Home Blog Page 203

Indian Army : भारताच्या लष्करात ट्रान्सजेंडर्सची भरती होणार का? 

Indian Army (1)

करिअरनामा ऑनलाईन । जगातील अनेक देशांच्या सैन्यात (Indian Army) ट्रान्सजेंडर्सची भरती झाली आहे. आता भारतातही याविषयी निर्णय घेण्यासाठी मोठे पाऊल उचले जावू शकते. देशात एक अभ्यास गट तयार करण्यात आला आहे जो यासंबंधी विचार करेल. सध्या अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलसह जगातील 19 देशांच्या सैन्यात ट्रान्सजेंडर्सची भरती केली जात आहे. तर नेदरलँड्स हा जगातील पहिला देश आहे जिथे ट्रान्सजेंडर्सच्या भरतीस 1974 पासून सुरवात झाली होती.
ट्रान्सजेंडर्सच्या सैन्यातील भरतीबाबत निर्णय घेण्यासाठी सैन्य दलाने एक खास एक गट तयार केला असून तो संरक्षण क्षेत्रात ट्रान्सजेंडर्सना कसं तैनात करता येईल याचा अभ्यास करेल. हा उपक्रम यशस्वी झाल्यास देशात समानता आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले जाईल.

आत्तापर्यंत भारतीय लष्कराच्या कोणत्याही भागात ट्रान्सजेंडर्सना प्रवेश मिळालेला नाही. मात्र, याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.एका अहवालानुसार ट्रान्सजेंडर्सना सैन्यात प्रवेश मिळाल्यास त्यांना प्रशिक्षणापासून निवडीपर्यंत कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
सरकारने या दिशेने पावले टाकली तर अनेक आव्हाने उभी राहतील. असे झाल्यास त्याकडे रोजगाराची संधी म्हणून पाहता येणार नाही, असे एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. येथे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. जसे- त्यांच्या राहण्यासाठी घर, शौचालय आणि कामाचा नमुना.

ट्रान्सजेंडर्सची नेदरलँडमध्ये झाली पहिली भरती
1974 मध्ये पहिल्यांदाच सैन्यात ट्रान्सजेंडर्सची भरती (Indian Army) सुरू झाली. असे करणारा तो पहिला देश ठरला. यानंतर जगातील अनेक देशांनी ट्रान्सजेंडर्सना सैन्यात प्रवेश दिला. नेदरलँडनंतर 1976 मध्ये स्वीडन, 1878 मध्ये डेन्मार्क, 1979 मध्ये नॉर्वे आणि त्यानंतर कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये अशा भरती होवू लागल्या.
भारतात 2015 मध्ये, तामिळनाडूने देशातील पहिल्या पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्याच वेळी, छत्तीसगड हे पोलीस दलात ट्रान्सजेंडर समुदायाची सक्रियपणे भरती करणारे पहिले राज्य ठरले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Business Success Story : वयाच्या 26 व्या वर्षी बनला अब्जाधीश; दिलं हजारो हातांना काम; पहा हा तरुण नेमकं काय करतो?

Business Success Story of Sagar Gupta

करिअरनामा ऑनलाईन । त्याला CA व्हायचं होतं, पण नशिबात (Business Success Story) वेगळीच गोष्ट लिहली होती. 2017 हे वर्ष त्याच्या आयुष्यात एक वेगळं वळण घेवून आलं. आज आपण एका तरुण उद्योजकाविषयी जाणून घेणार आहोत. त्याने आपल्या वडिलांच्या बरोबरीने व्यवसाय करत अवघ्या 4 वर्षात 600 कोटींचे साम्राज्य उभे केले आहे. ज्या वयात सागर गुप्ताने हा पराक्रम केला आहे; त्या वयात ही गोष्ट फार थोडक्याच तरुणांना शक्य होते.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक तरुण नोकरीच्या शोधात असतो, पण काही तरुण असे असतात, जे नोकरी करत नाहीत, तर नोकरी देणारी कंपनीच उभी करतात. देशात असे अनेक तरुण उद्योजक आहेत, ज्यांनी अल्पावधीतच आपल्या व्यवसायाने आणि कमाईने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. या यादीत नोएडाच्या सागर गुप्ता याचेही नाव आवर्जून घ्यावे वाटते.

दिल्ली विद्यापीठातून पूर्ण केले शिक्षण (Business Success Story)
२२ व्या वर्षी दिल्ली विद्यापीठाच्या अत्यंत प्रतिष्ठित श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर वर्षभरात सागरने आपल्या वडिलांबरोबर व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला त्याला CA व्हायचे होते, पण नशिबाने त्याच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. त्यानंतर २०१७ मध्ये त्याच्या कारकिर्दीला मोठे वळण मिळाले.

सॅमसंग, तोशिबा आणि सोनी या ब्रँड्सची सुरु केली निर्मिती
शिक्षणानंतर सागरला उत्पादन व्यवसायात उतरायचे होते. ३ दशकांच्या सेमी कंडक्टर व्यापारानंतर त्याच्या वडिलांनी एलईडी टेलिव्हिजन उत्पादन युनिट सुरू केले, तेव्हा सागरसाठी ही सुवर्णसंधी होती. २०१९ मध्ये त्याने नोएडामध्ये त्याची कंपनी सुरू केली. हे काम इतकं सोपं नसलं तरी वडिलांच्या मदतीने त्याने संपर्क साधला आणि सॅमसंग, तोशिबा आणि सोनी या ब्रँड्सची निर्मिती सुरु केली. एलईडी उत्पादन उद्योगात चीनचे वर्चस्व होते, परंतु हे क्षेत्र भारतातही आता वेगाने उदयास येत आहे.

