Home Blog Page 201

Job Notification : पुण्याच्या ‘या’ पतसंस्थेत ज्युनिअर क्लर्क, सेवक पदावर भरती; थेट द्या मुलाखत

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । मान्य खाजगी प्राथमिक (Job Notification) शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ लेखनिक, सेवक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 26 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे
भरले जाणारे पद –
1. कनिष्ठ लेखनिक – 02 पदे
2. सेवक – 01 पद
पद संख्या – 03 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा –
कनिष्ठ लेखनिक – 27 वर्षे
सेवक – 25 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 26 नोव्हेंबर 2023
मुलाखतीचा पत्ता – मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे स.नं. ६६६-६६७, ओंकार अपार्टमेंट, नु. म. वि. कनिष्ठ महाविद्यालयासमोर, नारायण पेठ, पुणे ३०.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लेखनिक
  • कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • जीडी सी अॅडए
  • अकोऊन्टीग प्रमाणपत्र असणे आवश्यक
  • एमएस वर्ड/एक्सेल / टॅली येणे आवश्यक
  • लेखापरीक्षणाचा अनुभর
  • बैंक / पतसंस्थेच्या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
सेवक
  • १२ वी कॉमर्स ५०% पेक्षा जास्त गुण असणारे
  • बैंक / पतसंस्थेच्या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य

 

अशी होईल निवड –
1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा (Job Notification) आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे.
4. उमेदवारांनी 26 नोव्हेंबर 2023 रोजी दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : राज्याच्या ‘या’ सहकारी बँकेत नोकरीची संधी; पात्रता ग्रॅज्युएट 

करिअरनामा ऑनलाईन । विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक (Job Alert) येथे कनिष्ठ अधिकारी, लिपीक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे.

बँक – विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक
भरले जाणारे पद – कनिष्ठ अधिकारी, लिपीक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-१३

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
वय मर्यादा –
कनिष्ठ अधिकारी – 40 वर्षे
लिपीक – 35 वर्षे
अर्ज फी – Rs. 100/-
परीक्षा फी – (Job Alert)
रु. 1000/-
महिला/एससी/एसटी/एनटी/ओबीसी / यांचेकरीता – रु. 5००/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारी
  • किमान पदवीधारक (कोणत्याही शाखेचा)
  • बँका/पतसंस्था/इतर वित्तीय संस्थांमध्ये किमान ५ वर्षांचा अनुभव अत्यावश्यक
  • एम.बी.ए./जीडीसी अँड ए / जेआयआयबी/ सीएआयआयबी असल्यास प्राधान्य
  • संगणकाचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक
लिपीक
  • किमान पदवीधारक (कोणत्याही शाखेचा)
  • बँका/पतसंस्था/इतर वित्तीय संस्थांमध्ये किमान ३ वर्षांचा अनुभव
  • जी.डी.सी अँड ए. उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची बँकिंग/सहकार कायदेविषयक पदविका असल्यास प्राधान्य.
  • संगणकाचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक

 

Job Alert

Job Alert

असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या (Job Alert) अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अपूर्ण माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिकृत वेबसाईट – https://vishwasbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Intelligence Bureau Recruitment 2023 : देशाच्या गुप्तचर विभागात 995 पदांवर भरती; ग्रॅज्युएट असाल तर ही संधी सोडू नका

Intelligence Bureau Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही सरकारी नोकरीच्या (Intelligence Bureau Recruitment 2023) शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत तब्बल 995 पदांवर भरती जाहिर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/कार्यकारी परीक्षा-2023 पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs)
भरले जाणारे पद – सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/कार्यकारी परीक्षा-2023
पद संख्या – 995 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 25 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2023
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा/ मुलाखती

वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे
अर्ज फी – रु. 450/-
परीक्षा फी – रु. 100/-
मिळणारे वेतन – Level 7 (Rs.44,900-1,42,400)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Intelligence Bureau Recruitment 2023)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/कार्यकारी परीक्षा-2023
  • Graduation or equivalent from a recognized university.
  • Knowledge of computers.


असा करा अर्ज –

1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी (Intelligence Bureau Recruitment 2023) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
4. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरुन 25 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करू शकतात.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
6. उमेदवारांना अर्ज फी भरणे अनिवार्य आहे.
7. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (लिंक 25 नोव्हेंबरपासून सुरु) – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IDBI Recruitment 2023 : पदवीधारकांची IDBI बँकेत होणार मेगाभरती!! 2100 जागांसाठी निघाली जाहिरात

IDBI Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । IDBI बँकेने नवीन पदांवर भरती (IDBI Recruitment 2023) जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक – जेएएम (ग्रेड ‘ओ’) पदांच्या एकूण 800 आणि ESO पदांच्या 1300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2023 आहे.

