Home Blog Page 198

Pune University Recruitment 2023 : सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात उत्तम पगाराची नोकरी; त्वरा करा 

Pune University Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Pune University Recruitment 2023) काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन E-Mail माध्यमातून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
भरले जाणारे पद – प्रकल्प सहाय्यक (Pune University Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
आवश्यक शैक्षणिक पात्रता – एम.एससी/एम.टेक इन बायोटेक्नॉलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ प्राणीशास्त्र/ वैद्यकीय जैवतंत्रज्ञान/ जेनेटिक्स/; एम.फार्म (फार्माकोलॉजी/ फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी)

मिळणारे वेतन – 25,400/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स – (Pune University Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.unipune.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BSF Recruitment 2023 : 10वी, ITI पास, डिप्लोमा धारकांसाठी देशसेवेची संधी; BSF अंतर्गत नवीन भरती सुरु 

BSF Recruitment 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । तरुणांसाठी देशसेवेची चांगली संधी (BSF Recruitment 2023) निर्माण झाली आहे. देशाच्या सीमा सुरक्षा दल अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल पदाच्या 166 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – सीमा सुरक्षा दल (Border Security Force)
भरले जाणारे पद – उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल
पद संख्या – 166 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (BSF Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महानिरीक्षक (कर्मचारी), महासंचालनालय, बीएसएफ, ब्लॉक क्रमांक 4, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003.
वय मर्यादा – 52 वर्षे

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
उपनिरीक्षक 68 पदे
हेड कॉन्स्टेबल 85 पदे
कॉन्स्टेबल 13 पदे


आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
उपनिरीक्षक Pass three years Diploma in Civil Engineering from an Institute recognised by the Central Govern- ment or the State Government.
हेड कॉन्स्टेबल a) Matriculation pass or equivalent from a recognised board or Institute; 

(b) Industrial Training Institute certificate in respective trade from a recognised Institute with three years’ experience in the respective trade from a firm recognised by the Central or the State Government subject

कॉन्स्टेबल Preference will be given to those with certificate or diploma in the trade from recognized Institute


मिळणारे वेतन –
1. Sub Inspector (Works) Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
2. Sub Inspector/ Junior Engineer (Electrical) Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
3. Head Constable (Generator Operator) Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
4. Head Constable (Generator Mechanic) Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
5. Head Constable (Wireman/ Lineman) Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
6. Head Constable (Electrician/ Electrical) Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
7. Constable (Generator Mechanic) Rs. 21,700/- to Rs. 69,100/-
8. Constable (Generator Operator) Rs. 21,700/- to Rs. 69,100/-… Read more at:

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जा सोबत उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया –
1. Written Exam
2. Document Verification
3. Physical Standard Test (PST)
4. Interview
5. Medical Examination
6. Final Merit Test

काही महत्वाच्या लिंक्स – (BSF Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्जाचा नमुना – Application Form
अधिकृत वेबसाईट – bsf.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : राज्याच्या ‘या’ बँकेत विविध पदांवर भरती; थेट मुलाखतीने होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन । रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी, अहमदनगर (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मॅनेजर, पासिंग ऑफिसर, क्लर्क, कॅशियर, वसुली अधिकारी, पिग्मी एजंट, कर्ज विभाग अधिकारी, ड्रायव्हर, कारपेंटर, पेंटर, वायरमन, मार्केटिंग अधिकारी पदांच्या एकूण 107 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी, अहमदनगर
भरले जाणारे पद – मॅनेजर, पासिंग ऑफिसर, क्लर्क, कॅशियर, वसुली अधिकारी, पिग्मी एजंट, कर्ज विभाग अधिकारी, ड्रायव्हर, कारपेंटर, पेंटर, वायरमन, मार्केटिंग अधिकारी
पद संख्या – 107 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
मुलाखतीचा पत्ता – विजय चौक झेंडा, श्रीगोंदा, तालुका-श्रीगोंदा, जि. अहमदनगर

भरतीचा तपशील – (Job Alert)

पद पद संख्या 
मॅनेजर 10
पासिंग ऑफिसर 10
क्लर्क 20
कॅशियर 20
वसुली अधिकारी 10
पिग्मी एजंट 05
कर्ज विभाग अधिकारी 10
ड्रायव्हर 05
कारपेंटर 03
पेंटर 02
वायरमन 02
मार्केटिंग अधिकारी 10


