IAS Success Story : एका घटनेने मिळाला टर्निंग पॉईंट; चहा विकणाऱ्या बापाचा लेक झाला IAS; कोचिंगशिवाय पास होवून टॉप केलं

करिअरनामा ऑनलाईन । या तरुणाचे वडील चहा विकून कुटुंबाचा (IAS Success Story) उदरनिर्वाह चालवायचे. घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होत होते. त्यांचा मोठा मुलगा अभ्यासात हुशार होता. त्याची भारतीय नौदलात निवड झाली होती, पण पाणबुडीला झालेल्या अपघातात तो शहीद झाला. या घटनेने देशलला मोठा धक्का बसला, पण काही दिवसांनी यातून तो सावरला आणि त्याने अभ्यासात मेहनत घ्यायला सुरवात केली. आज आपण IAS अधिकारी देशल दानबद्दल जाणून घेणार आहोत….

त्याने इतिहास रचला
UPSC परीक्षेत यशस्वी उमेदवारांच्या अशा अनेक कहाण्या समोर येतात, ज्या इतरांसाठी प्रेरणा बनतात. आम्ही तुम्हाला अशाच एका IAS अधिकाऱ्याची कहाणी सांगणार आहोत, ज्याने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर खूप संघर्ष केला, पण हार मानली नाही आणि IAS बनून इतिहास रचला…

पाणबुडीच्या अपघातात भाऊ शहीद झाला (IAS Success Story)
देशल दान हा राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील सुमलियाई गावचा रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि 7 भावंडे आहेत. भावा-बहिणींमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे कुटुंब अगदी सामान्य. या तरुणाचे वडील चहा विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होत होते. त्यांचा मोठा मुलगा अभ्यासात हुशार होता. त्याची भारतीय नौदलात निवड झाली होती, पण पाणबुडीला झालेल्या अपघातात तो शहीद झाला. या घटनेने देशलला मोठा धक्का बसला, पण त्यातून तो सावरला. त्याला अभ्यासात गोडी होतीच. त्याने बारावीनंतर जेईई (JEE) परीक्षा दिली आणि आयआयटी (IIT) जबलपूरमध्ये प्रवेश घेतला. येथून त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केले.

दिल्लीत जावून केला अभ्यास
देशलने लहानपणापासूनच IAS होण्याचे स्वप्न पाहिले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच्याकडे चांगल्या पगाराची खाजगी नोकरी करण्याचा पर्याय होता, पण त्याने यूपीएससीची (UPSC) परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. अभ्यास करण्यासाठी तो दिल्लीत आला. त्याला या गोष्टीची जाणीव होती, की या UPSC पास होण्यासाठी बराच वेळ आणि पैसे खर्च होणार आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला लवकरात लवकर परीक्षा पास करायची होती. त्यादृष्टीने त्याची घोडदौड सुरु होती.

कोचिंग क्लासशिवाय पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो दिवसरात्र मेहनत करू लागला. त्याच्या अथक परिश्रमाचे फळ म्हणजे तो UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात पास झाला आणि त्याला IAS पद मिळाले. विशेष म्हणजे दिल्लीत अभ्यास करत असताना त्याने कोणत्याही कोचिंग क्लासला प्रवेश घेतला नाही; तर स्वत:च्या बळावर (IAS Success Story) त्याने परिक्षेत बाजी मारली. 2017 मध्ये त्याने ही परीक्षा दिली; यामध्ये त्याने संपूर्ण भारतातून 82 वा क्रमांक पटकावला. एका छोट्या गावातून IAS होण्याचा त्याचा प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणा देणारा आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com