Home Blog Page 200

GK Updates : माशीच्या तोंडात किती दात असतात? दर 2 महिन्यांनी शरीराचा कोणता भाग बदलतो? असे ट्रिकी प्रश्न एकदा वाचाच

GK Updates 23 Nov.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न. दर 2 महिन्यांनी शरीराचा कोणता भाग बदलतो?
उत्तर : माणसाचं मन दर दोन महिन्यांनी बदलतं, तर संपूर्ण शरीर बदलायला साधारण 5-7 वर्षं लागतात.
प्रश्न. कोणत्या लाकडाची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे?
उत्तर : लाल चंदन अत्यंत मौल्यवान आहे. (GK Updates)

प्रश्न. कोणत्या देशात तुरुंगातून पळून जाण्यासाठी शिक्षा नाही?
उत्तर : जर्मनीत कैदी तुरुंगातून पळून गेल्यावर त्याला वेगळी शिक्षा दिली जात नाही, तर त्याला पकडून पुन्हा तुरुंगात आणले जाते.
प्रश्न. तापवल्यावर ती घनरूप होते, अशी कोणती गोष्ट आहे?
उत्तर : अंडं तापवलं की ते वितळण्याऐवजी घट्ट होतं.

प्रश्न. (GK Updates) बुडल्यावर कोणी वाचवत नाही अशी कोणती गोष्ट आहे?
उत्तर: मावळतीचा सूर्य
प्रश्न. माशीच्या तोंडात किती दात असतात?
उत्तर : माशीच्या तोंडात एकही दात नसतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIM Recruitment 2023 : मुंबईत नोकरीचा गोल्डन चान्स!! इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ‘या’ पदांवर भरती सुरु

IIM Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई (IIM Recruitment 2023) अंतर्गत विविध 73 पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनिअर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट, रिसर्च असोसिएट इंडस्ट्रियल, रिसर्च असोसिएट/ रिसर्च असिस्टंट, ड्रायव्हर, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक सहयोगी, वैद्यकीय अधिकारी, ज्युनियर अभियंता इलेक्ट्रिकल, ज्यु. अभियंता सिव्हिल, ओएसडी करिअर डेव्हलपमेंट आणि प्लेसमेंट, ओएसडी इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लॅनिंग, सीईओ कार्यकारी शिक्षण, सीईओ – इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि उद्योजकता ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई
भरले जाणारे पद – ज्युनिअर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट, रिसर्च असोसिएट इंडस्ट्रियल, रिसर्च असोसिएट/ रिसर्च असिस्टंट, ड्रायव्हर, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक सहयोगी, वैद्यकीय अधिकारी, ज्युनियर. अभियंता इलेक्ट्रिकल, ज्यु. अभियंता सिव्हिल, ओएसडी करिअर डेव्हलपमेंट आणि प्लेसमेंट, ओएसडी इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लॅनिंग, सीईओ कार्यकारी शिक्षण, सीईओ – इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि उद्योजकता
पद संख्या – 73 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – मुंबई (IIM Recruitment 2023)

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
ज्युनिअर रिसर्च फेलो 01
रिसर्च असोसिएट 01
रिसर्च असोसिएट इंडस्ट्रियल 01
रिसर्च असोसिएट/ रिसर्च असिस्टंट
ड्रायव्हर 01
शिक्षकेतर कर्मचारी 50
शैक्षणिक सहयोगी 12
वैद्यकीय अधिकारी 01
ज्युनियर. अभियंता इलेक्ट्रिकल 01
ज्यु. अभियंता सिव्हिल 01
ओएसडी करिअर डेव्हलपमेंट आणि प्लेसमेंट 01
ओएसडी इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लॅनिंग 01
सीईओ कार्यकारी शिक्षण 01
सीईओ – इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि उद्योजकता 01

