TCS Recruitment Scam : सरकारी नोकर भरती करणाऱ्या TCS कंपनीचा घोटाळा उघड; 16 कर्मचाऱ्यांना दिला डच्चू; वेंडर्सवरही कारवाईचा बडगा

करिअरनामा ऑनलाईन । TCS ही देशातील सर्वात मोठी IT कंपनी (TCS Recruitment Scam) आहे. या कंपनीच्या माध्यमातून सरकारी नोकर भरती केली जाते. हाती आलेल्या माहितीनुसार TCS ने आता नोकरभरती घोटाळ्याबाबत मोठी कारवाई केली आहे. नुकताच उघडकीस आलेल्या या घोटाळ्यामुळे कंपनीने आपल्या 16 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे; तसेच 6 वेंडर्सवर बंदी घातली आहे. कंपनीने या कारवाईची माहिती दिली आहे.

टाटा ग्रुपच्या आयटी कंपनीने याबाबतचे निवेदन जारी केले आहे. नोकर भरती दरम्यान झालेल्या घोटाळ्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान कंपनीचे १९ कर्मचारी भरती घोटाळ्यात सामील असल्याचे आढळले. त्यापैकी १६ कर्मचाऱ्यांना कंपनीने काढून टाकले, तर ३ कर्मचाऱ्यांना रिसोर्स मॅनेजमेंट युनिटमधून काढून टाकण्यात आले आहे.

वेंडर्सवरही कारवाईचा बडगा
टीसीएसने (TCS) कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त काही वेंडर्सवरही कारवाई केली आहे. कंपनीने ६ वेंडर्स, त्यांचे मालक आणि त्यांच्याशी संबंधित लोकांना TCS बरोबर कोणताही (TCS Recruitment Scam) व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. जेव्हा भरती घोटाळ्याची माहिती समोर आली, तेव्हा टीसीएसचे काही वेंडर्स त्यांच्या काही कर्मचाऱ्यांशी संगनमत करून नोकऱ्यांमध्ये हेराफेरी करत असल्याचे उघड झाले होते.

4 महिने चालला तपास (TCS Recruitment Scam)
के. कृतिवासन यांनी नुकतीच टीसीएसच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी जबाबदारी स्वीकारल्यानंतर या अनियमिततेचा आरोप समोर आला आहे. सीईओ पदाची सूत्रे हाती घेताच त्यांना हे मोठे आव्हान पेलावे लागले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर टीसीएसने कडक भूमिका घेतली होती. ही बाब जून 2023 मध्ये उघडकीस आली आणि त्याचवेळी कंपनीने तपास सुरु केला.
तब्बल ४ महिने हा तपास सुरु होता. तपासानंतर TCSने आता (TCS Recruitment Scam) कारवाई केली आहे. या तपासात कोणत्याही प्रमुख व्यवस्थापकाचा सहभाग उघड झाला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. या भरती घोटाळ्यामुळे कंपनीवर कोणतेही आर्थिक दायित्व आलेले नाही. आगामी काळात कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी काम करणार असल्याचे TCS ने सांगितले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com