Medical Education : आता ‘बायोलॉजी’ विषय नसतानाही होता येणार डॉक्टर; पहा नॅशनल मेडिकल कमिशनने काय सांगितलं… 

करिअरनामा ऑनलाईन । डॉक्टर होवून करिअर (Medical Education) घडवण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. पण या प्रवासात एका गोष्टीचा अडथळा येतो तो म्हणजे विविध शाखांमध्ये सुरुवातीचं महाविद्यालयीन शिक्षण झालं असल्याचा. अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही महत्वाची अपडेट घेवून आलो आहोत.

तुमचा बायोलॉजी विषय नसेल तरीही होवू शकता डॉक्टर (Medical Education)
डॉक्टर होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाटेतून एक मोठा अडथळा दूर होणार असून, डॉक्टर होण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. 10+2 म्हणजेच बारावीची (HSC Exams) परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित या विषयांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांनाही डॉक्टर होता येणार आहे. अट फक्त एकच आहे, की वैद्यकिय शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी additional subject म्हणून बारावीच्या परीक्षेमध्ये biology/biotechnology मध्ये उत्तीर्ण असावं. राष्ट्रीय वैद्यकिय आयोगानं याबाबतच्या मार्गदर्शक सुचना नुकत्याच जारी केल्या आहेत.

National Medical Commission च्या मार्गदर्शक सूचना
NMC च्या माहितीनुसार physics, chemistry, biology/biotechnology आणि इंग्रजी (additional subject) विषयांसह बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस (MBBS) आणि बीडीएसच्या (BDS) प्रवेशासाठीची NEET-UG परीक्षा देता येणार आहे. इतकंच नव्हे, तर या विद्यार्थ्यांना एनएमसीकडून (NMC) देण्यात येणारा कायदेशीर पुरावा म्हणून पात्रता प्रमाणपत्रही देण्यात येणार (Medical Education) आहे. ज्यामुळं त्यांना परदेशात पदव्युत्तर शिक्षणही घेता येणार आहे.
डॉक्टर होण्यासाठी यापूर्वी विद्यार्थ्यांनी सलग दोन वर्षांसाठी म्हणजेच अकरावी आणि बारावीमध्ये physics, chemistry, biology/biotechnology या विषयांचा सातत्यपूर्ण अभ्यास करणं अपेक्षित होतं. त्यासोबतच एमबीबीएस आणि बीडीएससाठी इंग्रजीसुद्धा महत्त्वाचा विषय होता. पण, आता मात्र वैद्यकिय क्षेत्रातील या नव्या निर्णयामुळं अनेकांसाठीच खऱ्या अर्थानं करिअरच्या नव्या वाटा निर्माण झाल्या आहेत; असं म्हणायला हरकत नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com