Kotwal Bharti 2023 : 4थी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! राज्याच्या ‘या’ जिल्ह्यात कोतवाल भरती सुरु 

करिअरनामा ऑनलाईन । तहसिलदार कार्यालय, हिंगोली अंतर्गत कोतवाल (Kotwal Bharti 2023) पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, सेनगाव, औंढा तालुक्यात कोतवालांची 75 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – तहसिलदार कार्यालय, हिंगोली
भरले जाणारे पद – कोतवाल
पद संख्या – 75 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑगस्ट 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – हिंगोली
वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे

अर्ज फी – रु. 25/-
परीक्षा फी – (Kotwal Bharti 2023)
खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरीता – रु. 600/-
मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक उमेदवाराकरीता – रु. 400/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – Rs. 15,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही. (Kotwal Bharti 2023)
4. अर्ज व आवश्यक कागदपत्र पुराव्यासहित दिनांक २५ जुलै २०२३ ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) तहसिल कार्यालय हिंगोली येथे सादर करावेत.
5. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणा–या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही,

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
1. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
2. लेखी परिक्षा दि. 10 ऑगस्ट 2023 रोजी प्रवेश पत्राव्दारे कळविण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येईल.
3. गुणवत्ता क्रम हा लेखी परिक्षेत मिळालेल्या एकूण 100 पैकी मिळालेल्या गुणांच्या आधारावर असेल.
4. लेखी परिक्षेतील प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ 50 प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
5. लेखी परिक्षेत सामान्य ज्ञान, अंक गणित, मराठी भाषा विषय व जिल्ह्यातील भौगोलिक माहिती याचा समावेश राहिल.
6. लेखी परिक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल. (Kotwal Bharti 2023)
7. लेखी परिक्षेसाठी उपस्थित राहण्याचा प्रवास खर्च उमेदवारांना स्वतः करावा लागेल.
काही

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF जाहिरात (सेनगाव) 

PDF जाहिरात (कळमनुरी) 
PDF जाहिरात (हिंगोली) 
PDF जाहिरात (औंढा) 
PDF जाहिरात (वसमत) 
अधिकृत वेबसाईट – hingoli.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com