Home Blog Page 269

Rashi Bagga 85 Lakh Package : भेटा राशी बग्गा या तरुणीला; जीने IIT, IIM न करता मिळवलं रेकॉर्ड ब्रेक पॅकेज; पहा कसं

Rashi Bagga 85 Lakh Package

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण पूर्ण होत आलं की प्रत्येकाची (Rashi Bagga 85 Lakh Package) चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी धडपड सुरु होते. तुम्ही शिकत असलेल्या कॉलेज कॅम्पस मधून नोकरीची संधी मिळाली तर सोने पे सुहागा म्हणावा लागेल. महाविद्यालयांमध्ये असे कॅम्पस सिलेक्शन होत असतात; ज्यामध्ये अनेक विद्यार्थी आपलं नशीब आजमावतात.

रायपूरच्या (Raipur) एका मुलीने भरगच्च पगाराची नोकरी कॅम्पस सिलेक्शनमधून मिळवली आहे. या विद्यार्थिनीने सगळेच रेकॉर्ड मोडले आहेत. आयआयटी, आयआयएम किंवा एनआयटी सारखी मोठी डिग्री न मिळवता तिने चक्क 85 लाख पॅकेज मिळवून देणारी नोकरी मिळवून कमाल केली आहे.
राशीची आज सर्वत्र चर्चा होत आहे. कारण IIT, IIM मधून शिक्षण घेवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना काही लाखांत आणि कोटींमध्ये पॅकेज मिळत असते; हे आता सर्वांनाच ठाऊक आहे. पण (Rashi Bagga 85 Lakh Package) अशी कोणतीही पदवी न घेता छत्तीसगड मधील रायपूरमध्ये राहणाऱ्या राशी बग्गा (Rashi Bagga) या विद्यार्थिनील एका कंपनीकडून तब्बल 85 लाखांच्या नोकरीची ऑफर मिळाली आहे.

इथं घेतलं शिक्षण 
इंटरनॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इंफोर्मेशन टेक्नोलॉजी, नवे रायपुर (IIIT-NR) मधील या विद्यार्थिनीला कॅम्पस सिलेक्शनमधून 85 लाखांच्या नोकरीची ऑफर मिळाली आहे. राशीने इंजिनियरिंगमधून शिक्षण पूर्ण केले आहे. यापूर्वी  राशीला एका कंपनीने 85 लाखांची ऑफर दिली होती पण त्यावेळी तिने स्वतःला आणखी सिद्ध करण्यासाठी ही नोकरी नाकारली आणि अखेर तिला पुन्हा एकदा 85 लाखांची नोकरी मिळाली . याच कंपनीने गेल्यावर्षी याच इंस्टीट्यूट मधील विद्यार्थ्याला 57 लाखांचे पॅकेज दिले होते.

जाणून घ्या राशी बग्गाविषयी (Rashi Bagga 85 Lakh Package)
राशी ही मूळची छत्तीसगड मधील बिलासपुर मध्ये राहणारी आहे. तिचे वडील शरणजीत बग्गा हे सरकारी शाळेत शिक्षक आहेत. तर आई गृहिणी आहे. राशी आता ‘IIIT-NR’ मधून इंजिनियर झाली आहे. इंजिनियर होण्याची प्रेरणा तिला तिच्या भावाकडून मिळाली आहे. ती शाळेत असल्यापासूनच प्रचंड हुशार होती. पण आज ती ज्या पदावर पोहोचली आहे ते केवळ तिच्या वडिलांमुळेच; असे ती मानते. कारण इथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनीच तिला सतत पाठिंबा दिला. राशी इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षापासूनच इंटरव्हूव ची तयारी करत होती; म्हणूनच तिला हे यश मिळवता आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maha Waqf Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात ‘या’ पदांवर भरती सुरु; लगेच करा APPLY

