
5. सहाय्यक भूभौतिकशास्त्रज्ञ – 02 पदे
पद संख्या – 56 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2023

वय मर्यादा –
1. वैमानिक अधिकारी – 35 वर्ष
2. प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक अधिकारी – 35 वर्ष
3. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ग्रेड-II – 35 वर्ष
4. शास्त्रज्ञ ‘बी’ – 35 वर्ष (UPSC Recruitment 2023)
5. सहाय्यक भूभौतिकशास्त्रज्ञ – 40 वर्षअर्ज शुल्क – Rs. 25/-
निवड प्रक्रिया – मुलाखती

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वैमानिक अधिकारी – Degree in Aeronautical or Electrical or Electronics or Mechanical or Metallurgical Engineering from a recognized University
2. प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक अधिकारी – Degree in Engineering in Civil or Computer Science or Information Technology OR Masters Degree in
Mathematics or Geography or Geophysics or Computer Applications or Computer Science or Information Technology OR Pass in the final examination of the institution of surveyors in subdivision
3. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ग्रेड-II – Bachelor’s Degree from a recognized university or institution
शास्त्रज्ञ ‘बी’ Master’s Degree in Science in the required Discipline (i.e. Botany/Horticulture/Organic Chemistry) from a recognized (UPSC Recruitment 2023) University or equivalent
4. सहाय्यक भूभौतिकशास्त्रज्ञ – Master’s Degree in Physics or Geophysics or Geology or Mathematics from a recognized University or Institute; OR BE or AMIE in Electronics or Communication from a recognized University or Institute

आवश्यक कागदपत्रे – (UPSC Recruitment 2023)
1. Matriculation/10th Standard or equivalent certificate indicating date of birth, or mark sheet
2. Degree/Diploma certificate as proof of educational qualification
3. Caste certificate
4. Certificate of Disability
5. Experience Certificate

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
निवड प्रकिया – मुलाखत
1. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जांमध्ये दिलेल्या माहितीच्या (UPSC Recruitment 2023) आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांना निवडले जाईल.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
3. निवड भरती चाचणी (RT) आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे केली जाते, उमेदवाराला मुलाखतीच्या टप्प्यावर त्यांच्या संबंधित श्रेणीमध्ये योग्यतेची किमान पातळी गाठावी लागेल.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या तारखा –
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Kotwal Bharti 2023 : 4थी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! राज्याच्या ‘या’ जिल्ह्यात कोतवाल भरती सुरु 

Kotwal Bharti 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । तहसिलदार कार्यालय, हिंगोली अंतर्गत कोतवाल (Kotwal Bharti 2023) पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, सेनगाव, औंढा तालुक्यात कोतवालांची 75 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – तहसिलदार कार्यालय, हिंगोली
भरले जाणारे पद – कोतवाल
पद संख्या – 75 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑगस्ट 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – हिंगोली
वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे

अर्ज फी – रु. 25/-
परीक्षा फी – (Kotwal Bharti 2023)
खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरीता – रु. 600/-
मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक उमेदवाराकरीता – रु. 400/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – Rs. 15,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही. (Kotwal Bharti 2023)
4. अर्ज व आवश्यक कागदपत्र पुराव्यासहित दिनांक २५ जुलै २०२३ ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) तहसिल कार्यालय हिंगोली येथे सादर करावेत.
5. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणा–या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही,

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
1. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
2. लेखी परिक्षा दि. 10 ऑगस्ट 2023 रोजी प्रवेश पत्राव्दारे कळविण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येईल.
3. गुणवत्ता क्रम हा लेखी परिक्षेत मिळालेल्या एकूण 100 पैकी मिळालेल्या गुणांच्या आधारावर असेल.
4. लेखी परिक्षेतील प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ 50 प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
5. लेखी परिक्षेत सामान्य ज्ञान, अंक गणित, मराठी भाषा विषय व जिल्ह्यातील भौगोलिक माहिती याचा समावेश राहिल.
6. लेखी परिक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल. (Kotwal Bharti 2023)
7. लेखी परिक्षेसाठी उपस्थित राहण्याचा प्रवास खर्च उमेदवारांना स्वतः करावा लागेल.
काही

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF जाहिरात (सेनगाव) 

