Home Blog Page 199

ICMR Recruitment 2023 : पुण्यात नोकरी!! नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत ‘ही’ पदे रिक्त

ICMR Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर पुण्यात नोकरी शोधत असाल (ICMR Recruitment 2023) तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ पदांच्या ८० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे
भरले जाणारे पद –
1) तांत्रिक सहाय्यक – 49 पदे
2) तंत्रज्ञ – 1- 31 पदे (ICMR Recruitment 2023)
पद संख्या – 80 पदे
अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात पहा)
वय मर्यादा – लवकरच उपलब्ध होईल.
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

काही महत्वाच्या लिंक्स – (ICMR Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – niv.icmr.org.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MIDC Recruitment 2023 : MIDC अंतर्गत ‘या’ पदावर भरती; थेट मुलाखतीने होणार निवड

MIDC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । मुसळगाव, सिन्नर येथील रिंग प्लस अॅक्वा लिमिटेड (MIDC Recruitment 2023) नामांकित कंपनी, नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटद्वारे ऑपरेशन असोसिएट्स पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखती सुरु झाल्या असून दि. 01 डिसेंबर 2023 पर्यंत मुलाखत प्रक्रिया पार पडणार आहे.

संस्था – मुसळगाव, सिन्नर येथील रिंग प्लस अॅक्वा लिमिटेड नामांकित कंपनी नाशिक
भरले जाणारे पद – फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटद्वारे ऑपरेशन असोसिएट्स
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक (MIDC Recruitment 2023)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 26 नोव्हेंबर 2023 ते 01 डिसेंबर 2023
मुलाखतीचा पत्ता – रिंग प्लस अॅक्वा लिमिटेड D3/D4 मुसळगाव MIDC सिन्नर, नाशिक

आवश्यक शैक्षणिक पात्रता – BE/Diploma Mechanical/B.Sc./BE Electrical
निवड प्रक्रिया – (MIDC Recruitment 2023)
1. भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे..
3. मुलाखत दि. 26 नोव्हेंबर 2023 ते 01 डिसेंबर 2023 रोजी घेतली जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : महाराष्ट्र राज्य हज समिती अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; पात्रता 10 वी पास ते ग्रॅज्युएट

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य हज समिती (Job Notification) अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर, हेल्पलाईनसह संगणक तंत्रज्ञ, लिपिक, हेल्पलाइन ऑपरेटर, शिपाई पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य हज समिती
भरले जाणारे पद – डेटा एंट्री ऑपरेटर, हेल्पलाइनसह संगणक तंत्रज्ञ, लिपिक, हेल्पलाइन ऑपरेटर, शिपाई
पद संख्या – 16 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य हज समिती, मोहम्मद हाजी साबू सिद्दीक मुसाफ़िरखाना, खोली क्र. ६,७ व ८, तळ मजला, मुंबई – ४०० ००१
नोकरीचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – १८ ते ३८ वर्षे

भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
डेटा एंट्री ऑपरेटर 10
हेल्पलाइनसह संगणक तंत्रज्ञ 01
लिपिक 02
हेल्पलाइन ऑपरेटर 01
शिपाई 02


आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
डेटा एंट्री ऑपरेटर कोणत्याही शाखेतील पदवी
हेल्पलाइनसह संगणक तंत्रज्ञ कोणत्याही शाखेतील पदवी
लिपिक कोणत्याही शाखेतील पदवी
हेल्पलाइन ऑपरेटर कोणत्याही शाखेतील पदवी
शिपाई १०वी उत्तीर्ण

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (Job Notification) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mshc.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : 10 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी सुवर्णसंधी; ‘या’ नामांकित पतसंस्थेत मिळणार नोकरी 

Job Alert (88)

करिअरनामा ऑनलाईन । पार्श्वनाथ पतसंस्था, कराड अंतर्गत विविध रिक्त (Job Alert) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखाप्रमुख, अधिकारी, लिपिक, शिपाई पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – पार्श्वनाथ पतसंस्था, कराड
भरले जाणारे पद – शाखाप्रमुख, अधिकारी, लिपिक, शिपाई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2023
E-Mail ID – [email protected]
पतसंस्थेचा पत्ता – श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, ७५ गुरुवार पेठ चावडी चौक, कराड

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
शाखाप्रमुख Graduate in any discipline and computer knowledge required
अधिकारी Graduate in any discipline and computer knowledge required
लिपिक Graduate in any discipline and computer knowledge required
शिपाई 10th Pass

 

