Home Blog Page 272

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाचा मोठा निर्णय; परीक्षांचे वेळापत्रक तीन महिने आधीच जाहीर करणार; कारण?

Shivaji University (1)

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाने (Shivaji University) परीक्षांचे वेळापत्रक तीन महिने आधीच जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास आणि परीक्षेची अधिक चांगली तयारी करता यावी. मूल्यांकन, निकालाच्या प्रक्रियेतील वेळेची बचत होण्याच्या दृष्टीने प्राचार्य, प्राध्यापकांना नियोजन करता यावे; हा या निर्णयामागचा उद्देश आहे.

ऑक्टोबरपासून होणाऱ्या हिवाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर परीक्षांचे वेळापत्रक (Exam Time Table) जुलैमध्येच जाहीर केले आहे. कोरोनामुळे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले. त्याचा मूल्यांकन, निकाल जाहीर करण्यासह विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशावर परिणाम झाला. हे टाळण्यासाठी आणि वेळेत परीक्षा घेण्यासह निकाल जाहीर करण्यासाठी सध्याच्या प्रक्रियेत सुधारणा (Shivaji University) करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला. त्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली. या समितीने विद्यापीठाच्या परीक्षा नियुक्ती समितीने केलेल्या वेळापत्रकाची तपासणी केली.

या समितीच्या मान्यतेनंतर परीक्षा मंडळाने यापुढे दहावी, बारावीच्या धर्तीवर शैक्षणिक वर्षातील सत्राच्या प्रारंभालाच परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्याची हिवाळी सत्रापासून सुरुवात केली. परीक्षा मंडळाने 28 जुलै रोजी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबर ते जानेवारी या (Shivaji University) कालावधीत पदवी, पदव्युत्तर परीक्षा होणार आहेत.

पदवी, पदव्युत्तर परीक्षेच्या तीन महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्याच्या कार्यवाहीचा विद्यार्थी, प्राध्यापक आणि परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. प्राध्यापकांना अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आणि विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षेच्या तयारीचे, तर कर्मचाऱ्यांना मूल्यमापन, निकाल, फेरमूल्यांकन प्रक्रियेचे सूक्ष्म नियोजन करता येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Artificial Intelligence : AI नवीन क्षेत्र असूनही घडवले जाऊ शकते उत्तम करिअर; पहा कसं

Artificial Intelligence (1)

करिअरनामा ऑनलाईन । माणसाचं जगणं सोपं व्हावं असा AI तंत्रज्ञानाचा (Artificial Intelligence) उद्देश आहे. AI मधून मिळालेली माहिती आपल्याला एखादा निर्णय घेण्यास मदत करते, तसेच कामाचा व्याप कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात वेळेची बचत करता येते. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय? एवढे दिवस माणसाकरवी केल्या जाणाऱ्या गोष्टी आता कम्प्युटर करत आहे. किंबहुना माणसापेक्षा AI जास्ती चांगल्या प्रकारे डेटाचा वापर करू शकतो. आत्तापर्यंत मनुष्य जे निर्णय स्वतः घ्यायचा, किंवा ज्या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधायचा आज त्या कामांसाठी कॉम्प्युटरचा वापर केला जातोय. AI च्या वाढत्या वापराबरोबरच इथे असणाऱ्या करिअरच्या संधी देखील वाढत आहेत. तर काय आहेत या उपलब्ध संधी जाणून घेण्यासाठी नक्की वाचा…

असं म्हणतात की AIच्या वापरामुळे अशक्य गोष्टी देखील शक्य होत आहेत. पण खरोखरच AI हे आपल्यासाठी उत्तम करिअर आहे का?
हे एक नवखं क्षेत्र असल्यामुळे जास्ती लोकं करियरच्या दृष्टीने याचा विचार करत नाहीत. त्यामुळे संधी जरी उपलब्ध असल्या तरीदेखील ‘टॅलेंट गॅप’ पाहायला मिळते. येणाऱ्या (Artificial Intelligence) काही काळात AI क्षेत्रात अजून जास्त प्रगती होण्याची देखील शक्यता आहे. इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणारा मोबदला देखील मुबलक असतो. त्यामुळे नवीन काहीतरी करू पाहणाऱ्या मुलांनी AI चा विचार नक्की करावा.
AI मध्ये खालील प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत –
१) मशीन लर्निंग इंजिनियर
२) डेटा सायंटिस्ट
३) बिझनेस इंटेलिजन्स डेव्हलपर
४) रिसर्च सायंटिस्ट
५) डेटा आर्किटेक्ट
६) सॉफ्टवेअर इंजिनियर
७) सॉफ्टवेअर आर्किटेक्ट
८) डेटा एनालिस्ट
९) रोबोटिक्स इंजिनियर
१०) बिग डेटा इंजिनियर