बँक – IDBI बँक
भरले जाणारे पद – कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक – जेएएम (ग्रेड ‘ओ’) आणि ESO (Executives – Sales and Operations)
पद संख्या – 2100 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 डिसेंबर 2023
अर्ज फी –
1. राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 200/-
2. खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
वय मर्यादा – २० ते २५ वर्षे
मिळणारे वेतन – 29,000/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या तारखा – (IDBI Recruitment 2023)

Important Events Dates
Commencement of on-line registration of application 22/11/2023
Closure of registration of application 06/12/2023

 

 

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक – जेएएम (ग्रेड ‘ओ’) 600 पदे
अधिकारी – विक्री आणि संचालन 1300 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक – जेएएम (ग्रेड ‘ओ’)
  • Candidates should be Graduate from any discipline from a university recognized by Government of India or an equivalent qualification recognized by Government of India. Passing only a diploma course will not be considered as qualifying the eligibility criteria.
  • Candidates are expected to have proficiency in computers.
  • Proficiency in regional language will be preferred.
अधिकारी – विक्री आणि संचालन  – ESO
  • A Graduate from a recognized university. Passing only a diploma course will not be considered as qualifying the eligibility criteria. The university / institute should be recognized / approved by Government; Government Bodies viz., AICTE, UGC etc.
    Passing only a diploma course will not be considered as qualifying the
    eligibility criteria

IDBI Bank Recruitment 2023

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांकडे स्वतःचा (IDBI Recruitment 2023) वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 : आदिवासी विकास महामंडळात विविध पदांवर भरती; ताबडतोब करा अर्ज

Adivasi Vikas Vibhag Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत (Adivasi Vikas Vibhag Bharti 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून  उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम) या पदांच्या एकूण 602 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे.

विभाग – आदिवासी विकास महामंडळ
भरली जाणारी पदे – उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)
पद संख्या – 602 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

वय मर्यादा – १८ वर्षे ते ३८ वर्षे
अर्ज फी –
1. राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
2. खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
काही महत्वाच्या तारखा – (Adivasi Vikas Vibhag Bharti 2023)

Important Events Dates
Commencement of on-line registration of application 23/11/2023
Closure of registration of application 13/12/2023 


असा करा अर्ज –
1. वरील पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी (Adivasi Vikas Vibhag Bharti 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज करायचा आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – tribal.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : शाळेने बोर्डाची परीक्षा नाकारली; आईने मोबाईल नाल्यात फेकला; कॉल सेंटरमधील मुलगा असा झाला अब्जाधीश 

Career Success Story of nikhil and nitin kamath

करिअरनामा ऑनलाईन । नितीन कामत आणि (Career Success Story) निखिल कामत हे दोघे भाऊ आहेत. नितीन हा निखिलचा मोठा भाऊ आहे. हे दोघे सध्या एका कंपनीचे सह-संस्थापक आणि CFO आहेत. ज्या व्यक्तीला शालेय शिक्षणही पूर्ण करता आले नाही, त्याने शिकण्याची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तब्बल 16 हजार पाचशे कोटी रुपयांची कंपनी कशी बनवली; याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

2 भावांनी स्वबळावर सुरु केली कंपनी
झिरोधा ही एक ब्रोकरेज कंपनी आहे. याद्वारे तुम्ही ऑनलाइन डिमॅट खाते उघडून शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये पैसे गुंतवू शकता. भारतातील काही स्टार्टअप्सपैकी हे एक स्टार्टअप आहे, जे मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहे. झिरोधाने या आर्थिक वर्षात २००० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, निखिल आणि नितीन कामत या दोन भावांनी ही कंपनी कशी स्थापन केली? खरं सांगायचं तर त्यांनी फायनान्सचं औपचारिक शिक्षणही घेतलेलं नाही. नितीन कामत हा इंजिनियर आहे तर निखिल कामत याने शाळेतूनच शिक्षण अर्धवट सोडलं आहे. यामुळेच त्यांना कंपनी स्थापन करण्यासाठी निधीही मिळाला नाही. आजही बाहेरून एकही पैसा झिरोधामध्ये गुंतवला जात नाही, पण या 2 भावांनी स्वबळावर ही कंपनी स्थापन करून त्यातून मोठ्या प्रमाणात फायदा मिळवला आहे. झिरोधाचे मूल्य सुमारे २ बिलियन डॉलरच्या आसपास आहे.

शाळेने परीक्षेला बसू दिले नाही (Career Success Story)
निखिल कामत याने वयाच्या 14 व्या वर्षी सेकंड हँड फोन विकायला सुरुवात केली. यामुळे त्याच्या अभ्यासावर परिणाम झाला. हा प्रकार त्याच्या आईला कळताच तिने सर्व फोन नाल्यात फेकून दिले. त्याच्या अभ्यासाबाबतच्या निष्काळजीपणाचा शाळा प्रशासनालाही राग होता, त्यामुळे त्याला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसण्याची संधीही देण्यात आली नाही. यानंतर निखिलने शाळा सोडली.