PDF जाहिरात (कळमनुरी) 
PDF जाहिरात (हिंगोली) 
PDF जाहिरात (औंढा) 
PDF जाहिरात (वसमत) 
अधिकृत वेबसाईट – hingoli.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAS Success Story : IAS मधील प्रसिद्ध चेहरा; BDS ते UPSC कसा होता तनु जैन यांचा प्रवास

IAS Success Story Tanu Jain

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी(UPSC) किंवा आयएएस स्पर्धा (IAS Success Story) परीक्षा म्हटलं की काही विशेष नावं समोर येतात, त्यातीलच एक नाव म्हणजे डॉक्टर तनु जैन. या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या तसेच इतर अनेक सामान्य लोकांमध्ये तनु जैन ह्या बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत. युनियन पब्लिक सर्विस कमिशन( Union Service Public Comission) असं नाव केवळ youtube वर सर्च केल्यास तनु जैन यांचा व्हिडिओ सापडल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीतच तनु जैन हा चेहरा सर्वांना परिचयाचा आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या विविध मॉक इंटरव्यूज मधून लोकप्रिय झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक अशा तनु जैन या मुद्देसूद भाषण आणि बोलण्याचे तंत्रामुळे त्या समोरच्यावर प्रभाव पाडतात. सध्या डीआरडीओ( Defence Reserach and Development Organisation)मध्ये सहाय्यक संचालक पदावर त्या कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षा मधून उत्तीर्ण होत आपल्या देशाप्रती कार्य करण्याची इच्छा बाळगणाऱ्या अनेक तरुणांसाठी तनु जैन या प्रेरणास्थान आहेत चला तर जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल…

IAS Success Story Tanu Jain

जन्म आणि शिक्षण
डॉक्टर जैन यांचा जन्म राजधानी दिल्लीचा गजबजलेल्या (IAS Success Story) भागात झाला. आत्ताच्या काळात स्पर्धा परीक्षांसाठी मनोबल वाढवणाऱ्या डॉक्टर जैन यांचे शाळेत मात्र अभ्यासात जेमतेमच लक्ष असायचे. अगदीच मध्यमवर्गीय कुटुंबातील तनुला खेळात मात्र फारच आवड होती व यामुळेच कधीही परीक्षेत अव्वल गुण मिळवण्यासाठी त्यांच्यावर कोणीही दबाव टाकला नाही. तनु जैन यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण दिल्लीतील केंब्रिज हायस्कूल मधून झाले आहे त्यानंतर त्यांनी मेरठ येथील सुभारती मेडिकल कॉलेज मधून बीडीएस(BDS) ही पदवी प्राप्त केली .बारावीनंतर बीडीएस साठी शिष्यवृत्तीचा फॉर्म भरताना तनु यांना सरकारी कर्मचारी आणि नागरी सेवा यांचे महत्त्व कळले आणि इथूनच त्या दृष्टीने मेहनत करण्यास त्यांनी सुरुवात केली.

 

IAS Success Story Tanu Jain

IAS चा प्रवास
यूपीएससीची परीक्षा जेवढी वाटते तेवढीच कठीण आहे. मात्र डॉक्टर जैन यांनी केवळ दोन महिन्यांच्या तयारीत यूपीएससी प्रीलीम्स परीक्षा उत्तीर्ण केली. उत्तीर्ण झाल्यानंतरही त्यांनी अनेकदा ही परीक्षा दिली आणि प्रत्येक वेळी त्या यशस्वी झाल्या. एवढेच नाही तर चार वेळा त्यांनी यूपीएससीच्या मुलाखती (IAS Success Story) दिल्या आहेत. वर्ष २०१२ मध्ये डॉक्टर जैन यांनी पहिल्यांदा युपीएससीची परीक्षा दिली होती आणि प्रथमच फेरीत बाजी देखील मारली होती. २०१४ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांना इच्छेनुसार यश प्राप्त झाले त्यावेळी त्यांनी AIR 648 मिळवली होती. यानंतर त्यांना 2015 मध्ये सशस्त्र दल मुख्यालय सेवेत काम करण्याची संधी मिळाली.

