Success Story : या तरुणाने इंजिनिअरिंग न करता मिळवली Googleमध्ये नोकरी; पॅकेजचा आकडा ऐकून थक्क व्हाल!!

करिअरनामा ऑनलाईन । जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी (Success Story) म्हणून गुगलची गणना होते. काम आणि पगारासोबत गुगल कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा देते त्यामुळे या कंपनीत काम करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की इंजिनिअरिंग न करता देखील एका तरुणाने गुगlमध्ये नोकरी मिळवली आहे. एकूण आश्चर्य वाटेल; पण हे खरं आहे. पुण्यातील हर्षल जुईकर (Harsha Juikar) या विद्यार्थ्याने अभियांत्रिकीची पदवी नसतानाही गुगलमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळवली आहे.

50 लाखाचं पॅकेज
हर्षलचे कौशल्य आणि दृढनिश्चयामुळे त्याला 50 लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे, अशी बातमी न्यूज18 ने दिली आहे. विशेष म्हणजे हर्षलने अभियांत्रिकी क्षेत्राबाहेरील पदवी घेऊन शिक्षण पूर्ण केले आहे. अभियांत्रिकी पार्श्वभूमी असेल तरच टेक कंपन्यांमध्ये नोकरी मिळते हा समज तोडून हर्षलने गुगलमध्ये (Google) नोकरी मिळवली आहे.

नेमकं काय शिकला हर्षल?
हर्षलने संगणक कोडिंग आणि प्रोग्रामिंगमचे कौशल्य आत्मसात केले आहे. तो एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे तिथे त्याने ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये (Success Story) एमएससी पूर्ण केले आहे, हा एक अपारंपरिक अभ्यासक्रम आहे जो अनेकजण निवडत नाहीत. कौशल्य आणि अथक प्रयत्नाच्या जोरावर त्याने Google मध्ये नोकरी मिळवली आहे.

Google ने हर्षलमध्ये काय पाहिलं
नाविन्यपूर्ण कल्पनांचा पाठपुरावा करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या Google ने हर्षलमध्ये कोडिंगची क्षमता पाहिली. त्याची उल्लेखनीय प्रतिभा ओळखून, Google ने त्याला आकर्षक पगाराच्या पॅकेजसह नोकरीची ऑफर दिली आहे.

विद्यार्थ्यांसाठी काही टिप्स (Success Story)
ज्यांना आयुष्यात यशस्वी होण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हर्षलने (Harshal Juikar) काही टिप्स शेअर केल्या आहेत. तो म्हणाला, “जिज्ञासू राहा, चिकाटी ठेवा आणि अज्ञात प्रदेश शोधण्यास घाबरू नका. आपल्या आवडीच्या शोधातच आपल्याला आपला उद्देश सापडतो. टेक कंपन्या सहसा नवीन महाविद्यालयीन पदवीधरांना मोठ्या पगाराच्या पॅकेजवर घेतात.”

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अलीकडील अहवालानुसार, फेसबुकची (Facebook) मूळ कंपनी मेटा (Meta) आणि गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट या तीन सर्वाधिक पगार देणाऱ्या कंपन्यांमध्ये मोडतात. मेटा सरासरी पगाराच्या बाबतीत दुस-या क्रमांकावर आहे, कंपनी कर्मचार्‍यांना सुमारे $3,00,000 (अंदाजे रु. 2.46 कोटी) सरासरी पगार देते. अल्फाबेट $2,80,000 (अंदाजे रु. 2.29 कोटी) च्या सरासरी पगार देते. टेक कंपन्या अशा मोठ्या पगाराच्या पॅकेजवर कर्मचार्‍यांना कामावर घेत असल्या तरी ते त्यांच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये कपात करत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com