Home Blog Page 273

Job Notification : परीक्षा न देता थेट द्या मुलाखत!! राज्यातील ‘या’ महाविद्यालयात प्राध्यापक भरती सुरु; 103 पदे रिक्त 

Job Notification (72)

करिअरनामा ऑनलाईन । पुण्यश्लोक अहिल्यादेवी (Job Notification) होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत सहायक प्राध्यापक पदाच्या 103 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे. मुलाखतीची तारीख 17, 18, 19, 21, 22 व 23 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक
पद संख्या – 103 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 17, 18, 19, 21, 22 व 23 ऑगस्ट 2023
मुलाखतीचा पत्ता – विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सभागृह
नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
सहायक प्राध्यापक – Master’s degree with 55% marks (or an equivalent grade in a point-scale wherever the grading system is
followed) in a concerned/relevant/allied subject from an Indian University, or an equivalent degree from an accredited foreign university.

मिळणारे वेतन –
सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी –
i) Qualification NET/SET/GPAT/Ph.D. holder candidates – Rs.30,000/- per month,
ii) others candidates – Rs. 25,000/- per month on consolidated pay
iii) for M.B.A. – as per sixth pay commission.

अशी असेल निवड प्रक्रिया –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
3. मुलाखतीची तारीख 17, 18, 19, 21, 22 व 23 ऑगस्ट 2023 आहे.
4. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
5. अधिक माहिती (Job Notification) करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –  PDF

अधिकृत वेबसाईट – www.sus.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Eastern Railway Recruitment 2023 : पूर्व रेल्वेमध्ये होणार नवीन भरती; 10वी ते पदवीधारकांना मिळणार संधी; 689 पदे रिक्त 

Eastern Railway Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची (Eastern Railway Recruitment 2023) इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पूर्व रेल्वे अंतर्गत असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर पदांच्या एकूण 689 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – पूर्व रेल्वे
भरले जाणारे पद –
1. असिस्टंट लोको पायलट – 390 पदे
2. तंत्रज्ञ – 99 पदे
3. कनिष्ठ अभियंता – 117 पदे
4. ट्रेन मॅनेजर – 83 पदे
पद संख्या – 689 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2023

वय मर्यादा – 42 ते 47 वर्ष
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. असिस्टंट लोको पायलट – 10th/ ITI in relevant field
2. तंत्रज्ञ – 10th/ ITI in relevant field (Eastern Railway Recruitment 2023)
3. कनिष्ठ अभियंता – Diploma in relevant field
4. ट्रेन मॅनेजर – Degree, Graduation

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
4. एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात.
5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (Eastern Railway Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.er.indianrailways.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NFSC Nagpur Recruitment 2023 : नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; कधी आणि कुठे करायचा अर्ज?

NFSC Nagpur Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल फायर सर्व्हिस (NFSC Nagpur Recruitment 2023) कॉलेज, नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहयोगी प्राध्यापक, उपसंचालक, मुख्य प्रशिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ग्रेड-I, वरिष्ठ प्रशिक्षक पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर
भरले जाणारे पद –
1. सहयोगी प्राध्यापक – 02 पदे
2. उपसंचालक – 03 पदे
3. मुख्य प्रशिक्षक – 01 पद
4. प्रयोगशाळा तंत्रज्ञ ग्रेड-I – 06 पदे
5. वरिष्ठ प्रशिक्षक – 02 पदे
पद संख्या – 14 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 सप्टेंबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
मिळणारे वेतन – (NFSC Nagpur Recruitment 2023)
1. सहयोगी प्राध्यापक – Rs. 37,400 – 67,000/- per month
2. उपसंचालक – Level-11
3. मुख्य प्रशिक्षक – Level-07
4. प्रयोगशाळा तंत्रज्ञ ग्रेड – I Level-07
5. वरिष्ठ प्रशिक्षक – Level-06

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज मुदती अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. (NFSC Nagpur Recruitment 2023)
5. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nfscnagpur.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