IAS Success Story Tanu Jain

सोशल मीडियावर ऍक्टिव्ह
सध्या त्या एक सुप्रसिद्ध नागरी सेवक आहेत आणि यूपीएससी परीक्षा देणाऱ्यांना त्या मार्गदर्शन करतात. आपले पती वात्सल्य पंडित(IAS) यांचा मदतीने त्यांनी अनेक पुस्तके देखील लिहिलेली आहेत. या व्यतिरिक्त डॉक्टर जैन यांची मॉक इंटरव्ह्यू पॅनल मधील महत्त्वाची सदस्य महिला म्हणून ओळख आहे. वाढत्या सोशल मीडियाच्या जगात डॉक्टर जैन यांचा देखील सक्रिय सहभाग जाणवतो. Instagram वर त्यांचे 80 हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

IAS Success Story Tanu Jain

IAS पतीची…साथ मोलाची
राजधानी दिल्ली येथे तथास्तु आयसीएस (Tathastu ICS) नावाचे आयएएस कोचिंग सेंटर त्यांनी स्थापन केले आहे. डॉक्टर तनु जैन म्हणतात की, “पूर्णवेळ नोकरीसह यूपीएससी परीक्षेची तयारी करणारे उमेदवार दररोज पाच तासांपेक्षा जास्त अभ्यास करू शकत नाहीत. परीक्षेची तयारी करत असताना (IAS Success Story) भावनिक सामाजिक अध्यात्मिक आणि नातेसंबंधांचा समतोल राखणे देखील आवश्यक आहे.” डॉक्टर तनु जैन यांना त्यांच्या कामात त्यांचे पती आयएएस वात्सल्य पंडित देखील खूप सहकार्य करतात. या दाम्पत्याला राजवर्धन नावाचा मुलगा देखील आहे. त्यांचे पती वात्सल्य स्वतः एक नागरी सेवक असून मोटिवेशनल स्पीकर देखील आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Pune Top 5 Colleges : शिक्षणासाठी पुण्यात यायचंय?? हे आहेत टॉप 5 कॉलेजेस

Pune Top 5 Colleges

करिअरनामा ऑनलाईन । पुणे हे महाराष्ट्रातील असे शहर आहे (Pune Top 5 Colleges) जे भारताचे ‘एज्युकेशन हब’ म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्याला ‘विद्येचे माहेरघर’ही म्हटले जाते. पुण्यात असंख्य खासगी सार्वजनिक आणि व्यावसायिक महाविद्यालये आहेत.
पुण्यात तुम्हाला मिळणारे महाविद्यालयांचे प्रकार म्हणजे लॉ कॉलेज, आर्ट कॉलेज, फाईन आर्ट्स कॉलेज, फार्मसी कॉलेज, मेडिकल कॉलेज, मॅनेजमेंट कॉलेज, कॉमर्स कॉलेज, विज्ञान महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालये, शारीरिक शिक्षण महाविद्यालये, आर्किटेक्चर महाविद्यालये वगैरे….
पुण्यातील बहुतेक महाविद्यालये पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. देश विदेशातील अनेक विद्यार्थ्यांना पुण्यात येवून शिक्षण घेण्याची इच्छा असते. शिक्षणाचे माहेरघर ही ओळख सार्थ करणाऱ्या पुण्यातील आघाडीच्या महाविद्यालयांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

1.फर्ग्यूसन कॉलेज (Fergusson college pune)

फर्ग्युसन कॉलेज हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीने (DEC) 1895 मध्ये स्थापन केलेल्या भारतातील सर्वात जुन्या कॉलेजांपैकी एक आहे. हे महाविद्यालय सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्याशी संलग्न असलेले NAAC “A” ग्रेड मान्यताप्राप्त महाविद्यालय आहे.
फर्ग्युसन कॉलेज वाणिज्य आणि कला विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक शिक्षण, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी प्रदान करते.
Ranking – कॉलेज फॉर पोटेन्शिअल एक्सलन्स आणि UGC (विद्यापीठ अनुदान आयोग) द्वारे पुरस्कृत College of Excellence
फोन क्र. : (020) 6765 6000
पत्ता : फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर, पुणे-411 004
Website : www.fergusson..edu

Commerce Colleges in Pune

 

2.  एस. पी. कॉलेज (SP College, Pune)

