Home Blog Page 196

Konkan Railway Recruitment 2023 : कोकण रेल्वेमध्ये विविध पदांवर भरती; दरमहा 78,800 रुपये पगार 

Konkan Railway Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । कोकण रेल्वे अंतर्गत विविध (Konkan Railway Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ डिझाईन अभियंता, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/निरीक्षण, रचना अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, आराखडा, उप. महाव्यवस्थापक (वित्त), सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखा व्यवस्थापक, विभाग अधिकारी पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखत दि. 14, 18, 20, 22, 26, 28, 30 डिसेंबर 2023 आणि 01, 04, 05, 08 जानेवारी 2024 या दिवशी होणार आहे.

संस्था – कोकण रेल्वे
भरले जाणारे पद – वरिष्ठ डिझाईन अभियंता, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/निरीक्षण, रचना अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, आराखडा, उप. महाव्यवस्थापक (वित्त), सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखा व्यवस्थापक, विभाग अधिकारी
पद संख्या – 32 पदे
वय मर्यादा – 35 ते 55 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
मुलाखतीची तारीख – 14, 18, 20, 22, 26, 28, 30 डिसेंबर 2023 आणि 01, 04, 05, 08 जानेवारी 2024

भरतीचा तपशील – (Konkan Railway Recruitment 2023)

पद पद संख्या 
वरिष्ठ डिझाईन अभियंता 01
वरिष्ठ प्रकल्प अभियंता/निरीक्षण 05
रचना अभियंता 02
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक 03
प्रकल्प अभियंता 12
आराखडा 01
उप. महाव्यवस्थापक (वित्त) 01
सहायक लेखाधिकारी 02
कनिष्ठ लेखा व्यवस्थापक 01
विभाग अधिकारी 04

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
वरिष्ठ डिझाईन अभियंता Rs.56,100/-
वरिष्ठ प्रकल्प अभियंता/निरीक्षण Rs.44,900/-
रचना अभियंता Rs.44,900/-
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक Rs.44,900/-
प्रकल्प अभियंता Rs.44,900/-
आराखडा Rs. 35,400/-
उप. महाव्यवस्थापक (वित्त) Rs. 78,800/-
सहायक लेखाधिकारी Rs.56,100/-
कनिष्ठ लेखा व्यवस्थापक Rs.47,600/-
विभाग अधिकारी Rs.44,900/-

 

अशी होईल निवड –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. (Konkan Railway Recruitment 2023)
2. उमेदवाराने दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
3. मुलाखतीची तारीख 14, 18, 20, 22, 26, 28, 30 डिसेंबर 2023 आणि 01, 04, 05, 08 जानेवारी 2024 आहे.
4. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : दोन मुले आणि घरची जबाबदारी सांभाळत केला अभ्यास; नगमा बनली उपविभागीय दंडाधिकारी

Success Story of Nagma Tabassum

करिअरनामा ऑनलाईन । नगमा तबस्सुमने आईची भूमिका (Success Story) पार पाडत स्वतःच्या कर्तृत्वाची यशोगाथा लिहिली आहे. तिची चर्चा जिल्ह्यातील प्रत्येकाच्या ओठावर आहे. सरकारी खात्यात भरती होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण रात्रंदिवस मेहनत घेतात. नगमा त्यांच्यापैकीच एक आहे. तिने बिहार लकसेवा आयोगाच्या परिक्षेत 52 वा क्रमांक मिळवला आहे. अडचणींवर मात करत तिने हे यश कसं मिळवलं त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

दोन मुले आणि घरची जबाबदारी सांभाळत केला अभ्यास
बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्या नंतर नगमाची उपविभागीय दंडाधिकारी
(Sub Divisional Magistrate) पदासाठी निवड झाली आहे. तिची ही कहाणी प्रेरणा देणारी आहे कारण तिने आपल्या दोन लहान मुलांचे संगोपन करत अभ्यास केला आहे. एकीकडे मुलांचे संगोपन आणि दुसरीकडे कुटुंबाची जबाबदारी; अशी दुहेरी भूमिका पार पाडत तिने BPSC परीक्षेची तयारी केली आहे. एक आई म्हणून तिने आपल्या मुलांना कधीच एकटं पडून दिलं नाही. नगमा तबस्सुमला एक मुलगा आणि एक मुलगी असून इफ्रा आणि इमदाद अशी त्यांची नावे आहेत.

