Home Blog Page 271

SWAYAM Portal Courses : ‘स्वयम पोर्टल’वर करता येणार 9वी ते इंजिनिअरिंगचे कोर्स; घ्या ऑनलाईन शिक्षण तेही अगदी मोफत 

SWAYAM Portal Courses

करिअरनामा ऑनलाईन । शालेय तसेच महाविद्यालयीन (SWAYAM Portal Courses) विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. उच्च शिक्षण घेण्याची  इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या स्वयम पोर्टलवर (SWAYAM Portal) इयत्ता 9 वी ते पदवी अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन कोर्स करता येणार आहे. विशेष म्हणजे हे कोर्स विनामूल्य असणार आहेत. यामध्ये आयआयएम बेंगलोर (IIM Benglore) आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठांसारख्या (IGNOU) 9 प्रतिष्ठीत संस्था को-ऑर्डिनेटरच्या भूमिकेत असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

कोर्स नंतर सर्टिफिकेट मिळणार
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) विद्यापीठांना त्यांचे 40 टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन करण्याची परवानगी दिली आहे. या अंतर्गत विद्यापीठे ‘स्वयम पोर्टल’चा वापर करू शकतील. स्वयम पोर्टल मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने चालवले जात आहे. यूजीसीच्या नियमानुसार विद्यार्थी विद्यापीठ, महाविद्यालयीन अभ्यासक्रम करण्यासोबतच पोर्टलवर स्वतः अभ्यास करू शकतील आणि तिथून (SWAYAM Portal Courses) मिळालेले गुणही त्यांच्या पदवीमध्ये ग्राह्य धरण्यात येतील. विशेष बाब म्हणजे विद्यार्थी पोर्टलवरच मोफत अभ्यास करू शकतात, यासाठी कोणतेही शूल्क आकारण्यात येणार नाही. जर एखाद्या कोर्ससाठी सर्टिफिकेट हवं असेल तर 1000 रुपये भरून दिलेल्या ठिकाणी परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्याचे सर्टिफिकेट मिळणार आहे.

‘स्वयम पोर्टल’ म्हणजे काय?
भारत सरकारने फेब्रुवारी 2017 मध्ये स्वयम पोर्टल सुरू केले. याद्वारे नववीच्या वर्गापासून ते पदवी पर्यंतचे विद्यार्थी विविध अभ्यासक्रम ऑनलाईन माध्यमातून मोफत करू शकतात. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थी 2100 हून अधिक अभ्यासक्रम शिकू शकतात. यासाठी एक हजाराहून अधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्वयम हा भारत सरकारने सुरू केलेला एक कार्यक्रम आहे. प्रवेश, समानता आणि गुणवत्ता ही देशातील शैक्षणिक धोरणाची तीन मुख्य तत्त्वे साध्य करण्यासाठी देशातील (SWAYAM Portal Courses) नामांकीत शिक्षकांच्या मदतीने हा कोर्स तयार करण्यात आलेला आहे. काही कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षणाची संधी देणे, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून सर्व घटकांना ज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी स्वयंम

SWAYAM वर या प्रकारामध्ये आयोजित केले जातात अभ्यासक्रम
1) व्हिडीओ लेक्चर.
2) खास तयार केलेले वाचन साहित्य, हे डाउनलोड करता येतं.
3) टेस्ट आणि प्रश्नमंजुषांद्वारे स्व-मूल्यांकन चाचण्या.
4) शंका निरसणासाठी ऑनलाईन डिस्कशन फोरम.

सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी राष्ट्रीय को-ऑर्डिनेटर म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या 9 संस्था –
1. AICTE (All India Council for Technical Education) स्वयं शिक्षणासाठी आणि आंतरराष्ट्रीय कोर्ससाठी.
2. NPTEL (National Programme on Technology Enhanced Learning) अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी.
3. UGC (University Grants Commission) नॉन टेक्निकल पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स.
4. CEC (Consortium for Educational Communication) पदवीपूर्व शिक्षणासाठी.
5. NCERT (National Council of Educational Research and Training) शालेय शिक्षणासाठी.
6. NIOS (National Institute of Open Schooling) शालेय शिक्षणासाठी.
7. IGNOU (Indira Gandhi National Open University) दूरस्थ विद्यार्थ्यांसाठी.
8. IIMB (Indian Institute of Management, Bangalore) मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी.
9. NITTTR (National Institute of Technical Teachers Training and Research) शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी.