कॉल सेंटरमध्ये केले काम
वयाच्या १७ व्या वर्षी त्याने एका कॉल सेंटरमध्ये काम करायला सुरुवात केली, जिथे त्याला ८,००० रुपये पगार मिळायचा. निखिल सांगतो की, “मी कॉल सेंटरमध्ये संध्याकाळी ४ ते पहाटे १ वाजेपर्यंत काम करायचो आणि सकाळी मी ट्रेडिंगमध्ये माझं नशीब आजमावायचो.” यादरम्यान त्याने मार्केटबद्दल बरेच काही जाणून घेतले.

अशी लाँच झाली ‘झिरोधा’
त्याच्या वडिलांनी त्याला भक्कम पाठिंबा दिला. त्यांनी आपल्या जवळील पैसे मुलाला शेअर बाजारात गुंतवण्यासाठी दिले. निखिलने आपल्या कॉल सेंटरमधील सहकाऱ्यांना त्यांच्या (Career Success Story) पैशांचे व्यवस्थापन शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने करायचे याचे महत्त्व पटवून दिले. अशाप्रकारे स्टॉक ब्रोकिंगमध्ये त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. 2010 मध्ये त्याने आपल्या भावाला बरोबर घेवून ‘झिरोधा’ लाँच केली आणि २०२१ मध्ये निखिल कामत वयाच्या 34 व्या वर्षी अब्जाधीश झाला.

कंपनीने कमावला 2094 कोटी रुपयांचा निव्वळ नफा 
झिरोधाला कोणीही निधी दिला नाही आणि आजही बाहेरून एकही पैसा कंपनीत गुंतवला जात नाही. असे असूनही आज झिरोधा ही १६,५०० कोटी रुपयांचं भागभांडवल असलेली कंपनी आहे. निखिल कामतने गेल्या वर्षीच्या हुरुन इंडिया सेल्फ-मेड रिच लिस्टमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. एका रिपोर्टनुसार निखिल कामतची एकूण संपत्ती १७,५०० कोटी रुपये आहे. या आर्थिक वर्षात कंपनीने २०९४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SBI PO Prelims Result : SBI PO पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; असा पहा निकाल

SBI PO Prelims Result

करिअरनामा ऑनलाईन ।  स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी (SBI PO Prelims Result) ऑफिसर पदासाठी घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर sbi.co.in हा निकाल पाहता येणार आहे. दि. १, ४ आणि ६ नोव्हेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती आणि जे परीक्षेत बसले होते आणि यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. या भरती अंतर्गत एकूण २००० पदे भरली जाणार आहेत.

या परीक्षेसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केले होते. एसबीआय पीओ पूर्व परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार आता मुख्य परीक्षेला बसतील. निकालानंतर प्रवेशपत्र आणि मुख्य परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल. मुख्य परिक्षेत उतीर्ण झालेल्या उमेदवारांना ग्रुप एक्सरसाइज आणि त्यानंतर मुलाखतीसाठी बोलवले जाईल.

असा पहा तुमचा निकाल (SBI PO Prelims Result)
1. सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://bank.sbi/careers ला भेट द्यायची आहे.
2. यानंतर प्रोबेशनरी ऑफिसर निकाल असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
3. येथे मागितलेली सर्व माहिती अचूक भरा.
4. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
पूर्व परीक्षेत उतीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलवण्यात येईल. जे उमेदवार मुख्य परीक्षेत पास होतील, त्यांना सायकोमेट्रिक चाचणीसाठी बोलावले जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Ayodhya Ram Mandir Bharti 2023 : 20 पदांच्या भरतीसाठी 3 हजार जण इच्छुक; भव्य-दिव्य राम मंदिरात पुजाऱ्यांची मुलाखतीने होणार निवड

Ayodhya Ram Mandir Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण देशाला उत्सुकता (Ayodhya Ram Mandir Bharti 2023) लागून राहिलेल्या राम मंदिराचं उद्घाटन लवकरच होणार आहे.  आजपासून दोन महिन्यानंतर राम मंदिरामध्ये रामलल्लाची स्थापना होणार आहे. दि. 22 जानेवारीला राम मंदिरात मूर्तीची  प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या भव्यदिव्य राम मंदिरासाठी पुजारी पदांवर भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या पदांसाठी तब्बल 3 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानंतर उमेदवारांची मेरिट लिस्ट जारी करण्यात आली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून उमेदवारांची मुलाखत घेण्यास सुरुवात झाली आहे.