अपयश आलं म्हणून खचली नाही (Success Story)
परीक्षा देत असताना नगमाला दोन वेळा अपयश आलं तरी ती डगमगली नाही. तिने पुन्हा जोमाने तयारी केली आणि तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं. नगमा तबस्सुमने आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या विवाहित महिला आणि गृहिणींसमोर एक आदर्श उभा केला आहे. तिने आयुष्यात काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न पाहिले होते. नगमा तबस्सुमने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पहिल्या दोनवेळा तिला यश मिळाले नाही, पण तिने संयम सोडला नाही. ती प्रयत्न करत राहिली. तिसऱ्या प्रयत्नात तिला यश मिळाले. तिला मुलांच्या पालन पोषणासाह कुटुंबाची जबाबदारी पार पडायची होती. हे सर्व करत असताना यश मिळण्यास विलंब होत होता. तरीही तिने जिद्द सोडली नाही. तिच्या मनात आत्मविश्वास कायम होता.

कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे यश मिळवणं झालं सोपं
तिच्या यशाचे रहस्य सांगताना नगमा म्हणाली की; “माझ्या यशात पती आणि सासरच्या मंडळींचा मोठा वाटा आहे. माझ्या प्रमाणे सर्व मुलींना पाठिंबा मिळाला तर मुली सासरच्या घरी जाऊनही त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतात.” नगमा तबस्सुमने  यापूर्वी बी.टेक आणि एम.टेक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. पण (Success Story) तिला नागरी सेवक व्हायचे होते म्हणून नगमाने सरकारी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. नगमा तबस्सुमने तुर्कौलिया येथून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर ती अलीगड मुस्लिम विद्यापीठाकडे वळली. तेथून तिने 12वी पूर्ण केली आणि नंतर बी. टेक आणि एम.टेक. केले.

यश मिळवण्यासाठी तरुणांना दिला सल्ला
अभ्यासाच्या बाबतीतील समर्पण आणि सततच्या मेहनतीमुळे हे यश मिळाल्याचे नगमा सांगते. तिने आपल्या कामगिरीतून तरुणांना संदेश दिला आहे की, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत संयम गमावू नये. ती सांगते; “धीर धरा… यश तुमच्या हातात आहे. इकडच्या-तिकडच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. दीर्घ (Success Story) कालावधीसाठी अभ्यास आणि तयारी करण्याची क्षमता ठेवा. नेहमी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही किती मेहनत घेत आहात याकडे लक्ष द्या. वेळेचा मागोवा घ्या आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करा. प्रत्येक मिनिटाचा वापर करा मग तो कुटुंबासाठी असो किंवा तयारीसाठी, त्यावर योग्य लक्ष केंद्रित करा. एक दिवस यश नक्कीच तुमच्या पायांचे चुंबन घेईल.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Namo Maharojgar Melava 2023 : 10वी पास ते पदवीधरकांसाठी मोठी बातमी!! नमो महारोजगार मेळाव्यातून मिळणार 10 हजार पेक्षा जास्त नोकऱ्या मिळणार

Namo Maharojgar Melava 2023

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर नोकरीच्या शोधत (Namo Maharojgar Melava 2023) असाल तर इकडे लक्ष्य द्या. तब्बल 10 हजारापेक्षा जास्त नोकऱ्या देण्यासाठी नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची असून मेळाव्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर रहायचे आहे. मेळाव्याची तारीख 09 आणि 10 डिसेंबर 2023 आहे.

नाव – नमो महारोजगार मेळावा
कोणकोणत्या पदांसाठी होणार मेळावा –
फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशीनिस्ट, पेंटर, कारपेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, ट्रेनी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, इंजिनिअर आणि इतर पदे
पद संख्या – 10,000+ (Namo Maharojgar Melava 2023)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/D.Pharm/MBA/पदवीधर/ डिप्लोमाधारक/पदव्युत्तर पदवी

मेळाव्याची तारीख – दि. 09 आणि 10 डिसेंबर 2023
मेळाव्याची वेळ – सकाळी 10:00 ते सायंकाळी 06:00 पर्यंत
मेळाव्याचे ठिकाण – जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, नागपूर विद्यापीठ, अमरावती रोड, नागपूर
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

काही महत्वाच्या लिंक्स – (Namo Maharojgar Melava 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा – Registration
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : विविध विभागात निघाल्या सरकारी नोकऱ्या; कुठे आणि केव्हा कराल अर्ज?

