Worlds Top 10 Entrance Exams : तुम्हाला माहित आहेत का जगातील टॉप 10 प्रवेश परीक्षा

करिअरनामा ऑनलाईन | स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणं (Worlds Top 10 Entrance Exams) आणि करिअर सेट करणं कठीण झालंय. प्रत्येकाला आपलं करिअर घडवण्यासाठी खडतर प्रयत्न करावे लागतात. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या स्पर्धात्मक काळात टिकाव धरणं जरा कठीण आहे. पण तरीही मेहनत आणि स्वतःवरच्या विश्वासाने ध्येय गाठलं जावू शकतं. आता असे अनेक करिअर पर्याय समोर येत आहेत ज्याचा वापर करुन तुम्ही करिअरमध्ये ऊंची गाठू शकता. देश-विदेशात अशा अनेक स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात. तर कोणत्या आहेत या परीक्षा ज्या पार केल्यानंतर घडवलं जाऊ शकतं एक आकर्षक करिअर…

1)आयआयटी जेईई (IIT-JEE)
जेईई (JEE) या परीक्षेला आपल्या देशात फार महत्त्व आहे. सर्वाधिक कठीण परीक्षांपैकी ही एक मानली जाते. ज्या मुलांना इंजिनीयर बनण्याची इच्छा आहे त्यांनी ही परीक्षा द्यावी. जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन (JEE Entrance Exam) ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर भारतातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजेमध्ये प्रवेश मिळवला जाऊ शकतो. ही परीक्षा जेईई-मेन आणि जेईई ऍडव्हान्स अशा दोन पातळींवर घेतली जाते.

2) गेट (Worlds Top 10 Entrance Exams)
ग्रॅज्युएट एपटीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग म्हणजेच GATE ही प्रवेश परीक्षा इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. भारत, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, इथिओपिया आणि युनायटेड अरब एमराइट्स (UAE) मध्ये देखील ही परीक्षा घेतली जाते. भारतीय विज्ञान संस्था आणि सात भारतीय तंत्रज्ञान संस्थांद्वारे संयुक्तपणे ही परीक्षा घेतली जाते.

3) नीट (NEET)
नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट (NEET) ही नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाणारी परीक्षा आहे. भारतातील इतर स्पर्धा परीक्षांप्रमाणे नीटला देखील विद्यार्थी विशेष प्राधान्य देतात. डॉक्टर आणि डेंटिस्ट बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागते.

4) यूपीएससी( UPSC)
भारतात सगळ्यात कठीण आणि सर्वोच्च मानली जाणारी ही परीक्षा आहे. तसेच जे विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना विशेष सन्मान मिळतो व त्यांची वाहवा केली जाते. ही परीक्षा (World’s Top 10 Entrance Exams) युनियन पब्लिक सर्विस कमिशनद्वारे म्हणजेच संघ लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाते. परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय नागरी सेवेमध्ये नोकरी करण्याची संधी प्राप्त होते. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा (Indian Administrative Services), भारतीय परकीय सेवा (Indian Foreign Services) आणि इंडियन पोलीस सेवा (Indian Police Services) अशा सेवांचा समावेश होतो.

5) नेट सेट परीक्षा (NET/SET Exam)
भारतात ज्या विद्यार्थ्यांना असिस्टंट प्रोफेसर किंवा ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून रुजू व्हायचे आहे त्यांना ही परीक्षा द्यावी लागते. नेट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET/SET) ज्याच्या अंतर्गत तुम्ही भारतात कुठेही नोकरी मिळवू शकता, पण स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण केल्यानंतर त्या राज्यातच नोकरी मिळवली जाऊ शकते. नेट सोबत जेआरएफ मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला खास स्कॉलरशिप दिली जाते.

6) युएसएमएलई USA (USMLE)
युनायटेड स्टेट्स मध्ये मेडिकल लायसन्स मिळवण्यासाठी ही परीक्षा अनिवार्य आहे. ‘युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसनिंग एक्झामिनेशन’ असे या परीक्षेचे नाव असून फेडरेशन ऑफ स्टेट मेडिकल बोर्ड आणि नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल एक्झामिनर्स यांच्यावतीने ही परीक्षा घेतली जाते.

7) गाओकाओ (GAOKAO)
चीनमधील कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. चीनमधील सर्वोत्कृष्ट कॉलेजेस मधून जर तुम्हाला पदवी मिळवायची असेल तर ही परीक्षा उत्तीर्ण करणं (World’s Top 10 Entrance Exams फार महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांना चायनीज आणि गणित या विषयांमध्ये ही परीक्षा द्यावी लागते. याशिवाय पर भाषियांसाठी इंग्रजी, फ्रेंन्च, जपानी, रशियन, जर्मन किंवा स्पॅनिश यांतील भाषा निवडण्याची मुभा असते. याव्यतिरिक्त लिबरल आर्ट्स, नॅचरल सायन्स पैकी एक विषय निवडावा लागतो

8) मेन्सा (MENSA)
मेन्सा ही आयक्यू टेस्ट करणारी परीक्षा आहे. केवळ 98% किंवा त्याहून जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतात.
9) जीआरइ परीक्षा (GRE)
ही परीक्षा द एज्युकेशनल टेस्टिंग सर्विसेस द्वारे घेतली जाते. या परीक्षेमध्ये वरबाल रीजनिंग, एनालेक्ट्रिकल रायटिंग आणि कॉन्टिटेटिव्ह रिझनिंगचा समावेश असतो. ज्या (World’s Top 10 Entrance Exams) विद्यार्थ्यांना एमस किंवा एमबीए करण्याची इच्छा आहे त्यांनी ही परीक्षा द्यावी.

10)कॅलिफोर्निया बार एक्झाम यूएसए( California Bar Exam)
वकील होण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेत ही परीक्षा घेतली जाते. इथे तुम्हाला विविध प्रश्न विचारले जातात या व्यतिरिक्त एक परफॉर्मन्स टेस्ट देणंही आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com