20 पदांसाठी 3 हजार अर्ज
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात पुजाऱ्यांच्या भरतीसाठी मेरिट लिस्ट तयार करण्यात आली असून त्यासाठी मुलाखती सुरु झाल्या आहेत. राम मंदिरातील पुजारी पदांसाठी एकूण तीन हजार जणांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यानंतर गुणवत्ता यादीच्या आधारे 225 जणांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली आहे. मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

225 उमेदवार मेरिट लिस्टमध्ये (Ayodhya Ram Mandir Bharti 2023)
ट्रस्टला मिळालेल्या 3000 अर्जांपैकी 225 उमेदवारांची त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर निवड करण्यात आली आहे. त्यांना ट्रस्टने मुलाखतीसाठी बोलावलं आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार वृंदावनचे प्रसिद्ध हिंदू धर्मोपदेशक जयकांत मिश्रा यांचाही मुलाखतकारांच्या तीन सदस्यीय पॅनेलमध्ये समावेश आहे. मुलाखतकारांचे तीन सदस्यीय पॅनेल अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेचे मुख्यालय कारसेवक पुरम येथे या निवडक उमेदवारांची मुलाखत घेत आहे.

मुलाखत पॅनेलमध्ये या महंतांचा समावेश
मुलाखतकारांच्या तीन सदस्यीय पॅनेलमध्ये वृंदावनचे प्रसिद्ध हिंदू धर्मोपदेशक जयकांत मिश्रा आणि अयोध्येचे दोन महंत, मिथिलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास यांचा समावेश आहे.
पुजाऱ्यांना घ्यावं लागणार 6 महिन्यांचे प्रशिक्षण 
मुलाखतीनंतर पुजारी पदावर निवड झालेल्या 20 उमेदवारांना (Ayodhya Ram Mandir Bharti 2023) अयोध्येतील पुरम येथे सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे प्रशिक्षण धार्मिक अभ्यासक्रमावर आधारित असेल. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना मोफत राहण्याची सोय आणि भोजन मिळेल, तसेच दोन हजार रुपये मानधनही मिळणार आहे.

26 जानेवारीपासून खुले होणार नवे राम मंदिर
26 जानेवारीपासून राम मंदिर भक्तांसाठी खुले केले जाणार आहे. त्यानंतर रामभक्तांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे. अयोध्येतील राम मंदिरात दररोज सुमारे 75 हजार भाविक दर्शन घेऊ शकतील; अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Naval Dockyard Recruitment 2024 : 10वी, ITI पास तरुणांसाठी खुषखबर!! नेव्हल डॉकयार्डने जाहीर केली नवीन भरती

Naval Dockyard Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत (Naval Dockyard Recruitment 2024) असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 275 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.

संस्था – नेव्हल डॉकयार्ड
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 275 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जानेवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – विशाखापट्टणम

निवड प्रक्रिया –
1. लेखी परीक्षा
2. मुलाखती
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Naval Dockyard Recruitment 2024)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार
  • SSC / Matric / Std X
  • ITI (NCVT/SCVT)

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अपूर्ण अर्ज नाकारले जातील. (Naval Dockyard Recruitment 2024)
4. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन करायचे आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.joinindiannavy.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Typing Skill Exam : टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी MPSCची नवी कार्यपद्धत

MPSC Typing Skill Exam

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने टंकलेखन (MPSC Typing Skill Exam) कौशल्य चाचणीसाठी नवी कार्यपद्धती जाहीर केली आहे. लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक या टंकलेखन आवश्यक असलेल्या पदांच्या परीक्षांसाठी ही कार्यपद्धती असणार आहे.

त्यानुसार लिपिक-टंकलेखक पद भरतीत मुख्य परीक्षेसाठी (MPSC Typing Skill Exam) उमेदवारांना मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक टंकलेखन कौशल्य चाचणी निवडता येणार आहे. तसेच कर सहाय्यक पदासाठी दोन्ही भाषांतील टंकलेखन कौशल्य चाचण्या द्याव्या लागणार आहेत. दोन्ही पदांसाठी टंकलेखन कौशल्य चाचणी अहर्ताकारी स्वरूपाची केली आहे. MPSCने या संदर्भात माहितीपत्रक काढले आहे. लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक या पदांच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदी आणि अन्य बाबींचा साकल्याने विचार करून कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक पदाच्या पदभरतीत संगणक प्रणालीवर (On a Computer System) आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे.

पात्रता निकष (MPSC Typing Skill Exam)
लेखी परीक्षेच्या आधारे संबंधित पदांसाठी भरल्या जाणाऱ्या पदांच्या तीनपट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरवले जातील. ही कार्यपद्धती यापुढे होणाऱ्या टंकलेखन कौशल्य चाचणीला लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अपंग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना नियुक्ती मिळाल्यास टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांचा कालावधी आणि दोन संधी लागू असल्याने या वर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com