Home Blog Page 270

Bharati Vidyapeeth Recruitment 2023 : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! भारती विद्यापीठ अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात

Bharati Vidyapeeth Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत (Bharati Vidyapeeth Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – भारती विद्यापीठ, पुणे
भरली जाणारी पदे –
1. प्राध्यापक – 2 पदे
2. सहयोगी प्राध्यापक – 1 पद
3. सहायक प्राध्यापक – 1 पद
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Bharati Vidyapeeth Recruitment 2023)

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक Ph.D. degree in relevant field and first class or equivalent at either Bachelor’s or Master’s level in the relevant branch and minimum of 10 years of experience in teaching / research / industry out of which at least 3 years shall be at a post equivalent to that of an Associate Professor and at least 6 research publications at the level of Associate Professor in SCI journals / UGC / AICTE approved list of journals and at least 2 successful Ph.D. guided as Supervisor / Co-supervisor till the date of eligibility of promotion or at least 10 research publications at the level of Associate Professor in SCI journals / UGC / AICTE approved list of journals till be date of eligibility of promotion.
सहयोगी प्राध्यापक Ph.D. degree in the relevant field and first class or equivalent at either Bachelor’s or Master’s level in the relevant branch and at least total 6 research publications in SCI journals / UGC / AICTE approved list of journals and minimum of 8 years of experience in teaching / research / industry out of which at least 2 years shall be Post Ph.D. experience.
सहायक प्राध्यापक B. Pharm. and M. Pharm/ Pharm. D. in the relevant specialization with First Class or equivalent in any one of the two degrees

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज सादर करायचा आहे.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – bvp.bharatividyapeeth.edu
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Central Railway Reruitment 2023 : लोको पायलटसह ज्युनियर इंजिनिअर, ट्रेन मॅनेजर होण्याची संधी; रेल्वेने जाहीर केली 1303 पदांवर मेगाभरती

Central Railway Reruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी करण्याची (Central Railway Reruitment 2023) इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या मध्य रेल्वे अंतर्गत असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर पदाच्या तब्बल 1303 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – मध्य रेल्वे
भरले जाणारे पद –
1. असिस्टंट लोको पायलट – 732 पदे
2. तंत्रज्ञ – 255 पदे
3. कनिष्ठ अभियंता – 234 पदे
4. ट्रेन मॅनेजर – 82 पदे
पद संख्या – 1303 पदे (Central Railway Reruitment 2023)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 सप्टेंबर 2023

वय मर्यादा –
UR उमेदवार – 18 ते 42 वर्षे
OBC उमेदवार – 18 ते 45 वर्षे
SC/ST उमेदवार – 18 ते 47 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. असिस्टंट लोको पायलट – 10th/ ITI in relevant field
2. तंत्रज्ञ – 10th/ ITI in relevant field
3. कनिष्ठ अभियंता Diploma in relevant field
4. ट्रेन मॅनेजर Degree, Graduation

असा करा अर्ज – (Central Railway Reruitment 2023)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
4. एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहीरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Worlds Top 10 Entrance Exams : तुम्हाला माहित आहेत का जगातील टॉप 10 प्रवेश परीक्षा

World’s Top 10 Entrance Exams

करिअरनामा ऑनलाईन | स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणं (Worlds Top 10 Entrance Exams) आणि करिअर सेट करणं कठीण झालंय. प्रत्येकाला आपलं करिअर घडवण्यासाठी खडतर प्रयत्न करावे लागतात. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या स्पर्धात्मक काळात टिकाव धरणं जरा कठीण आहे. पण तरीही मेहनत आणि स्वतःवरच्या विश्वासाने ध्येय गाठलं जावू शकतं. आता असे अनेक करिअर पर्याय समोर येत आहेत ज्याचा वापर करुन तुम्ही करिअरमध्ये ऊंची गाठू शकता. देश-विदेशात अशा अनेक स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात. तर कोणत्या आहेत या परीक्षा ज्या पार केल्यानंतर घडवलं जाऊ शकतं एक आकर्षक करिअर…