कोणकोणते कोर्स करू शकता (SWAYAM Portal Courses)
SWAYAM पोर्टलसाठी आर्ट, ह्युमॅनिटी, इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान, लॉ, मॅनेजमेंट, अॅग्रीकल्चर इत्यादी विषयांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यासाठी https://swayam.gov.in/ या लिंकद्वारे नोंदणी करता येईल. नावनोंदणी प्रक्रियेचे दोन प्रकार आहेत. पोर्टलवर आधीच निश्चित कालावधीचे अभ्यासक्रम आणि इतर स्वयं-गती अभ्यासक्रम आहेत. निश्चित मुदतीच्या अभ्यासक्रमांना अंतिम मुदत असते. सेल्फ-पेस कोर्सेससाठी वेळ मर्यादा नाही.
कोर्ससाठी प्रमाणपत्र मिळवायचे असेल तर त्याची माहिती आधी द्यावी लागेल आणि नंतर कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, विहित नियमांसह संबंधित संस्थेकडून प्रमाणपत्र प्राप्त केले जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : देशातील सर्वात मोठा नोटांचा छापखाना कोठे आहे? रेल्वेचे डबे कुठे तयार होतात?

GK Updates 2 Aug

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 : जपान या देशाच्या संसद गृहास काय म्हणतात?
उत्तर : डायट
प्रश्न 2 : विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो?
उत्तर : राज्यपाल (GK Updates)
प्रश्न 3 : चुंबकीय वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर : अलिबाग (रायगड)

प्रश्न 4 : चंद्राचा किती टक्के भाग आपणास दिसू शकत नाही?
उत्तर : 41%
प्रश्न 5 : नागार्जुन सागर धारण प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
उत्तर : कृष्णा नदी
प्रश्न 6 : भारतीय रेल्वेचा डबे निर्मिती कारखाना कुठे आहे?
उत्तर : पेराम्बूर
प्रश्न 7 : (GK Updates) भारताचा सर्वात मोठा नोटांचा छापखाना कोठे आहे?
उत्तर : इंडिया सेक्युरिटी प्रेस, नाशिक

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment 2023 : 10 वी/ITI उत्तीर्णांसाठी महावितरण अंतर्गत भरती सुरु; त्वरा करा

Mahavitaran Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण (Mahavitaran Recruitment 2023) कंपनी लिमिटेड, भंडारा येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटीस (विजतंत्री, तारतंत्री, कोपा) पदांच्या एकूण 36 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज (नोंदणी) करायची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, भंडारा
भरले जाणारे पद –
1. अप्रेंटीस (वायरमन) – 15 पदे
2. अप्रेंटीस (तारतंत्री) – 15 पदे
3. अप्रेंटीस (कोपा) – 06 पदे
पद संख्या – 36 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. 10+2 Pass/ ITI
2. अप्रेंटीस ITI Pass in Relevant field
नोकरी करण्याचे ठिकाण – भंडारा
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे (Mahavitaran Recruitment 2023)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. दिलेल्या मुदतीनंतर अर्ज करता येणार नाही.
3. अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
4. अधिक माहितीसाठी https://www.apprenticeshipindia.gov.in या संकेत स्थळावर भेट द्यावी.
काही महत्वाच्या लिंक्स – (Mahavitaran Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यसाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : सरकारी भरती!! वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत नोकरीची संधी

Job Notification (74)

