Success Story : दोन मुले आणि घरची जबाबदारी सांभाळत केला अभ्यास; नगमा बनली उपविभागीय दंडाधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । नगमा तबस्सुमने आईची भूमिका (Success Story) पार पाडत स्वतःच्या कर्तृत्वाची यशोगाथा लिहिली आहे. तिची चर्चा जिल्ह्यातील प्रत्येकाच्या ओठावर आहे. सरकारी खात्यात भरती होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण रात्रंदिवस मेहनत घेतात. नगमा त्यांच्यापैकीच एक आहे. तिने बिहार लकसेवा आयोगाच्या परिक्षेत 52 वा क्रमांक मिळवला आहे. अडचणींवर मात करत तिने हे यश कसं मिळवलं त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

दोन मुले आणि घरची जबाबदारी सांभाळत केला अभ्यास
बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्या नंतर नगमाची उपविभागीय दंडाधिकारी
(Sub Divisional Magistrate) पदासाठी निवड झाली आहे. तिची ही कहाणी प्रेरणा देणारी आहे कारण तिने आपल्या दोन लहान मुलांचे संगोपन करत अभ्यास केला आहे. एकीकडे मुलांचे संगोपन आणि दुसरीकडे कुटुंबाची जबाबदारी; अशी दुहेरी भूमिका पार पाडत तिने BPSC परीक्षेची तयारी केली आहे. एक आई म्हणून तिने आपल्या मुलांना कधीच एकटं पडून दिलं नाही. नगमा तबस्सुमला एक मुलगा आणि एक मुलगी असून इफ्रा आणि इमदाद अशी त्यांची नावे आहेत.

अपयश आलं म्हणून खचली नाही (Success Story)
परीक्षा देत असताना नगमाला दोन वेळा अपयश आलं तरी ती डगमगली नाही. तिने पुन्हा जोमाने तयारी केली आणि तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं. नगमा तबस्सुमने आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या विवाहित महिला आणि गृहिणींसमोर एक आदर्श उभा केला आहे. तिने आयुष्यात काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न पाहिले होते. नगमा तबस्सुमने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पहिल्या दोनवेळा तिला यश मिळाले नाही, पण तिने संयम सोडला नाही. ती प्रयत्न करत राहिली. तिसऱ्या प्रयत्नात तिला यश मिळाले. तिला मुलांच्या पालन पोषणासाह कुटुंबाची जबाबदारी पार पडायची होती. हे सर्व करत असताना यश मिळण्यास विलंब होत होता. तरीही तिने जिद्द सोडली नाही. तिच्या मनात आत्मविश्वास कायम होता.

कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे यश मिळवणं झालं सोपं
तिच्या यशाचे रहस्य सांगताना नगमा म्हणाली की; “माझ्या यशात पती आणि सासरच्या मंडळींचा मोठा वाटा आहे. माझ्या प्रमाणे सर्व मुलींना पाठिंबा मिळाला तर मुली सासरच्या घरी जाऊनही त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतात.” नगमा तबस्सुमने  यापूर्वी बी.टेक आणि एम.टेक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. पण (Success Story) तिला नागरी सेवक व्हायचे होते म्हणून नगमाने सरकारी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. नगमा तबस्सुमने तुर्कौलिया येथून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर ती अलीगड मुस्लिम विद्यापीठाकडे वळली. तेथून तिने 12वी पूर्ण केली आणि नंतर बी. टेक आणि एम.टेक. केले.

यश मिळवण्यासाठी तरुणांना दिला सल्ला
अभ्यासाच्या बाबतीतील समर्पण आणि सततच्या मेहनतीमुळे हे यश मिळाल्याचे नगमा सांगते. तिने आपल्या कामगिरीतून तरुणांना संदेश दिला आहे की, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत संयम गमावू नये. ती सांगते; “धीर धरा… यश तुमच्या हातात आहे. इकडच्या-तिकडच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. दीर्घ (Success Story) कालावधीसाठी अभ्यास आणि तयारी करण्याची क्षमता ठेवा. नेहमी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही किती मेहनत घेत आहात याकडे लक्ष द्या. वेळेचा मागोवा घ्या आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करा. प्रत्येक मिनिटाचा वापर करा मग तो कुटुंबासाठी असो किंवा तयारीसाठी, त्यावर योग्य लक्ष केंद्रित करा. एक दिवस यश नक्कीच तुमच्या पायांचे चुंबन घेईल.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com