1)आयआयटी जेईई (IIT-JEE)
जेईई (JEE) या परीक्षेला आपल्या देशात फार महत्त्व आहे. सर्वाधिक कठीण परीक्षांपैकी ही एक मानली जाते. ज्या मुलांना इंजिनीयर बनण्याची इच्छा आहे त्यांनी ही परीक्षा द्यावी. जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन (JEE Entrance Exam) ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर भारतातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजेमध्ये प्रवेश मिळवला जाऊ शकतो. ही परीक्षा जेईई-मेन आणि जेईई ऍडव्हान्स अशा दोन पातळींवर घेतली जाते.

2) गेट (Worlds Top 10 Entrance Exams)
ग्रॅज्युएट एपटीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग म्हणजेच GATE ही प्रवेश परीक्षा इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. भारत, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, इथिओपिया आणि युनायटेड अरब एमराइट्स (UAE) मध्ये देखील ही परीक्षा घेतली जाते. भारतीय विज्ञान संस्था आणि सात भारतीय तंत्रज्ञान संस्थांद्वारे संयुक्तपणे ही परीक्षा घेतली जाते.

3) नीट (NEET)
नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट (NEET) ही नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाणारी परीक्षा आहे. भारतातील इतर स्पर्धा परीक्षांप्रमाणे नीटला देखील विद्यार्थी विशेष प्राधान्य देतात. डॉक्टर आणि डेंटिस्ट बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागते.

4) यूपीएससी( UPSC)
भारतात सगळ्यात कठीण आणि सर्वोच्च मानली जाणारी ही परीक्षा आहे. तसेच जे विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना विशेष सन्मान मिळतो व त्यांची वाहवा केली जाते. ही परीक्षा (World’s Top 10 Entrance Exams) युनियन पब्लिक सर्विस कमिशनद्वारे म्हणजेच संघ लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाते. परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय नागरी सेवेमध्ये नोकरी करण्याची संधी प्राप्त होते. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा (Indian Administrative Services), भारतीय परकीय सेवा (Indian Foreign Services) आणि इंडियन पोलीस सेवा (Indian Police Services) अशा सेवांचा समावेश होतो.

5) नेट सेट परीक्षा (NET/SET Exam)
भारतात ज्या विद्यार्थ्यांना असिस्टंट प्रोफेसर किंवा ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून रुजू व्हायचे आहे त्यांना ही परीक्षा द्यावी लागते. नेट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET/SET) ज्याच्या अंतर्गत तुम्ही भारतात कुठेही नोकरी मिळवू शकता, पण स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण केल्यानंतर त्या राज्यातच नोकरी मिळवली जाऊ शकते. नेट सोबत जेआरएफ मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला खास स्कॉलरशिप दिली जाते.

6) युएसएमएलई USA (USMLE)
युनायटेड स्टेट्स मध्ये मेडिकल लायसन्स मिळवण्यासाठी ही परीक्षा अनिवार्य आहे. ‘युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसनिंग एक्झामिनेशन’ असे या परीक्षेचे नाव असून फेडरेशन ऑफ स्टेट मेडिकल बोर्ड आणि नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल एक्झामिनर्स यांच्यावतीने ही परीक्षा घेतली जाते.