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि (Job Notification) नगर हवेली आणि दमण आणि दीव अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक, आणि ज्येष्ठ निवासी, आरोग्य शिक्षक, चिकित्सक, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक पदांच्या एकूण 99 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव
भरली जाणारी पदे –
1. प्राध्यापक – 14 पदे
2. सहयोगी प्राध्यापक – 16 पदे
3. सहायक प्राध्यापक – 17 पदे
4. शिक्षक – 16 पदे
5. ज्येष्ठ निवासी – 15 पदे
6. आरोग्य शिक्षक – 02 पदे
7. चिकित्सक – 01 पद
8. बालरोगतज्ञ – 01 पद (Job Notification)
9. स्त्रीरोगतज्ज्ञ – 01 पद
10. भूलतज्ज्ञ – 01 पद
11. जनरल सर्जन – 03 पदे
12. ऑर्थोपेडिक सर्जन – 01 पद
13. पॅथॉलॉजिस्ट – 01 पद
14. वैद्यकीय अधिकारी – 09 पदे
15. व्यवस्थापक – 01 पद
पद संख्या – 99 पदे

वय मर्यादा – 45 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा-396230
निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
प्राध्यापक – MD/MS
सहयोगी प्राध्यापक – MD/MS
सहायक प्राध्यापक – MD/MS
शिक्षक – MD/MS
ज्येष्ठ निवासी – MD/MS
आरोग्य शिक्षक – MD/MS/DNB
चिकित्सक – MD/MS/DNB
बालरोगतज्ञ – MD/MS/DNB
स्त्रीरोगतज्ज्ञ – MD/MS/DNB
भूलतज्ज्ञ – MD/MS/DNB
जनरल सर्जन – MD/MS/DNB
ऑर्थोपेडिक सर्जन – MD/MS/DNB
पॅथॉलॉजिस्ट – MD/MS/DNB
वैद्यकीय अधिकारी – MBBS
व्यवस्थापक – MBA in Hospital Administration/ Health & Hospital Management

असा करा अर्ज – (Job Notification)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.

निवड प्रक्रिया – मुलाखत
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. दस्तऐवज पडताळणीसाठी तुम्हाला सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि दस्तऐवज पडताळणीसाठी मूळ प्रमाणपत्रांसह प्रमाणित छायाप्रतीच्या एक संच आणणे आवश्यक आहे.
5. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ddd.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Van Vibhag Exam : 2 वर्षाच्या अभ्यासावर क्षणात फिरलं पाणी; 1 मिनिट उशीर झाल्याने परीक्षार्थी केंद्राबाहेर; वन विभाग परीक्षेत गोंधळ

Van Vibhag Exam

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारच्या वनविभाग परीक्षेत मोठा (Van Vibhag Exam) गोंधळ उडाला आहे. परीक्षेला फक्त 1 मिनिट उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा वर्गातून बाहेर ठेवण्याचा प्रकार घडल्याचे वृत्त समोर आले आहे. पुणे रामटेकडी येथील सुयोग हब परीक्षा केंद्रावर 25 ते 30 विद्यार्थ्यांना उशीरा आल्याने बाहेर ठेवले असून या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा  घ्यावी; अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.

आज (दि. 2 ऑगस्ट) रामटेकडी पुणे या ठिकाणी वन विभागाच्या पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा सुरु होती. 1 मिनिट उशीर झाला म्हणून पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांना बाहेर काढले गेले. या विद्यार्थ्यांनी रडतच पुण्यातील मराठा क्रांती संघटनेशी संपर्क साधला. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांकडून (Van Vibhag Exam) शासनाने एक हजार रुपये परीक्षा शुल्क आकारले आहे. 1 हजार परीक्षा शुल्क भरणारे 35 लाख विद्यार्थी आहेत. फक्त महाराष्ट्रामध्ये 7000 हजार जागा आहेत. एकीकडे नोकरीसाठी स्पर्धा सुरु असताना 25 ते 30 विद्यार्थी बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.