AI इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी कोणते शिक्षण घ्याल?
डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स किंवा आयटी यामधून तुम्ही बारावीनंतर बॅचलरची डिग्री मिळवू शकता. यापुढे मॅथेमॅटिक्स, कॉग्नेटिव्ह सायन्स, कम्प्युटर सायन्स किंवा डेटा सायन्स मधून मास्टर्सची डिग्री मिळवली जाऊ शकते. या व्यतिरिक्त काही सर्टिफिकेट कोर्सेस देखील उपलब्ध आहेत.
भारतात काही शैक्षणिक संस्था आहेत ज्या AI क्षेत्रातील डिग्री देण्याचे काम करतात.
कोर्स कुठे कराल? (AI Institutes)
१) मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, मणिपाल.
२) व्हीआयपी भोपाल यूनिवर्सिटी (Artificial Intelligence)
३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भोपाल
४) गुजरात युनिव्हर्सिटी, अहमदाबाद.
५) कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कोची
६) श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, चेन्नई
७) जैन युनिव्हर्सिटी, बेंगलोर
८) चंदीगड युनिव्हर्सिटी

काय असतो AI कर्मचाऱ्यांचा पगार? (Salary)
AI मध्ये नवीनच रुजू झालेल्या कर्मचाऱ्याला 6,00,000 रुपये पगार मिळू शकतो तर मोठाल्या कंपन्या जसे की गुगल, अमेझॉन, फ्लिपकार्ट कडून 12,00,000 एवढ्या पगाराची अपेक्षा केली जाऊ शकते. त्यानंतर कामातून मिळणारा अनुभव, स्वतःवर घेतलेली मेहनत, आणि वाढवलेला स्किल सेट यामुळे दोन ते चार वर्ष AI इंडस्ट्री मध्ये काम करणारा माणूस 7  ते 20 लाख रुपये नक्कीच कमवू शकतो. यापुढेही नोकरीचा अनुभव असेल तर 30 ते 50 लाख किंवा 1 कोटीची रक्कम देखील कंपनीकडून देऊ केली जाते.
आतापर्यंत करिअर म्हणून विचार केलेल्या गोष्टींपेक्षा AI हे फारच वेगळं आणि नवीन क्षेत्र आहे आणि याबद्दल आपल्याला फारशी माहिती असत नाही. त्यामुळे AI हे करिअर म्हणून निवडताना आधी पुरेशी माहिती घेणं महत्त्वाचं आहे. यामध्ये तुम्हाला Programming Language, Algebra, Probability, Problem Solving Behaviour आणि उत्कृष्ट Communication Skills ची गरज असते. त्यामुळे व्यवस्थित मेहनत करत या नवीन फिल्डमध्ये देखील चांगलं करिअर घडवता येईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education or Personal Loan : एज्युकेशन आणि पर्सनल लोन; शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणाची मदत घ्यावी?

Education or Personal Loan

करिअरनामा ऑनलाईन । भारत हा एक प्रगती करणार देश आहे. आणि (Education or Personal Loan) अशा देशात शिक्षित लोकांचा मोठा वाटा असणे हे देखील देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. आजकाल आपल्या देशात लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटतंय, गावागावातील अनेक पालक आपल्या मुलांना शिक्षित बनवण्यासाठी धडपड करतायेत. प्रत्येक आई-वडिलांना असं वाटत असतं की आपलं मूल डॉक्टर, इंजिनीयर, एच आर व्हावं पण यासाठी लागणाऱ्या फीची रक्कम मात्र थेट गगनाला भिडली आहे. भारतातील सामान्य माणसाला परवडणारी ही रक्कम मुळीच नाही. पण तरीही आपल्या मुला/मुलीचे शिक्षण पूर्ण करण्याचा अट्टाहास बाळगत पालक जमेल तसा पैसा गोळा करतात. बऱ्याच वेळा मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पालक कर्ज घेतात. मात्र नेमकं कुठलं कर्ज घ्यावं, शिक्षणासाठी किती कर्जाचे प्रकार उपलब्ध आहेत आणि कोणतं कर्ज आपल्या फायद्याचं ठरेल याबद्दल पुरेशी माहिती आपल्याजवळ नसते. काय आहे पर्सनल आणि एज्युकेशन लोन हे जाणून घेण्यासाठी पुढे नक्की वाचा.