7) गाओकाओ (GAOKAO)
चीनमधील कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. चीनमधील सर्वोत्कृष्ट कॉलेजेस मधून जर तुम्हाला पदवी मिळवायची असेल तर ही परीक्षा उत्तीर्ण करणं (World’s Top 10 Entrance Exams फार महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांना चायनीज आणि गणित या विषयांमध्ये ही परीक्षा द्यावी लागते. याशिवाय पर भाषियांसाठी इंग्रजी, फ्रेंन्च, जपानी, रशियन, जर्मन किंवा स्पॅनिश यांतील भाषा निवडण्याची मुभा असते. याव्यतिरिक्त लिबरल आर्ट्स, नॅचरल सायन्स पैकी एक विषय निवडावा लागतो

8) मेन्सा (MENSA)
मेन्सा ही आयक्यू टेस्ट करणारी परीक्षा आहे. केवळ 98% किंवा त्याहून जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतात.
9) जीआरइ परीक्षा (GRE)
ही परीक्षा द एज्युकेशनल टेस्टिंग सर्विसेस द्वारे घेतली जाते. या परीक्षेमध्ये वरबाल रीजनिंग, एनालेक्ट्रिकल रायटिंग आणि कॉन्टिटेटिव्ह रिझनिंगचा समावेश असतो. ज्या (World’s Top 10 Entrance Exams) विद्यार्थ्यांना एमस किंवा एमबीए करण्याची इच्छा आहे त्यांनी ही परीक्षा द्यावी.

10)कॅलिफोर्निया बार एक्झाम यूएसए( California Bar Exam)
वकील होण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेत ही परीक्षा घेतली जाते. इथे तुम्हाला विविध प्रश्न विचारले जातात या व्यतिरिक्त एक परफॉर्मन्स टेस्ट देणंही आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : कोण आहे ‘दबंग लेडी’ अंकिता शर्मा? नुसत्या नावानेच नक्षलवाद्यांचा उडतो थरकाप

UPSC Success Story of Ankita Sharma IPS

करिअरनामा ऑनलाईन । देशात सर्वात अवघड (UPSC Success Story) मानली जाणारी परीक्षा म्हणजे UPSC. देशातील अनेक विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत घेत असतात. ही परीक्षा पार करणारी लोकं आज देशातील तरुणांसाठी आदर्श बनले आहेत. आजची कहाणी देखील अशाच एका IPS ऑफिसरची आहे. त्या किरण बेदी (Kiran Bedi) यांना आपला आदर्श मानतात. आजही त्यांच्या नावामुळे नक्षलवाद्यांचा थरकाप उडतो. ही गोष्ट आहे दबंग लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या IPS अधिकारी अंकिता शर्मा (Ankita Sharma) यांची… तर कोण आहेत अंकिता शर्मा हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा….

UPSC Success Story of Ankita Sharma IPS

 

छत्तीसगडच्या आहेत अंकिता शर्मा
IPS (IPS) अंकिता शर्मा यांचा जन्म 25 जून 1990 रोजी छत्तीसगडमध्ये झाला. त्यांचे वडील राकेश शर्मा हे व्यापारी होते तर त्यांची आई गृहिणी आहे. आपल्या दोन बहिणींमध्ये अंकिता या सर्वात मोठ्या आहेत. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असलेल्या अंकिता यांनी सरकारी शाळेतून आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. पदवी (Graduation) पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी MBA (MBA) पूर्ण केले. यानंतर UPSC कडे त्यांनी आपला मोर्चा वळवला.

UPSC Success Story of Ankita Sharma IPS

नुसत्या नावाने नक्षलवाद्यांचा उडतो थरकाप (UPSC Success Story)
अंकिता यांनी पूर्ण ताकदीने UPSC (UPSC) च्या अभ्यासाला सुरवात केली. केवळ तिसऱ्याच प्रयत्नात त्यांना UPSC मध्ये यश मिळालं आहे. या परिक्षेत त्यांना संपूर्ण भारतातून 203 वी रॅंक मिळाली आहे. 2018  बॅचच्या अंकिता या छत्तीसगड कैडरच्या IPS अधिकारी आहेत. वर्ष 2022 पासून त्या खैरगड येथे SP म्हणून कार्यरत आहेत. या आधीच त्यांनी आपल्या धडक कारवाईतून नक्षलवाद्यांवर असा काही दरारा बसवला की आजही देशाच्या कानाकोपऱ्यातील नक्षलवादी केवळ त्यांच्या नावाने घाबरतो.

