Hotel Management Entrance Exam : हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाच्या तारखा

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंटने (Hotel Management Entrance Exam) प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.  2024-25 या वर्षात हॉटेल मॅनेजमेंट संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) कौन्सिलने जारी केलेल्या अधिकृत माहिती नुसार मे 2024 मध्ये घेतली जाणार आहे.

NCHM JEE 2024 राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केली जाते. परीक्षेस बसण्यासाठी नोंदणी दि. 1 फेब्रुवारी 2024 रोजी NTAद्वारे सुरू केली जाईल. संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे मे महिन्यातच जारी केली जातील. परीक्षा झाल्यानंतर मे महिन्यातच उत्तरसुचीही (Answer Key) जाहीर केली जाणार आहे.

उमेदवार या उत्तरसुचींवर त्यांचे आक्षेप ऑनलाइन (Hotel Management Entrance Exam) नोंदवू शकतील. या हरकतींचा आढावा घेऊन परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. यशस्वी घोषित उमेदवारांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जून 2024 मध्ये समुपदेशनाची पहिली फेरी घेतली जाईल. या परीक्षेच्या माध्यमातून देशातील प्रतिष्ठित हॉटेल मॅनेजमेंट संस्था तसेच विविध राज्यांतील सरकारी आणि खाजगी हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

परीक्षेसंबंधी महत्वाच्या तारखा – (Hotel Management Entrance Exam)

S. No. Events Dates
1 NCHMCT JEE Registration 2024 1st week of February 2024
to May 2024
2 NCHMCT JEE 2024 Application
Correction Window
May 2024 (Tentative)
3 Advance City Intimation Slip May 2024 (Tentative)
4 NCHMCT JEE 2024 Admit Card May 2024 (Tentative)
5 NCHMCT JEE 2024 Exam Date May 2024 (Tentative)
6 Answer Key (Provisional) May 2024 (Tentative)
7 First Round Online Registration June 2024 (Tentative)

– अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ – nchmjee.nta.nic.in
– एकूण जागा – 11 हजार 965
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com