१) पर्सनल लोन म्हणजे काय?
पर्सनल लोनला मल्टीपर्पज लोन किंवा कंज्यूमर लोन असं म्हणूनही ओळखलं जातं. बँक किंवा इतर आर्थिक संस्था गरजू माणसाला काही रक्कम उधार म्हणून देत असतात. ही रक्कम देत असताना, त्या माणसाची कर्ज परत करण्याची क्षमता आहे का, त्याचा पगार किती आहे किंवा याआधी त्याने (Education or Personal Loan) कर्जाची परतफेड केलेली आहे का अशा गोष्टी लक्षात घेतल्या जातात. शक्यतो पर्सनल लोन 1 ते 5 वर्षांसाठी दिलं जातं, आपली परतफेड करण्याची क्षमता ओळखून आपण ते कर्ज  घ्यावं. इतर कर्जाच्या तुलनेत इथे जास्त कागदपत्रे देखील देण्याची गरज नसते.‌ तुमची आर्थिक स्थिती ओळखून EMI ठरवला जातो. या EMI नुसार प्रत्येक महिन्यात तुम्ही एक ठराविक रक्कम परत करायची असते.
आवश्यक कागदपत्रे (Documents)
१) इन्कम प्रुफ ( salary slip, bank account statement)
२) रहिवासी पुरावा आणि ओळखपत्र
३) लायसन्स ( व्यवसाय असलेल्यांसाठी)

२) शैक्षणिक कर्ज म्हणजे काय? (Educational Loan)
एज्युकेशन लोन हे मुलांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिलं जातं. यामध्ये ट्युशन फी, पुस्तकं किंवा शिक्षणाच्या बाबतीत आवश्यक खर्च पुरवण्यासाठी पैसे दिले जातात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिने किंवा एक वर्षाच्या कालावधीत ह्या लोनची परतफेड ही त्या विद्यार्थ्याने करायची असते. एज्युकेशन लोनचा इंटरेस्ट रेट देखील फार कमी असतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी रक्कम परत करण्यासाठी सक्षम असल्याचे गृहीत धरून हे लोन दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे( Documents)
१) दहावी आणि बारावीचे मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट.
२) कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीचे ऍडमिशन लेटर
३) फी स्ट्रक्चर
४) KYC डॉक्युमेंट
५) उत्पन्नाचा दाखला

पर्सनल आणि एज्युकेशन लोन मध्ये फरक काय?
एज्युकेशन लोन घेणाऱ्या विद्यार्थ्याला ७.५ लाख ते १.५ कोटी पर्यंत लोन मिळू शकते. पण पर्सनल लोनच्या बाबतीत मात्र ही रक्कम केवळ २५ लाख आहे जी जास्तीत जास्त ४० लाख पर्यंत जाऊ शकते. दोन्ही प्रकारच्या लोनमध्ये इंटरेस्ट रेटचा देखील फरक पाहायला मिळतो ज्यात एज्युकेशन (Education or Personal Loan) लोनचा इंन्ट्रेस्ट रेट हा ८.४५-१०.५% आहे. तर पर्सनल लोनचा आकडा हा मोठा असून १०.५-२४% प्रमाणे इंटरेस्ट रेट भरावा लागतो. पर्सनल लोन हे पालकांच्या नावी रुजू झाल्यामुळे कर्जाची रक्कम पालक स्वतः फेडत असतात तर एज्युकेशन लोन हे विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फेडायचे असते. एज्युकेशन लोन ची अजून एक आकर्षक बाब म्हणजे विद्यार्थिनींसाठी एज्युकेशन लोनचा इंटरेस्ट रेट हा फक्त ०.५% आहे.
एखादा विद्यार्थी जर आपल्या स्वबळावर शिक्षण पूर्ण करू इच्छित असेल तर त्याने एज्युकेशन लोनचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. कारण एज्युकेशन लोन हे विद्यार्थ्याला रकमेची परतफेड करण्यासाठी पुरेसा वेळ देत असते याउलट जर पालकांना सवलतीचा दरात आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करायचे असेल तर ते पर्सनल लोनचा वापर करू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