वन विभागाच्या (Van Vibhag) परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी दोन वर्ष अभ्यास केला आहे. या विद्यार्थ्यांसंदर्भात शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होण्यापासून थांबवावे अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल; असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) धनाजी साखळकर यांनी दिला आहे.
राज्यभरातील अनेक परीक्षा केंद्रांवर असा प्रकार घडला आहे. परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारला याबाबत निवेदन दिले जाणार आहे, असे साखळकर यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Nitin Desai : आपल्या कलेतून चित्रपटाच्या सेटवर जिवंतपणा आणणारे नितीन देसाई कितवी शिकले? जाणून घ्या…

Nitin Desai

करिअरनामा ऑनलाईन । प्रख्यात कला दिग्दर्शक (Nitin Desai) नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनीच उभारलेल्या एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. त्यांच्या आत्महत्येने मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी हादरली आहे. मराठी आणि बॉलिवूडमधील विविध चित्रपटांचे जिवंत सेट्स उभारणाऱ्या नितीन देसाईंचे शिक्षण माहिती करुन घेण्यासाठी पुढे वाचा…

Nitin Desai

 

दापोलीच्या निसर्गाने कलाकार घडवला
नितीन देसाई यांचा जन्म 9 ऑगस्ट 1965 रोजी दापोली येथे झाला. दापोलीतील निसर्गरम्य वातावरण नितीन देसाई यांच्यातील कलाकारांना घडवण्यास कारणीभूत ठरलं. लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत ते निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेतेही होते. अनेक सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कलादिग्दर्शन केलं आहे. अनेक लोकप्रिय सिनेमांच्या निर्मितीत त्यांचं मोलाचं योगदान होतं.

Nitin Desai

 

असा आहे शैक्षणिक प्रवास (Nitin Desai)
जन्म दापोलीमध्ये झालेल्या नितीन देसाई यांचं शिक्षण मात्र मुंबईत झालं आहे. मुलुंडच्या वामनराव मुरंजन हायस्कुलच्या मराठी माध्यमाच्या शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे त्यांनी फोटोग्राफीमधील शिक्षण घेण्यासाठी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आणि एल. एस. रहेजा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी जे.जे कलाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. कलादिग्दर्शक नितीश रॉय यांच्याकडे त्यांनी सुरुवातीला कलादिग्दर्शनाचे धडेही गिरवले आहेत.
त्यांनी कालांतराने 2D आणि 3D world फॉरमॅट फोटोग्राफी सोबत कलादिग्दर्शनाकडे (Arts Direction) आपला मोर्चा वळवला.

Nitin Desai

या सुपरहिट सिनेमांचं केलं कला दिग्दर्शन (Art Direction)
‘1942 अ लव्ह स्टोरी’ या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला. जोधा अकबर, अजिंठा, हरिश्चंद्राची फॅक्टरी, हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास आणि बालगंधर्व सारख्या मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांचे जिवंत सेट्स असो, मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागच्या राजाचा लक्षवेधून घेणारा देखावा असो किंवा दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारे भव्य चित्ररथ असो… या आणि यांसारख्या (Nitin Desai) अनेक कलाकृती आणि जगातील विविध ठिकाणे आपल्या डोळ्यांसमोर हुबेहूब उभी करून त्यात जिवंतपणा आणणारा कलाकार म्हणजे नितीन देसाई.
नितीन देसाईंनी कलादिग्दर्शनात यश मिळू लागल्यानंतर मालिका आणि सिनेमांच्या निर्मितीकडे मोर्चा वळवला. ‘राजा शिवछत्रपती’, ‘बाजीराव मस्तानी’,’मराठी पाऊल पडते पुढे’ अशा अनेक गाजलेल्या सिनेमांची आणि ‘बालगंधर्व’सारख्या सिनेमाची निर्मिती त्यांनी केली आहे. पुढे ‘अजिंठा’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवलं.