एस. पी. कॉलेज हे 103 वर्षांचा शैक्षणिक इतिहास सांगणारे पुण्यातील सर्वात जुने आणि नामांकित महाविद्यालयांपैकी एक आहे. महाविद्यालय NAAC द्वारे A+ ग्रेडसह मान्यताप्राप्त (Pune Top 5 Colleges) आहे आणि ते सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्याशी संलग्न आहे. महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर या तिन्ही प्रवाहांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
फोन क्र. : (020) 24331978
पत्ता : सर परशुरामभाऊ कॉलेज, टिळक रोड सदाशिव पेठ, पुणे-411 030
Website : www.spcollege.edu

Commerce Colleges in Pune

3. एम. ई. एस. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स (Garware College, Pune)

एम. ई. एस. गरवारे महाविद्यालय 1860 मध्ये एक मालकी संस्था म्हणून सुरू करण्यात आले. एमईएस ही KG ते PG पर्यंत संपूर्ण शिक्षण देणारी आघाडीची संस्था आहे. हे महाविद्यालय पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे आणि NAAC कडून ग्रेड “A” मान्यता प्राप्त आहे. MES मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
Ranking – सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ देऊन मान्यताप्राप्त
फोन क्र : (020) 410 38345
पता : खिलारेवाड़ी, कर्वे रोड, डेक्कन जिमखाना, पुणे- 411 030
Website : www.ges.mespune.in

Commerce Colleges in Pune

4. MIT World Peace University (एम. आई. टी. पुणे)

MIT पुणे ही 1983 मध्ये स्थापन झालेली भारतातील सर्वोच्च संस्था आहे. हे महाविद्यालय UGC अंतर्गत नोंदणीकृत एक खासगी विद्यापीठ आहे ज्याचे भारतभरात 10 पेक्षा जास्त कॅम्पस आहेत. या महाविद्यालयात विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी केवळ पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
Ranking : टाइम्स बी-स्कूल रँकिंग सर्वेक्षणाद्वारे एमआयटी-डब्ल्यूपीयूला भारतातील 5 वे सर्वोत्कृष्ट खाजगी विद्यापीठ म्हणून ओळखले गेले आहे. टाइम्स बी-स्कूल रँकिंग सर्वेक्षणाद्वारे पश्चिम भारतातील टॉप बिझनेस स्कूलच्या यादीत हे विद्यापीठ 10 व्या क्रमांकावर आहे.
फोन क्र : (020) 71177104
पत्ता (Pune Top 5 Colleges) : जिजाऊ महासाहेब मार्ग, पौड रोड, कोथरूड, पुणे- ४११ ०३८
Website : www.mitpune.com

Commerce Colleges in Pune

 

5. सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स एंड कॉमर्स (Symbiosis College, Pune)

सिम्बायोसिस ही 1971 मध्ये स्थापन झालेली भारतातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स हे खाजगी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिम्बायोसिस (Pune Top 5 Colleges) अंतर्गत येते आणि ते सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्याशी संलग्न आहे. महाविद्यालयाला NAAC द्वारे A+ ग्रेडसह मान्यता मिळाली आहे. महाविद्यालय केवळ वाणिज्य आणि कला विद्यार्थ्यांसाठी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम देते.
Ranking : Outlook द्वारे 2022 मध्ये भारतातील वाणिज्यसाठी 26 व्या क्रमांकावर आहे.
फोन क्र : (020) 256 53903
पत्ता : शिवाजीनगर, सेनापती बापट मार्ग, पुणे- 411 004
Website :www.symbiozcollege.edu

Commerce Colleges in Pune

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MEA Internship 2023 : तुम्ही ग्रॅज्युएट आहात… तर मिळेल देशाच्या परराष्ट्र मंत्रालयात इंटर्नशिप करण्याची मोठी संधी

MEA Internship 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात काम (MEA Internship 2023) करण्याचं स्वप्न तुम्ही पाहत असाल तर ते पूर्ण होवू शकतं. Ministry of External Affairs Government of India च्या वतीने दरवर्षी देशभरातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना दोन सत्रांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळते. पदवी आणि पदवीधर विद्यार्थ्यांना या इंटर्नशिपसाठी अर्ज करता येणार आहे. वाचा इंटर्नशिप विषयी सविस्तर…