How to Become Engineer in CPWD : केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कसं बनता येईल इंजिनिअर? इथे मिळले संपूर्ण माहिती

How to Become Engineer in CPWD

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय सार्वजनिक बांधकाम (How to Become Engineer in CPWD) विभागाद्वारे दरवर्षी कनिष्ठ अभियंता पदांसाठी भरती केली जाते. ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे आयोजित केली जाते. आपल्या देशातील एका अहवालानुसार दरवर्षी 15 लाख विद्यार्थी अभियांत्रिकीमधून पदवी घेतात. यातील लाखो अभियांत्रिकी तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळण्याची इच्छा असते. अशा तरुणांसाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता पदांसाठी दरवर्षी भरती केली जाते. जर तुम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अभियंता पदावर सरकारी नोकरी हवी असेल आणि अभियंता बनण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्यायची असेल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त आहे. PWD अभियंता होण्यासाठी पात्रतेपासून निवड प्रक्रियेपर्यंतची संपूर्ण माहिती तुम्ही येथून मिळवू शकता.

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD) मध्ये SSC करते अभियंता पदांची भरती
CPWD म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करते. CPWD दरवर्षी कनिष्ठ अभियंता पदांची भरती करते. कर्मचारी निवड आयोग (SSC) ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जबाबदार आहे. यावर्षी एसएससी कनिष्ठ अभियंता (सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि क्वांटिटी) पदांसाठी भरती करणार आहे.

PWD अभियंता होण्यासाठी काय आहे पात्रता?
ज्या उमेदवारांना केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता (Engineer) व्हायचे आहे आणि एसएससी जेई भरतीमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याशिवाय, उमेदवाराकडे दोन वर्षांच्या कामाच्या अनुभवासह संबंधित ट्रेडमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असेल, तर ते देखील अर्ज करू शकतात.

आवश्यक वय मर्यादा –
या भरतीमध्ये सामील होण्यासाठी, पदांनुसार उमेदवाराचे कमाल वय 30/32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. कर्मचारी निवड आयोगाने घालून दिलेल्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
अशी आहे PWD अभियंता निवड प्रक्रिया (How to Become Engineer in CPWD)
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता होण्यासाठी उमेदवारांना प्रथम पेपर-1 (संगणक आधारित परीक्षा) परीक्षा द्यावी लागते. CBT नंतर, उमेदवारांना पेपर -2 लेखी परीक्षेला बसावे लागेल. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये यशस्वी होण्यासाठी, अनारक्षित प्रवर्गासाठी किमान 30 टक्के, OBC/EWS प्रवर्गासाठी 25 टक्के आणि SC/ST प्रवर्गासाठी 20 टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य असेल. दोन्ही पेपरमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

किती असेल पगार –
PWD अभियंता हे पद गट ‘ब’ अंतर्गत येते. या पदासाठी (How to Become Engineer in CPWD) निवडलेल्या उमेदवारांना केंद्रीय वेतन आयोग (पे मॅट्रिक्स 7) आणि स्तर 6 अंतर्गत दरमहा रु.3,5400 ते 1,12,400 रुपये दिले जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये होणार नवीन उमेदवारांची निवड; इथे आहे अर्जाची लिंक

Government Job (1)

करिअरनामा ऑनलाईन । कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत (Government Job) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकूण 93 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
भरले जाणारे पद –
1. मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) – 06 पदे
2. मॅनेजमेंट ट्रेनी (खाते) – 06 पदे
3. कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी – 81 पदे
पद संख्या – 93 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑगस्ट 2023

वय मर्यादा – 30 वर्ष
अर्ज फी – (Government Job)
UR/ EWS/ OBC उमेदवार – रु. 1500/-
SC/ ST/ PwED उमेदवार – रु. 500/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) – MBA in Agri Business Management/ Agriculture
2. मॅनेजमेंट ट्रेनी (खाते) – CA/ CMA/ MBA (Fin)/ MMS/ M.Com or PG (Commerce)
3. कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी – B.Sc (Agriculture)