Nitin Desai

52 एकरात एन. डी. स्टुडिओची स्थापना (ND Studio)
विविध कलाकृतींच्या माध्यमातून निर्माता, दिग्दर्शक, कलादिग्दर्शक, अभिनेता अशा विविध भूमिकांमधून नितीन देसाई यांनी कायम प्रेक्षकांची मने जिंकली. तर, विविध चित्रपटांच्या (Nitin Desai) सेट्स चा अनुभव प्रेक्षकांनाही घेता यावा म्हणून त्यांनी कर्जतमध्ये तब्बल 52 एकर परिसरात भव्य एन डी स्टुडिओचीही स्थापना केली. चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार, तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कारही नितीन देसाई यांना मिळाला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Teacher Recruitmemt 2023 : D.Ed., B.Ed. उमेदवारांसाठी मोठी बातमी!! राज्याच्या ‘या’ विभागात होणार 8 हजार शिक्षक पदांची भरती

Teacher Recruitmemt 2023

करिअरनामा ऑनलाईन । नाशिक विभागात लवकरच (Teacher Recruitmemt 2023) तब्बल 8 हजार शिक्षक पदांची भरती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे बी.एड. आणि डी. एड. झालेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.

येत्या महिनाभरात संचमान्यतेनंतर किमान साडेसात ते आठ हजार जागा नाशिक विभागात रिक्त होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे बी.एड. व डी.एड. करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी वाढणार आहेत. अनेक वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे.

शिक्षकांवर कामाचा ताण (Teacher Recruitmemt 2023)
पवित्र पोर्टल 2017 पासून लागू झाल्यानंतर शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे अनुदानित शाळेतील शिक्षकांवर कामाचा मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. इंग्रजी माध्यमाकडे मुलांचा शिकण्याचा कल असल्यामुळे अनेक तुकड्या सध्या कमी होत आहेत. शिवाय लाखोंच्या संख्येने डी. एड. व बी. एड. झालेले भावी शिक्षक सध्या नोकरीच्या प्रतीक्षेत आहे.

या जिल्ह्यांमध्ये रिक्त होणार जागा
नाशिक विभागात येणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये किमान आठ हजार जागा रिक्त होतील; असा अंदाज शिक्षण उपसंचालकांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेसह (Teacher Recruitmemt 2023) खासगी शिक्षण संस्थांच्या प्राथमिक विभागात जागा रिक्त होण्याचे प्रमाण अधिक आहे, तर माध्यमिक स्तरावर मध्यम आहे. निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या जागी अनेक संस्थांनी मानधन तत्त्वावर शिक्षक भरले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Sports Jobs : खेळाडूंसाठी मोठी संधी!! कोल्हापूरच्या ‘या’ शाळेत कबड्डी क्रीडा प्रशिक्षक भरती सुरु 

Sports Jobs

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत मुख्य (Sports Jobs) कबड्डी क्रीडा प्रशिक्षक आणि सहाय्यक कबड्डी क्रीडा प्रशिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – जिल्हा परिषद, कोल्हापूर
भरले जाणारे पद –
1. मुख्य कबड्डी क्रीडा प्रशिक्षक
2. सहाय्यक कबड्डी क्रीडा प्रशिक्षक
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 ऑगस्ट 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Sports Jobs)

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कबड्डी क्रीडा प्रशिक्षक   NIS (Kabaddi Game) Diploma and 3 years training experience in Kabaddi game/ Must be a national medal winner in NPED and recognized Kabaddi competition and have 3 years training experience in Kabaddi.
सहाय्यक कबड्डी क्रीडा प्रशिक्षक NIS (Kabaddi Game) Diploma and 3 years training experience in Kabaddi game/Must be a national medal winner in BPED and recognized Kabaddi competition and have 3 years training experience in Kabaddi.

मिळणारे वेतन –
1. मुख्य कबड्डी क्रीडा प्रशिक्षक – Rs. 20,000/- दरमहा
2. सहाय्यक कबड्डी क्रीडा प्रशिक्षक Rs. 12,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. (Sports Jobs)
4. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्जाचा नमुना व इतर माहिती zpkolhapur.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
6. अर्ज दि. 4 ऑगस्ट 2023 रोजी सांयकाळी 4.00 वा. पर्यंत स्विकारले जातील.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट- zpkolhapur.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IBPS Recruitment 2023 : सरकारी मेगाभरती!! IBPS अंतर्गत 1402 पदांची निघाली जाहिरात; या लिंकवर करा अर्ज 