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनिअर रिसर्च फेलो M.Sc./M.Tech. in Environmental Science/Engineering, MBA in Environmental or Sustainability Management. Ph.D. preferred. Candidates with relevant experience in the abovementioned areas will be given preference.
रिसर्च असोसिएट M.Sc./M. Tech. in Environmental Science/Engineering, MBA in Environmental or Sustainability Management, Ph.D. in relevant field preferred. Candidates with relevant experience in environmental management, LCA, sustainability, product sustainability, net zero, etc. will be given preference.
रिसर्च असोसिएट इंडस्ट्रियल M.Sc./M. Tech. in Environmental Science/Engineering, MBA in Environmental or Sustainability Management, Ph.D. in relevant field preferred. Candidates with relevant experience in environmental management, LCA, sustainability, product sustainability, net zero, etc. will be given preference.
रिसर्च असोसिएट/ रिसर्च असिस्टंट PG Degree in Management (MBA), Economics or Engineering (MTech/ME) with minimum of 60 %
ड्रायव्हर Minimum 12th Standard (10+2) in any discipline from a recognized Board with ability to speak in Hindi, English and conversant with local language
शिक्षकेतर कर्मचारी
शैक्षणिक सहयोगी Minimum qualification required is MBA or Post Graduate Diploma in Management (PGDM)-which is equivalent to Master’s degree from a reputed Institution with a minimum of 60% marks.
वैद्यकीय अधिकारी M.B.B.S degree from an Institution/ University recognized by the Medical Council of India.
ज्युनियर. अभियंता इलेक्ट्रिकल Bachelor’s degree in Electrical Engineering with 60% marks from a recognized Institute with a minimum of 3 years’ relevant experience in electrical maintenance & other related jobs in reputed organizations. Knowledge of computer operations is essential. Knowledge of CPWD rules/manual is desirable
ज्यु. अभियंता सिव्हिल B.Tech/BE or equivalent degree with minimum 60% marks in Civil Engineering from a recognized Institute. Candidates with higher qualifications will be given preference.
ओएसडी करिअर डेव्हलपमेंट आणि प्लेसमेंट Postgraduate/Diploma in Management Studies with Marketing/HR will be preferred.
ओएसडी इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लॅनिंग B.Tech. / BE or equivalent degree in Civil Engineering with a minimum of 60% marks or equivalent grade point average from a recognized university with 15 years relevant experience at PL-12 (7th CPC) or equivalent. Master’s degree will be Preferable
सीईओ कार्यकारी शिक्षण
  • Candidate should be a Postgraduate from a reputed Institute.
  • Candidate with higher qualifications will be given preference.
सीईओ – इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि उद्योजकता Candidates must have MTech/ MBA/ PGDM/Equivalent Master’s degree in Management/ Finance/ Marketing/ AgriMarketing/ Agri Economics/ Economics/ Technology/ Technology Commercialization/ Entrepreneurship from a recognized institute with First class marks / grades

 

मिळणारे वेतन – (IIM Recruitment 2023)

पदाचे नाव वेतनश्रेणी
ज्युनिअर रिसर्च फेलो Rs. 31000/month + 24% HRA
रिसर्च असोसिएट Rs. 35,000-40,000/- per month
रिसर्च असोसिएट इंडस्ट्रियल Rs. 35,000-40,000/- per month
रिसर्च असोसिएट/ रिसर्च असिस्टंट
ड्रायव्हर Rs.25,000/- to Rs.30,000/-
शिक्षकेतर कर्मचारी
  • Rs.67700 -208700
  • Rs.56100-177500
  • Rs.47600-151100
  • Rs.44900-142400
  • Rs.29200-92300
  • Rs.25500-81100
  • Rs.21700-69100
  • Rs.19900-63200
शैक्षणिक सहयोगी Rs. 35,000 – 45,000/- per month
वैद्यकीय अधिकारी Rs. 70,000/- (allinclusive) & out of campus allowance of Rs 4500/-
ज्युनियर. अभियंता इलेक्ट्रिकल Rs. 45,000/- to Rs 50,000/- & out of campus allowance of Rs 4500/-
ज्यु. अभियंता सिव्हिल Rs. 45,000/- to Rs 50,000/- & out of campus allowance of Rs 4500/-
ओएसडी करिअर डेव्हलपमेंट आणि प्लेसमेंट Rs.145000 – 175000/- with Other Benefits
ओएसडी इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लॅनिंग Rs.145000 – Rs. 175000/- with Other Benefits
सीईओ कार्यकारी शिक्षण Rs. 1,75,000/- to Rs 2,10,000/- with Other Benefits
सीईओ – इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि उद्योजकता Rs 1,75,000/- to Rs 2,10,000/- per Month

 

