Home Blog Page 202

UPSC Success Story : आधी IIT, नंतर UPSC; देशात ठरला टॉपर; IAS होवून तरुणांसमोर ठेवला आदर्श 

UPSC Success Story of IAS Utsav Gautam

करिअरनामा ऑनलाईन । उत्सव लहानपणापासूनच (UPSC Success Story) अभ्यासात हुशार होता. त्याला 10वीत 91.8 टक्के आणि 12 वीत 87.6 टक्के गुण मिळाले होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने आयआयटी, पाटणामधून बॅचलर पदवी मिळवली. ग्रॅज्युएशन पूर्ण होताच उत्सवला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली. पण त्याला UPSC ची परीक्षा द्यायची होती म्हणून त्याने नोकरी सोडली. आज त्याच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ही कहाणी रंजक आणि प्रेरणादायी आहे.

UPSC परीक्षा दिल्या नंतर मिळणाऱ्या सरकारी नोकरीचे आकर्षण तरुणांना स्वस्थ बसू देत नाही. यासाठी अनेकजण लाखो रुपये पगाराच्या नोकऱ्या सोडायला तयार होतात. आयएएस (UPSC Success Story) अधिकारी उत्सव गौतम यांचीही अशीच कहाणी आहे. IIT मधून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर सुमारे एक वर्ष त्यांनी नोकरी केली. त्यानंतर आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. मात्र, यानंतर त्याला अनेक अपयशांना सामोरे जावे लागले.

एकापाठोपाठ तीनवेळा आले अपयश (UPSC Success Story)
UPSCची परीक्षा देण्याचा विचार उत्सवच्या मनात आला. यानंतर त्याने नोकरीचा राजिनामा दिला आणि अभ्यासाला सुरुवात केली. संघर्ष संपत नव्हता. त्याला एकापाठोपाठ अनेक अपयशांना सामोरे जावे लागले. उत्सवने UPSC मध्ये सलग तीन प्रयत्न केले. तिन्ही वेळेस त्याला अपयश आले. पण उत्सव निराश झाला नाही. त्याने सकारात्मक विचाराने तयारी सुरुच ठेवली. मागील परीक्षांमध्ये झालेल्या चुका ओळखून त्या सुधारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या चिकाटीचा परिणाम म्हणजे त्याने 2017 मध्ये चौथ्या प्रयत्नात UPSC पास होण्यात यश मिळवले.

अभ्यासक्रमाची भरपूर उजळणी करा
उत्सव फक्त UPSC पास झाला नाही; तर त्याने या परिक्षेत संपूर्ण भारतातून 33 वा क्रमांक मिळवला आहे. त्याचे नाव टॉपर्सच्या यादीत झळकत आहे. UPSC ची तयारी करणाऱ्यांना (UPSC Success Story) उत्सव सांगतो की, “संपूर्ण अभ्यासक्रम वाचून भरपूर उजळणी करा. या परीक्षेसाठी पुस्तकांची निवड अत्यंत विचारपूर्वक करावी लागते. मानक पुस्तकांव्यतिरिक्त, NCERT ची पुस्तके नक्कीच वाचा.” असा सल्ला तो देतो.
या परीक्षेसाठी उत्सवचा ऐच्छिक विषय गणित हा होता. तो म्हणतो; “UPSC चा कोणताही पेपर हलका घेऊ नका. पण मुख्य परीक्षेसाठी ऐच्छिक विषयांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. मी ऐच्छिक विषय कधीच बदलला नाही. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आणि सकारात्मक विचारासोबतच संयमही आवश्यक आहे.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : ‘या’ पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये लेक्चरर पदावर नोकरीची संधी; ताबडतोब करा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । KP पाटील इन्स्टिट्यूट ऑफ (Job Notification) टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) मुदाल, कोल्हापूर येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 05 रिक्त पदे भरली जनर आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तरीलह 28 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – के.पी.पाटील पॉलिटेक्निक, कोल्हापूर (श्री सद्गुरु बाळूमामा शिक्षण प्रसारक मंडळ, मुदाल)
भरले जाणारे पद – Lecturer (Computer, Electrical and Mechanical Engineering)
पद संख्या – 05 पदे (Job Notification)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – B.E. in Computer / Electronics / Electrical / Mechanical Engineering.
निवड प्रक्रिया – मुलाखत