Government Job (34)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. अनेक ठिकाणी सरकारी नोकर भरती जाहीर झाली आहे; याविषयी आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहोत. या भरती मध्य प्रदेश उच्च न्यायालय, भारतीय रेल्वे, गुजरात अधीनस्थ निवड सेवा मंडळ इत्यादी ठिकाणी होणार आहेत. ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे ते संबंधित भरतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. माहिती घेवूया रिक्त पदे, आवश्यक वयोमर्यादा, पात्रता आणि अर्जाची अंतिम तारीख याविषयी सविस्तर.

1. रेल्वे मध्ये होतेय शिकाऊ पदावर भरती
रेल्वेत शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. उत्तर मध्य रेल्वे RRC प्रयागराजने वेगवेगळ्या ट्रेडमध्ये शिकाऊ भरती जाहीर केली आहे. एकूण 1664 पदांवर नियुक्त्या होणार आहेत. अर्ज करणारे उमेदवार 14 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी RRC प्रयागराज rrcpryj.org च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2. मध्य प्रदेश उच्च न्यायालय भरती (Government Job)
मध्य प्रदेश उच्च न्यायालयात दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ विभाग (प्रवेश स्तर) साठी भरती जाहीर झाली आहे. त्यासाठी रीतसर अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक अधिकृत वेबसाइट mphc.gov.in वर ऑनलाइन अर्ज करूशकतात. अर्ज सादर करण्याची शेवटकी तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

3. गुजरात निवड मंडळ
गुजरात अधीनस्थ सेवा निवड मंडळाद्वारे 1246 पदांवर भरती होणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करता येतील. याविषयी संपूर्ण माहिती गुजरात अधीनस्थ सेवा निवड मंडळ ojas.gujarat.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
4. UPSC भरती 
युनियन लोकसेवा आयोग (UPSC) ने अनुवादक आणि सहाय्यक महासंचालक या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार संघ लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटला भेट देऊ शकतात. upsconline.nic.in. किंवा तुम्ही upsc.gov.in द्वारे अर्ज करू शकता.

5. नेवेली मध्ये होतेय भरती 
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 295 जागा (Government Job) रिक्त आहेत. अभियांत्रिकी विषयात पदवी घेतलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांवर ही भरती सेल. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना nlcindia.in वर भेट देऊन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SET Exam 2023 : ‘या’ तारखेला होणार लेखी SET परीक्षा; पुढील वर्षापासून होणार ऑनलाईन पद्धतीने आयोजन

SET Exam 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राज्‍य पात्रता (SET Exam 2023) परीक्षेच्‍या तारखेची घोषणा  केली आहे. 2024 मध्ये दि. 7 एप्रिलला एम-सेट ही परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी स्वरुपात होणारी ही शेवटची ऑफलाईन परीक्षा असणार आहे. 2025 पासून सेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्‍याचे स्‍पष्ट करण्यात आले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्‍या सूचनेप्रमाणे आतापर्यंत 38 सेट परीक्षांचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ऑफलाईन पद्धतीने करण्यात आले होते. 39 व्‍या सेट परीक्षेचे आयोजन यापूर्वीप्रमाणेच पारंपारिक पद्धतीने दि. 7 एप्रिल 2024 ला केले जाणार आहे. मात्र 2025 पासून घेण्यात येणारी सेट परीक्षा ही केंद्रनिहाय ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली जाईल.

एप्रिलमध्ये होणाऱ्या सेट परीक्षेच्‍या नोंदणी प्रक्रियेची परीक्षार्थ्यांना प्रतीक्षा आहे. एकूण 300 गुणांसाठीच्‍या या परीक्षेत वस्‍तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्‍न विचारले (SET Exam 2023) जातील. पेपर क्रमांक 1 मध्ये प्रत्‍येकी दोन गुणांसाठी 50 प्रश्‍न विचारले जाणार आहेत. शिक्षक अध्यापन व संशोधन कौशल्‍ये या विषयावरील पेपर क्रमांक एक असेल. पेपर क्रमांक दोन हा परीक्षार्थ्यांचा विशेष विषयावर राहणार असून, एकूण 71 विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे.