अशी होणार निवड –

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
Job Alert
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – http://www.renukamatamultistate.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : सरकारी नोकर भरती परिक्षेत विचारले जावू शकतात ‘हे’ प्रश्न

GK Updates 29 Nov.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न1. कोणते झाड कधीही घरात लावू नये? (GK Updates)
उत्तर – पिंपळाचे झाड घराच्या आत लावू नये.
प्रश्न 2. भारतातील कोणते राज्य चंदनासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर – कर्नाटक

प्रश्न 3. तुळशीचा रस दह्यात मिसळून प्यायल्याने काय फायदा होतो?
उत्तर – तुळशीचा रस दह्यात मिसळून प्यायल्यास वजन कमी होण्यास फायदा होतो.
प्रश्न 4. भगवान गौतम बुद्धांनी सर्वप्रथम भारतात कोणत्या ठिकाणी उपदेश दिला होता?
उत्तर- सारनाथ

प्रश्न 5. (GK Updates) भारतातील कोणत्या राज्यात गव्हाची लागवड केली जात नाही?
उत्तर – तामिळनाडू राज्यात गव्हाची लागवड होत नाही.
प्रश्न 6. मुघल बादशाह अकबराचा अर्थमंत्री कोण होता?
उत्तर- राजा तोरडमल
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Reading Tips and Tricks : वाचनाची सवय लावण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Reading Tips and Tricks

करिअरनामा ऑनलाईन । मला माहित आहे की वाचन कधीकधी ते (Reading Tips and Tricks) कंटाळवाणे होते. पण काही वेळा वाचन किती प्रभावी ठरू शकते हेही आपल्याला माहीत आहे. एक चांगले पुस्तक तुम्हाला सात आश्चर्यांचा प्रवास घडवू शकते. तुम्ही जे वाचता ते तुम्हाला नेहमी आठवत नाही पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मिळवलेले ज्ञान अविवेकी आहे. आम्हाला माहित आहे की सवयी विशिष्ट कृतींच्या पुनरावृत्तीने तयार होतात, म्हणून तुमचे क्षितिज विस्तृत करण्यासाठी आणि तुम्हाला वाचनाची सवय लागावी यासाठी आम्ही सोप्या टिप्स सांगणार आहोत. पाहूया….

1. तुम्हाला जे आवडते त्यापासून वाचनास सुरुवात करा
तुमची आवड कुठे आहे हे जाणून घेणे ही महत्वाची गोष्ट आहे. पण आपल्याला काय करायचे आहे किंवा वाचायचे आहे याची जाणीव नेहमीच नसते; यासाठी अशा विषयापासून सुरुवात जे तुम्हाला अधिक वाचण्यासाठी गती देऊ शकतात. तुम्ही तुमचा छंद किंवा थोडीशी आवड असलेल्या कोणत्याही गोष्टीपासून वाचनास सुरुवात करा. उदा. तुम्हाला चित्रकला आवडत असल्यास, त्यात सुधारणा करण्यासाठी वेगवेगळ्या रंगांची रचना आणि कला कौशल्यांवरचे लेख पहा. हे तुम्हाला तुमच्या वाचनाच्या मध्यभागी तंद्री न लागता वाचनाची सुरुवात करुन देतात.

2. वाचनासाठी एक निश्चित जागा निवडा
वाचनासाठी जागा निवडणं महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या घरात, एखाद्या लायब्ररीत किंवा तुमच्या बागेत वाचनासाठी जागा  चिन्हांकित करा आणि ती जागा तुम्ही फक्त वाचनासाठी वापरा. त्यामुळे काय होईल; जेव्हाही तुम्ही तुमच्या वाचनाच्या ठरलेल्या ठिकाणी जाल तेव्हा तुम्हाला वाचनाची आठवण होईल आणि तिथे बसून तुम्ही फक्त वाचनच कराल. यावेळी तुम्ही तुमचा मोबाईल स्क्रोल करू नका, फक्त शिस्त बाळगा आणि त्या ठिकाणाचा आणि वेळेचा उपयोग फक्त वाचनासाठी करा. सुरुवातीला तुम्हाला ते अवघड वाटेल, पण जसजशी तुम्हाला सवय होईल तेव्हा वाचनाच्या नित्यक्रमात तुम्ही स्थिर व्हाल.

