Home Blog Page 226

Insurance for Students in Maharashtra : फक्त 20 रुपयात उतरवा विमा!! राज्य सरकारने जाहीर केली योजना; शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा 

Insurance for Students in Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन । शाळकरी आणि पदवी पर्यंतचे (Insurance for Students in Maharashtra) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने एक खास विमा योजना जाहीर केली आहे. आनंदाची बाब म्हणजे या विद्यार्थ्यांच्या एका पालकाला देखील याचा लाभ घेता येईल. या विमा योजनेचा प्रीमियम 20 रुपयांपासून सुरू होईल. यामध्ये वैद्यकीय तसेच अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला असून पीटीआयने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ही विमा योजना सरकारी किंवा अनुदानित महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना लागू असेल.

असं आहे योजनेचं स्वरुप
20 रुपये प्रीमिमय भरुन एका विद्यार्थ्याला एक लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. ही पॉलिसी एका वर्षासाठी लागू असेल. तर 62 रुपये प्रीमियममध्ये याच कालावधीसाठी 5 लाख रुपये कव्हरेज मिळणार आहे. अपघातानंतर उपचारांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल कव्हरेज हवे असल्यास, 422 रुपये प्रीमियम भरावा लागेल; असं या आदेशात म्हटलं आहे.
काय आहे पात्रता
प्राथमिक विमाधारक सदस्य हा महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत संलग्न, संबद्ध, प्रशासित, वर्गीकृत असलेल्या महाविद्यालये, संस्था किंवा विद्यापीठांमध्ये (Insurance for Students in Maharashtra) शिकणारा विद्यार्थी असावा. सेकंडरी विमा सदस्य हा विद्यार्थ्याचा शाळा किंवा कॉलेजमधील प्रवेश अर्जावर नोंदणी असलेला पालक असेल.

 इन्शुरन्ससाठी ‘या’ कंपन्यांची निवड (Insurance for Students in Maharashtra)
या योजनेसाठी ICICI Lombard इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि नॅशनल इन्शुरन्स कॉर्परेशन लिमिटेड या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. 20 रुपये आणि 422 रुपये प्रीमियम असलेल्या योजना आयसीआयसीआयच्या असणार आहेत. तर 62 रुपये प्रीमियम असलेला पाच लाखांचा वैयक्तिक अपघाती विमा नॅचरल इन्शुरन्स कंपनी ऑफर करेल.

असं असल्यास विमा संरक्षण मिळणार नाही
आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न, गर्भधारणा किंवा बाळंतपण, मोटार रॅली किंवा साहसी खेळांमध्ये सहभाग, गृहयुद्धात सहभाग, नक्षलवादी हल्ला वगळता झालेले इतर दहशतवादी हल्ले, दारुच्या प्रभावाखाली झालेली दुर्घटना, ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचे सेवन, विमा लाभार्थीकडून हत्या, न्यूक्लिअर रेडिएशन अशा घटनांमध्ये विद्यार्थ्यांना विमा संरक्षण मिळणार नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : सांगा बरं… नारळाचे वैज्ञानिक नाव कोणते? राजर्षी शाहू महाराजांचे पूर्ण नाव काय आहे? 

GK Updates 16 Oct.

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता?
उत्तर – NH 44
NH 53
NH 60
NH 43
(सविस्तर – NH44 हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे जो 11 राज्ये आणि सुमारे 30 महत्त्वाच्या शहरांना जोडतो. श्रीनगर ते कन्याकुमारी)
2. प्रश्न . नारळाचे वैज्ञानिक नाव काय आहे? (GK Updates)
कैरीका पपया
सायट्रस सीनन्सिस
उत्तर –कोको न्यूसिफेरा
मुसा पेराडीसीएका

3. सिद्ध नाटक शकुंतला कोणी लिहिली होती?
महामुनी व्यास
महामुनी वाल्मिकी
उत्तर – महाकवी कालिदास
4. धनंजय चंद्रवुड सरन्यायधीश सर्वोच्य न्यायालय कितवे न्यायधीश आहेत?
47
45
उत्तर – 50
48