Maha Waqf Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य (Maha Waqf Recruitment 2023) वक्फ बोर्ड, औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघु टंकलेखक, कनिष्ठ अभियंता, विधि सहायक पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड, औरंगाबाद
भरले जाणारे पद –
1. जिल्हा वक्फ अधिकारी – 25 पदे
2. कनिष्ठ लिपिक – 31 पदे
3. लघु टंकलेखक – 01 पद
4. कनिष्ठ अभियंता – 01 पद
5. विधि सहायक – 02 पदे
पद संख्या – 60 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद
वय मर्यादा – 18 ते 38 वर्षे (Maha Waqf Recruitment 2023)
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव  आवश्यक शैक्षणिक पात्रता
जिल्हा वक्फ अधिकारी  सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील (किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण) पदवी.
कनिष्ठ लिपिक  सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील (किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण) पदवी.
लघुटंकलेखक किमान माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
कनिष्ठ अभियंता  सांविधिक विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी
विधि सहायक सांविधिक विद्यापीठाची विधी (Law) शाखेतील पदवी

 

मिळणारे वेतन –

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज  सादर करावा.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज शुल्क पाठवण्यापूर्वी आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवार सर्व सूचना आणि पात्रता निकष काळजीपूर्वक पार पाडू शकतात.
5. एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – mahawakf.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Postal Department Recruitment 2023 : 10 वी पास उमेदवारांसाठी देशाच्या टपाल विभागात मेगाभरतीची घोषणा!! तब्बल 30,041 पदे भरणार

Indian Postal Department Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय टपाल विभागाने (Indian Postal Department Recruitment 2023) संपूर्ण देशात बंपर भरती जाहीर केली आहे. यामुळे टपाल विभागात सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या अंतर्गत शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक पदांच्या तब्बल 30,041 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – भारतीय टपाल विभाग
भरले जाणारे पद –
1. शाखा पोस्ट मास्टर
2. सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक
पद संख्या – 30,041 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारतात

वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Postal Department Recruitment 2023)
1. शाखा पोस्ट मास्टर

i) 10th pass
ii) Knowledge of Computer
iii) Knowledge of Cycling
iv) Adequate of Livelihood
2. सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक –
i) 10th pass
ii) Knowledge of Computer
iii) Knowledge of Cycling
iv) Adequate of Livelihood

मिळणारे वेतन –
1. शाखा पोस्ट मास्टर – Rs. 12,000/- to 29,380/- दरमहा
2. सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक – Rs. 10,000/- to 24,470/- दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
1. Original Marks/ Board Sheet
2. Original Community / Caste Certificate
3. Original PWD Certificate
4. Original Transgender Certificate
5. Original Date of Birth Proof.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
अशी असेल निवड प्रक्रिया –
1. अर्जदारांना प्रणाली-व्युत्पन्न गुणवत्ता यादीच्या आधारे भरतीसाठी निवडले जाईल.
2. मान्यताप्राप्त बोर्डांच्या 10वी इयत्तेच्या माध्यमिक शालेय परिक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर/ ग्रेड/गुणांचे गुणांमध्ये रूपांतर (खालील उप परिच्छेद- iii ते ix मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे) च्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल. संबंधित मान्यताप्राप्त बोर्डाच्या नियमांनुसार सर्व विषय उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
3. ज्या अर्जदारांसाठी त्यांच्या माध्यमिक शाळेच्या दहावीच्या गुणपत्रिकेच्या परीक्षेत गुण किंवा गुण आणि ग्रेड/पॉइंट्स दोन्ही आहेत, फक्त त्यांचे एकूण गुण (Indian Postal Department Recruitment 2023) सर्व अनिवार्य आणि ऐच्छिक/वैकल्पिक विषयांमध्ये (इतर) मिळालेले गुण विचारात घेऊन तयार केले जातील. अतिरिक्त विषयांपेक्षा, असल्यास). हे सुनिश्चित करेल की जास्त गुण मिळविणारा अर्जदार निवडला जाईल.