UPSC Success Story of Ankita Sharma IPS


कोण आहेत अंकिता शर्मा यांच्या आदर्श?
अंकिता असं म्हणतात की त्यांना लहानपणीपासूनच किरण बेदींसारखं बनायचं होतं. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणतात की UPSC बद्दल त्यांना काहीच माहिती (UPSC Success Story) नव्हती व यामुळेच त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. मात्र किरण बेदी यांच्याकडून प्रेरणा घेत त्या आयपीएस अधिकारी बनल्या. अंकिता यांचे पती विवेकानंद भारतीय सेनेत मेजर म्हणून कार्यरत आहेत; ते आपली पत्नी अंकिता यांना‌ कामात नेहमीच मोलाची साथ देत असतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Options from Commerce Stream : 12 वी Commerce झालंय? CA/CS सोडून काहीतरी वेगळं करायचं आहे? ‘या’ आहेत उपलब्ध संधी

Career Options from Commerce Stream

करिअरनामा ऑनलाईन। असं म्हणतात की शिक्षण (Career Options from Commerce Stream) घेतल्यामुळे देशाची प्रगती होते. त्यामुळे आपल्या देशातील जेवढे तरुण शिक्षित होतील, तेवढीच आपली प्रगती देखील चांगली होईल. काही वर्षांपूर्वी डॉक्टर किंवा इंजिनियर होणं म्हणजे मोठ्या अचीव्हमेंट्स मानल्या जायच्या. पण आजकाल या विचारांत बदल होताना दिसतोय. तरुण मुलं जास्तीत जास्त पर्याय शोधू पाहतायेत, काहीतरी नवीन करण्याची इच्छा त्यांच्या मनात तयार होत आहे. मग अशावेळी आर्ट्स घेतलं म्हणजे टीचिंग फील्ड, सायन्स घेतलं तर इंजिनियर किंवा डॉक्टर आणि कॉमर्स म्हणजे सीए ही चौकट मोडली जात आहे. इंटरनेटच्या या जगात अगदी सोप्या पद्धतीने नवनवीन करिअर ऑप्शन्स शोधले जाऊ शकतात. कॉमर्स मधून 12वी केल्यानंतर केवळ सीए (CA) किंवा सी एस (CS) न करता याशिवाय काही वेगळं करिअर निवडले जाऊ शकते हे तुम्हाला माहित आहे का? तर काय आहेत या वेगळ्या दिशा जाणून घेण्यासाठी पुढे नक्की वाचा….

कोणत्या आहेत ह्या वेगळ्या दिशा?
1. Event Management
2. Business
3. MBA
4. MA-Economics

1. Event Management : आजकाल लग्न, मुंजी अशा पारंपारिक समारंभांपासून अनेक प्रकारच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात. आणि इथे प्रकर्षाने गरज असते ती एका इव्हेंट मॅनेजरची. तुम्हाला जर मॅनेजमेंटची आवड असेल तर इव्हेंट मॅनेजमेंट ह्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध आहेत. इथे तुमच्याजवळ आलेल्या इव्हेंटचंं प्लॅनिंग करणं, त्याच्यासाठी लागणारा खर्च, गरज पडल्यास स्टेज शो, येणाऱ्या पाहुण्यांसाठी बैठक व्यवस्था आणि जेवणाची सोय यासारख्या गोष्टींची  तयारी करावी लागते. एका गटाचं कुशल नेतृत्व करणारा माणूस, संयमासह यामध्ये करिअर घडवू शकतो.
12वीत पडलेल्या मार्कनुसार इव्हेंट मॅनेजमेंटसाठी ऍडमिशन दिली जाते, यात डिग्री किंवा डिप्लोमा असे दोन्हीही ऑप्शन्स खुले आहेत. उत्कृष्ट कम्युनिकेशन स्किल्स, टाईम मॅनेजमेंट, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स यांच्या जोरावर इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये करिअर केलं जाऊ शकतं.
Top Colleges : (Career Options from Commerce Stream) National Institute Of Event Management(Delhi), Pearl Academy (Jaipur), Chandigarh University, DY Patil International University