8th Scholarship : खुषखबर!! 8वीच्या स्कॉलरशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरु; दरमहा ‘इतकी’ रक्कम मिळणार

8th Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या (8th Scholarship) जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा 10 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी ते 12वीपर्यंत दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

काय आहे पात्रता –
1. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी ज्यांच्या पालकांचे उत्पन्न 3 लाख 50 हजारांपेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी योजनेसाठी पात्र आहेत. राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी परीक्षेस बसू शकतात.
2. तसेच विद्यार्थी इयत्ता सातवीमध्ये किमान 55 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) मधील विद्यार्थ्यांनी किमान 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला असावा; अशी माहिती परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.
3. विनाअनुदानित शाळेत, केंद्रीय विद्यालयात, जवाहर नवोदय विद्यालय, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे (8th Scholarship) विद्यार्थी आणि सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी या योजनेस पात्र ठरणार नाहीत.
4. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इयत्ता नववी व अकरावी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. इयत्ता दहावीमध्ये किमान 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे, असे ओक यांनी सांगितले.

काही महत्त्वाच्या तारखा – (8th Scholarship)
दि. 23 ऑगस्ट 2023 –
ऑनलाइन पद्धतीने अर्जाची शेवटची मुदत
दि. 2 सप्टेंबर 2023 – विलंब शुल्कासहीत अर्ज
दि. 10 डिसेंबर 2023 – परीक्षा
फेब्रुवारी 2024 – परीक्षेचा निकाल
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट –
https://www.mscepune.in
https://nmmsmsce.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

12th Exam : मोठी बातमी!! 12वी परीक्षेत केला ‘हा’ मोठा बदल; पहा किती गुणांचा असणार पेपर

12th Exam

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या शिक्षण खात्याने बारावीच्या परीक्षेत (12th Exam) बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार यापुढे बारावीचा वार्षिक पेपर 80 गुणांचा असणार आहे. तर 20 गुण अंतर्गत मूल्यमापन आणि वर्षभरातील तीन परीक्षांमधील गुणवत्तेनुसार दिले जाणार आहेत.

त्यामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना वर्षभरात होणाऱ्या चाचणी परीक्षा व विविध प्रोजेक्ट देखील चांगल्या प्रकारे सादर करावे लागणार आहेत. अनेक वर्षांपासून बारावीची परीक्षा 100 गुणांची घेतली जात आहे. मात्र, आता शिक्षण खात्याने बारावीच्या परीक्षेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना (Students) वर्षभर अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे लागणार असून शिक्षण खात्यातर्फे वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या तीन चाचणी परीक्षांमध्येही चांगले गुण मिळवावे लागणार आहेत. तीन परीक्षांपैकी दोन परीक्षांमधील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना 10 गुण दिले जाणार आहेत.

परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांचे दहा गुण ऑनलाईनद्वारे अपलोड केले जाणार आहेत. तर विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टिकोन वाढावा, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट तयार करावे लागणार आहेत. विद्यार्थ्याने प्रोजेक्ट कशाप्रकारे तयार केला आहे. यासाठी पाच गुण तर तोंडी प्रश्नांसाठी (12th Exam) पाच गुण दिले जाणार असून, हे गुण देखील परीक्षेपूर्वी अपलोड केले जाणार आहेत. त्यामुळे परीक्षेचा निकाल जाहीर होताना या वीस गुणांचे देखील महत्त्व वाढणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेतील पेपरबरोबरच मूल्यमापनाद्वारे दिल्या जाणाऱ्या 20 गुणांसाठीही चांगली तयारी करावी लागणार आहे. प्रत्येक महाविद्यालयाने परीक्षेतील बदलाबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी; अशी सूचना शिक्षण खात्याने केली आहे.