4. For applicants  having  only grades  subject-wise,  marks  will  be arrived for each subject (compulsory and elective subjects but not extra

u     Grade Grade Point Multiplication factor
b        A1 10 9.5
J          A2 

e

9 9.5
c         B1 8 9.5
s    B2 7 9.5
>          C1 6 9.5
C2 5 9.5
b          D 4 9.5

राज्यानुसार भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा Link 1 – APPLY

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा Link 2- APPLY
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Success Story : खासगी शिकवण्या घेवून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं; डोंगराळ भागातील अमृता जिद्दीने बनली PSI

MPSC Success Story of Amruta Bathe PSI

करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात संकटं कोणाच्या (MPSC Success Story) दारात येत नाहीत? प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या संकटाला तोंड देत शेवटचा प्रवास करावा लागतो. एखाद्या माणसामध्ये असलेली जिद्द आणि चिकाटी सोबतच स्वतःवरील दृढ विश्वास यामुळे कुठलंही संकट फार मोठं वाटत नाही. आपल्या घरात प्रत्येक सुख सुविधा आपले आई बाबा उपलब्ध करून देत असतात, पण याचवेळी आपल्या वयाची अशी अनेक मुलं आहेत जी कष्ट करत, मेहनत करत इतरांसमोर  आदर्श उभा करतात. आजची कहाणी अशाच एका मुलीची आहे. महाराष्ट्रातील छोट्याशा भागात वाढलेली अमृता बाठे हिने PSI होण्याचं स्वप्न कसं पूर्ण केलं याबद्दलची ही कथा…

पैसे कमवण्यासाठी केली खासगी क्लासमध्ये नोकरी
किल्ले पुरंदरच्या उपर डोंगराळ रांगेतील कुंभोशी येथे राहणारी अमृता हीच्या घरची परिस्थिती अगदीच बेताची होती. घरची गरीबी एवढी जास्त की जर तिने स्वतः कमावलं तरच ती शिकू शकली असती. तिचे वडील भरत बाठे व आई संगीता दोघेही या डोंगराळ भागात शेती करतात. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंकिता हिने पुण्यात काही खासगी क्लासमध्ये शिकवण्या द्यायला सुरुवात केली. अमृताच्या पाठोपाठ तिचा एक भाऊ व एक बहीण देखील आहेत.

सरकारी शाळेत घेतले शिक्षण (MPSC Success Story)
अमृताचे प्राथमिक शिक्षण हे तिच्या गावातल्या एका सरकारी शाळेतून झाले, पण यापुढील शिक्षणाची गावात काहीच सोय नसल्यामुळे अमृताने पुण्यातील महर्षी धोंडो केशव कर्वे येथील महिला वसतिगृहात प्रवेश मिळवला व या पुढील शिक्षण तिने महर्षी कर्वे या शाळेतून पूर्ण केले. शाळेत असतानाच तिने पोलीस होण्याची इच्छा जोपासली व आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येथूनच तिचा प्रवास सुरू झाला.

19 महिन्यांनी दिली परीक्षा
अपयश तिच्या देखील वाट्याला आलं पण खचून न जाता तिने अपयशापेक्षा मोठं व्हायचं ठरवलं. पुण्यातील श्री सिद्धिविनायक महाविद्यालयातून तिने BA ची पदवी मिळवली. खर्च भागत नसल्यामुळे तिने काही खाजगी क्लासेस मधून शिक्षिकेचे कार्य केले. वर्ष 2019 मध्ये तिने पहिल्यांदा MPSC ची परीक्षा दिली पण केवळ दोन गुणांनी तिला अपयश आले. इथे हार न मानता 2020 च्या परीक्षेत पास होण्याची खूण गाठ तिने मनाशी बांधली. पण 2020 हे वर्ष कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनमुळे ही परीक्षा चार वेळा (MPSC Success Story) पुढे ढकलली गेली. परिणामी तब्बल 19 महिन्यांनी अमृताला ही परीक्षा देण्याची संधी मिळाली‌. अखेर परीक्षेचा निकाल लागला आणि तिच्या कष्टांचे चीज होत तिची यावेळी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. यावेळी ती आपल्या आजोळी वाघजवाडी येथे रहात होती.