IBPS Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । IBPS ने रिक्त पदांच्या भरतीसाठी (IBPS Recruitment 2023) अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून  विविध तज्ञ अधिकारी पदाच्या एकूण 1402 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – Institute of Banking Personnel Selection
भरले जाणारे पद –
1. IT Officer (Scale-I) – 120 पदे
2. Agricultural Field Officer (Scale-I) – 500 पदे
3. Rajbhasha Adhikari (Scale-I) – 41 पदे
4. Law Officer (Scale-I) – 10 पदे
5. HR/Personnel Officer (Scale-I) – 31 पदे
6. Marketing Officer (Scale-I) – 700 पदे
पद संख्या – 1402 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2023

अर्ज फी –
SC/ST/PWBD – Rs. 175/- (inclusive of GST)
for all others – Rs. 850 /- (inclusive of GST)
काही महत्वाच्या तारखा –

Important Events Dates
Commencement of on-line registration of application 01/08/2023
Closure of registration of application 21/08/2023
Closure for editing application details 21/08/2023
Last date for printing your application 05/09/2023
Online Fee Payment 01/08/2023 to 21/08/2023

 

 

 

 

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

Post Educational Qualification
I.T. Officer a) 4 year Engineering/Technology Degree in Computer Science/ Computer Applications/Information Technology/Electronics/Electronics & Telecommunications/ Electronics & Communication/Electronics &
Instrumentation
OR
b) Post Graduate Degree in Electronics/Electronics & Tele Communication/Electronics & Communication/Electronics & Instrumentation/Computer Science/Information Technology/Computer Applications
OR
Graduate having passed DOEACC ‘B’ level
Agricultural Field Officer 4 year Degree (graduation) in Agriculture/Horticulture/Animal Husbandry/Veterinary Science/Dairy Science/Fishery Science/ Pisciculture/Agri. Marketing & Cooperation/Co-operation & Banking/ Agro-Forestry/Forestry/Agricultural Biotechnology/Food Science/ Agriculture Business Management/Food Technology/Dairy Technology/ Agricultural Engineering/ Sericulture (IBPS Recruitment 2023)
Rajbhasha Adhikari Post Graduate Degree in Hindi with English as a subject at the degree
(graduation) level
OR
Post graduate degree in Sanskrit with English and Hindi as subjects at the
degree (graduation) level.
Law Officer A Bachelor Degree in Law (LLB) and enrolled as an advocate with Bar Council
HR/Personnel Officer Graduate and two years full time post graduate degree or two years full time post graduate diploma in Personnel Management /Industrial Relations/HR /HRD/Social Work /Labour Law.
Marketing Officer Graduate and two years full time MMS (Marketing)/two years full time MBA (Marketing)/two years full time PGDBA/PGDBM/PGPM/PGDM with specialization in Marketing

 

Events Fees –
1. General Rs. 850 /-
2. OBC Rs. 850 /- (IBPS Recruitment 2023)
3. SC/ST/PH Rs. 175 /-
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.

काही महत्वाच्या लिंक्स – (IBPS Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Clerk Recruitment 2023 : पुण्याच्या ‘या’ शाळेत क्लर्क पदावर नवीन भरती; लगेच करा Apply

Clerk Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । वायुसेना शाळा चंदन नगर, पुणे विविध (Clerk Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य लिपिक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – वायुसेना शाळा चंदन नगर, पुणे
भरले जाणारे पद – मुख्य लिपिक
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – वायुसेना शाळा चंदन नगर, 9, BRD, चंदननगर AF, पुणे -411014
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

वय मर्यादा – 45 ते 60 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Clerk Recruitment 2023)
1. Minimum 2 years working experience in NPF
2. Medically Fit
3. Work experience Of Managerial Nature Of Minimum 1 year
मिळणारे वेतन –
मुख्य लिपिक – Rs. 25,000/- दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
3. अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली (Clerk Recruitment 2023) आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
4. सविस्तर जाहिरात अटी, शर्ती तथा अर्जासह www.afscn.in वर उपलब्ध आहे.

आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (बायोडेटा)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.afscn.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com