MPSC Exam Date 2024 : MPSCने जाहीर केले वेळापत्रक; पहा कोणकोणत्या आणि कधी परीक्षा होणार

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC Exam Date 2024) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. आयोगाने 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार वर्ष 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचा तारखा, संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून संबंधित संवर्ग किंवा पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल.
आयोगाने अंदाजित वेळापत्रक तयार केले आहे. हे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो. तसेच काही बदल झाल्यास त्याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.

कोणकोणत्या परीक्षा होणार? (MPSC Exam Date 2024)
जाहिर केलेल्या या अंदाजित वेळापत्रकामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र वन सेवा परीक्षांचा समावेश आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला https://mpsc.gov.in/ भेट देण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव दे.वि. तावडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com