2. Business : जर तुम्हाला कोणाच्या हाताखाली काम करायची इच्छा नसेल, तर अशावेळी तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकता. अनेकदा यासाठी कुठल्या विशिष्ट डिग्रीची गरज नसते. आपल्याजवळ असलेल्या स्किल्सचा वापर करुन आपण उत्तमरित्या एखादा व्यवसाय करु शकतो. पण अशावेळी कॉमर्समधून घेतलेली डिग्री तुम्हाला या क्षेत्राबद्दल जास्त माहिती देऊ शकते. त्यामुळे बारावीनंतर MBA, B. Com, मार्केटिंग सारखे कोर्सेस घेऊन तुम्ही तुमच्या आवडत्या बिजनेसची सुरुवात करु शकता. बिझनेसची सुरुवात करताना सुद्धा भरपूर संयमाची गरज असते, याव्यतिरिक्त तुम्ही एका गटासोबत काम करत असता त्यामुळे त्याचं नेतृत्व कसं करावं हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे.

3. MBA : बारावी झाल्यानंतर तुम्ही बीबीए(BBA) आणि त्यानंतर एमबीए(MBA) ची डिग्री मिळवू शकता. मार्केटिंग व्यतिरिक्त तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट, ट्रॅव्हल एंड टुरिझम मधून देखील डिग्री मिळवू शकता. त्यामुळे तुमच्या आवडी ओळखून तुम्ही हा कोर्स निवडला पाहिजे. एमबीए मध्ये प्रोडक्ट मॅनेजर, बिझनेस एनालिस्ट, डिजिटल मार्केटिंग मॅनेजर, फायनान्स मॅनेजर अशा काही पोझिशन्स उपलब्ध असतात. भारतात अशी अनेक कॉलेजेस आहेत जी एमबीएची डिग्री तुम्हाला मिळवून देऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला ऑफिस वर्क करायचा असेल तर एमबीए ही एक उत्तम संधी उपलब्ध आहे.
Top Colleges : IIM ( Lakhnow), IIM( Indore), IIM( Ahmedabad)

4. MA. Economics : तुम्हाला कॉलेज किंवा हायर सेकंडरी मध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्याची इच्छा असल्यास एमए इकॉनॉमिक्स ही डिग्री मिळवली जाऊ शकते. बारावीनंतर कॉमर्स या फिल्ड मधून बी इकॉनॉमिक्स आणि त्यानंतर एमएची पदवी मिळवली जाते. मुळातच इकॉनॉमिक्स (Career Options from Commerce Stream) या विषयात असलेल्या आवडीमुळे तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये HoD चे पद सुद्धा मिळवू शकता. मात्र कॉलेजमध्ये सह प्राध्यापक म्हणून रुजू होण्यासाठी या NET/SET परीक्षांची आवश्यकता आहे त्याचबरोबर कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही अर्ज करत आहात त्यानुसार कदाचित तुम्हाला PhDची गरज वाटू शकते.
Top Colleges : LSR( Delhi), Christ University ( Bangalore), MCC( Chennai), Morden College (Pune).
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : पदवीधारकांसाठी राज्याच्या ‘या’ बँकेत नोकरीची संधी; अर्ज करा E-Mail

Banking Job (5)

करिअरनामा ऑनलाईन । भाग्यलक्ष्मी महिला सहकारी (Banking Job) बँक लि. नांदेड अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि. नांदेड
भरले जाणारे पद – मुख्य कार्यकारी अधिकारी
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑगस्ट 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – नांदेड
वय मर्यादा – 35 ते 50 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Job)

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी उमेदवार पदवीधर व सीएआयआयबी / डिप्लोमा इन बँकींग अॅण्ड फायनान्स/ डिप्लोमा इन को-ऑपरेटीव्ह बिझनेस मॅनेजमेंट किंवा तत्सम पात्रताधारक किंवा कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. CA / Cost Accountant / MBA (Finance) असल्यास प्राधान्य.