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://iimmumbai.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Engineering Jobs : इंजिनियर्ससाठी आनंदाची बातमी!! बेल ऑप्टोनिक डिव्हाइसेस लिमिटेड, पुणे येथे मिळणार उत्तम पगाराची नोकरी

Engineering Jobs

करिअरनामा ऑनलाईन । बेल ऑप्टोनिक डिव्हाइसेस लिमिटेड, पुणे (Engineering Jobs) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक, अभियंता, खाते सहाय्यक, प्रक्रिया अभियंता, इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, यांत्रिक अभियंता पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – बेल ऑप्टोनिक डिव्हाइसेस लिमिटेड, पुणे
भरले जाणारे पद – व्यवस्थापक, अभियंता, खाते सहाय्यक, प्रक्रिया अभियंता, इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, यांत्रिक अभियंता
पद संख्या – 08 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. व्यवस्थापक – एचआर बीईएल ऑप्टोनिक डिव्हाइसेस लिमिटेड, EL-30, ‘J’ ब्लॉक, भोसरी औद्योगिक क्षेत्र, पुणे- 411 026.
नोकरीचे ठिकाण – पुणे

भरतीचा तपशील – (Engineering Jobs)

पद पद संख्या 
व्यवस्थापक 03
अभियंता 01
खाते सहाय्यक 01
प्रक्रिया अभियंता 01
इलेक्ट्रॉनिक्स अभियंता 01
यांत्रिक अभियंता 01

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक BE / B.TECH (Mechanical Engg.)
अभियंता BE / B.TECH (Mechanical Engg.)
खाते सहाय्यक B.Com
प्रक्रिया अभियंता BE / B.TECH (Mechanical)
इलेक्ट्रॉनिक्स अभियंता BE (Electronics/ Industrial Electronics/E &TC) from a UGC recognized University / Institution
यांत्रिक अभियंता BE (Mechanical) from a UGC recognized University / Institution

 

मिळणारे वेतन – (Engineering Jobs)

पद मिळणारे वेतन
व्यवस्थापक
  • 50000 – 3%- 160000
  • 40000 -3%- 140000
अभियंता 30000 – 3%- 120000
खाते सहाय्यक 12100-3%- 14150
प्रक्रिया अभियंता E-2 30000-120000
इलेक्ट्रॉनिक्स अभियंता 1st year -23,500/-
2nd year-25,500/-
3rd year-27,500/
यांत्रिक अभियंता 1st year -23,500/-
2nd year-25,500/-
3rd year-27,500/-

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी नोटिफिकेशन (Engineering Jobs) काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://belop-india.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : राज्याच्या ‘या’ महापालिकेत विविध पदांवर भरती सुरु

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत (Job Notification) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कामगार अधिकारी, आगार व्यवस्थापक, सहाय्यक आगार व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, उद्यान अधिक्षक/उद्यान अधिकारी, शाखा अभियंता पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर
भरले जाणारे पद – कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कामगार अधिकारी, आगार व्यवस्थापक, सहाय्यक आगार व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, उद्यान अधिक्षक/उद्यान अधिकारी, शाखा अभियंता
पद संख्या – 22 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, दुसरा मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर-३

नोकरीचे ठिकाण – उल्हासनगर
भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
कार्यकारी अभियंता 01
उप अभियंता 05
कामगार अधिकारी 01
आगार व्यवस्थापक 01
सहाय्यक आगार व्यवस्थापक 01
प्रशासकीय अधिकारी 01
उद्यान अधिक्षक/उद्यान अधिकारी 01
शाखा अभियंता 10

 

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. (Job Notification)
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्यावर पाठवावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CFS Recruitment 2023 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी; सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस अंतर्गत नवीन भरती सुरु 

CFS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (CFS Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक, व्यवसाय विकास कार्यकारी, कंपनी सचिव पदांच्या 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.

बँक – सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
भरले जाणारे पद – व्यवस्थापक, व्यवसाय विकास कार्यकारी, कंपनी सचिव
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – (CFS Recruitment 2023)
1. व्यवस्थापक, कंपनी सचिव – 35 वर्षे
2. व्यवसाय विकास कार्यकारी – 45 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
व्यवस्थापक 01
व्यवसाय विकास कार्यकारी 01
कंपनी सचिव 01

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. पदाचे नावशैक्षणिक पात्रताव्यवस्थापक –

  • Graduate in any discipline.
  • Preferable: MBA Finance/Marketing or PGDBM in Equity and Market Research. The Institute should be recognized / approved by Govt. bodies/ AICTE/ UGC.