अमृता म्हणते …
तिच्या प्रवासाविषयी सांगताना अमृता म्हणते, “शिक्षण व नंतरच्या धडपडीचा काळ हा माझ्यासाठी व माझ्या कुटुंबीयांसाठी खूपच चिंतेचा होता. तरीही मी माझ्या निर्णयावर ठाम राहून अभ्यास सुरूच ठेवला. प्रयत्न करत राहिले  की यश नक्कीच मिळतं…”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Sarthi Maharashtra : विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी ‘सारथी’ देणार विशेष प्रशिक्षण; मराठा उमेदवारांना मोठी संधी

Sarthi Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन । छत्रपती शाहू महाराज (Sarthi Maharashtra) संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांकरीता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे यांनी केले आहे.

इथे करा नोंदणी –
‘सारथी’ च्या लक्षीत गटातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या प्रवर्गाच्या एकूण २०,००० उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षणअंती (Sarthi Maharashtra) रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
कौशल्य विकास सोसायटीच्या संकेतस्थळावर कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम मागणी नोंदविण्याकरिता इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/sarthi या लिंकवर भेट देऊन नोंदणी करावी. उमेदवारांना दि. 30 ऑगस्ट 2023 पर्यंत नोंदणी करता येणार आहे.
या उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यामधून स्किल इंडिया पोर्टलवरील विविध सेक्टरमधील अभ्यासक्रमाकरिता ५ स्टार, ४ स्टार व ३ स्टार ट्रेनिंग सेंटर (TP-TC) यांच्याद्वारे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत विहीत प्रक्रियेचा अवलंब करून प्रशिक्षण राबविले जाणार आहे.

इथे करा संपर्क – (Sarthi Maharashtra)
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर, १७५ श्रेयस चेंबर, पहिला मजला, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी ०२२-२२६२६४४० यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Zilha Parishad Bharti 2023 : मोठी घोषणा!! राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये होणार मेगाभरती; 19 हजार 460 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Zilha Parishad Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । ग्रामविकास विभागांतर्गत (Zilha Parishad Bharti 2023) राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील 100 टक्के व इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मार्च 2019 मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाची पार्श्वभुमी व इतर विविध कारणांमुळे परिक्षा होऊ शकली नाही. यानंतर शासनाच्या विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत ही मेगाभरती करण्यात येत आहे.

दि.05 ऑगस्ट 2023 ते दि.25 ऑगस्ट 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्विकारण्यात येतील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन दि.25 ऑगस्ट, 2023 पर्यंत Online पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरातींच्या (Zilha Parishad Bharti 2023) अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी संबंधित जिल्हा परिषदांच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार आहेत.

संगणकीकृत परीक्षा होणार
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये (ZP) एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रियेसाठी (Zilha Parishad Bharti 2023) ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.

IBPS कंपनीमार्फत होणार परीक्षा
परिक्षेची संपूर्ण प्रक्रिया IBPS कंपनीमार्फत राबवण्यात येणार आहे. त्यामुळे सदर परिक्षेमध्ये अत्यंत पारदर्शकता राहणार आहे. त्यामुळे उमेदवाराने कोणत्याही आमिषास बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सन 2019 पासून परिक्षा झाली नसल्याने उमेदवारांमध्ये असलेली संतापाची भावना लक्षात घेवून प्रधान सचिव (ग्रामविकास विभाग) यांच्या माध्यमातून वारंवार IBPS तसेच जिल्हा परिषद अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावलेला आहे.