आवश्यक पात्रता –
1. Ministry of External Affairs च्या मुख्यालयातील इंटर्नशिपसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदवीची किमान शैक्षणिक पात्रता असलेला भारतीय नागरिक असावा.
2. पदव्युत्तर शिक्षणाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या आणि इंटर्नशिप हा त्यांच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमाचा भाग असलेले विद्यार्थी पात्र ठरू शकतात.
3. इंटर्नशिपच्या वर्षाच्या अखेर दि. 31  डिसेंबर 2023 पर्यंत उमेदवाराचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
काही अटी –
दरवर्षी, सहा महिन्यांच्या दोन टर्ममध्ये इंटर्नशिप दिली जाईल उदा. एप्रिल ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते मार्च.
पद संख्या –
मंत्रालय प्रत्येक वेळी जास्तीत जास्त 30 इंटर्न उमेदवार नियुक्त करेल.
इंटर्नशिपचा कालावधी – (MEA Internship 2023)
प्रत्येक इंटर्न किमान एक महिन्याच्या कालावधीसाठी आणि जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप करू शकेल. (हा निर्णय Ministry of External Affairs Government of India च्यावतीने घेतला जाईल)
इंटर्नशिपचे ठिकाण –
दिल्ली

अशी असेल निवड प्रक्रिया –
1. ही निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून, परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर उमेदवाराने नोंदणी केली असणे गरजेचे आहे.
2. अर्ज नोंदणी, अर्ज पडताळणी, निवड प्रक्रिया, विभागाचे वाटप, अधिसूचना, विस्तार आणि प्रमाणपत्र मंत्रालयाच्या समर्पित इंटर्नशिप पोर्टलवरच पार पडले.
3. प्रत्येक उमेदवाराला इंटर्नशिप पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
शिवाय, निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रवेश प्रमाणपत्रे प्राप्त करणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडणार असून, प्राथमिक स्क्रीनिंग आणि वैयक्तिक मुलाखत अशा या दोन फेऱ्या असण्याची शक्यता आहे. (अंतिम निर्णय अधिकृत वेबसाईटवर त्या-त्या वेळी प्रसिद्ध केले जाईल)
4. ‘कोटा कम वेटेज’ पद्धतीनुसार प्रत्येक टर्ममध्ये १४ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांतील अर्जदारांचा विचार केला जाईल.
5. उपलब्ध जागांपैकी किमान 30 टक्के जागांवर महिला उमेदवारांची निवड करण्यात येईल. यासाठी १०+२ आणि पदवी परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार मूल्यांकन करून शैक्षणिक पात्रता ठरवून निवड केली जाईल.
१० + २ आणि पदवी परीक्षांमधील शैक्षणिक कामगिरीच्या आधारे पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी राज्यनिहाय गुणवत्ता याद्या स्वतंत्रपणे तयार केल्या जातील. (MEA Internship 2023)
6. प्राथमिक तपासणी टप्प्यात TADP जिल्ह्यांतील अर्जदारांना आणि वैयक्तिक मुलाखतीच्या टप्प्यात SC/ST/OBC/EWS श्रेणीतील अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल.
7. गुणवत्ता यादीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
प्रत्येकवेळी मुलाखत प्रक्रियेतून जास्तीत जास्त ३० उमेदवारांची निवड सदर इंटर्नशिपसाठी केली जाईल.
8. निवडलेल्या कोणत्याही उमेदवाराने निवड रद्द केल्यास, संबंधित राज्यातील गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवाराला संधी दिली जाईल.

टर्मनुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी –
टर्म 1 (एप्रिल ते सप्टेंबर)

आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अंदमान आणि निकोबार बेटे, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, दिल्ली
टर्म 2 (ऑक्टोबर ते मार्च)
मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल जम्मू आणि काश्मीर, लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी
वरील माहितीनुसार प्रत्येक टर्ममध्ये, १४ राज्यांमधून २६ इंटर्न, ४ केंद्रशासित प्रदेशांमधून २ इंटर्न आणि TADP जिल्ह्यांमधून / समाजातील वंचित घटकांमधून जास्तीत जास्त गुण मिळवलेल्या २ इंटर्न उमेदवारांची  निवड केली जाऊ शकते.