2. व्यवसाय विकास कार्यकारी

  • Graduate in any discipline.
  • Preferable: MBA Finance/Marketing. The Institute should be recognized / approved by Govt. bodies/ AICTE/ UGC.

3. कंपनी सचिव

  • Company Secretary: Must be Associate/Fellow Member of Institute of Company Secretaries of India. (CFS Recruitment 2023)
  • Preferred Qualification: LLB
    LLB : A Bachelor Degree in Law (LLB) integrated 5 years/3years regular course from recognized University

 

मिळणारे वेतन –

पद वेतन (दरमहा)
व्यवस्थापक 33,000.00
व्यवसाय विकास कार्यकारी 50,000.00
कंपनी सचिव 66,000.00

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करा.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://cfsl.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : 10वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!! मराठी भाषा संचालनालयात निघाली भरती

Government Job (32)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासन, मराठी भाषा (Government Job) विभागाच्या अधिनस्त असलेल्या भाषा संचालनालय, मुंबई व विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालय अंतर्गत नवीन भरती निघाली आहे. कनिष्ठ ग्रंथपाल, शिपाई पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभागाच्या अधिनस्त असलेल्या भाषा संचालनालय, मुंबई व विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालय
भरले जाणारे पद – कनिष्ठ ग्रंथपाल, शिपाई
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – १८ वर्षे
1. खुल्या प्रवर्गासाठी – ४० वर्षे
2. मागासवर्गीयांसाठी – ४५ वर्षे
परीक्षा फी – (Government Job)
1. अमागास : रु. १०००/-
2. मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग : रु. ९००/-
(उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच देय कर अतिरिक्त असतील.)
निवड प्रक्रिया – मुलाखत

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
कनिष्ठ ग्रंथपाल 01
शिपाई 02

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ ग्रंथपाल
  • उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • ग्रंथालय शास्त्र या विषयातील पदविका किंवा पदवी धारण केलेली असावी.
शिपाई उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक.

 

मिळणारे वेतन –

पद वेतन 
कनिष्ठ ग्रंथपाल २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार)
शिपाई १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार

महत्वाची कागदपत्रे –
1. अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
2. वयाचा पुरावा
3. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
4. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
5. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
6. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा (Government Job)
7. एस. एस. सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
8. अराखीव, महिला, मागासवर्गीय, आ.दु.घ., आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
9. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
10. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
11. अनुभव प्रमाणपत्र

असा करा अर्ज –
1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://directorate.marathi.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAS Success Story : एका घटनेने मिळाला टर्निंग पॉईंट; चहा विकणाऱ्या बापाचा लेक झाला IAS; कोचिंगशिवाय पास होवून टॉप केलं

IAS Success Story of Deshal Dan

करिअरनामा ऑनलाईन । या तरुणाचे वडील चहा विकून कुटुंबाचा (IAS Success Story) उदरनिर्वाह चालवायचे. घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होत होते. त्यांचा मोठा मुलगा अभ्यासात हुशार होता. त्याची भारतीय नौदलात निवड झाली होती, पण पाणबुडीला झालेल्या अपघातात तो शहीद झाला. या घटनेने देशलला मोठा धक्का बसला, पण काही दिवसांनी यातून तो सावरला आणि त्याने अभ्यासात मेहनत घ्यायला सुरवात केली. आज आपण IAS अधिकारी देशल दानबद्दल जाणून घेणार आहोत….

त्याने इतिहास रचला
UPSC परीक्षेत यशस्वी उमेदवारांच्या अशा अनेक कहाण्या समोर येतात, ज्या इतरांसाठी प्रेरणा बनतात. आम्ही तुम्हाला अशाच एका IAS अधिकाऱ्याची कहाणी सांगणार आहोत, ज्याने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर खूप संघर्ष केला, पण हार मानली नाही आणि IAS बनून इतिहास रचला…

पाणबुडीच्या अपघातात भाऊ शहीद झाला (IAS Success Story)
देशल दान हा राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील सुमलियाई गावचा रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि 7 भावंडे आहेत. भावा-बहिणींमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे कुटुंब अगदी सामान्य. या तरुणाचे वडील चहा विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होत होते. त्यांचा मोठा मुलगा अभ्यासात हुशार होता. त्याची भारतीय नौदलात निवड झाली होती, पण पाणबुडीला झालेल्या अपघातात तो शहीद झाला. या घटनेने देशलला मोठा धक्का बसला, पण त्यातून तो सावरला. त्याला अभ्यासात गोडी होतीच. त्याने बारावीनंतर जेईई (JEE) परीक्षा दिली आणि आयआयटी (IIT) जबलपूरमध्ये प्रवेश घेतला. येथून त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केले.