कमाल वयोमर्यादेत 2 वर्षाची शिथिलता (Zilha Parishad Bharti 2023)
ज्या उमेदवारांनी मार्च 2019 मध्ये जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज केला होता पण वय मर्यादा ओलांडल्याने ते परिक्षेस बसण्यास अपात्र होत आहेत, अशा उमेदवारांना दि. 31 डिसेंबर, 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे. तसेच ज्या उमेदवारांनी मार्च, 2019 परीक्षेकरीता अर्ज केलेला नाही, त्यांनाही सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयास अनुसरुन कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली असून दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Fraud : नोकरी देण्याच्या नावाखाली बेरोजगारांना लुटलं; ‘नासा’मध्ये सायंटिस्ट असल्याचा केला बनाव; काय आहे प्रकरण 

Fraud

करिअरनामा ऑनलाईन । ओंकार महेंद्र तलमले (Fraud) याने विदर्भातील १११ बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. ओंकार हा दोन व्यापाऱ्यांचे अपहरण करत पैशांसाठी त्यांची गोळी मारुन हत्या करणाऱ्या प्रकरणाचा सूत्रधार आहे. ‘नासा’मध्ये (NASA) वैज्ञानक असल्याची थाप मारत त्याने बेरोजगारांना लक्ष्य केले व रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून ५.३१ लाख रुपये उकळले आहेत. त्याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निरालाकुमार सिंह व अंबरीश गोळे या दोन व्यापाऱ्यांची मागील आठवड्यात कोंढाळी येथील फार्म हाऊसमध्ये ओंकार व त्याच्या सहकाऱ्यांनी हत्या केली होती. त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ओंकारकडून फसवणूक झालेल्या अश्विन प्रवीण वानखेडे (वय ३२, मनिषनगर) याने पोलिसात त्याच्याविरोधात तक्रार दिली आहे. ओंकारचे माटे चौकातील एका इमारतीत कार्यालय होते. कोरोनाच्या कालावधीत अश्विन वानखेडेशी त्याची भेट झाली. दोघेही ढोलताशा पथकात एकत्रित असल्याने एकमेकांना ओळखत होते. मी ‘नासा’मध्ये ज्युनिअर सायंटिस्ट पदावर कार्यरत असल्याचा बनाव केला होता.

111 जणांना 5.31 कोटींचा गंडा
“नागपुरातील ‘रिजनल रिमोट सेंसिंग सेंटर’मध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असून लवकरच पद भरती होणार आहे. तेथील अधिकारी माझ्या परिचयातील असून मी तुला नोकरी लावून देऊ शकतो”; असे त्याने सांगितले. त्याबदल्यात २ लाख रुपये द्यावे लागतील, असे देखील त्याने म्हटले होते. त्यावेळी कोरोनाची सुरुवात होती व सरकारी नोकरीची संधी असल्याने अश्विनने ओंकारवर विश्वास ठेवला. त्याने २ लाख रुपये त्याच्या खात्यात जमा केले. ओंकारने त्यानंतर ‘इतर कुणी परिचयातील असतील तर त्यांना देखील घेऊन ये’; असे म्हटले. अश्विनने त्याचे काही नातेवाईक, मित्रांना या पदभरतीची माहिती दिली. ही माहिती आणखी इतरांना मिळत गेली व जवळपास १११ लोकांनी ओंकारला संपर्क केला. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या बॅंक खात्यात ५.३१ कोटी पाठविले. मात्र कुणालाही नोकरी लावून दिली नाही. तीन वर्ष हा प्रकार सुरू होता. अखेर हत्या प्रकरणात त्याचे नाव समोर आल्यावर त्याचे बिंग फुटले. ओंकार अगोदरपासूनच अटकेत असून अश्विनच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट अपॉईंटमेन्ट लेटर पाठवले
ओंकारने ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना नंतर कुठलाच संपर्क केला नाही. मात्र सातत्याने लोकांकडून विचारणा होत असल्याने त्याने त्यांच्या पत्त्यावर व ई-मेल आयडीवर ऑफिस ॲडमिन, सिनिअर ॲडमिन पदावर नियुक्ती झाल्याचे बोगस अपॉईंटमेन्ट लेटर पाठविले. काही जण ‘रिमोट सेन्सिंग’च्या कार्यालयात गेल्यावर त्याचा खोटेपणा उघड झाला.