राष्ट्रीय स्‍तरावर होणाऱ्या यूजीसी-नेट परीक्षेचे आयोजन संगणकावर आधारित केले जाते. या धर्तीवर 2025 पासून सेट परिक्षाही संगणकावर आधारित घेतली जाईल. दरम्‍यान UGC NET प्रमाणे एम-सेट परीक्षाही वर्षातून दोन सत्रांमध्ये घेतली जाते की एकदा घेतली जाते, तसेच शिक्षणक्रम, विषयांच्‍या संख्येत काय बदल केले जातात, याकडे परीक्षार्थींचे लक्ष लागून राहिले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment 2023 : 10 वी/ITI पास उमेदवारांसाठी खुषखबर!! महावितरणमध्ये होणार नवीन भरती

Mahavitaran Recruitment 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण (Mahavitaran Recruitment 2023) कंपनी लिमिटेड, औरंगाबाद अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 06 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 150 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 06 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी/ITI पास असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. ऑनलाईन अर्ज सादर करताना (Mahavitaran Recruitment 2023) आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
5. शैक्षणिक व इतर कागदपत्रांची साक्षांकीत छायांकित प्रत सादर न करणा-या उमेदवाराच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही.
6. अर्ज प्रक्रिया 06 डिसेंबर 2023 पासून सुरु होईल.

काही महत्वाच्या लिंक्स – (Mahavitaran Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

District Court Recruitment 2023 : लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल पदांवर नोकरीची संधी; महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात होणार नवीन भरती 

District Court Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात (District Court Recruitment 2023) विविध पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीची अधिसूचना दि. 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – जिल्हा न्यायालय
भरली जाणारी पदे – 
1. लघुलेखक (श्रेणी 3) —
2. कनिष्ठ लिपिक —
3. शिपाई/ हमाल —
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

मिळणारे वेतन – (District Court Recruitment 2023)
1. लघुलेखक – S-14 : 38600-122800
2. कनिष्ठ लिपिक – S-6 : 19900-63200
3. शिपाई/हमाल – S-1 : 15000-47600

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in .
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : दोन वेळा संधी हुकली; हताश झालेली प्रियदर्शिनी कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे अशी बनली IAS

UPSC Success Story of IAS Pujya Priyadarshini

करिअरनामा ऑनलाईन । जे प्रामाणिकपणे मेहनत (UPSC Success Story) घेतात ते UPSCचा गड सर करतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका यशस्वी व्यक्तिमत्वाबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे निश्चितच तुमच्यातील आत्मविश्वास जागा होईल. या व्यक्तीने कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या जोरावर 2018 मध्ये घेण्यात आलेल्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत संपूर्ण देशात 11 वा क्रमांक मिळवून IAS बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. या व्यक्तिचं नांव आहे IAS अधिकारी पूज्य प्रियदर्शिनी….

कुटुंबाच्या पाठिंब्यामुळं हे शक्य झालं 
पूज्य प्रियदर्शिनी UPSCची परीक्षा देत असताना तिला पहिल्या दोन प्रयत्नात पराभवाचा सामना करावा लागला. तिसर्‍या प्रयत्नात तिला हा टप्पा गाठण्यात यश मिळाले. याआधी तिने दोन वेळेस अपयश पचवले होते. पूर्व आणि मुख्य परीक्षा पास अजल्यानंतर ती दोनवेळा मुलाखत फेरीपर्यंत पोहचली होती. पण दोन्ही वेळा तिला अपयश आले. यानंतर साहजिकच तिचा धीर सुटला आणि तिने UPSC सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र कुटुंबाच्या आग्रहास्तव आणि पाठिंब्यामुळे तिने पुन्हा हिंमत दाखवली आणि तिसऱ्या प्रयत्नात मुलाखतीची फेरी पूर्ण केली. मुलाखत तिने पास केलीच पण विशेष म्हणजे तिला या परिक्षेत संपूर्ण भारतात 11 वी रँक मिळाली आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबाचं नांव उज्ज्वल झालं आहे.