5. आधुनिक भारताचे शिल्पकार कोण?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
राजा राम मोहन राय (GK Updates)
उत्तर – पंडित जवाहरलाल नेहरू
लॉर्ड रिपन
6. राजर्षी शाहू महाराज यांचे पूर्ण नाव काय ?
उत्तर – यशवंतराव जयसिंगराव घाटगे
यशवंतराव जयसिंगराव दळवी
यशवंतराव जयसिंगराव शिंगरे
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DRDO RAC Recruitment 2023 : केंद्र सरकारची नोकरी!! DRDO RAC अंतर्गत ‘या’ पदांवर भरतीसाठी लगेच करा APPLY

DRDO RAC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO RAC Recruitment 2023) भरती व मूल्यांकन केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शास्त्रज्ञ सी, वैज्ञानिक डी, वैज्ञानिक ई, शास्त्रज्ञ एफ पदाच्या एकूण 51 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – DRDO RAC
भरले जाणारे पद – शास्त्रज्ञ सी, वैज्ञानिक डी, वैज्ञानिक ई, शास्त्रज्ञ एफ
पद संख्या – 51 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2023
वय मर्यादा – 40 ते 50 वर्ष

भरतीचा तपशील – (DRDO RAC Recruitment 2023)

पद पद संख्या 
शास्त्रज्ञ सी 27 पदे
वैज्ञानिक डी 08 पदे
वैज्ञानिक ई 14 पदे
शास्त्रज्ञ एफ 02 पदे

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
शास्त्रज्ञ सी Rs. 67,700/‐
वैज्ञानिक डी Rs. 78,800/‐
वैज्ञानिक ई Rs. 1,23,100/‐
शास्त्रज्ञ एफ Rs. 1,31,100/‐


असा करा अर्ज –

1. वरील भरतीकसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी अर्ज (DRDO RAC Recruitment 2023) सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (21 ऑक्टोबर पासून अर्ज सुरु) – APPLY
अधिकृत वेबसाईट –
अधिकृत वेबसाईट I – rac.gov.in
अधिकृत वेबसाईट II – www.drdo.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AAI Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये 496 पदांवर भरती; ही संधी सोडू नका

AAI Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI Recruitment 2023) अंतर्गत मोठी भरती जाहीर झाली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) पदांच्या एकूण 496 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 30 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India)
भरले जाणारे पद – कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल)
पद संख्या – 496 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 1 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
वय मर्यादा – 27 वर्ष

काही महत्वाच्या तारखा – (AAI Recruitment 2023)
AAI Bharti 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) – Candidates having B.E./B. Tech/ B. Sc. (Engg.) Degree are allowed to apply where essential qualification is prescribed as Bachelor’s Degree in Engineering.
मिळणारे वेतन – Rs.40000 – 3% – 140000

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी (AAI Recruitment 2023) उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरूनच अर्ज करायचा आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY (1 नोव्हेंबरपासून सुरु)
अधिकृत वेबसाईट – www.aai.aero
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : ग्रॅज्युएट्ससाठी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपग्रंथपाल, सहायक परीक्षा नियंत्रक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर
भरले जाणारे पद –
1. उपग्रंथपाल – 01 पद
2. सहायक परीक्षा नियंत्रक – 01 पद
पद संख्या – 02 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, वारंगा, PO: डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर – 441108 [महाराष्ट्र]
E-Mail ID – [email protected]

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा –
कमीत कमी 18 वर्षे
जास्तीत जास्त 38 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
उपग्रंथपाल A Master’s Degree in Library Science/Information Science/Documentation Science, with at least 55% Marks or its Equivalent Grade;
सहायक परीक्षा नियंत्रक A Master’s Degree with at least 55% of Marks or its equivalent Grade from a recognized University/Institution.