आर्थिक गुन्हेशाखेकडून तपास सुरु (Fraud)
या प्रकरणात बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेतर्फे तपास सुरू आहे. त्याच्या निवासस्थानासह संबंधित कार्यालयाचीदेखील झडती घेण्यात आली. ओंकारने आणखी कुणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी समोर येण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त अर्चित चांडक यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Satara Recruitment 2023 : सातारा जिल्हा परिषद अंतर्गत मेगाभरती जाहीर; ‘या’ पदांच्या 972 जागा भरणार

ZP Satara Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्हा निवड (ZP Satara Recruitment 2023) समितीच्यावतीने सातारा जिल्हा परिषदेतील 21 संवर्गातील ९७२ पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषद साताराच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध 972 रिक्त पदे जिल्हा परिषद साताराच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. गट-क मधील विविध संवर्गाच्या एकूण 972 रिक्त पदांकरिता अर्ज प्रक्रिया आजपासून (दि. 5 ऑगस्ट) सुरु झाली आहे. जाणून घ्या या भरतीविषयी सविस्तर…

संस्था – जिल्हा परिषद, सातारा
भरली जाणारी पदे – (ZP Satara Recruitment 2023)
आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
पद संख्या – 972 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 5 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2023
परीक्षा फी –
1. खुला वर्ग रु. 1000/-
2. राखीव वर्ग – रु. 900/-
(माजी सैनिकास अर्ज शुल्क नाही)
मिळणारे वेतन – दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत

काही महत्वाच्या तारखा –

वय मर्यादा –
(दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजीचे उमेदवाराचे वय ग्राह्य धरणेत येईल.)
1. सर्वसाधारण प्रवर्ग – 18 ते 40 वर्षे
2. मागास प्रवर्ग – 18 ते 45 वर्षे

असा करा अर्ज –
1. सर्वप्रथम उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun२३/ या संकेतस्थळावर जावे.
2. अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा ” (Click here for New Registration) टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एस. एम. एस. देखील पाठविला जाईल.
3. जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल, तर तो ‘सेव्ह आणि नेक्स्ट’ (Save & Next ) टॅब निवडून आधीच “एंटर” (Enter) केलेला डेटा जतन करू शकतो. ऑनलाइन अर्ज “सबमिट” (Submit) करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाईन अर्जातील तपशीलांची पडताळणी (ZP Satara Recruitment 2023) करण्यासाठी ‘सेव्ह आणि नेक्स्ट’ (Save & Next) सुविधेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करावा. दृष्टिहीन उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी तपशीलांची पडताळणी करून घ्यावी.
4. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी, कारण “पूर्ण नोंदणी” (COMPLETE REGISTRATION BUTTON) बटणावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल करणे शक्य होणार नाही.
5. उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील/पती इ. चे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे, जसे ते प्रमाणपत्र/गुणपत्रिका/ओळख पुराव्यामध्ये दिसते. कोणताही बदल / तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.
6. तुमचे तपशील सत्यापित करा (Validate your details) आणि जतन करा आणि पुढील (Save & Next) बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा.
7. फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी.
8. नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन (ZP Satara Recruitment 2023) आणि पडताळणी करण्यासाठी “पूर्वावलोकन ” (Preview) टॅबवर क्लिक करा.
9. आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा (COMPLETE REGISTRATION).
10. पेमेंट (Payment) टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जावे व सबमिट (Submit) बटणा वरक्लिक करावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.zpsatara.gov.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Union Bank of India Recruitment 2023 : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; तुम्ही आहात का पात्र?

Union Bank of India Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । युनियन बँक ऑफ (Union Bank of India Recruitment 2023) इंडिया अंतर्गत डेटा सायंटिस्ट आणि मशीन लर्निंग (ML) अभियंता पदाच्या  रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2023 आहे.