ऑनलाईन करा अर्ज (12th Exam)
बारावीचा निकाल लागल्यानंतर पुरवणी परीक्षा घेऊन देखील पुन्हा नव्याने पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ करून घेत ज्या विद्यार्थ्यांचे विषय राहिले आहेत त्यांनी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. अन्यथा अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण निर्माण होत आहे. शिक्षण खात्याच्या वेळापत्रकानुसार परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. पेपर 80 गुणांचा होणार असून, 20 गुण अंतर्गत मूल्यमापन आणि वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या तीन परीक्षांमधील गुणांच्या आधारे दिले जाणार आहेत. परीक्षेत केल्या जाणाऱ्या बदलाबाबत विषयांच्या प्राध्यापकांना माहिती देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agriculture Admission : इंजिनियरिंग प्रमाणेच होणार कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती

Agriculture Admission

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कृषी महाविद्यालयांच्या (Agriculture Admission) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे.  कृषी महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर कृषी महाविद्यालयात रिक्त जागांची माहिती मिळणार आहे. त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याला पर्याय निवडता येणार आहे. यामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार असून, महाविद्यालयांनाही अंतिम तारखेपर्यंत प्रवेश देता येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

मात्र, हा बदल नेमका कोणत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. राज्यात सध्या CET सेलमार्फत कृषी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून, सोमवार दि. 31 जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली (Agriculture Admission) जाणार आहे. नोंदणी करतानाच विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयानुसार पसंतीक्रम भरुन घेण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक फेरीसाठी निवड यादी प्रसिद्ध केली जाते. तर अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार प्रत्येक फेरीसाठी नव्याने पसंतीक्रम भरता येतात.

आता ही पध्दत कृषी अभ्यासक्रमांसाठीही राबविली जाणार आहे. कृषी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी असलेल्या महाविद्यालये किंवा संस्थांना खासगी कृषी विद्यापीठ स्थापण्यास परवानगी देण्यासंदर्भातही बैठकीत विचारविनिमय  करण्यात आला. राज्यातील विविध कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, रोपवाटिका आदींच्या प्रश्नांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले आहे.
निर्णयाचे फायदे – (Agriculture Admission)
1. विद्यार्थी केंद्रित प्रवेश प्रक्रिया
2. राखीव जागांचा लाभही विद्यार्थ्यांना मिळणार
3. कृषी प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत केंद्रीभूत पद्धतीनं राबविण्यात येणार
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PMC Recruitment 2023 : पुणे महापालिकेत शिक्षक पदांची भरती; 153 पदे रिक्त

PMC Recruitment 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका (PMC Recruitment 2023) संचलित उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक व विशेष मुलांच्या शाळांसाठी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण 153 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका संचलित उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक व विशेष मुलांची शाळा
भरले जाणारे पद –
1. उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक – 54 पदे
2. विशेष शिक्षक – 02 पदे
3. इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक – 97 पदे
पद संख्या – 153 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन (समक्ष)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 ऑगस्ट 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – (PMC Recruitment 2023)
उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे ०५
विशेष शिक्षक – विशेष मुलांची शाळा, मनपा शाळा क्र १४ मुलांची, काँग्रेस भवनमार्ग, शिवाजीनगर, पुणे ५

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रधारक व शिक्षणशास्त्र पदविका (डी. एड/बी. एड) उर्दू माध्यम, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण.

अ) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

ब) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणानुक्रमे अन्य उमेदवारांना संधी देण्यात येईल.

विशेष शिक्षक माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र धारक व बौद्धिक अक्षम प्रवर्गातील प्रशिक्षित पदविका, डी.एस.ई. (आय डी) व आर सी आय नोंदणी प्रमाणपत्र धारक.
इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक १) इयत्ता १ली ते १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण

२) इयत्ता १ली ते १० वी पर्यंत इंग्रजी, १२वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण

३) इयत्ता १ली ते १० वी मराठी अथवा इतर माध्यमातून व १२वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./ बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण

४) इयत्ता १ली ते १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण अ) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. च) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणानुक्रमे अन्य उमेदवारांना संधी देण्यात येईल.