3. चांगले रिसोर्सेस निवडा (Reading Tips and Tricks)
वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी चांगल्या संसाधनाची (Resourses) आवश्यकता असते. तुम्ही कुठून वाचत आहात याचा विचार करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. तुम्हाला जो विषय वाचायचा आहे, तो तुम्ही शक्य तितक्या चांगल्या प्रकारे शोधला पाहिजे आणि यासाठी संक्षिप्त साहित्य शोधा. एक्सप्लोर करणे ही येथे सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे, कारण जेव्हा तुम्ही वेबसाईटवर चांगली सामग्री शोधण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही चित्रात येणारे सर्व लिखाण वाचण्याची शक्यता जास्त असते आणि या शोधण्याच्या प्रक्रियेत तुम्ही नकळत अधिकाधिक वाचन करता.

4. सुरुवातीला उद्दिष्टय कमी ठेवा
वाचनाच्या सुरवातीला लहान उद्दिष्टय ठेवा. दिवसात किती वेळ वचन करायचं आणि किती पाने वाचायची हे ठरवा. जेव्हा आपण आपल्या वेळेनुसार आपले कार्य निश्चित करतो तेव्हा आपण ते साध्य करण्याची शक्यता जास्त असते, अन्यथा आपण त्याकडे दुर्लक्ष करत राहतो, हे फक्त एक पान आहे, नंतर ते वाचू शकतो. आणि ते ‘नंतर’ कधीच येत नाही, म्हणून कदाचित तुमच्या दिवसाची सुरुवात 5 मिनिटे वाचन करुन करा किंवा दिवसाचा शेवट वाचनाने करा.

5. वाचलेल्या गोष्टी ट्रॅकवर ठेवा
आम्‍ही वाचत असलेल्‍या सर्व गोष्टी आम्‍ही नेहमी लक्षात ठेवत नाही, त्यामुळे माहितीचा मागोवा ठेवल्‍याने तुम्‍हाला अधिक अंतर्दृष्टी मिळू शकते. तुम्‍ही एक डायरी किंवा लॉग जपून ठेवावे जेथे तुम्‍ही काही मनोरंजक ओळ, कोट किंवा व्‍हॉकॅब चिन्हांकित करू शकता जे तुम्‍हाला नंतर मदत करतील. यामुळे केवळ तुमचे वाचन कौशल्यच नाही तर लेखन कौशल्य देखील सुधारेल, कारण जेव्हा आपण काही गोष्टी चिन्हांकित करत असतो तेव्हा आपण यावर सखोल विचार करतो आणि नाविन्यपूर्ण कल्पना निर्माण करतो.
6. Book Bucket List
जीवनाच्या प्रवासात ध्येय साध्य करताना आपण बकेट लिस्ट बनवतो. पण तुम्ही हे कसे साध्य कराल याचा कधी विचार केला आहे का? तुम्हाला तुमची निश्चित ठिकाणे तपासावी लागतील किंवा त्यांच्या नयनरम्य पैलूंबद्दल वाचावे लागेल. यासाठी योग्य योजना आखल्यास ही सवय लवकरच (Reading Tips and Tricks) जोपासण्यास मदत होईल. एका विशिष्ट शैलीने सुरुवात करा.  या शैलीतील काही पुस्तके वाचत जा आणि हळुहळू दुसर्‍या शैलीकडे वळा. काही पुस्तकांतील विविध पैलू वाचल्यानंतर तुम्हाला वाचायच्या असलेल्या पुस्तकांची यादी तयार करा. हे तुम्हाला तुमची आवड शोधण्यात मदत करेल आणि तुम्ही ते विशिष्ट प्रकार वाचण्यासाठी उत्सुक रहाल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : शिक्षण कायद्याचं… पण करते शेती; ओसाड जमिनीवर पिकवली स्ट्रॉबेरी; तिची कमाई पाहून थक्क व्हाल

