IAS Success Story : IAS मधील प्रसिद्ध चेहरा; BDS ते UPSC कसा होता तनु जैन यांचा प्रवास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी(UPSC) किंवा आयएएस स्पर्धा (IAS Success Story) परीक्षा म्हटलं की काही विशेष नावं समोर येतात, त्यातीलच एक नाव म्हणजे डॉक्टर तनु जैन. या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या तसेच इतर अनेक सामान्य लोकांमध्ये तनु जैन ह्या बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत. युनियन पब्लिक सर्विस कमिशन( Union Service Public Comission) असं नाव केवळ youtube वर सर्च केल्यास तनु जैन यांचा व्हिडिओ सापडल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीतच तनु जैन हा चेहरा सर्वांना परिचयाचा आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या विविध मॉक इंटरव्यूज मधून लोकप्रिय झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक अशा तनु जैन या मुद्देसूद भाषण आणि बोलण्याचे तंत्रामुळे त्या समोरच्यावर प्रभाव पाडतात. सध्या डीआरडीओ( Defence Reserach and Development Organisation)मध्ये सहाय्यक संचालक पदावर त्या कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षा मधून उत्तीर्ण होत आपल्या देशाप्रती कार्य करण्याची इच्छा बाळगणाऱ्या अनेक तरुणांसाठी तनु जैन या प्रेरणास्थान आहेत चला तर जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल…

IAS Success Story Tanu Jain

जन्म आणि शिक्षण
डॉक्टर जैन यांचा जन्म राजधानी दिल्लीचा गजबजलेल्या (IAS Success Story) भागात झाला. आत्ताच्या काळात स्पर्धा परीक्षांसाठी मनोबल वाढवणाऱ्या डॉक्टर जैन यांचे शाळेत मात्र अभ्यासात जेमतेमच लक्ष असायचे. अगदीच मध्यमवर्गीय कुटुंबातील तनुला खेळात मात्र फारच आवड होती व यामुळेच कधीही परीक्षेत अव्वल गुण मिळवण्यासाठी त्यांच्यावर कोणीही दबाव टाकला नाही. तनु जैन यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण दिल्लीतील केंब्रिज हायस्कूल मधून झाले आहे त्यानंतर त्यांनी मेरठ येथील सुभारती मेडिकल कॉलेज मधून बीडीएस(BDS) ही पदवी प्राप्त केली .बारावीनंतर बीडीएस साठी शिष्यवृत्तीचा फॉर्म भरताना तनु यांना सरकारी कर्मचारी आणि नागरी सेवा यांचे महत्त्व कळले आणि इथूनच त्या दृष्टीने मेहनत करण्यास त्यांनी सुरुवात केली.

 

IAS Success Story Tanu Jain

IAS चा प्रवास
यूपीएससीची परीक्षा जेवढी वाटते तेवढीच कठीण आहे. मात्र डॉक्टर जैन यांनी केवळ दोन महिन्यांच्या तयारीत यूपीएससी प्रीलीम्स परीक्षा उत्तीर्ण केली. उत्तीर्ण झाल्यानंतरही त्यांनी अनेकदा ही परीक्षा दिली आणि प्रत्येक वेळी त्या यशस्वी झाल्या. एवढेच नाही तर चार वेळा त्यांनी यूपीएससीच्या मुलाखती (IAS Success Story) दिल्या आहेत. वर्ष २०१२ मध्ये डॉक्टर जैन यांनी पहिल्यांदा युपीएससीची परीक्षा दिली होती आणि प्रथमच फेरीत बाजी देखील मारली होती. २०१४ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांना इच्छेनुसार यश प्राप्त झाले त्यावेळी त्यांनी AIR 648 मिळवली होती. यानंतर त्यांना 2015 मध्ये सशस्त्र दल मुख्यालय सेवेत काम करण्याची संधी मिळाली.

IAS Success Story Tanu Jain

सोशल मीडियावर ऍक्टिव्ह
सध्या त्या एक सुप्रसिद्ध नागरी सेवक आहेत आणि यूपीएससी परीक्षा देणाऱ्यांना त्या मार्गदर्शन करतात. आपले पती वात्सल्य पंडित(IAS) यांचा मदतीने त्यांनी अनेक पुस्तके देखील लिहिलेली आहेत. या व्यतिरिक्त डॉक्टर जैन यांची मॉक इंटरव्ह्यू पॅनल मधील महत्त्वाची सदस्य महिला म्हणून ओळख आहे. वाढत्या सोशल मीडियाच्या जगात डॉक्टर जैन यांचा देखील सक्रिय सहभाग जाणवतो. Instagram वर त्यांचे 80 हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

IAS Success Story Tanu Jain

IAS पतीची…साथ मोलाची
राजधानी दिल्ली येथे तथास्तु आयसीएस (Tathastu ICS) नावाचे आयएएस कोचिंग सेंटर त्यांनी स्थापन केले आहे. डॉक्टर तनु जैन म्हणतात की, “पूर्णवेळ नोकरीसह यूपीएससी परीक्षेची तयारी करणारे उमेदवार दररोज पाच तासांपेक्षा जास्त अभ्यास करू शकत नाहीत. परीक्षेची तयारी करत असताना (IAS Success Story) भावनिक सामाजिक अध्यात्मिक आणि नातेसंबंधांचा समतोल राखणे देखील आवश्यक आहे.” डॉक्टर तनु जैन यांना त्यांच्या कामात त्यांचे पती आयएएस वात्सल्य पंडित देखील खूप सहकार्य करतात. या दाम्पत्याला राजवर्धन नावाचा मुलगा देखील आहे. त्यांचे पती वात्सल्य स्वतः एक नागरी सेवक असून मोटिवेशनल स्पीकर देखील आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com