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
उपग्रंथपाल Rs.1,500/- (For Unreserved Candidates) Rs.1000/- (For Others)
सहायक परीक्षा नियंत्रक Rs.1,500/- (For Unreserved Candidates) Rs.1000/- (For Others)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची (Job Notification) आगाऊ स्कॅन केलेली प्रत [email protected] वर पाठवणे आवश्यक आहे.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nlunagpur.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्ज नमुना – CLICK
अधिकृत वेबसाईट – www.nlunagpur.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2023 : MPSC ‘गट क’ अंतर्गत 7510 पदांच्या भरतीची जाहिरात निघाली; लवकरात लवकर करा अर्ज 

MPSC Recruitment 2023 (10)

करिअरनामा ऑनलाईन । MPSC कडून भरती जाहीर होण्याची (MPSC Recruitment 2023) राज्यातील तरुण उमेदवार आतुरतेने वाट पाहत असतात. अशा उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. जाहिरात क्रमांक ००१/२०२३ दिनांक २० जानेवारी, २०२३ नुसार आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२३ मधून भरावयाच्या गट-क संवर्गाच्या दिनांक ०१ सप्टेंबर, २०२३ व १२ सप्टेंबर, २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा रविवार, दिनांक १७ डिसेंबर, २०२३ रोजी पार पडणार आहे. राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या सहा जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात येईल. या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी दि. 31  ऑक्टोबर च्या आत अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या ७५१० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांनी खलाई दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – २०२३
पदाचे नाव – उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक
पद संख्या – 7510 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – १७ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०२३

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज फी – (MPSC Recruitment 2023)
1. अमागास – रु. 544/-
2. मागासवर्गीय- रु.344/-
3. माजी सैनिक – रु.44/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
उद्योग निरीक्षक, गट-क
  • उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :

  • सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा
  • विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
  • पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कर सहाय्यक मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
लिपिक-टंकलेखक मराठी टंकलेखनाचा वेग (MPSC Recruitment 2023) किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. 

इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

 

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : प्राध्यापकांसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन भरती सुरु

Job Alert (73)

करिअरनामा ऑनलाईन । विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय (Job Alert) महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदाच्या 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर
भरले जाणारे पद – 
1. प्राध्यापक – ०२ पदे
2. सहयोगी प्राध्यापक – ०७ पदे
पद संख्या – ०९ पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – लातूर
वय मर्यादा – 69 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
1. प्राध्यापक – MD/MS/DNB
2. सहयोगी प्राध्यापक – MD/MS/DNB
मिळणारे वेतन –
1. प्राध्यापक – 1,85,000/- रुपये दरमहा
2. सहयोगी प्राध्यापक – 1,70,000/- रुपये दरमहा

असा करा अर्ज –
1. भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे (Job Alert) आपलोड करणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही .
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.vdgmclatur.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 Career Success Story : खाकितील ‘मर्दानी’!! अंडरवर्ल्ड डॉनचाही भितीने उडायचा थरकाप; आव्हानांना न घाबरणाऱ्या IPS मीरा बोरवणकर 

Career Success Story of IPS Meera Borawankar

करिअरनामा ऑनलाईन । देशातील अनेक महिलांनी आपल्या (Career Success Story) स्व कर्तृत्वाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. IPS मीरा बोरवणकरही त्यापैकीच एक आहेत. त्यांचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर सर्वोत्तम IPS अधिकार्‍यांमध्ये घेतले जाते. त्या देशभरात ‘सुपरकॉप’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या 1981 च्या बॅचच्या IPS अधिकारी असून सध्या त्या सेवा निवृत्त झाल्या आहेत.

वडील BSF मध्ये अधिकारी तर पती IAS
मीरा बोरवणकर यांचे वडील ओ.पी.चड्ढा हे सीमा सुरक्षा दलात (BSF) अधिकारी होते. त्यांची पोस्टिंग फाजिल्का येथे झाली होती. मीरा यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण फाजिल्का येथेच झाले. 1971 मध्ये वडिलांची बदली झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण जालंधर येथून पूर्ण केले. माजी IPS किरण बेदी यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्धार केला. त्यांचे पती अभय बोरवणकर हे देखील भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होते आणि सध्या ते नोकरी सोडून व्यवसाय करत आहेत.