आवश्यक कागदपत्रे –
अर्जासोबत स्वतःचा फोटो, शैक्षणिक पात्रता प्रमाणित प्रती जोडणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज नमूद संबंधित E-Mail पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह पाठवावेत.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची (Job Alert) प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. दिलेली माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.
6. मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.parshwanathpatsanstha.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC GD Recruitment 2023 : काय सांगता!! SSC GD ने काढली तब्बल 26,146 पदांवर भरती; 10 वी पास उमेदवार करु शकतात अर्ज 

SSC GD Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (SSC GD Recruitment 2023) असणाऱ्या उमेदवारांच्या आनंदात भर घालणारी बातमी हाती आली आहे. कर्मचारी निवड आयोग अंतर्गत कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)पदांच्या तब्बल 26,146 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Comission)
भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)
पद संख्या – 26146 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023
वय मर्यादा – 18 ते 23 वर्षे

भरतीचा तपशील – (SSC GD Recruitment 2023)
SSC GD Constable Bharti 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
The candidates must have passed Matriculation or 10th Class Examination from a recognized Board/ University
मिळणारे वेतन – Rs. 21,700 ते Rs. 69,100 दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी वेबसाइटवर उपलब्ध सूचना काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना (SSC GD Recruitment 2023) संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
5. उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे हे तपासून घ्या.
6. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल/दुरुस्ती/फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

काही महत्वाच्या तारखा –
SSC GD Constable Bharti 2023

भरतीचा संपूर्ण तपशील –

Force Male  Female
BSF 5211 963
CISF 9913 1112
CRPF 3326 71
SSB 593 42
ITBP 2694 495
AR 1448 42
SSF 222 74
Total 23347 2799


काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : 10 वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी

Government Job (33)

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण संचालनालय, दमण येथे (Government Job) विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीमुळे 10 वी पास तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्री-स्कूल केअरटेकर/हेल्पर पदाच्या 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 04 आणि 05 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – शिक्षण संचालनालय, दमण
भरले जाणारे पद – प्री-स्कूल केअरटेकर/हेल्पर
पद संख्या – 62 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत (Government Job)
मुलाखतीचा पत्ता –
दादरा आणि नगर हवेली जिल्ह्याचे संबंधित CPS आणि DIET शिक्षा सदन, दमण जिल्ह्याचे परिशिष्ट -1
मुलाखतीची तारीख – 04 आणि 05 डिसेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 45% गुणांसह 10वी किंवा समतुल्य शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक.
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 5,000/- रुपये
नोकरी करण्याचे ठिकाण – दमण

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://daman.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAS Success Story : शिक्षणासाठी गाव सोडलं; अनेक अवघड परीक्षा चुटकीसरशी पास केल्या; इंग्रजी बोलताना अडखळणारी सुरभी आज आहे IAS

IAS Success Story of Surabhi Gautam

करिअरनामा ऑनलाईन । IPS किंवा IAS परीक्षा पास होण्यासाठी (IAS Success Story) तुम्हाला योग्य रणनिती आखून स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे IAS अधिकारी सुरभी गौतम. तिने तिच्या क्षमतेनुसार स्वतःला घडवले आणि अगदी पहिल्याच प्रयत्नात अधिकारी होऊन तरुण पिढीसाठी प्रेरणा बनली आहे.
कोणतीही नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे हे खूप मोठे यश आहे, अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे ही परीक्षा पास करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते जीवतोड मेहनत घेतात. परंतु तरी देखील अनेकांना ही परीक्षा पास करणे कठीण होते. काही लोकांनाच हे यश गाठता येते. तसे पाहता UPSC परीक्षेत पास होण्यासाठी किंवा त्याची तयारी करण्यासाठी सर्व उमेदवारांची स्वतःची एक रणनीती तयार असते, ज्याप्रमाणे त्यांची वाटचाल सुरु असते. परंतु त्यांचीच रणनीती वापरुन दुसऱ्या व्यक्तीला ती परीक्षा पास करता येईल की नाही याबाबत शाश्वती देता येत नाही.

बोर्डाच्या परिक्षेत मिळायचे 90 टक्क्यांहून जास्त मार्क (IAS Success Story)
मध्य प्रदेशातील एका छोट्या गावात राहणारी सुरभी गौतम लहानपणापासूनच हुशार होती. तिने 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत, कोणताही क्लास न लावता फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. या परिक्षेत तिला 90 टक्क्यांहून अधिक मार्क मिळाले आहेत. तिचे वडील दिवाणी न्यायालयात वकील आहेत तर आई शिक्षिका आहे.

उच्च शिक्षणासाठी शहरात जाणारी पहिली मुलगी
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरभीने राज्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा दिली आणि या परिक्षेत तिला घवघवीत यश मिळाले. तिच्या गावातून उच्च शिक्षणासाठी शहरात जाणारी ती पहिली मुलगी होती. तिने भोपाळमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. इथे तिने विद्यापीठात अव्वल स्थान मिळविले. ती या महाविद्यालयची गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थिनी ठरली आहे.