मिळणारे वेतन –
1. मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) – Rs. 30,000 ते 1,20,000 (IDA)
2. मॅनेजमेंट ट्रेनी (खाते) – Rs 30,000 ते 1,20,000 (IDA)
3. कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी – Rs 22000 ते 90000 (IDA)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
3. अर्ज सादर करण्याची (Government Job) अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2023 आहे.
4. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. अर्जदारांनी अर्जासोबत अर्ज फी जमा करावी.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.cotcorp.org.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NIA Recruitment 2023 : सरकारी नोकरी!! नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सीमध्ये होणार नवीन भरती; पात्रता डिग्री 

NIA Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध रिक्त (NIA Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक पदांच्या एकूण 97 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय तपास संस्था (National Investigation Agency)
भरले जाणारे पद –
निरीक्षक –
33 पदे
उपनिरीक्षक – 39 पदे
सहायक उपनिरीक्षक – 25 पदे
पद संख्या – 97 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 सप्टेंबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NIA Recruitment 2023)
1. निरीक्षक – Bachelor Degree in any discipline
2. उपनिरीक्षक – Bachelor Degree in any discipline
3. सहायक उपनिरीक्षक – Bachelor Degree in any discipline
मिळणारे वेतन –
1. निरीक्षक – As Per Norms
2. उपनिरीक्षक – Rs. 35,400 ते 1,12,400/- दरमहा
3. सहायक उपनिरीक्षक – Rs. 29,200 ते 92,300/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जाचा नुमुना https://www.nia.gov.in/recruitment-notice.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
3. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत. (NIA Recruitment 2023)
5. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
6. कोणत्याही बाबतीत अपूर्ण अर्ज फेटाळण्यास प्रशासन जबाबदार असेल.
7. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत उमेदवारांनी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nia.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : राज्याच्या ‘या’ महापालिकेत विविध पदांवर भरती; त्वरा करा 

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । उल्हासनगर महानगरपालिका (Job Alert) कार्यक्षेत्रात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिजिशियन (औषध), प्रसूती स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि ईएनटी तज्ञ पदांच्या 21 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – उल्हासनगर महानगरपालिका
भरले जाणारे पद – (Job Alert)
1. फिजिशियन (औषध) – 03 पदे
2. प्रसूती स्त्रीरोग तज्ञ – 03 पदे
3. बालरोगतज्ञ – 03 पदे
4. नेत्ररोग तज्ञ – 03 पदे
5. त्वचारोग तज्ञ – 03 पदे
6. मानसोपचार तज्ञ – 03 पदे
7. ईएनटी तज्ञ – 03 पदे
पद संख्या – 21 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑगस्ट 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – उल्हासनगर, ठाणे
अर्ज पाठवण्याचा पत्ता – उल्हासनगर महानगरपालिका, वैद्यकिय आरोग्य विभाग, तळमजला, उल्हासनगर ३ पिन कोड – ४२१००३
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. फिजिशियन (औषध) – MD Medicine, DNB
2. प्रसूती स्त्रीरोग तज्ञ – MD/MS Gyn/DGO/DNB
3. बालरोगतज्ञ – MD Paed/DCH/DNB (Job Alert)
4. नेत्ररोग तज्ञ – MS Opthalmologist/DOMS
5. त्वचारोग तज्ञ – MD(Skin/VD) DVD,DNB
6. मानसोपचार तज्ञ – MS Pyschiatrist/DPM/DNB
7. ईएनटी तज्ञ – MS ENT/DORL/DNB

मिळणारे वेतन –
1. फिजिशियन (औषध) – To visit once in every week. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patient checked of his/her speciality to maximum Rs. 5000 visit
2. प्रसूती स्त्रीरोग तज्ञ – To visit once in every week. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patient checked of his/her speciality to maximum Rs. 5000 visit
3. बालरोगतज्ञ – To visit once in every week. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patient checked of his/her speciality to maximum Rs. 5000 visit
4. नेत्ररोग तज्ञ – To visit once in every fortnight: Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/- visit.
5. त्वचारोग तज्ञ – To visit once in every fortnight: Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/- visit.
6. मानसोपचार तज्ञ – To visit once (Job Alert) in every fortnight: Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/- visit.
7. ईएनटी तज्ञ To visit once in every fortnight: Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/- visit.

