PMC Recruitment 2023 : पुणे महापालिकेत शिक्षक पदांची भरती; 153 पदे रिक्त

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका (PMC Recruitment 2023) संचलित उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक व विशेष मुलांच्या शाळांसाठी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण 153 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका संचलित उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक व विशेष मुलांची शाळा
भरले जाणारे पद –
1. उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक – 54 पदे
2. विशेष शिक्षक – 02 पदे
3. इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक – 97 पदे
पद संख्या – 153 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन (समक्ष)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 ऑगस्ट 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – (PMC Recruitment 2023)
उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे ०५
विशेष शिक्षक – विशेष मुलांची शाळा, मनपा शाळा क्र १४ मुलांची, काँग्रेस भवनमार्ग, शिवाजीनगर, पुणे ५

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रधारक व शिक्षणशास्त्र पदविका (डी. एड/बी. एड) उर्दू माध्यम, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण.

अ) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

ब) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणानुक्रमे अन्य उमेदवारांना संधी देण्यात येईल.

विशेष शिक्षक माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र धारक व बौद्धिक अक्षम प्रवर्गातील प्रशिक्षित पदविका, डी.एस.ई. (आय डी) व आर सी आय नोंदणी प्रमाणपत्र धारक.
इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक १) इयत्ता १ली ते १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण

२) इयत्ता १ली ते १० वी पर्यंत इंग्रजी, १२वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण

३) इयत्ता १ली ते १० वी मराठी अथवा इतर माध्यमातून व १२वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./ बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण

४) इयत्ता १ली ते १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण अ) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. च) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणानुक्रमे अन्य उमेदवारांना संधी देण्यात येईल.

मिळणारे वेतन –
1. उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक – Rs. 20,000/- दरमहा
2. विशेष शिक्षक – Rs. 20,000/- दरमहा
3. इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक – Rs. 20,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी अर्ज समक्ष पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर सदर करायचा आहे.
2. वरील सर्व पदांकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झालेच्या दिनांकापासून ५ दिवसांपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११.०० ते २.०० या वेळेपर्यंत अर्ज सदर करावे.
3. उमेदवाराने सादर करावयाचा विहित नमुन्यातील (PMC Recruitment 2023) अर्ज कार्यालयामार्फत वरील ठिकाणीच देण्यात येईल.
4. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2023 आहे.
6. वेळेनंतर आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाठी जाहिरात पहा –
PDF जाहिरात I 

PDF जाहिरात II 
PDF जाहिरात III 
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com