परदेशात शिक्षण; 5 वर्षानंतर स्वप्न पूर्ण (UPSC Success Story)
पूज्य प्रियदर्शिनी हिने दिल्लीतून B.Com ची पदवी घेतली आहे. नंतर तिने परदेशात राहून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून लोक प्रशासनात पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर 2013 मध्ये तिने UPSC ची तयारी सुरु केली. सलग 5 वर्षांच्या तयारीनंतर 2018 मध्ये तिला या परिक्षेत यश मिळवता आलं आहे.

तरुणांना दिला मोलाचा सल्ला 
IAS पूज्य प्रियदर्शिनी हिने UPSC ची तयारी करणाऱ्या (UPSC Success Story) उमेदवारांना सल्ला दिला आहे. कधीही अपयशाला घाबरू नका; यश-अपयशाचा सामना करा. प्रत्येकाने आपल्या अपयशाचे मूल्यांकन केले पाहिजे आणि केलेल्या चुकांवर सतत काम केले पाहिजे. चुकांमधून शिकून तुम्ही तुमची स्वप्ने नक्कीच पूर्ण करू शकता; असं तिचं म्हणणं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Sainik School Admission 2024 : ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश प्रक्रिया सुरु; पहा अर्ज प्रक्रिया, परीक्षा, पात्रतेविषयी सविस्तर

Sainik School Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । जिद्द, शिस्त, अनुशासन आणि (Sainik School Admission 2024) उत्तम शिक्षणासाठी देशातील सैनिक स्कूल ओळखल्या जातात. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा, शिस्त व त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी तसेच संरक्षण सेवांमध्ये अधिकारी होण्यासाठी आवश्यक कौशल्य व प्रशिक्षण देण्यासाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल्सची स्थापना करण्यात आलेली आहे. देशभरातील सैनिक स्कूलमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सैनिक शाळांमध्ये इयत्ता सहावी आणि इयत्ता नववी प्रवेशांसाठी प्रवेश परीक्षा राबविली जाते. प्रवेशासाठी पूर्व परीक्षा आणि मुलाखती होणार असून याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांना सैनिकी शाळेत चांगले शिक्षण देण्यासाठी ही योग्य संधी निर्माण झाली आहे. पाहूया सविस्तर…

सैनिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी पात्रता काय आहे?
ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी, विद्यार्थ्यांनी सैनिक स्कूल प्रवेश पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. 2024 मध्ये होणाऱ्या सैनिक शाळा प्रवेशाच्या आवश्यकतेनुसार, विद्यार्थ्यांनी किमान वय आणि शैक्षणिक आवश्यकतांचे पालन करणे आवश्यक आहे. सैनिक शाळेच्या अधिसूचनेनुसार पात्रता निकष खालील प्रमाणे आहेत.

सैनिक शाळा २०२४ साठी प्रवेश पात्रता (Sainik School Admission 2024)
1. इयत्ता 6वी

३१ मार्च २०२४ रोजी १० ते १२ वयोगटातील मुले.
विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता पाचवीत शिकत असावा.
2. इयत्ता 9वी
इयत्ता नववीसाठी सैनिक स्कूल प्रवेश २०२४ साठी पात्रता
३१ मार्च २०२४ पर्यंत ज्या मुलांचे वय १३-१५ वर्षे आहे.
विद्यार्थ्याने इयत्ता आठवीमध्ये मान्यताप्राप्त शाळेत प्रवेश घेतला पाहिजे.

कोणकोणती कागदपत्रे आहेत आवश्यक 
1. उमेदवाराचे छायाचित्र
2. उमेदवाराची स्वाक्षरी
3. उमेदवाराच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा. (डाव्या हाताचा अंगठा अनुपलब्ध असल्यास, उजव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा वापरला जाऊ शकतो).
4. सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जन्मतारीख प्रमाणपत्र.
5. रहिवासी प्रमाणपत्र (Sainik School Admission 2024)
6. जात/समुदाय/श्रेणी प्रमाणपत्र (लागू असल्यास).
7. माजी सैनिकांसाठी सेवेचे प्रमाणपत्र (संरक्षण श्रेणी-सेवेसाठी लागू असल्यास)
8. अर्जदार मान्यताप्राप्त नवीन सैनिक शाळेत शिकत असल्याचे प्रमाणित करणारे मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र.
(केवळ सध्या मान्यताप्राप्त नवीन सैनिक शाळांमध्ये शिकत असलेल्यांसाठी लागू).
(टीप – सर्व कागदपत्रे स्कॅन कॉपीमध्ये असणे आवश्यक आहे.)

