Home Blog Page 197

Anganwadi Sevika : मोठा दिलासा!! अंगणवाडी सेविकांना आता शिक्षिकेचा दर्जा मिळणार; पहा मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या 

Anganwadi Sevika (1)

करिअरनामा ऑनलाईन । अंगणवाडी सेविकांसाठी एक (Anganwadi Sevika) आनंदाची बातमी आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांना वेतनासह पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवू आणि त्यासाठी पाठपुरावा करु; असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतेच मंत्रालयात आमदार कपिल पाटील यांना दिले आहे; अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
आमदार कपिल पाटील यांच्यासोबत अंगणवाडी ताई आणि शिक्षक भारती शिष्टमंडळा सोबत आदिती तटकरे यांची बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, पूर्व प्राथमिक (अंगणवाडी) शिक्षक भारतीच्या नेत्या मायाताई म्हस्के, सुरेखा घाडगे, आशाताई देशमुख, प्राथमिक शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष विनोद कडव, संघटक प्रकल्प पाटील आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

हेल्थ इन्शुरन्सचा खर्च शासन करणार (Anganwadi Sevika)
या बैठकीत आदिती तटकरे यांनी तीन हजार मिनी अंगणवाडीचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करण्याचे व सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी ताईंना वैद्यकीय उपचार देण्याचे मान्य केले. तसेच त्यांचा हेल्थ इन्शुरन्सचा खर्च शासन करणार असून थकीत बिले तातडीने देण्याचे मान्य केले. अंगणवाडी सेविकांना दर्जेदार मोबाईल देण्याचे व पोषण आहारामध्ये दर्जा वाढवण्याचे आश्वासनही तटकरे यांनी दिले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : लाखात पगार देणारी नोकरी!! रेल्वे रुग्णालयात भरली जाणार ‘ही’ पदे 

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे, मुंबई (Job Notification) अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी (GDMO/विशेषज्ञ), अर्धवेळ दंत सर्जन पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी  मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे, मुंबई
भरले जाणारे पद – कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी (GDMO/विशेषज्ञ), अर्धवेळ दंत सर्जन
पद संख्या – 05 पदे
नोकरीचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – ५३ वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 04 डिसेंबर 2023
मुलाखतीचा पत्ता – 7 वा मजला, संलग्नक इमारत, जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे, मुंबई सेंट्रल, मुंबई 400 008.

भरली जाणारी पदे – (Job Notification)

पद पद संख्या 
कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी (GDMO) 02
कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी (विशेषज्ञ) 02
अर्धवेळ दंत सर्जन 01


आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक  शैक्षणिक पात्रता
कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी (GDMO)
  • MBBS (MCI Recognized ) Candidates must be registered with MCI/MMCT
  • BDS (DCI) recognized candidates must be registered with DCI till date.
कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी (विशेषज्ञ) MBBS and PG Degree /Diploma in respective specialty. (Degree should be MCI Recognized ) Candidates must be registered with MCI/MMC
अर्धवेळ दंत सर्जन BDS (DCI) recognized candidates must be registered with DCI/MDS should possess three years of working
experience after completion of BDS. or
MDS.

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी (GDMO) Rs.75,000/-
कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी (विशेषज्ञ) Rs.95,000/-for Ist year.
Rs.1,05,000/- 2nd year onwards
अर्धवेळ दंत सर्जन Rs.36,900/-

 

निवड प्रक्रिया –
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. मुलाखतीच्या वेळी (Job Notification) उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
4. उमेदवारांना मुलाखतीला हजर राहण्यासाठी भत्ता दिला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://wr.indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Cent Bank Recruitment 2023 : ऑफिसर, सिनिअर ऑफिसर पदावर नोकरीची संधी; सेंट बँक होम फायनान्स लिमिटेडने जाहीर केली भरती

Cent Bank Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड (Cent Bank Recruitment 2023) अंतर्गत अधिकारी, वरिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 60 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड
भरले जाणारे पद  – अधिकारी, वरिष्ठ अधिकारी
पद संख्या – 60 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2023
वय मर्यादा – 21 वर्षे ते 35 वर्षे
अर्ज फी – (Cent Bank Recruitment 2023)
1. SC/ST/OBC/EWS – Rs.200/-
2. GENERA – Rs.500/-
निवड प्रक्रिया – चाचणी/मुलाखती

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
अधिकारी 31
वरिष्ठ अधिकारी 29

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
अधिकारी Graduation in any discipline from Recognized University
वरिष्ठ अधिकारी Graduation in any discipline from Recognized University

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
अधिकारी CTC Rs.3.60 lakh p.a. Additional ( Rs.30,000/- p.a. over 1 year experience subject to maximum CTC Rs.4,20,000/-p.a.)
वरिष्ठ अधिकारी CTC Rs.4.00 lakh p.a. Additional (Rs.30,000/- p.a. over 2 years’ experience subject to maximum CTC Rs.4,60,000/-p.a.)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे (Cent Bank Recruitment 2023) अगोदर सादर करावा.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.cbhfl.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IPR Bharti 2023 : प्लाझ्मा संशोधन संस्थेत ‘ही’ पदे रिक्त; आकर्षक पगारासह मिळवा सरकारी नोकरी 