दिल्लीत जावून केला अभ्यास
देशलने लहानपणापासूनच IAS होण्याचे स्वप्न पाहिले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच्याकडे चांगल्या पगाराची खाजगी नोकरी करण्याचा पर्याय होता, पण त्याने यूपीएससीची (UPSC) परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. अभ्यास करण्यासाठी तो दिल्लीत आला. त्याला या गोष्टीची जाणीव होती, की या UPSC पास होण्यासाठी बराच वेळ आणि पैसे खर्च होणार आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला लवकरात लवकर परीक्षा पास करायची होती. त्यादृष्टीने त्याची घोडदौड सुरु होती.

कोचिंग क्लासशिवाय पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो दिवसरात्र मेहनत करू लागला. त्याच्या अथक परिश्रमाचे फळ म्हणजे तो UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात पास झाला आणि त्याला IAS पद मिळाले. विशेष म्हणजे दिल्लीत अभ्यास करत असताना त्याने कोणत्याही कोचिंग क्लासला प्रवेश घेतला नाही; तर स्वत:च्या बळावर (IAS Success Story) त्याने परिक्षेत बाजी मारली. 2017 मध्ये त्याने ही परीक्षा दिली; यामध्ये त्याने संपूर्ण भारतातून 82 वा क्रमांक पटकावला. एका छोट्या गावातून IAS होण्याचा त्याचा प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणा देणारा आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Medical Education : आता ‘बायोलॉजी’ विषय नसतानाही होता येणार डॉक्टर; पहा नॅशनल मेडिकल कमिशनने काय सांगितलं… 

Medical Education (2)

करिअरनामा ऑनलाईन । डॉक्टर होवून करिअर (Medical Education) घडवण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. पण या प्रवासात एका गोष्टीचा अडथळा येतो तो म्हणजे विविध शाखांमध्ये सुरुवातीचं महाविद्यालयीन शिक्षण झालं असल्याचा. अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही महत्वाची अपडेट घेवून आलो आहोत.

तुमचा बायोलॉजी विषय नसेल तरीही होवू शकता डॉक्टर (Medical Education)
डॉक्टर होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाटेतून एक मोठा अडथळा दूर होणार असून, डॉक्टर होण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. 10+2 म्हणजेच बारावीची (HSC Exams) परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित या विषयांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांनाही डॉक्टर होता येणार आहे. अट फक्त एकच आहे, की वैद्यकिय शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी additional subject म्हणून बारावीच्या परीक्षेमध्ये biology/biotechnology मध्ये उत्तीर्ण असावं. राष्ट्रीय वैद्यकिय आयोगानं याबाबतच्या मार्गदर्शक सुचना नुकत्याच जारी केल्या आहेत.

National Medical Commission च्या मार्गदर्शक सूचना
NMC च्या माहितीनुसार physics, chemistry, biology/biotechnology आणि इंग्रजी (additional subject) विषयांसह बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस (MBBS) आणि बीडीएसच्या (BDS) प्रवेशासाठीची NEET-UG परीक्षा देता येणार आहे. इतकंच नव्हे, तर या विद्यार्थ्यांना एनएमसीकडून (NMC) देण्यात येणारा कायदेशीर पुरावा म्हणून पात्रता प्रमाणपत्रही देण्यात येणार (Medical Education) आहे. ज्यामुळं त्यांना परदेशात पदव्युत्तर शिक्षणही घेता येणार आहे.
डॉक्टर होण्यासाठी यापूर्वी विद्यार्थ्यांनी सलग दोन वर्षांसाठी म्हणजेच अकरावी आणि बारावीमध्ये physics, chemistry, biology/biotechnology या विषयांचा सातत्यपूर्ण अभ्यास करणं अपेक्षित होतं. त्यासोबतच एमबीबीएस आणि बीडीएससाठी इंग्रजीसुद्धा महत्त्वाचा विषय होता. पण, आता मात्र वैद्यकिय क्षेत्रातील या नव्या निर्णयामुळं अनेकांसाठीच खऱ्या अर्थानं करिअरच्या नव्या वाटा निर्माण झाल्या आहेत; असं म्हणायला हरकत नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC NET Syllabus : UGC-NET चा अभ्यासक्रम बदलणार; पहा तपशील…