आवश्यक कागदपत्रे –
1. विहीत नमुन्यातील अर्ज
2. १० वी गुणपत्रक आणि सनद
3. MS-CIT प्रमाणपत्र
4. अनुभव प्रमाणपत्र
5. रहिवासी प्रामणपत्र
6. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी तसेच नुतनीकरण प्रमाणपत्र

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
3. अर्जाची ऑनलाईन पद्धतीने www.umc.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करावी. तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचे वेबसाईटवर सुद्धा ही लिंक उपलब्ध राहील.
4. प्रत्यक्ष अर्जाची प्रत सुद्धा कार्यालयात आणुन द्यायची आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील उमेदवारांनी अर्ज पोस्टाद्वारे कार्यालयीन पत्यावर पाठवायचे आहेत.
5. मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

निवड प्रक्रिया – मुलाखत
1. Walk in Interview करिता दिनांक ०३/०८/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता उपस्थित रहावे.
(शनिवार व रविवार कार्यालय बंद राहील.)
2. कोणत्याही कारणामुळे मूळ कागदपत्रांशिवाय मुलाखतीस पात्र ठरविले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
3. मुलाखतीवेळी सादर केलेल्या कागदपत्रांपैकी कोणतेही कागदपत्र खोटे/ चूकीचे आढळल्यास संबंधित उमेदवाराची नियुक्ती संपुष्टात आणण्यात येईल. (Job Alert)
4. मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर रहावे लागेल.

भरतीचा तपशील –

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.umc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Salary Ratio in India : महाराष्ट्राबाहेर जावून नोकरी करायची आहे? कोणत्या राज्यात मिळते किती सॅलरी? घ्या माहिती…

Salary Ratio in India

करिअरनामा ऑनलाईन । स्थलांतर हे मानवासाठी नवीन नाही. कामाच्या (Salary Ratio in India) निमित्ताने एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि गावांकडून शहरांमध्ये स्थलांतर होतच असते. एवढेच नाही तर एका राज्यातून दुसरा राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असते. जेव्हा कामानिमित्त स्थलांतर होते तेव्हा ज्या ठिकाणी आपल्याला कामासाठी जायचे आहे त्या ठिकाणी असलेली कामाची उपलब्धता किंवा नोकऱ्यांची उपलब्धता, त्या ठिकाणी मिळणारे पगार व इतर सोयी सुविधांचा विचार प्रामुख्याने केला जातो.

हीच बाब दुसऱ्या राज्यात कामाला किंवा नोकरीच्या निमित्ताने जाताना सुद्धा प्रामुख्याने पाहिली जाते. कारण नोकरीसाठी दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या शहरांमध्ये जात असताना आपल्याला ज्या ठिकाणी कामाचा मोबदला जास्तीत जास्त मिळेल त्या ठिकाणी जाण्याला बरेच जण पसंती देतात. यामध्ये जर आपण मासिक पगाराचा विचार केला तर भारतामध्ये सरासरी मासिक वेतन हे राज्यानुसार वेगवेगळे आहे. त्यामुळे दुसऱ्या राज्यात नोकरीनिमित्त जाण्याचा निर्णय घेत असाल  तर त्या ठिकाणचे सरासरी मासिक वेतन किती आहे; हे पाहूया…

देशातील काही राज्यातील सरासरी मासिक पगार –
1 उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेश राज्याचा विचार केला तर या ठिकाणचे नागरिक मोठ्या प्रमाणावर कामानिमित्त इतर राज्यांमध्ये जातात. परंतु असे असताना देखील उत्तर प्रदेश या (Salary Ratio in India) देशातील सर्वाधिक सरासरी मासिक वेतन देणारे राज्य असून ते इतर राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. जर आपण उत्तर प्रदेश राज्यातील प्रति व्यक्तीचा सरासरी मासिक पगार पाहिला तर तो 20 हजार 730 रुपये इतका आहे.
2 पश्चिम बंगाल – पश्चिम बंगाल हे साधारणपणे औद्योगिक दृष्ट्या मागासलेले राज्य असून देखील हे सरासरी मासिक वेतन देण्यामध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पश्चिम बंगाल मध्ये एका व्यक्तीचा सरासरी मासिक पगार हा 20,210 इतका आहे.
3 महाराष्ट्र – या यादीत तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. हे औद्योगिक दृष्ट्या प्रगत असे राज्य असून कृषी क्षेत्रात देखील महाराष्ट्रामध्ये खूप मोठा विकास झालेला आहे. जर या ठिकाणी असलेल्या सरासरी मासिक पगाराचा विचार केला तर तो 20 हजार 11 रुपये इतका आहे.