IPR Bharti 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । प्लाझ्मा संशोधन संस्थेत रिक्त पदे (IPR Bharti 2023) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तांत्रिक अधिकारी – सी पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – प्लाझ्मा संशोधन संस्था (Institute For Plasma Research)
भरले जाणारे पद – तांत्रिक अधिकारी–सी
पद संख्या – 22 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2023
वय मर्यादा – 30 वर्षे
अर्ज फी –
1. SC/ST/Female/PwBD/EWS/ Ex-Serviceman – Nil
2. For Other Categories – 200/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.E./B.Tech असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – ₹ 56,100/- दरमहा (As per 7th CPC)
आवश्यक कागदपत्रे – (IPR Bharti 2023)
1. शैक्षणिक गुणपत्रिका/प्रमाणपत्रे/पदव्या.
2. अनुभव प्रमाणपत्र (असल्यास).
3. विहित नमुन्यात SC/ST/OBC/माजी सैनिक/PwBD/EWS चे प्रमाणपत्र (लागू असल्यास).
4. देयक पावतीची प्रत (लागू असल्यास).
5. इतर कोणतेही संबंधित दस्तऐवज.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण (IPR Bharti 2023) असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ipr.res.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DFCCIL Recruitment 2023 : DFCCIL मध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी; 102 पदे रिक्त 

DFCCIL Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (DFCCIL Recruitment 2023) कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ कार्यकारी (OP&BD) पदांच्या एकूण 102 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – वरिष्ठ कार्यकारी (OP&BD) (Senior Executive)
पद संख्या – 102 पदे (DFCCIL Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Addl. General Manager (HR)/DFCCIL/CO, 5th Floor, Supreme Court Metro Station Building Complex, New Delhi

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Employees working in analogous grade (Level-7) in relevant discipline or holding substantive posts in Level-6.
असा करा अर्ज –
(DFCCIL Recruitment 2023)
1. वरील पदासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावा.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.
4. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://dfccil.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Receptionist Jobs : रिसेप्शनिस्ट पदावर काम करण्याची संधी; पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत नवीन भरती सुरु

Receptionist Jobs

करिअरनामा ऑनलाईन । गोवा पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत (Receptionist Jobs) रिसेप्शनिस्ट पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – गोवा पर्यटन विकास महामंडळ
भरले जाणारे पद – रिसेप्शनिस्ट
पद संख्या – 08 पदे (Receptionist Jobs)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, गोवा पर्यटन विकास महामंडळ लि., पर्यटन भवन, तिसरा मजला, पट्टो, पणजी-गोवा. 403 001

नोकरीचे ठिकाण – गोवा
मिळणारे वेतन – 5,200 ते 20,200 रुपये दरमहा
असा करा अर्ज – (Receptionist Jobs)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत.
3. उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज बाद ठरवले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://goa-tourism.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Prasar Bharati Recruitment 2023 : प्रसार भारतीने जाहीर केली ‘या’ पदावर भरती; ग्रॅज्युएट उमेदवारांना मोठी संधी

Prasar Bharati Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । प्रसार भारतीने खर्च प्रशिक्षणार्थी (Prasar Bharati Recruitment 2023) पदावर भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – प्रसार भारती (Cost Trainee)
भरले जाणारे पद – खर्च प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 17 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 डिसेंबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Should have passed CMA Intermediate Examination conducted by Institute of Cost Accountants of India (ICAI) with at least 60% marks.
मिळणारे वेतन – (Prasar Bharati Recruitment 2023)

पदाचे नाव वेतनश्रेणी
खर्च प्रशिक्षणार्थी
  • 1st Year : Rs.10000/-
  • 2nd Year : Rs.12500/-
  • 3rd Year : Rs.15000/-


असा करा अर्ज –

1. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (Prasar Bharati Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जा संबंधी सविस्तर सूचना www.prasarbharati.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://prasarbharati.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Exam Date 2024 : MPSCने जाहीर केले वेळापत्रक; पहा कोणकोणत्या आणि कधी परीक्षा होणार

MPSC Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC Exam Date 2024) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. आयोगाने 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार वर्ष 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचा तारखा, संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून संबंधित संवर्ग किंवा पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल.
आयोगाने अंदाजित वेळापत्रक तयार केले आहे. हे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो. तसेच काही बदल झाल्यास त्याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.