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.kppatilpolytechnic.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Hotel Management Entrance Exam : हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाच्या तारखा

Hotel Management Entrance Exam

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंटने (Hotel Management Entrance Exam) प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.  2024-25 या वर्षात हॉटेल मॅनेजमेंट संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) कौन्सिलने जारी केलेल्या अधिकृत माहिती नुसार मे 2024 मध्ये घेतली जाणार आहे.

NCHM JEE 2024 राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केली जाते. परीक्षेस बसण्यासाठी नोंदणी दि. 1 फेब्रुवारी 2024 रोजी NTAद्वारे सुरू केली जाईल. संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे मे महिन्यातच जारी केली जातील. परीक्षा झाल्यानंतर मे महिन्यातच उत्तरसुचीही (Answer Key) जाहीर केली जाणार आहे.

उमेदवार या उत्तरसुचींवर त्यांचे आक्षेप ऑनलाइन (Hotel Management Entrance Exam) नोंदवू शकतील. या हरकतींचा आढावा घेऊन परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. यशस्वी घोषित उमेदवारांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जून 2024 मध्ये समुपदेशनाची पहिली फेरी घेतली जाईल. या परीक्षेच्या माध्यमातून देशातील प्रतिष्ठित हॉटेल मॅनेजमेंट संस्था तसेच विविध राज्यांतील सरकारी आणि खाजगी हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

परीक्षेसंबंधी महत्वाच्या तारखा – (Hotel Management Entrance Exam)

S. No. Events Dates
1 NCHMCT JEE Registration 2024 1st week of February 2024
to May 2024
2 NCHMCT JEE 2024 Application
Correction Window
May 2024 (Tentative)
3 Advance City Intimation Slip May 2024 (Tentative)
4 NCHMCT JEE 2024 Admit Card May 2024 (Tentative)
5 NCHMCT JEE 2024 Exam Date May 2024 (Tentative)
6 Answer Key (Provisional) May 2024 (Tentative)
7 First Round Online Registration June 2024 (Tentative)

– अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ – nchmjee.nta.nic.in
– एकूण जागा – 11 हजार 965
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PW Recruitment 2023 : फिजिक्सवालामध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी; मिळवा लाखो रुपये पगार

PW Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय बहुराष्ट्रीय शैक्षणिक (PW Recruitment 2023) तंत्रज्ञान कंपनी म्हणजेच PhysicsWallah Private Limited येथे नोकरीची संधी निर्माण झाली आहे. कॉन्टेंट रिव्यूवर पदासाठी या कंपनीत भरती होणार आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना ज्यूडिशिएरी कॉन्टेंट रिव्यूचे काम करावे लागणार आहे.
‘PhysicsWallah Private Limited’ म्हणजेच ‘PW’ म्हणून ओळखली जाणारी ही एक भारतीय बहुराष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी आहे. हे एक भारतातील सर्वोच्च ऑनलाइन एड-टेक प्लॅटफॉर्म आहे. याचे मुख्यालय नोएडा, उत्तर प्रदेश येथे आहे. २०२० मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचे जून २०२२ मध्ये १.१ अब्ज डॉलरच्या मुल्यांकनात $१०० दशलक्ष उभारल्यानंतर ती युनिकॉर्न कंपनी असणार आहे.