4 बिहार – बिहार देखील एक औद्योगिकदृष्ट्या मागासलेले राज्य असून औद्योगिक विकास झाला नसल्यामुळे या ठिकाणचे बरेच लोक इतर राज्यांमध्ये कामासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतात. असे असताना देखील मासिक सरासरी पगार देणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये बिहार चौथ्या क्रमांकावर आहे. या ठिकाणचे सरासरी मासिक उत्पन्न 19,960 रुपये इतके आहे.
5 राजस्थान- या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर राजस्थान हे राज्य असून या ठिकाणी देखील हवा तेवढा औद्योगिक विकास झालेला नाही. या ठिकाणचे सरासरी मासिक उत्पन्न हे 19,740 रुपये आहे.
6 मध्य प्रदेश – मध्यप्रदेश राज्य कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण असून कृषी क्षेत्राचा या ठिकाणी चांगल्याप्रकारे विकास झालेला आहे. तसेच औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून देखील मध्य प्रदेश एक महत्त्वाचे राज्य आहे. या ठिकाणचे सरासरी मासिक उत्पन्न हे 19,740 इतके आहे.

7 तामिळनाडू- (Salary Ratio in India) हे दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे राज्य असून औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून हे राज्य प्रगत आहे. या राज्यामध्ये सरासरी मासिक उत्पन्न 19 हजार सहाशे रुपये असून या यादीमध्ये ते सातव्या क्रमांकावर आहे.
8  कर्नाटक- हे देखील देशातील एक महत्त्वाचे राज्य असून महाराष्ट्राच्या शेजारी असलेले राज्य आहे. हे राज्य देखील आता झपाट्याने विकसित होत असून या यादीमध्ये ते आठव्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी सरासरी मासिक उत्पन्न हे 19,150 इतके आहे.
9 गुजरात – औद्योगिक दृष्टिकोनातून अतिशय प्रगत समजले जाणारे आणि व्यापार उदीमसाठी देखील गुजरात खूप प्रसिद्ध राज्य आहे. परंतु असे असताना देखील सरासरी मासिक उत्पन्न असलेल्या यादीमध्ये गुजरात नवव्या क्रमांकावर असून या ठिकाणचे सरासरी मासिक उत्पन्न हे 18,880 रुपये इतके आहे.
10 ओडिसा – या यादीमध्ये ओडिसा हे दहाव्या स्थानावर असून या ठिकाणचे सरासरी मासिक उत्पन्न 18 हजार 790 रुपये इतके आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CAT 2023 Registration : IIM CAT परीक्षेच्या नोंदणीसाठी ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात

CAT 2023 Registration

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, (CAT 2023 Registration) लखनऊ लवकरच कॉमन अॅडमिशन टेस्टसाठी  (CAT 2023) अधिसूचना जारी करणार आहे. या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी IIM ची अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in तपासू शकतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), लखनऊ CAT 2023 परीक्षा आयोजित करणार आहे.

इच्छुक उमेदवारांना CAT 2023 परीक्षेसाठी दि. 2 ऑगस्ट 2023 पासून अर्ज करता येणार आहे. दि. 13 सप्टेंबर 2023  पर्यंत ही प्रक्रिया सुरु राहील. CAT 2023 परीक्षा दि. 26 नोव्हेंबर रोजी तीन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे; यासाठी परीक्षेचे प्रवेशपत्र दि. 25 ऑक्टोबरपासून जारी केले जाईल.

ही परीक्षा 155 चाचणी केंद्रांमध्ये आयोजित केली जाईल; यासाठी उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार कोणतीही सहा चाचणी शहरे निवडण्याचा पर्याय दिला जाणार आहे. CAT 2023 ही प्रवेश परीक्षा IIMसह देशभरातील बिझनेस स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी निवडलेल्या उमेदवारांसाठी घेतली जाते. कॅट परीक्षेच्या पद्धतीनुसार या परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असणार आहे. गेल्या वर्षीच्या पॅटर्ननुसार प्रश्न पत्रिकेत एकूण तीन विभाग असतील.