अंडरवर्ल्डमध्ये दहशत
मीरा बोरवणकर यांची IPS पदी निवड झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र केडर मिळाले. पदभार स्वीकारल्या नंतर धडक कारवाया करत त्यांनी मुंबईतील माफिया राजवट संपवण्यात (Career Success Story) महत्त्वाची भूमिका बजावली होती. दाऊद ईब्राहिम कासकर आणि छोटा राजन टोळीतील अनेकांना तुरुंगात टाकून त्यांनी अंडरवर्ल्डमध्येही आपली दहशत निर्माण केली होती. मुंबई बॉम्बस्फोटाचा दोषी अजमल कसाब आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला मीरा यांच्या देखरेखीखाली फाशी देण्यात आली.

सेक्स स्कँडल उधळले
या नावाला आणखी प्रसिध्दी मिळाली जेव्हा 1994 मध्ये जळगाव येथे मोठ्या सेक्स स्कँडलची माहिती मिळाली आणि त्यांनी हे स्कँडल उधळून लावले. त्यांनी या स्कँडलमध्ये अडकलेल्या शाळकरी मुलींपासून ते महाविद्यालयीन मुलींपर्यंत सर्वांना वाचवण्याचे काम केले. या कारवाईपासून त्यांना ‘लेडी सुपरकॉप’ देखील म्हटले जाते. या कार्याची दखल घेत बोरवणकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

लिंग भेदाचा सामना करावा लागला (Career Success Story)
बोरवणकर त्यांनी 36 वर्षांची पोलिस कारकिर्द पूर्ण केली आहे. काम करत असताना सुरवातीच्या काळात त्यांना लिंग भेदाचा सामना करावा लागला पण जेव्हा त्या उच्च पदावर पोहोचल्या तेव्हा हा भेदभाव कमी झाला असल्याचे त्या सांगतात. मुलींना कार्यशक्तीमध्ये येण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हे तयांचे उद्दिष्ट आहे. त्या म्हणतात; ” मी देखील एका लहान शहरातील आहे आणि ग्रामीण आणि बी-टाउनमधील मुलींची स्थिती किती वाईट आहे याची मला जाणीव आहे. यासाठी मला अशा मुलींना मार्गदर्शन करायचे आहे जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान वाढेल.”

‘मॅडम कमिशनर’
मीरा बोरवणकर यांनी आपल्या पोलिस करकीर्दीविषयी भाष्य करणारे ‘मॅडम कमिशनर’ हे पुस्तक नुकतंच लिहलं आहे. या पुस्तकांत अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. येरवड्यातील पोलिस स्टेशनच्या जमिनीचा लिलावाचा निर्णय तत्कालीन मंत्री ‘दादा’ यांनी घेतला होता, असा गंभीर आरोप मॅडम कमिशनर या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे; यामुळे सध्या मीरा बोरवणकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वाद पेटला असून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

बोरवणकर यांनी बेधडक कारवाया (Career Success Story) केल्या. प्रसिध्द अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ हा चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित आहे. मीरा बोरवणकर या आपल्या देशातील सर्व महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

TCS Recruitment Scam : सरकारी नोकर भरती करणाऱ्या TCS कंपनीचा घोटाळा उघड; 16 कर्मचाऱ्यांना दिला डच्चू; वेंडर्सवरही कारवाईचा बडगा

TCS Recruitment Scam

करिअरनामा ऑनलाईन । TCS ही देशातील सर्वात मोठी IT कंपनी (TCS Recruitment Scam) आहे. या कंपनीच्या माध्यमातून सरकारी नोकर भरती केली जाते. हाती आलेल्या माहितीनुसार TCS ने आता नोकरभरती घोटाळ्याबाबत मोठी कारवाई केली आहे. नुकताच उघडकीस आलेल्या या घोटाळ्यामुळे कंपनीने आपल्या 16 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे; तसेच 6 वेंडर्सवर बंदी घातली आहे. कंपनीने या कारवाईची माहिती दिली आहे.