Success Story of Gurleen Chawla

करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन शिक्षण घेत (Success Story) असताना अनेक तरुण तरुणींना चिंता सतावत असते ती म्हणजे नोकरीची. वाढत्या स्पर्धेच्या युगात मनासारखी नोकरी मिळण्याची शाश्वती देता येणं तसं कठीणच. अशा परिस्थितीत काही तरुण नोकरीच्या मागे धावत असतात तर काही तरुण व्यवसाय करण्याचा मार्ग निवडतात.
नोकरी मिळाली नाही तर अनेकजण हताश होताना दिसतात. पण असे अनेक तरुण आहेत जे नोकरीची चिंता न करता व्यवसाय सुरु करून महिन्याला लाखो रुपये कमवतात. अशीच एक तरुणी आहे जीने नोकरीच्या मागे न धावता वेगळी वाट शोधून तरुणांसमोर आदर्श ठेवला आहे. गुरलीन चावला असं या तरुणीचं नांव आहे; ती मुळची झाशीची रहिवासी आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरलीनने काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला. तिने ओसाड जमिनीवर स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. तिने तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली. आज गुरलीन दर महिन्याला लाखो रुपये कमावते. पण तिचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. गुरलीन जिथे राहते तिथे वातावरण खूप उष्ण असते. अशा वातावरणात स्ट्रॉबेरीची लागवड करुन तिने सर्वांनाच चकित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुरलीनचे कौतुक केले आहे. मेहनत घेतली आणि झोकून देवून काम केलं की प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येतं हे गुरलीनने दाखवून दिलं आहे.

नेमकी कशी झाली सुरुवात (Success Story)
गुरलीनने कायद्याची पदवी घेतली आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे तिला नाईलाजास्तव झाशीला यावे लागले. लॉकडाऊनमधील मोकळ्या वेळेचा तिने पुरेपूर फायदा घेतला. तिला मुळातच स्ट्रॉबेरी खायला फार आवडायचं. या छंदापोटी सुरुवातीला तिने स्ट्रॉबेरीची काही झाडे तिच्या घराच्या कुंडीत लावली. या रोपाचे चांगले परिणाम मिळाल्यानंतर तिने तिच्या वडिलांच्या फार्म हाऊसवर सुमारे दीड एकर जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली. गुरलीनला स्ट्रॉबेरीची शेती करताना पाहून इतर शेतकरीही तिच्याकडे आकर्षित झाले.

सोशल मिडियाच्या माध्यमातून शेती करायला शिकली
गुरलीनने सांगितल्याप्रमाणे तिने अनेक व्हिडिओ पहिले आणि या माध्यमातून ती स्ट्रॉबेरीची शेती करायला शिकली होती. गुरलीनची मेहनत पाहून तिच्या वडिलांनीही तिला साथ दिली. त्यांनी चार एकर जमिनीवर कोणतेही पीक घेतले नाही. ऑक्टोबर महिन्यात तिने बाजारातून 20 हजार स्ट्रॉबेरीची रोपे खरेदी करून दीड एकर जमिनीवर लावली. डिसेंबरमध्ये हे उत्पादन विक्रीसाठी तयार झाले. गुरलीनने फळांसाठी स्थानिक बाजारपेठ गाठली, बघता बघता तिची सर्व फळे विकली गेली.

वेबसाईटच्या माध्यमातून मिळतात ऑर्डर
गुरलीनच्या म्हणण्यानुसार, तिने ‘झाशी ऑरगॅनिक्स’ नावाची वेबसाईटही (Success Story) डिझाईन केली होती. या माध्यमातून लोक ऑनलाईन पद्धतीने स्ट्रॉबेरी ऑर्डर करु शकतात. गुरलीन स्ट्रॉबेरीसोबत भाजीपालाही पिकवत आहे. ती सध्या सात एकर जमिनीवर शेती करत आहे. तिच्या शेतात दररोज 70 किलो स्ट्रॉबेरीचे उत्पादन होते तर यामाध्यमातून दररोज सुमारे 30 हजार रुपयांची विक्रीही होते.

पीएम मोदींनीही केलं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये गुरलीन चावला आणि तिच्या स्ट्रॉबेरी शेती उपक्रमाचा उल्लेख केला आहे. झाशीमध्ये स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड आणि उत्पन्न घेतल्यानंतर तिच्यावर प्रशासन आणि सरकारकडून कौतुकाचा वर्षाव झाला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHAI Recruitment 2023 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी खुषखबर!! राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात ‘या’ पदांवर भरती सुरु

NHAI Recruitment 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI Recruitment 2023) मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
भरले जाणारे पद – (NHAI Recruitment 2023)
1. व्यवस्थापक (प्रशासन)- 05 पदे
2. उपव्यवस्थापक (दक्षता)- 02 पदे
3. सहायक व्यवस्थापक (प्रशासन) – 03 पदे
पद संख्या – 10 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – DGM (HR &Admn.)-I, National Highways Authority of India, Plot No: G – 5 & 6, Sector – 10, Dwarka, New Delhi – 110075.