बँक – युनियन बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद –
1. डेटा सायंटिस्ट – 02 पदे
2. मशीन लर्निंग (ML) अभियंता – 02 पदे
पद संख्या – 4 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2023

वय मर्यादा – 25 ते 35 वर्षे
अर्ज फी – (Union Bank of India Recruitment 2023)
UR/OBC – रु.850/-
SC/ST/PwBD उमेदवार – रु.175/-
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेटा सायंटिस्ट   M.Sc. in Statistics/ B.Tech/MCA
मशीन लर्निंग (ML) अभियंता B. Tech/MCA

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
2. अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.
3. अर्ज शेवटच्या (Union Bank of India Recruitment 2023) तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर करायचे आहेत.
4. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.unionbankofindia.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Apurva Alatkar : कोण आहे अपूर्वा अलाटकर? जी चालवतेय पुण्याची मेट्रो…

Apurva Alatkar

करिअरनामा ऑनलाईन । साताऱ्यातील सुरेखा यादव या वंदे भारत (Apurva Alatkar) ट्रेन चालवणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या महिला लोकोपायलट ठरल्या होत्या. त्यांच्यानंतर आता साताऱ्याची कन्या अपूर्वा अलाटकर ही पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला ठरली आहे. पुणे मेट्रोचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभारंभ झाला. लोकोपायलट अपूर्वा प्रमोद अलाटकर हिने मेट्रोची ‘मास्क ऑन की’ च्या साथीने सर्व तांत्रिक बाबींच्या मदतीने वनाझ येथून उद्घाटनाची फेरी पूर्ण केली. तीच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे रेल्वे क्षेत्रात साताऱ्याची मान उंचावली आहे.

शाहूपुरीची अपूर्वा
शाहूपुरीतील (सातारा) रांगोळे कॉलनीत अपूर्वा अलाटकर राहते. प्रमोद आणि उज्वला यांची ती कन्या. अपूर्वाचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण बापूसाहेब चिपळूणकर शाळेत झाले. यानंतर तिने आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण अनंत इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण केले. दहावीनंतर तिने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण सोलापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण केले. येथील शिक्षण संपवून साताऱ्यात परत आल्यानंतर तिने सज्जनगड येथील ज्ञानश्री इन्स्टिट्यूटमध्ये त्याच शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला पुणे येथील कल्याणी उद्योग समूहात नोकरीची संधी मिळाली. तेथे काम सुरू असतानाच कोरोनाचा कहर वाढला आणि लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर ती साताऱ्यात परतली.

मेट्रोकडून बोलावणं आलं
2019 मध्ये पुणे मेट्रोसाठीच्या (Pune Metro) विविध पदांसाठीची माहिती तिला मिळाली. त्यानुसार तिने अर्ज केला. अर्ज केल्यानंतर अपूर्वाला पहिल्या फेरीसाठी मेट्रोकडून बोलावण्यात आले. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या फेऱ्या पूर्ण करत फेब्रुवारी 2023 मध्ये अपूर्वाने मेट्रोतील सेवेत आपले स्थान पक्के केले. निवडीनंतर तिच्याकडे वनाझ स्थानकाच्या स्टेशन कंट्रोलर आणि ट्रेन ऑपरेटर अशी दुहेरी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

45 दिवसांचे खडतर प्रशिक्षण
मेट्रोच्या वतीने पुण्यात चार मार्गांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्या मार्गांच्या लोकार्पणाची तयारी प्रशासनाने सुरू केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे ठरल्यानंतर चारही मार्गांवर धावणाऱ्या मेट्रो चालविण्यासाठीचे आवश्यक (Apurva Alatkar) प्रशिक्षण सुरू केले. या प्रशिक्षणार्थीमध्ये अपूर्वाचा देखील समावेश होता. हे 45 दिवसांचे खडतर तांत्रिक प्रशिक्षण तिने पूर्ण केले. “प्रवासी माझ्याशी आदराने वागतात तेव्हा मन खरोखरच आनंदी होते. त्यांनी केलेले कौतुक माझ्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे;” असे पुणे मेट्रो चालक अपूर्वा अलाटकर हिने सांगितले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com