 

असा करा अर्ज –

1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन E-Mail पध्दतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे (Banking Job) अगोदर करावा.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती देणे अपेक्षित आहे. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.bhagyalakshmibank.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC Declares 20 Universities as Fake : देशात 20 बोगस विद्यापीठे; UGCने जाहीर केली यादी; महाराष्ट्रात कोणते?

UGC Declares 20 Universities as Fake

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला ऐकून (UGC Declares 20 Universities as Fake) आश्चर्य वाटेल पण विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) 20 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दिल्लीतील आठ विद्यापीठांचा समावेश आहे. या विद्यापीठांना विद्यार्थ्यांना कोणतीही पदवी देण्याचा अधिकार नसल्याचे UGCने म्हटले आहे. दिल्लीव्यतिरिक्त कर्नाटक, महाराष्ट्र, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये बनावट विद्यापीठे आहेत.
UGCचे सचिव मनीष जोशी म्हणाले की, UGC कायद्यातील तरतुदींच्या विरोधात अनेक संस्था पदवी देत असल्याचे UGCच्या निदर्शनास आले आहे. अशा विद्यापीठांनी दिलेली पदवी उच्च शिक्षण किंवा रोजगाराच्या उद्देशाने मान्यताप्राप्त किंवा वैध असणार नाही. या विद्यापीठांना कोणतीही पदवी देण्याचा अधिकार नाही.

बनावट विद्यापीठांची यादी (UGC Declares 20 Universities as Fake)
1. दिल्ली (Delhi)
दिल्लीत आठ बनावट विद्यापीठे आहेत. यामध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस, प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर सेंट्रिक ज्युरिडिकल युनिव्हर्सिटी, कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दरियागंज, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनीअरिंग, विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि अध्यात्मिक विद्यापीठ यांचा समावेश आहे.
2. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)
उत्तर प्रदेशात चार बनावट विद्यापीठे आहेत. यामध्ये गांधी हिंदी विद्यापीठ, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यापीठ (मुक्त विद्यापीठ) आणि भारतीय शिक्षा परिषद यांचा समावेश आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळमध्येही बनावट विद्यापीठे आहेत.

3. आंध्र प्रदेश (Aandhra Pradesh)
आंध्र प्रदेशात ख्रिस्त न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी, बायबल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया यांना बनावट घोषित करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन आणि इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अँड रिसर्च यांना बनावट घोषित करण्यात आले आहे.
4. कर्नाटक (Karnataka)
कर्नाटकच्या बडगानवी सरकार वर्ल्ड ओपन (UGC Declares 20 Universities as Fake) युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी, केरळच्या सेंट जॉन्स युनिव्हर्सिटीला बनावट घोषित करण्यात आले आहे.

5. महाराष्ट्र (Maharashtra)
या यादीत महाराष्ट्रातील राजा अरेबिक विद्यापीठाचा समावेश आहे. तसेच पुद्दुचेरीच्या श्री बोधी अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, कोलकाता, पश्चिम बंगाल, इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अँड रिसर्च, कोलकाता, पश्चिम बंगाल यांना बनावट विद्यापीठ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2023 : NHM सातारा अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; इथे पाठवा अर्ज

NHM Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा (NHM Recruitment 2023) अंतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांमधील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून परिचर, सफाई कामगार आणि इतर रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा
भरले जाणारे पद –
1. परिचर – 31 पदे
2. सफाई कामगार – 31 पदे
3. इतर पदे – 12 पदे
पद संख्या – 74 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा (Satara)
भरतीचा तपशील –