परीक्षेसाठी आवश्यक पात्रता – (CAT 2023 Registration)
1. उमेदवाराकडे किमान 50 टक्के गुणांसह किंवा समान CGPA असलेली UG पदवी असावी.
2. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि अपंग व्यक्ती (PWD) श्रेणीतील उमेदवारांना 45 टक्के पात्रता गुण असणे आवश्यक आहे.
3. जे उमेदवार UG पदवीच्या अंतिम वर्षासाठी किंवा समकक्ष पात्रता परीक्षा देत आहेत, ज्यांनी पदवी पूर्ण केली आहे आणि निकालाची वाट पाहात आहेत ते या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

नोंदणी फी –
CAT 2023 परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी, उमेदवारांना SC, ST आणि PwD श्रेणीतील उमेदवारांसाठी 1200/- रुपयांचे नोंदणी शुल्क तर इतर (CAT 2023 Registration) सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी 2400/- रुपये भरावे लागतील .

कसा करायचा अर्ज –
1. सर्वप्रथम IIM ची अधिकृत वेबसाईट iimcat.ac.in ला भेट द्या.
2. त्यानंतर येथील मुख्यपृष्ठावरील CAT 2023 नोंदणीवर क्लिक करा.
3. युनिक युजर आयडी आणि पासवर्ड तयार करण्यासाठी नोंदणी करा.
4. अर्ज भरण्यासाठी जनरेट केलेला युजर आयडी (User ID) आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Netflix Bumper Job Openings : अव्वाच्या सव्वा पगार देतंय नेटफ्लिक्स!! लवकरच होणार बंपर जॉब ओपनिंग 

Netflix Bumper Job Openings

करिअरनामा ऑनलाईन । आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा अनेक (Netflix Bumper Job Openings) दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू आहे. या तंत्रज्ञानाच्या बाजूने आणि याच्या विरुद्ध अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या नोकऱ्या जातील अशी भीती व्यक्त केली जात आहे. ही भीती कितपत खरी ठरते, हे येणारा काळच सांगेल, पण या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी नक्कीच मिळू शकते.

AIला हॉलिवूडमध्ये होतोय विरोध
Netflix या ऑनलाइन कंटेंट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या कंपनीने अलीकडेच एक जागा भरली आहे. कंपनी सध्या  AI प्रॉडक्ट मॅनेजर शोधत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल हॉलीवूडमध्ये प्रचंड विरोध होत असताना नेटफ्लिक्सने एआय प्रॉडक्ट मॅनेजरची जागा भरत आहे. हॉलिवूडच्या रायटर्स असोसिएशन आणि इतर संस्था मनोरंजन उद्योगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अल्गोरिदमवरील वाढत्या अवलंबित्वामुळे संतप्त आहेत.

नेटफ्लिक्स देणार 9 लाख डॉलर पगार
नेटफ्लिक्सच्या या जॉबसाठी कंपनी एआय प्रॉडक्ट मॅनेजरच्या पदासाठी 9 लाख डॉलर पर्यंत वार्षिक पगार देऊ करत आहे, ज्याची रक्कम सुमारे 7.4 कोटी रुपये आहे. (Netflix Bumper Job Openings)
एआय प्रॉडक्ट मॅनेजरचे काम नेटफ्लिक्सच्या मशीन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करणे आणि कंटेंट तयार करण्यासाठी एआयचा वापर करणे हे असेल.

‘या’ पदासाठीही लोकांची आवश्यकता
एआय प्रॉडक्ट मॅनेजर व्यतिरिक्त, नेटफ्लिक्सला आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित इतर लोकांची देखील आवश्यकता आहे. कंपनीने टेक्निकल डायरेक्टरची जागा भरली आहे. या पदासाठी कंपनीकडून वार्षिक 4.5 लाख ते 6.5 लाख डॉलर्स पगाराची ऑफर दिली जात आहे. याचा (Netflix Bumper Job Openings) अर्थ नेटफ्लिक्स एका वर्षात 3.70 कोटी ते 5.35 कोटी रुपये पगार टेक्निकल डायरेक्टरला देईल. देश आणि जगातील अनेक मोठ्या कंपन्‍या आता आपल्‍या विविध कामांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा अधिकाधिक वापर करत आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि ओपन AIच्या चॅटजीपीटी आणि गुगलच्या बार्डने जगाला नवीन तंत्रज्ञानाची ओळख करुन दिली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com