अनेक अवघड परीक्षा केल्या पास
सुरभी गौतमने UPSC परीक्षा देण्यापुर्वी अनेक परीक्षा (IAS Success Story) उत्तीर्ण केल्या होत्या. सुरभी गौतमने एक वर्ष बीएआरसीमध्ये (BRC) अणुशास्त्रज्ञ म्हणूनही काम केले आहे. तिने GATE, ISRO, SAIL, MPPSC PCS, SSC CGL, दिल्ली पोलिस आणि FCI सारख्या परीक्षा देखील उत्तीर्ण केल्या. एवढेच नाही तर 2013 मध्ये झालेल्या IES परीक्षेत सुरभीने AIR 1 मिळवला होता.
इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे लोक खिल्ली उडवायचे
इतक्या परीक्षा पास करणारी सुरभी अभ्यासात हुशार असली तरी तिला चांगलं इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे लोक तिला  चिडवायचे, तिची खिल्ली उडवायचे. पण तरीही तिने आशा सोडली नाही. तिने जिद्दीने तिच्या कमकुवतपणावर मात केली आणि तिला कमी लेखणाऱ्या लोकांना आपल्या कृतीने चोख उत्तर दिले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!! 10वी आणि 12वी परीक्षेच्या पॅटर्नमध्ये होणार मोठे बदल

Education (9)

करिअरनामा ऑनलाईन । लवकरच इयत्ता दहावी आणि बारावीच्या (Education) विद्यार्थ्यांच्या परीक्षा पॅटर्नमध्ये मोठे बदल होणार आहेत. नव्या परीक्षा पॅटर्ननुसार, दिवाळीआधी एक सत्र, मार्चमध्ये दुसरे सत्र आणि अंतिम सत्र पूर्ण करण्यात येईल. या नवीन पद्धतीची अंमलबजावणी 2024-25 किंवा 2025-26 अशा शैक्षणिक वर्षांमध्ये करण्यात येईल. याबाबतची माहिती पुणे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

परीक्षेचा सेमिस्टर पॅटर्न बदलणार
नुकतेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानंतर आता दहावी बारावीच्या परीक्षेचा पॅटर्न देखील बदलणार असल्याचे समोर येत आहे. विद्यार्थ्यांसाठी (Education) दहावी आणि बारावीचे वर्ष सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी या वर्षांमध्ये अभ्यासाचा अधिक ताण घेतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा विचार करूनच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने परीक्षेचा सेमिस्टर पॅटर्न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मंत्रालयाने विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळांची मते देखील मागून घेतली आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्रालय त्यांना मिळालेल्या उत्तरातून येत्या दोन वर्षात परीक्षा पॅटर्न बरोबर अभ्यासक्रम पूर्णपणे बदलणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण देखील कमी होईल; असा विश्वास आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार, शैक्षणिक मंडळ मनोरंजक आणि समर्पक असा मजकूर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देईल. तसेच विद्यार्थ्यांना वैचारिक बनवण्यासाठी देखील नव्या पॅटर्नमधून प्रयत्न करण्यात येईल. याचा फायदा थेट विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करताना होईल. तसेच यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची रुची देखील वाढेल.

असा आहे नवीन परीक्षा पॅटर्न (Education)
दरम्यान, नव्या परीक्षा पद्धतीनुसार दहावी बारावीच्या परीक्षेचे पहिले सत्र दिवाळीपूर्वी घेतले जाईल तर दुसरे सत्र मार्च महिन्यात घेण्यात येईल. या दरम्यानच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा देखील घेतल्या जातील त्यानंतर दोन्ही सत्र परीक्षांचे गुण एकत्र करून बोर्डाच्या माध्यमातून निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. यामध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या सत्राचे गुण पाहायला मिळतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Educational Scholarship : शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार 3 हजार रुपयांची शिष्यवृत्ती

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 5वी ते 10वीपर्यंतच्या (Educational Scholarship) मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली आहे. शाळेतील मुलींची संख्या वाढावी आणि मुलींच्या शिक्षणाला सर्वात जास्त प्राधान्य मिळावे; या हेतूने ही शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शाळकरी मुलींना 600 रुपयांपासून 3 हजारांपर्यंतची आर्थिक मदत सरकार करत आहे. त्यामुळे या योजनेचा अधिक मुलींनी लाभ घ्यावा; असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. जाणून घेवूया सविस्तर…

या विद्यार्थिनींना होणार शिष्यवृत्तीचा फायदा
सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सर्व (Educational Scholarship) शाळांमधून समाज कल्याण विभागाकडे विद्यार्थिनींची माहिती पाठवण्यात येते. या माहितीची पडताळणी केल्यानंतर विभाग शिष्यवृत्ती मंजूर करते. पुढे मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनींच्या थेट बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम पाठवण्यात येते. परंतु या शिष्यवृत्तीचा लाभ फक्त पाचवी ते दहावीतील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींना घेता येत आहे. यासाठी मुलींची वर्गातील दैनंदिन उपस्थिती अनिवार्य आहे.