मिळणारे वेतन –
1. उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक – Rs. 20,000/- दरमहा
2. विशेष शिक्षक – Rs. 20,000/- दरमहा
3. इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक – Rs. 20,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी अर्ज समक्ष पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर सदर करायचा आहे.
2. वरील सर्व पदांकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झालेच्या दिनांकापासून ५ दिवसांपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११.०० ते २.०० या वेळेपर्यंत अर्ज सदर करावे.
3. उमेदवाराने सादर करावयाचा विहित नमुन्यातील (PMC Recruitment 2023) अर्ज कार्यालयामार्फत वरील ठिकाणीच देण्यात येईल.
4. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2023 आहे.
6. वेळेनंतर आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाठी जाहिरात पहा –
PDF जाहिरात I 

PDF जाहिरात II 
PDF जाहिरात III 
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Semicon India 2023 : AMD बंगळुरुमध्ये करणार 400 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक; 3 हजार इंजिनीयर्सना मिळणार नोकरीची संधी

Semicon India 2023

करिअरनामा ऑनलाईन । गुजरातमध्ये वार्षिक सेमीकंडक्टर परिषद (Semicon India 2023) आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस AMD, Micron, Cadence, Lam आणि इतर उद्योगक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी  उपस्थिती लावली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी टेक मेजर असणाऱ्या AMD ने भारतात 400 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. तसेच पुढील पाच वर्षांमध्ये बंगळुरूमध्ये जवळपास 3,000 रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, AMD हे बंगळूरमध्ये सर्वात मोठे R&D केंद्र स्थापन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे केंद्र या वर्षाच्या अखेरीस सुरु होणार असल्याचा आशावाद या कार्यक्रमादरम्यान व्यक्त करण्यात आला आहे.

AMD चे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मार्क पेपरमास्टर यांनी म्हटलं की, एएमडीची भारतात मागील काही वर्षांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. 2001 मध्ये फक्त (Semicon India 2023) काही कर्मचाऱ्यांपासून सुरुवात झाली आणि सध्या 6,500 हून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. तसेच त्यांनी या प्रगतीचे श्रेय सरकारचे पाठबळ आणि देशातील व्यावसायिकांनी केलेल्या सहाय्याला दिले आहे.

तरुणांना मिळणार रोजगार
येत्या काही काळामध्ये भारतात मोठी गुंतवणूक होणार असून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचा आशावाद या कार्यक्रमादरम्यान व्यक्त करण्यात आला आहे. तसेच भारतातील उच्च शिक्षित तरुणांना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी ही योजना राबण्यात येत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

सरकार करणार 50 टक्के आर्थिक मदत (Semicon India 2023)
भारताला सेमीकंडक्टर हब बनवण्यासाठी सरकारकडून 50 टक्के आर्थिक मदत देण्यात येण्याची घोषणा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली आहे. तसेच जगभरातील अनेक कंपन्या या भारताकडे सेमीकंडक्टर हब म्हणून पाहत आहेत, त्यामुळे भारत ही संधी हातातून जाऊ देणार नाही असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी यावेळी म्हटलं आहे. नेटवर्किंग, तंत्रज्ञान आणि व्यवसाय यासारख्या संधींद्वारे सेमीकंडक्टर उद्योगाच्या प्रगतीला गती देणे हे सध्या भारताचं लक्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुजरातमधील गांधीनगर येथे सेमीकॉन इंडिया या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सेमीकंडक्टर क्षेत्रामुळे अनेक क्षेत्रांना गती मिळण्यास मदत होते असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तसेच सेमीकंडक्टर्सची आज शेतीच्या ट्रॅक्टरपासून मोबाइल फोनपर्यंत, कारपासून फ्रिजपर्यंत गरज असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

National Education Policy : मोठी बातमी!! CBSE अभ्यासक्रमात होणार बदल; आता 10+2 ऐवजी नवीन शिक्षण पद्धत येणार पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

National Education Policy (1)

