Career Success Story : डोक्यावर अडचणींची टांगती तलवार, पालकांनी मोलमजुरी करुन शिकवलं; UPSC परिक्षेत कल्पेशने मारली बाजी 

करिअरनामा ऑनलाईन । घरची परिस्थिती तशी हालाखीची. वडिल (Career Success Story) वेल्डिंग कारखान्यात नोकरी करायचे. कसाबसा घरखर्च चालायचा. डोक्यावर दुःख आणि अडचणींची टांगती तलवार. पण तरीही त्याने राखेतून उठून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली आणि तरुणांपुढे आदर्श उभा केला आहे. ही कथा आहे कल्पेश सूर्यवंशी या तरुणाची.

एका गरीब कुटुंबातील मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन उच्च शिक्षण घेतले आहे. त्याने थेट एम. डी. चे शिक्षण पूर्ण करुन UPSC कडून घेण्यात आलेल्या वैद्यकीय परीक्षेत ३२० वी रँक मिळवून देशपातळीवर आपले नाव उज्ज्वल केले आहे. या कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुतार समाजात नाव उंचावलं
सुतार समाजातील दाम्पत्य राजेंद्र जगन्नाथ सूर्यवंशी आणि कल्पना राजेंद्र सूर्यवंशी यांचा मुलगा डॉ. कल्पेश. सूर्यवंशी कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील दुसाणे (धुळे) येथील रहिवासी आहेत. सध्या त्यांचं कुटुंब गुजरातमधील सुरत येथे वास्तव्यास आहे. कल्पेशच्या कामगिरीमुळे सुतार समाजात त्याचे नांव उंचावले आहे.

विद्यापीठात मिळवला 3 रा क्रमांक (Career Success Story)
कल्पेशने दिल्ली येथील डॉ. राममनोहर लोहिया हॉस्पिटलमधून एमडीची (MD) उच्च पदवी घेतली आहे. गुरू गोविंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठात त्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर UPSC-CMS परिक्षेत घवघवीत यश मिळवत त्याने संपूर्ण भारतात 320 वा क्रमांक पटकावला आहे. देशातील लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. ही अती कठीण परीक्षा तो उत्तीर्ण झाला. सुतार समाजाला गर्व वाटावा असे यश त्याने पटकावले आहे.

किरकोळ कामे करुन मुलांना शिकवलं 
कल्पेश हुशार आहे. तो आयुष्यात नक्की काहीतरी करुन दाखवेल; हा पक्का विश्वास त्याच्या आईला होता. मुलाच्या  शिक्षणात कोणताही अडथळा येवू नये यासाठी त्यांनी कंबर कसून काम केले. पैशासाठी सुरतसारख्या शहरात त्या किरकोळ कामे करत राहिल्या. तर वडिल वेल्डिंग कारखान्यात मजुरी करायचे. संसाराचा गाडा ओढत असताना कुटुंबाला आर्थिक हातभार लावत, प्रसंगी नातेवाइकांकडून हात ऊसने पैसे घेवून त्यांनी चारही मुला-मुलींना शिक्षण दिले आणि मोठे केले.
कुटुंबासाठी मेहनत घेत असताना कल्पेशच्या आईला (Career Success Story) अनेकवेळा पराभवाचा सामना करावा लागला तरी त्यांनी हिंमत सोडली नाही. एक दिवस असा उजाडला आणि त्यांच्या कष्टाचे चीज झाले. एका कष्टकरी आईचा मुलगा डॉक्टर झाला होता.

गरजू लोकांना मोफत सेवा देणार
कल्पेशने लहानपणापासून आई-वडिलांचे कष्ट पाहिले आहे. असंख्य आर्थिक अडचणींचा सामना करत त्याने शिक्षण पूर्ण केले आहे. गरिबीची पुरेपूर जाणीव असणाऱ्या कल्पेशने पुढील काळात गोरगरीब, तसेच गावातील लोकांसाठी मोफत सेवा देण्याचे ठरवले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com