कोणकोणत्या परीक्षा होणार? (MPSC Exam Date 2024)
जाहिर केलेल्या या अंदाजित वेळापत्रकामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र वन सेवा परीक्षांचा समावेश आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला https://mpsc.gov.in/ भेट देण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव दे.वि. तावडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : डोक्यावर अडचणींची टांगती तलवार, पालकांनी मोलमजुरी करुन शिकवलं; UPSC परिक्षेत कल्पेशने मारली बाजी 

Career Success Story of Kalpesh Suryawanshi

करिअरनामा ऑनलाईन । घरची परिस्थिती तशी हालाखीची. वडिल (Career Success Story) वेल्डिंग कारखान्यात नोकरी करायचे. कसाबसा घरखर्च चालायचा. डोक्यावर दुःख आणि अडचणींची टांगती तलवार. पण तरीही त्याने राखेतून उठून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली आणि तरुणांपुढे आदर्श उभा केला आहे. ही कथा आहे कल्पेश सूर्यवंशी या तरुणाची.

एका गरीब कुटुंबातील मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन उच्च शिक्षण घेतले आहे. त्याने थेट एम. डी. चे शिक्षण पूर्ण करुन UPSC कडून घेण्यात आलेल्या वैद्यकीय परीक्षेत ३२० वी रँक मिळवून देशपातळीवर आपले नाव उज्ज्वल केले आहे. या कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुतार समाजात नाव उंचावलं
सुतार समाजातील दाम्पत्य राजेंद्र जगन्नाथ सूर्यवंशी आणि कल्पना राजेंद्र सूर्यवंशी यांचा मुलगा डॉ. कल्पेश. सूर्यवंशी कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील दुसाणे (धुळे) येथील रहिवासी आहेत. सध्या त्यांचं कुटुंब गुजरातमधील सुरत येथे वास्तव्यास आहे. कल्पेशच्या कामगिरीमुळे सुतार समाजात त्याचे नांव उंचावले आहे.

विद्यापीठात मिळवला 3 रा क्रमांक (Career Success Story)
कल्पेशने दिल्ली येथील डॉ. राममनोहर लोहिया हॉस्पिटलमधून एमडीची (MD) उच्च पदवी घेतली आहे. गुरू गोविंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठात त्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर UPSC-CMS परिक्षेत घवघवीत यश मिळवत त्याने संपूर्ण भारतात 320 वा क्रमांक पटकावला आहे. देशातील लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. ही अती कठीण परीक्षा तो उत्तीर्ण झाला. सुतार समाजाला गर्व वाटावा असे यश त्याने पटकावले आहे.

किरकोळ कामे करुन मुलांना शिकवलं 
कल्पेश हुशार आहे. तो आयुष्यात नक्की काहीतरी करुन दाखवेल; हा पक्का विश्वास त्याच्या आईला होता. मुलाच्या  शिक्षणात कोणताही अडथळा येवू नये यासाठी त्यांनी कंबर कसून काम केले. पैशासाठी सुरतसारख्या शहरात त्या किरकोळ कामे करत राहिल्या. तर वडिल वेल्डिंग कारखान्यात मजुरी करायचे. संसाराचा गाडा ओढत असताना कुटुंबाला आर्थिक हातभार लावत, प्रसंगी नातेवाइकांकडून हात ऊसने पैसे घेवून त्यांनी चारही मुला-मुलींना शिक्षण दिले आणि मोठे केले.
कुटुंबासाठी मेहनत घेत असताना कल्पेशच्या आईला (Career Success Story) अनेकवेळा पराभवाचा सामना करावा लागला तरी त्यांनी हिंमत सोडली नाही. एक दिवस असा उजाडला आणि त्यांच्या कष्टाचे चीज झाले. एका कष्टकरी आईचा मुलगा डॉक्टर झाला होता.

गरजू लोकांना मोफत सेवा देणार
कल्पेशने लहानपणापासून आई-वडिलांचे कष्ट पाहिले आहे. असंख्य आर्थिक अडचणींचा सामना करत त्याने शिक्षण पूर्ण केले आहे. गरिबीची पुरेपूर जाणीव असणाऱ्या कल्पेशने पुढील काळात गोरगरीब, तसेच गावातील लोकांसाठी मोफत सेवा देण्याचे ठरवले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2023 : 10वी/12वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी!! रेल्वेने 1785 जागांवर जाहीर केली मेगाभरती

Railway Recruitment 2023 (17)

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा (Railway Recruitment 2023) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण-पूर्व रेल्वेने मेगाभरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या एकूण 1785 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – दक्षिण पूर्व रेल्वे (SER) विभाग
भरले जाणारे पद – अप्रेंटिस
पद संख्या – 1785 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2023
वय मर्यादा – 15 ते 24 वर्षे
अर्ज फी –
1. इतर उमेदवार – रु. 100/-
2. SC/ST/PWD/महिला उमेदवार – विनाशुल्क

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Railway Recruitment 2023)
Matriculation (Matriculate or 10th class in 10+2 examination system) from a recognized Board with minimum 50% marks in aggregate (excluding additional subjects) and an ITI Pass certificate (in the trade in which Apprenticeship is to be done) granted by the NCVT/SCVT.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या (Railway Recruitment 2023) लिंक वरून अर्ज करू शकतात.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – http://www.rrcser.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com