UGC NET Syllabus (1)

करिअरनामा ऑनलाईन । UGC-NET च्या अभ्यासक्रमात (UGC NET Syllabus) काही बदल केले जाणार आहेत. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिपच्या नियुक्तीसाठी UGC च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अभ्यासक्रम अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2017 मधील बदलानंतर आता या अभ्यासक्रमामध्ये बदल केला जाणार आहे.

युजीसी (UGC) लवकरच विविध विषयांतील अभ्यासक्रम तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत तज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार असून, नवीन अभ्यासक्रम लागू झाल्यावर त्यापूर्वी उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळ दिला जाईल. UGC NET परीक्षा वर्षातून दोनदा म्हणजेच जून आणि डिसेंबरमध्ये घेतली जाते. पुढील महिन्यात UGC-NET परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर 2024 मध्ये UGC-NETचे पहिले सत्र 10 ते 21 जूनदरम्यान होणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीनंतर (UGC NET Syllabus) बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम आणि समग्र शिक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली आहेत. उच्च शिक्षणात होत असलेल्या बदलांच्या अनुषंगाने UGC-NETचा अभ्यासक्रमही अद्ययावत केला जाईल, असा निर्णय यूजीसी आयोगाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिपच्या नियुक्तीसाठी UGC-NET च्या अभ्यासक्रमातही बदल केले जाणार आहेत. यूजीसी आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अभ्यासक्रम अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NET SET Exam : भावी प्राध्यापकांसाठी मोठी अपडेट; ‘सेट’ परीक्षा वर्षातून दोनवेळा होणार

NET SET Exam

करिअरनामा ऑनलाईन । प्राध्यापक होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी (NET SET Exam) महत्वाची अपडेट आहे. सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘नेट’ (NET) परीक्षेप्रमाणेच राज्याची ‘SET’ परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा विचार करण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत सुकाणू समितीने गठित केलेल्या समितीच्या निर्णयांचा आधारे हे नवे बदल अपेक्षीत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतली जाणारी यंदाची सेट परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असली तरी त्यानंतरची परीक्षा मात्र ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा विचार आहे.
विद्यापीठाकडून शेवटच्या ऑफलाईन सेटचे आयोजन करण्यात येणार असून, त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी सुमारे एक महिन्यांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर परीक्षा अर्जांची छाननी, प्रवेशपत्र तयार करणे या गोष्टींसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

कधी होणार परीक्षा (NET SET Exam)
परिणामी सेट परीक्षा येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात आयोजित केली जाणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे संच तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने सेट परीक्षा सुरू झाल्यानंतर वर्षातून दोनदा सेट परीक्षेचे आयोजन करण्याचा विचार आहे.
ही असेल शेवटची ऑफलाईन ‘SET’
महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षेचे आयोजन केले जाते. काही वर्षांपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार की ऑफलाईन याबाबत संभ्रम होता. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत समितीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीत सर्वसाधारणपणे मार्च-एप्रिल २०२४ मध्ये होणारी सेट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी. मात्र, त्यानंतरच्या पुढील सर्व परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात, असे निश्चित करण्यात आले.

परीक्षेतील गोंधळाबाबत विद्यापीठ सावध
विविध ऑनलाईन भरती परीक्षांमधील गोंधळ पाहता विद्यापीठाने (NET SET Exam) सेट परीक्षेसाठी सावध पाऊले उचलली आहे. परीक्षा केंद्राची प्रत्यक्ष पाहणी, इंटरनेटची बॅंड विड्थ आणि सुविधांच्या आधारेच ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कोणती अडचण येऊ नये, तसेच परीक्षेवेळी गोंधळ होऊ नये म्हणून आधी प्रत्यक्ष चाचणी केल्यानंतर ऑनलाईन सेट परीक्षेचा विचार केला जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com