टाटा ग्रुपच्या आयटी कंपनीने याबाबतचे निवेदन जारी केले आहे. नोकर भरती दरम्यान झालेल्या घोटाळ्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान कंपनीचे १९ कर्मचारी भरती घोटाळ्यात सामील असल्याचे आढळले. त्यापैकी १६ कर्मचाऱ्यांना कंपनीने काढून टाकले, तर ३ कर्मचाऱ्यांना रिसोर्स मॅनेजमेंट युनिटमधून काढून टाकण्यात आले आहे.

वेंडर्सवरही कारवाईचा बडगा
टीसीएसने (TCS) कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त काही वेंडर्सवरही कारवाई केली आहे. कंपनीने ६ वेंडर्स, त्यांचे मालक आणि त्यांच्याशी संबंधित लोकांना TCS बरोबर कोणताही (TCS Recruitment Scam) व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. जेव्हा भरती घोटाळ्याची माहिती समोर आली, तेव्हा टीसीएसचे काही वेंडर्स त्यांच्या काही कर्मचाऱ्यांशी संगनमत करून नोकऱ्यांमध्ये हेराफेरी करत असल्याचे उघड झाले होते.

4 महिने चालला तपास (TCS Recruitment Scam)
के. कृतिवासन यांनी नुकतीच टीसीएसच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी जबाबदारी स्वीकारल्यानंतर या अनियमिततेचा आरोप समोर आला आहे. सीईओ पदाची सूत्रे हाती घेताच त्यांना हे मोठे आव्हान पेलावे लागले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर टीसीएसने कडक भूमिका घेतली होती. ही बाब जून 2023 मध्ये उघडकीस आली आणि त्याचवेळी कंपनीने तपास सुरु केला.
तब्बल ४ महिने हा तपास सुरु होता. तपासानंतर TCSने आता (TCS Recruitment Scam) कारवाई केली आहे. या तपासात कोणत्याही प्रमुख व्यवस्थापकाचा सहभाग उघड झाला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. या भरती घोटाळ्यामुळे कंपनीवर कोणतेही आर्थिक दायित्व आलेले नाही. आगामी काळात कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी काम करणार असल्याचे TCS ने सांगितले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NEP 2023 : ‘या’ विद्यार्थ्यांना दोन्ही भाषांमध्ये उत्तरे लिहता येणार; पहा काय म्हणाले शिक्षण मंत्री…

NEP 2023

करिअरनामा ऑनलाईन । तंत्रविद्यानिकेतन (पॉलिटेक्निक) आणि (NEP 2023) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका आता मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्त्व देण्यात आले असून राज्यात मराठीतून व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना पेपरमधील उत्तरे देखील दोन्ही भाषेत लिहिता येणार आहेत; अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित ‘डीईएस पुणे विद्यापीठा’चे उद्‌घाटन पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले; त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास सोसायटीचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (AICTE) उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, डीईएस विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, सचिव धनंजय कुलकर्णी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले, “प्राध्यापकाने कोणत्याही भाषेत शिकवावे आणि विद्यार्थ्यांना ते आपल्या भाषेत ऐकू येईल, असे सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे. अभ्यासक्रम (NEP 2023) विद्यार्थ्यांना मातृभाषेतून अधिक चांगल्याप्रकारे समजतात; यासाठी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.  हे लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला आणि भारतीय संस्कृती, परंपरेला महत्त्व दिले आहे. त्यामुळे देशाची परंपरा, संस्कृती हा विषय विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांनी अभ्यासक्रमात आणावा, यासाठी सरकार आग्रही राहणार आहे.”

राज्यात आतापर्यंत दीड हजार शिक्षण संस्थांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. परंतु उच्च शिक्षण संस्थांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी न केल्यास अशा संस्थांना जगातील कोणत्याही विद्यापीठांची संलग्न होण्याची दारे खुली राहतील. परंतु या शिक्षण संस्था कोणत्याही भारतीय विद्यापीठांशी संलग्न राहणार नाहीत; असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com