काय आहे पात्रता (Educational Scholarship)
मुख्य बाब म्हणजे, पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींची किमान 75 टक्के उपस्थिती असल्यासच त्या मुलींना शिष्यवृत्ती देण्यास समाज कल्याण विभाग मंजूरी देते. आणि अशा मुलींचीच नावे शाळेकडून पाठवण्यात येतात. या शिष्यवृत्ती अंतर्गत पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना 600 रुपये दिले जातात. तसेच, आठवी ते दहावीतील विद्यार्थिनीना प्रतिवर्षाला 1 हजार रुपये शिष्यवृत्ती रक्कम देण्यात येते.

ही कागदपत्रे आहेत आवश्यक
सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींची किमान 75 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. यासोबत 1. विद्यार्थिनीच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला 2. मुख्याध्यापकांचा संबंधित प्रवर्गाचा दाखला 3. जातीचा दाखला 4. बँक खाते; अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Shivaji University : पदवी प्रमाणपत्राची पडताळणी करणं होणार सोप्पं; आता प्रत्येक प्रमाणपत्रावर असणार QR Code

Shivaji University (2)

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाची (Shivaji University) पदवी, पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी होणार आहे. यासाठी प्रमाणपत्रावर क्यूआर कोड (QR Code) देऊन त्याद्वारे पडताळणी करण्याची नवी सुविधा विद्यापीठ उपलब्ध करुन देणार आहे.

क्यूआर कोड असलेली प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना मिळणार
नोकरी तसेच उच्च शिक्षणासाठी पदवीची पडताळणी केली जाते. पुढील वर्षीच्या दीक्षान्त समारंभापासून क्यूआर कोड असलेली प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. पदवीचे डुप्लिकेट प्रमाणपत्र एकदा देण्याची अट देखील रद्द झाली आहे. सध्या ती प्रक्रिया ऑफलाईन स्वरूपात आहे. ही प्रक्रिया कमी वेळेत करण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न सुरू होते. विद्यार्थी हितासाठी याबाबत अधिसभा सदस्य ॲड. अभिषेक मिठारी यांनी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांनी प्रमाणपत्रावर क्यूआर कोड देण्यासह पदवीचे दुबार प्रमाणपत्र एकदाच घेण्याची अट शिथिल करण्याची मागणी केली. त्यावर सकारात्मक कार्यवाही विद्यापीठाच्या पदवीदान आणि संगणक विभागाने केली. यंदाच्या प्रमाणपत्राची छपाई पूर्ण झाली आहे, त्यामुळे क्यूआर कोड पुढील वर्षीच्या 61 व्या दीक्षान्त समारंभावेळी पदवी प्रमाणपत्रावर दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांकडून पदवी प्रमाणपत्र गहाळ झाल्यास आता फक्त एकदाच दुबार प्रमाणपत्र मिळते. शिवाय त्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर ॲफिडेव्हिट म्हणजेच प्रतिज्ञापत्र करावे लागते. पोलिस ठाण्यात एफआरआय द्यावी लागते. मात्र, आता त्यातील ॲफिडेव्हिट आणि एकदा प्रमाणपत्र देण्याची अट दंडक समितीने रद्द केली आहे. या दोन्ही निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पदवीच्या प्रत्येक प्रमाणपत्रावर असणार QR Code
प्रत्येक विद्यार्थ्याच्या पदवी प्रमाणपत्रावर वरच्या बाजूला क्यूआर कोड (Shivaji University) दिला जाणार आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर त्या प्रमाणपत्राची पडताळणी ऑनलाईन होणार आहे. त्यात विद्यार्थ्याचे नाव, पीआरएन नंबर, विषय, उत्तीर्णतेचे वर्ष आदी माहिती क्षणात मिळणार आहे. नोकरी तसेच उच्च शिक्षणासाठी या प्रमाणपत्राची पडताळणी प्रक्रिया सोपी आणि वेगवान होणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी सांगितले. क्यूआर कोडचा निर्णय आता झाला. त्यापूर्वी यंदाच्या ५० हजार प्रमाणपत्राची छपाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे प्रमाणपत्रावर क्यूआर कोड देण्याची कार्यवाही पुढील वर्षीच्या दीक्षान्त समारंभापासून होईल; अशी माहिती आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com