आवश्यक शैक्षणीक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 डिसेंबर 2023 रोजी 56 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी – फी नाही (NHAI Recruitment 2023)
मिळणारे वेतन – 9,300/- रुपये ते 39,100/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nhai.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BHEL Recruitment 2023 : सरकारी नोकरी!! BHEL मध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु; पात्रता डिप्लोमा, इंजिनिअरिंग

BHEL Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । BHEL अंतर्गत विविध रिक्त (BHEL Recruitment 2023) पदे भरली जाणार आहेत. या माध्यमातून पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 75 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – BHEL
भरले जाणारे पद – पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 75 पदे (BHEL Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2023
अर्ज फी –
1. UR/EWS/OBC – Rs. 795/-
2. SC/ST/PWD/Ex-Servicemen – Rs. 295/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Full time regular Diploma in Engineering from a recognized Indian University / Institute

असा करा अर्ज – (BHEL Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. सर्व माहिती आणि परिपत्रके www.bhel.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. उमेदवारांनी नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवायची आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.bhel.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CBSE Board Exam Time Table 2024 : CBSE बोर्डाच्या 10वी, 12वी परीक्षांच्या तारखेविषयी महत्वाची अपडेट

CBSE Board Exam Time Table 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण (CBSE Board Exam Time Table 2024) मंडळ लवकरच 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. जे विद्यार्थी CBSE बोर्डाच्या परीक्षेला बसले आहेत ते बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक पाहू शकतात. वेळापत्रक पाहण्यासाठी तसेच, वेळोवेळी परीक्षेच्या संदर्भात महत्वाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाची cbse.gov.in. ही वेबसाईट तपासणं गरजेचं आहे. परीक्षेसंदर्भात इतर कोणत्याही माध्यमातून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका; असं आवाहन CBSE बोर्डाने केलं आहे.
CBSE बोर्डाच्या 10वी आणि 12वी परीक्षेच्या तारखा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केल्या जाऊ शकतात; असा अंदाज आहे. परीक्षेची तारीख आता केव्हाही जाहीर होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतत संकेतस्थळावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

जानेवारी महिन्यापासून प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exams) घेण्यात येणार असून लेखी परीक्षांना (Theory Exam) फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असल्याची शक्यता आहे. परीक्षेची संभाव्य तारीख 15 फेब्रुवारी ते 10 एप्रिल दरम्यान असल्याचा अंदाज आहे. मात्र, यामध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे अधिकृत माहिती येण्यापूर्वी निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही.

वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर असं करा डाउनलोड
1. CBSE बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, सर्वात आधी वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
2. येथे लेटेस्ट नावाच्या विभागात जा आणि 10 वी किंवा 12 वी च्या वेळापत्रकावर क्लिक करा.
3. आता डेटाशीट उघडेल. (CBSE Board Exam Time Table 2024)
4. येथून परीक्षा कोणत्या दिवशी होणार आहे हे विद्यार्थ्यांनी तपासावे.
5. तुम्ही हे वेळापत्रक डाऊनलोड करुन त्याची प्रिंट देखील घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही परीक्षेचा निकाल
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : राज्याच्या ‘या’ महाविद्यालयात होतेय विविध पदांवर भरती; लगेच करा APPLY

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । रुखमा महिला महाविद्यालय, गोंदिया (Job Notification) येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – रुखमा महिला महाविद्यालय, गोंदिया
भरले जाणारे पद –
1. सहायक प्राध्यापक
2. ग्रंथपाल
3. शारीरिक शिक्षण संचालक
पद संख्या – 06 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2023 आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – गोंदिया
अर्ज फी – रु.१००/-
निवड प्रक्रिया – मुलाखती
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य/डीन/संचालक, रुखमा महिला महाविद्यालय, नवेगाव-बांध, एटी-नवेगाव बंद ता-अर्जुनी मोर जिल्हा-गोंदिया ता.- अर्जुनी मोरगाव, जि.- गोंदिया- 441702.

भरतीचा तपशील – (Job Notification )

पद पद संख्या 
सहायक प्राध्यापक 04
ग्रंथपाल 01
शारीरिक शिक्षण संचालक 01

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.
3. अर्ज सादर करण्याच्या (Job Notification) सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.rukhamamahilamv.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com