अर्ज सादर करण्याची तारीख –
ऑनलाइन अर्ज सादर करणे – दि. 16 डिसेंबर 2023 (सायंकाळी 05:00 पर्यंत)
अधिकृत वेबसाईट – https://aissee.co.in/
परीक्षेविषयी –
1. परीक्षेची पद्धत- ऑफलाईन
लेखी परीक्षेसाठी एकूण गुण – इयत्ता सहावीसाठी – ३०० गुण
इयत्ता नववीसाठी- ४०० गुण
2. परीक्षेचा कालावधी-
इयत्ता सहावीसाठी – १५० मिनिटे
इयत्ता नववीसाठी- १८० मिनिटे

3. परीक्षेची वेळ-
इयत्ता सहावी – दुपारी २ ते ४ : ३०
इयत्ता नववी- दुपारी २ ते ५ पर्यंत
4. निवड प्रक्रिया – लेखी चाचणी त्यानंतर वैद्यकीय चाचणी

इयत्ता 9वीसाठी असा असेल परीक्षेचा पॅटर्न
विभाजन – विषय- प्रश्न आणि गुण/प्रश्नांची संख्या- एकूण गुण कालावधी (मिनिटांमध्ये)
१- गणित- ५० x ३- १५० -६०
२ -इंग्रजी- २५ x २ -५० -३० (Sainik School Admission 2024)
३ -बुद्धिमत्ता -२५ x २ -५०- ३०
४ -सामान्य विज्ञान -२५ x २ -५० -३०
५ -सामाजिक अभ्यास- २५ x २- ५० -३०
-एकूण- १५० प्रश्न -४०० -१८०

इयत्ता 6 वीसाठी असा असेल परीक्षेचा पॅटर्न
विभाजन – विषय -प्रश्न आणि गुण/ प्रश्नांची संख्या- एकूण गुण कालावधी (मिनिटे)
१- गणित- ५० x ३- १५० -६०
२ -जीके (एससी आणि एसएसटी) -२५ x २ -५० -३०
३ -भाषा -२५ x २- ५० -३०
४ -बुद्धिमत्ता -२५ x २- ५० -३०
– एकूण- १२५ प्रश्न- ३०० -१५०
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CTET and TET Exam : सरकारी शिक्षक व्हायचंय? द्याव्या लागतात ‘या’ दोन परीक्षा

CTET and TET Exam (1)

करिअरनामा ऑनलाईन ।  सरकारी शिक्षक (CTET and TET Exam) होण्यासाठी CTET परीक्षेसह संबंधित राज्याची TET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यानंतरच तुम्ही केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरता. CTET परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये शिक्षक भरतीसाठी अर्ज करू शकतात. जर तुम्ही शिक्षण क्षेत्रात तुमचे करिअर करण्याचा विचार करत असाल, तर प्रथम त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या तपशीलांची माहिती असणं गजेचं आहे. आज आपण CTET आणि TET या दोन महत्त्वाच्या परीक्षांविषयी माहिती घेणार आहोत.
या दोन परीक्षा काय आहेत हे जाणून घेवूया. तसेच दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही कोणत्या शाळांमध्ये अर्ज करू शकता. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळतील.

1. CTET Exam (CTET and TET Exam)
सर्वप्रथम केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल जाणून घेवूया. या परीक्षेसाठी (CTET and TET Exam) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. ही परीक्षा वर्षातून दोनवेळा जुलै आणि डिसेंबरमध्ये घेतली जाते. ही परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्ही केंद्र सरकारद्वारे संचालित नवोदय विद्यालय (NVS), केंद्रीय विद्यालयात शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहात.

2. TET Exam
संबंधित राज्य स्तरावर TET परीक्षा आयोजित केली जाते. राज्य सरकारद्वारे (CTET and TET Exam) चालवल्या जाणाऱ्या सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्तीसाठी करण्यासाठी ही पात्रता परीक्षा घेतली जाते. या अंतर्गत यूपीमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेला यूपी टीईटी म्हणतात. इतर राज्यांनुसार एमपी टीईटी, केरळ टीईटी, टीएनटीईटी परीक्षा घेतल्या जातात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवार राज्य सरकारने जारी केलेल्या शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र होतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com