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ई-मेल व पोस्टाने प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (NHM Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.
6. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (NHM Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – mahatenders.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : UPSC साठी सोडली फिल्मी दुनिया, आधी PCS नंतर IAS अधिकारी बनून करतेय देशसेवा

Success Story IAS H S Kirtana

करिअरनामा ऑनलाईन । चित्रपटांमध्ये, अनेक अभिनेते आणि अभिनेत्री (Success Story) आपल्याला पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसतात. परंतु वास्तविक जीवनात अभिनेत्री किंवा अभिनेत्याने IAS झाल्याची कथा क्वचितच कोणी तरी ऐकली असेल. मात्र एका बालकलाकाराने आपले चित्रपट जग सोडून आपला सगळा वेळ UPSCच्या तयारीत घालवला आहे हे खरे आहे. UPSCची तयारी करण्यासाठी या बाल कलाकाराने अभिनय क्षेत्राला बाय बाय करत अभ्यासाकडे आपला मोर्चा वळवला. प्रामाणिक प्रयत्न करुन परीक्षाही पास केली. एच. एस. कीर्तनाने हे यश कसं मिळवलं यासाठी पुढे वाचा…

UPSC साठी टेलिव्हिजनचे जग सोडले (Success Story)
अनेक चित्रपट आणि टीव्ही शो केलेल्या बालकलाकार एच. एस. कीर्तनाने (HS Kirtana) टीव्हीचे चकाचक जग सोडून UPSCच्या तयारीसाठी आपला वेळ दिला. सलग पाचवेळा अपयश आल्यानंतरही हार न मानता कीर्तनाने सहाव्या प्रयत्नात UPSCची परीक्षा पास केली. याच जिद्दीमुळे ती आज IAS अधिकारी आहे.

अभिनेत्री बनली IAS अधिकारी
अभिनेत्री एच. एस. कीर्तनाने सहाव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांची पहिली पोस्टिंग कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त म्हणून झाली होती. कीर्तनाने (Success Story) गंगा-यमुना, सर्कल इन्स्पेक्टर, लेडी कमिशनर, मुदिना आलिया, उपेंद्र, ए हब्बा, दोरे, ओ मल्लीगे, जननी, पुतानी आणि चिगुरु जे यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

पटकावली 167 वी रॅंक
या अभिनेत्रीने 2011 मध्ये पहिल्यांदाच कर्नाटक प्रशासकीय सेवा परीक्षेत हजेरी लावली होती. येथे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने दोन वर्षे KAS अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर तिने UPSC परीक्षेची तयारी सुरू केली आणि 2013 मध्ये पहिल्यांदा UPSC CSE परीक्षेला बसली. मात्र, पाच प्रयत्नांनंतर तिला 2020 मध्ये UPSCमध्ये यश मिळवले आहे. संपूर्ण भारतातून (AIR Rank) 167 वी रँक मिळवून ती IAS अधिकारी बनली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

GK Updates : कागदाचा शोध कोठे लागला? TV चा शोध कोणी लावला? सोपे वाटणारे प्रश्न ऐनवेळी गोंधळ उडवतात

GK Updates 3 Aug

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 : आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती
प्रश्न 2 : पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे?
उत्तर : गुरुमुखी
प्रश्न 3 : भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?
उत्तर : कन्याकुमारी (GK Updates)
प्रश्न 4 : भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश
प्रश्न 5 : भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर : विल्यम बेंटिक

प्रश्न 6 : कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?
उत्तर : चीन
प्रश्न 7 : गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?
उत्तर : सिद्धार्थ
प्रश्न 8 (GK Updates) : टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?
उत्तर : जॉन लोगी बेअर्ड
प्रश्न 9 : नुकतेच ‘बॅन थुओंग’ हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत?
उत्तर : व्हिएतनाम.
प्रश्‍न 10 : आशिया खेळाडू बुद्धिबळ महासंघातर्फे नुकताच वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
उत्तर : डी गुकेश.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com