असं आहे कामाचं स्वरुप –
Judiciary Content Reviewer पदावर निवड झाल्यानंतर उमेदवाराला प्रश्नावली (Question Bank), पुस्तके किंवा विविध चाचण्यांसाठी कॉन्टेंट तयार करण्याची आणि रिव्यूची महत्त्वाची जबाबदारी कॉन्टेंट रिव्यूवरची असेल.
शिवाय, या पदावर असताना, उमेदवारावर निर्मिती आणि गुणवत्ता तपासणी या जबाबदऱ्या असतील.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (PW Recruitment 2023)
1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा.
2. न्यायिक सेवा परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
आवश्यक अनुभव –
कॉन्टेंट क्रिएशन किंवा रिव्यूचा (पुनरावलोकनाचा) किमान १ ते ५ वर्षांचा अनुभव असावा.

नोकरीचे ठिकाण – नोएडा, उत्तर प्रदेश
उमेदवराकडे आवश्यक कौशल्ये –
1. ज्यूडिशिएरीच्या सर्व विषयांचे चांगले वैचारिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
2. विविध प्रश्न तयार करणे (PW Recruitment 2023) आणि समजण्यास सोप्या भाषेत त्याचे समाधान तयार करणे.
3. चांगले संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे.
4. Google डॉक्सवर काम करणे सोयीस्कर असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
या कामासाठी ३.५ लाख ते ६ लाख रुपये पगार असू शकतो.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://www.pw.live/
Content Reviewer पदावर अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DRDO Recruitment 2023 : DRDO अंतर्गत नवीन भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

DRDO Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (DRDO Recruitment 2023) अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या 7 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यामुळे B.E., B.Tech. पदवी धारकांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

संस्था – रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट
भरले जाणारे पद – ज्युनियर रिसर्च फेलो
पद संख्या – 07 पदे
नोकरीचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 28 वर्षे (DRDO Recruitment 2023)
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (PDF पहा)
मुलाखतीची तारीख – 30 नोव्हेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – ज्युनियर रिसर्च फेलो बी.ई./बी.टेक.
मिळणारे वेतन – रु.37,000/- दरमहा
अशी होईल निवड – (DRDO Recruitment 2023)
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
3. मुलाखतीची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
4. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणायची आहेत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : राज्याच्या ‘या’ जिल्हाधिकारी कार्यालयात अकौंटिंग ऑफिसर पदावर नोकरीची संधी; लगेच करा APPLY

Government Job (31)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ (Government Job) अंतर्गत लेखाधिकारी (Accounting Officer) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ
भरले जाणारे पद – लेखाधिकारी (Accounting Officer)
पद संख्या – 01 पद
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ (सेतू विभाग)
नोकरीचे ठिकाण – यवतमाळ
निवड प्रक्रिया – मुलाखती

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Job)
लेखाधिकारी शासकीय/निमशासकीय/सिडको/नगर परिषद/नपा /म न.पा मध्ये सेवेत असताना किमान ५ वर्षे लेखा विभागात काम केल्याचा अनुभव आणि ई. पी.एफ. च्या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्जासोबत आवश्यक (Government Job) कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
4. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत ‘उप संचालक’ पदावर भरती; मिळवा भरघोस पगार

Job Alert (86)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन (Job Alert) परिषद अंतर्गत उपसंचालक पदांच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जरी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद
भरले जाणारे पद – उप संचालक
पद संख्या – 05 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Ph.D. in any Social Science.
मिळणारे वेतन – Level-11 Rs.67,700/- ते 2,08,700
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (Job Alert) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.
4. 08 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://icssr.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

EIL Recruitment 2023 : इंजीनियर्ससाठी 1,80,000 पगाराची नोकरी; EIL अंतर्गत नवीन भरती सुरु

EIL Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । इंजीनियर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत (EIL Recruitment 2023) अभियंते पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 17 उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – इंजीनियर्स इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – अभियंते
पद संख्या – 17 पदे
वय मर्यादा – 28 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2023

निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – B.E. / B. Tech / B. Sc. (Engg.) in Civil Engineering/Mechanical Engineering with minimum 65% marks
मिळणारे वेतन – 60,000 ते 1,80,000/- रुपये दरमहा

असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे (EIL Recruitment 2023) अगोदर सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.
5. विहित कालावधीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://engineersindia.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2023 : उत्तर-मध्य रेल्वेची मेगाभरती!! 10 वी/ITI पास करु शकतात अर्ज; पदे 1697

Railway Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर-मध्य रेल्वे अंतर्गत भरती जाहीर (Railway Recruitment 2023) करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 1697 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – उत्तर-मध्य रेल्वे
भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 1697 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2023

वय मर्यादा – 15 ते 24 वर्षे
अर्ज फी –
1. सामान्य/ओबीसी: ₹१००/-
2. [SC/ST/PWD/स्त्री: शुल्क नाही]

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी
  • 10th pass with 50% marks
  • ITI in related trade


असा करा अर्ज –

1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील (Railway Recruitment 2023) दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
4. एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे.
6. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज बाद केले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.rrcpryj.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

Indian Army : भारताच्या लष्करात ट्रान्सजेंडर्सची भरती होणार का? 

Indian Army (1)

करिअरनामा ऑनलाईन । जगातील अनेक देशांच्या सैन्यात (Indian Army) ट्रान्सजेंडर्सची भरती झाली आहे. आता भारतातही याविषयी निर्णय घेण्यासाठी मोठे पाऊल उचले जावू शकते. देशात एक अभ्यास गट तयार करण्यात आला आहे जो यासंबंधी विचार करेल. सध्या अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलसह जगातील 19 देशांच्या सैन्यात ट्रान्सजेंडर्सची भरती केली जात आहे. तर नेदरलँड्स हा जगातील पहिला देश आहे जिथे ट्रान्सजेंडर्सच्या भरतीस 1974 पासून सुरवात झाली होती.
ट्रान्सजेंडर्सच्या सैन्यातील भरतीबाबत निर्णय घेण्यासाठी सैन्य दलाने एक खास एक गट तयार केला असून तो संरक्षण क्षेत्रात ट्रान्सजेंडर्सना कसं तैनात करता येईल याचा अभ्यास करेल. हा उपक्रम यशस्वी झाल्यास देशात समानता आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले जाईल.

आत्तापर्यंत भारतीय लष्कराच्या कोणत्याही भागात ट्रान्सजेंडर्सना प्रवेश मिळालेला नाही. मात्र, याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.एका अहवालानुसार ट्रान्सजेंडर्सना सैन्यात प्रवेश मिळाल्यास त्यांना प्रशिक्षणापासून निवडीपर्यंत कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
सरकारने या दिशेने पावले टाकली तर अनेक आव्हाने उभी राहतील. असे झाल्यास त्याकडे रोजगाराची संधी म्हणून पाहता येणार नाही, असे एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. येथे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. जसे- त्यांच्या राहण्यासाठी घर, शौचालय आणि कामाचा नमुना.

ट्रान्सजेंडर्सची नेदरलँडमध्ये झाली पहिली भरती
1974 मध्ये पहिल्यांदाच सैन्यात ट्रान्सजेंडर्सची भरती (Indian Army) सुरू झाली. असे करणारा तो पहिला देश ठरला. यानंतर जगातील अनेक देशांनी ट्रान्सजेंडर्सना सैन्यात प्रवेश दिला. नेदरलँडनंतर 1976 मध्ये स्वीडन, 1878 मध्ये डेन्मार्क, 1979 मध्ये नॉर्वे आणि त्यानंतर कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये अशा भरती होवू लागल्या.
भारतात 2015 मध्ये, तामिळनाडूने देशातील पहिल्या पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्याच वेळी, छत्तीसगड हे पोलीस दलात ट्रान्सजेंडर समुदायाची सक्रियपणे भरती करणारे पहिले राज्य ठरले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com