करिअरनामा ऑनलाईन । पंततप्रधान नरेंद्र मोदी (National Education Policy) यांनी आज (29 जुलै) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त अखिल भारतीय शैक्षणिक परिषदेचं उद्घाटन केलं. नवी दिल्लीतील प्रगती मैदानाच्या भारत मंडप येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून देताना भविष्यातील शैक्षणिक बदलांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 10वी आणि 12वी ऐवजी नवीन शिक्षण प्रणाली राबवण्यात येणार असून CBSE अभ्यासक्रमात बदल होणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. भारताला संशोधन आणि नवीन कल्पनांचे केंद्र बनवण्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

10+2 ऐवजी येणार 5+3+3+4 शिक्षण पद्धत
“राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पारंपारिक ज्ञान प्रणालीपासून भविष्यातील तंत्रज्ञानाला संतुलित पद्धतीने महत्त्व देण्यात आले आहे. देशातील शिक्षणतज्ज्ञांनी संशोधन परिसंस्था मजबूत (National Education Policy) करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. देशातील  विद्यार्थ्यांना नवीन व्यवस्थेची चांगली माहिती आहे. 10+2 शिक्षण पद्धतीच्या जागी 5+3+3+4 शिक्षण पद्धत सुरू केली जात आहे. शिक्षणाची सुरुवात वयाच्या तिसऱ्या वर्षापासून होईल. यामुळे देशात एकरुपता येईल”; असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

देशातील सर्व CBSE शाळांसाठी एकच अभ्यासक्रम (National Education Policy)
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “येत्या काळात देशातील सर्व सीबीएसई शाळांमध्ये एकच अभ्यासक्रम लागू केला जाईल. यासाठी 22 भाषांमध्ये पाठ्यपुस्तके तयार केली जात आहेत. दरम्यान यावेळी ‘पीएमएसश्री’ योजनेचा पहिला हप्ताही जारी करण्यात आला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतील शिक्षणावरही पंतप्रधान मोदींनी भर दिला. तरुणांना त्यांच्याकडील कौशल्याऐवजी त्यांच्या भाषेच्या आधारे न्याय देणे हा त्यांच्यावर (National Education Policy) सर्वात मोठा अन्याय असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. मातृभाषेतील शिक्षणामुळे आता खरा न्याय भारतातील युवा कलागुणांना मिळणार आहे. सामाजिक न्यायासाठीही हे महत्त्वाचे पाऊल ठरेल; असंही मोदी म्हणाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SAI Recruitment 2023 : भारतीय क्रीडा प्राधिकरणात ‘या’ पदांवर भरती सुरु; महिन्याचा 80,250 पगार; पात्रता डिप्लोमा/ग्रॅज्युएट 

SAI Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत (SAI Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सल्लागार, यंग प्रोफेशनल पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – भारतीय क्रीडा प्राधिकरण
भरले जाणारे पद –
1. कनिष्ठ सल्लागार
2. यंग प्रोफेशनल
पद संख्या – 02 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑगस्ट 2023

वय मर्यादा – (SAI Recruitment 2023)
कनिष्ठ सल्लागार – 45 वर्षे
यंग प्रोफेशनल – 32 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कनिष्ठ सल्लागार – Masters’ Degree in Finance /Accounts / Commerce OR Two years PG Diploma in Financial Management/Accounting/CA/ ICMA from a recognized Institution/ University
2. यंग प्रोफेशनल –
Graduate in any discipline with Certificate /Diploma course in sports management (Certificate/Diploma duration must be more than 6 months) from a reputed institute.
MBA/Post Graduate Diploma (2 years) from a recognized University / Institution.

मिळणारे वेतन –
1. कनिष्ठ सल्लागार – Rs.80,250/- दरमहा
2. यंग प्रोफेशनल – Rs. 50,000/- to Rs. 70,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करायचा आहे.
3. इतर कोणत्याही (SAI Recruitment 2023) पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
4. दिलेल्या सूचनांनुसार अर्ज भरणे आवश्यक आहे.
5. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
6. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

PDF जाहिरात I
PDF जाहिरात II
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – sportsauthorityofindia.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com