मिळणारे मानधन आणि विमान भाडे –
मूलभूत खर्च चुकवण्यासाठी प्रत्येक इंटर्नला दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाईल.
उमेदवाराचे राज्य आणि दिल्ली दरम्यानच्या (MEA Internship 2023) प्रवासासाठी प्रचलित इकॉनॉमी क्लासच्या विमान भाड्याच्या कमाल मर्यादेच्या अधीन राहून एक वेळच्या विमान प्रवासाचा खर्च, अधिवास राज्य किंवा निवडलेल्या उमेदवारांच्या महाविद्यालय/विद्यापीठाकडून प्रदान केला जाईल.
इंटर्न्स त्यांच्या इंटर्नशिपच्या कालावधीत दिल्लीतील राहण्या-खाण्याची (बोर्डिंग आणि लॉजिंग) जबाबदारी उमेदवारांवर असेल.

इंटर्नना पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या –
1. इंटर्नशिप कार्यक्रम भारत सरकारद्वारे परराष्ट्र धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेची आणि त्याच्या अंमलबजावणीची ओळख करून देतो. इंटर्नला संबंधित विभाग प्रमुख (HOD) द्वारे कामाचे विशिष्ट विषय नियुक्त केले जातील. त्यानुसार संशोधन करणे, अहवाल लिहिणे, विकसित घडामोडींचे विश्लेषण करणे किंवा HOD द्वारे त्यांना सोपविलेले इतर कोणतेही कार्य पार पाडणे आवश्यक असणार आहे.
2. इंटर्नशिपच्या शेवटी, प्रत्येक इंटर्नने केलेल्या कामाचा तपशीलवार अहवाल सादर करणे अनिवार्य असणार आहे.
3. इंटर्नशिप दरम्यानच्या अभ्यासाचे परिणाम परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची बौद्धिक संपदा म्हणून राहतील आणि मंत्रालयाच्या पूर्व परवानगीशिवाय इंटर्न्स त्याचा वापर करू शकणार नाहीत.
4. इंटर्नने परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित कोणत्याही माहितीची पूर्ण गोपनीयता राखली पाहिजे.

इंटर्नशिपची समाप्ती – (MEA Internship 2023)
परराष्ट्र मंत्रालयातील इंटर्नशिप प्रोग्रामसाठी निवड आवश्यक सुरक्षा मंजुरींच्या अधीन आहे. मंत्रालय कोणतेही कारण न देता, योग्य वाटेल तेव्हा कोणत्याही वेळी इंटर्नची इंटर्नशिप रद्द करू शकतात अथवा थांबवू शकतात.
महत्त्वाची सूचना –
ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स प्रोग्राम (TADP) अंतर्गत जिल्ह्यातील उमेदवारांना आणि SC/ST/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना निवड प्रक्रियेत वेगवेगळ्या टप्प्यांवर प्राधान्य दिले जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IPPB Recruitment 2023 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ‘या’ पदावर भरती सुरु; पदवीधर उमेदवारांना नोकरीची मोठी संधी

IPPB Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत (IPPB Recruitment 2023) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुणांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. इथे कार्यकारी पदांच्या एकूण 132 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
भरले जाणारे पद – कार्यकारी
पद संख्या – 132 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2023
अर्ज फी – (IPPB Recruitment 2023)
SC/ST/PWD उमेदवार – Rs. 100/-
इतर सर्व उमेदवारांसाठी – Rs. 300/-
वय मर्यादा – 21 ते 35 वर्षे

काही महत्वाच्या तारखा –

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Graduate in any discipline.
मिळणारे वेतन – Rs. 30,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
3. उमेदवारांनी खालील (IPPB Recruitment 2023) दिलेल्या लिंक वरुन अर्ज करावे.
4. उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
निवड प्रक्रिया – मुलाखत
1. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाईल.
2. बँकेने मुलाखतीव्यतिरिक्त मूल्यांकन, गटचर्चा किंवा ऑनलाइन चाचणी घेण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
3. IPPB उमेदवारांची पात्रता, अनुभव, नोकरीच्या आवश्यकता इत्यादींच्या संदर्भात प्राथमिक स्क्रिनिंग / शॉर्ट लिस्टिंगनंतर मूल्यांकन/मुलाखत/गटचर्चा किंवा ऑनलाइन चाचणीसाठी केवळ आवश्यक उमेदवारांना कॉल करण्याचा अधिकार राखून ठेवते.
4. भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे निकाल आणि शेवटी निवडलेल्या उमेदवारांची यादी वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल. अंतिम (IPPB Recruitment 2023) निवड यादी वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.
5. लेखी परीक्षा/मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला TA/DA दिला जाणार नाही.
भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.ippbonline.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com