शेकडो परदेशी कंपन्यांना करतो पुरवठा
सागर गुप्ताची कंपनी आता १०० हून अधिक कंपन्यांसाठी एलसीडी टीव्ही, एलईडी टीव्ही आणि हाय-एंड टीव्ही तयार करते. कंपनी दर महिन्याला १ लाखाहून अधिक टीव्ही बनवते. २०२२-२३ मध्ये त्याच्या कंपनीचा महसूल ६०० कोटी रुपये होता. सागरला आता वॉशिंग मशिन, स्पीकर आणि स्मार्ट घड्याळे (Business Success Story) यांसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या निर्मितीमध्येही पाऊल टाकायचे आहे. एका रिपोर्टनुसार, सागरने नोएडामध्ये १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करायची ठरवलं आहे. जमीन खरेदी, प्रोजेक्ट उभारण्यासाठी लागणारी उपकरणे आणि इतर सुविधा खरेदी करण्यासाठी कंपनी प्रथम ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सध्या त्यांचा सोनीपतमध्ये कारखाना आहे आणि त्यात १००० हून अधिक कर्मचारी काम करत आहेत. कंपनी येत्या ३ वर्षात IPO देखील आणू शकते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Learn Foreign Language : परदेशी भाषा शिकाल तर आहेत फायदेच फायदे; ‘इथे’ मिळेल नोकरीचा चान्स

Learn Foreign Language

करिअरनामा ऑनलाईन । फक्त नोकरी मिळवली म्हणजे (Learn Foreign Language) करिअरमध्ये आपण यशस्वी झालो असे होत नाही. नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाले तर पूर्वीसारखे आता राहिले नाही. पदवी घेतली आणि नोकरी मिळाली असं आताच्या जमान्यात होत नाही.आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी नव्याने शिकण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे यशस्वी करिअर घडवण्यासाठी तुमच्या अंगी विविध कला असणे आवश्यक आहे.

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तुम्हाला विविध परदेशी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. परदेशी भाषांपैकी एखाद्या भाषेचे  ज्ञान तुम्हाला अवगत असेल तर तुम्हाला विदेशात ही नोकरीच्या भरपूर संधी निर्माण होतील.

भाषेचे ज्ञान घेतल्यामुळे बदलतो दृष्टीकोन (Learn Foreign Language)
जर तुम्हाला विविध भाषांचे ज्ञान अवगत असेल तर तुमचा जगाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन तयार होतो. तुम्ही फ्रेंच भाषा शिकता, जर्मनी शिकता की जपानी भाषा शिकता; यावरून त्या त्या देशातील गोष्टी समजून घेणं तुमच्यासाठी सोपं होतं. याबरोबरच कोणत्याही वातावरणाशी तुम्ही स्वत:ला जुळवून घेऊ शकता. भाषेचे ज्ञान असल्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. तुम्ही थेटपणे त्या भाषेत त्या प्रांतातील लोकांशी अगदी सहज संवाद साधू शकता. त्यामुळे तिथे नोकरी करणंही सोपं जातं.

इथे मिळतात नोकरीच्या संधी
जर तुम्हाला परदेशी भाषांचे ज्ञान अवगत असेल तर तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी निर्माण होवू शकतात. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध भाषा अवगत असणाऱ्या लोकांना मागणी असते. विदेशात अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत, इथे नोकरी मिळवताना तुम्हाला भाषेचे ज्ञान अवगत असल्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. भाषा अनुवादक म्हणून ही तुमच्यासाठी करिअरची नवी संधी निर्माण होऊ शकते.

व्यक्तिमत्वाला पडतात पैलू (Learn Foreign Language)
बहुभाषिक असणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळाच बदल आणि एक वेगळीच चमक आपणास दिसून येते. शिवाय, एकापेक्षा अधिक भाषा अवगत असल्यामुळे, नोकरीच्या क्षेत्रात विविध संधी निर्माण होतात. तुमच्या बोलण्याची शैली सुधारण्यास मदत होते. तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Recruitment 2023 : योग शिक्षक होण्याची मोठी संधी!! ‘इथे’ लगेच करा अर्ज; 76 पदांवर होणार भरती

ZP Recruitment 2023 (6)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत (ZP Recruitment 2023) भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून योग प्रशिक्षक पदांच्या एकूण 76 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – जिल्हा परिषद, सातारा
भरले जाणारे पद – योग प्रशिक्षक
पद संख्या – 76 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (ZP Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (PDF पहा)
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा

असा करा अर्ज – (ZP Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. दिलेल्या मुदती अगोदर अर्ज संबंधित पत्यावर पाठवायचा आहे.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.zpsatara.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DSSSB Recruitment 2023  : दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथे 863 पदांवर भरती सुरु; ताबडतोब करा अर्ज

DSSSB Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB Recruitment 2023) अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून फार्मासिस्ट, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ रेडिओथेरपी तंत्रज्ञ, सब स्टेशन अटेंडंट, सहाय्यक. इलेक्ट्रिक फिल्टर, कनिष्ठ जिल्हा राज्य अधिकारी, ड्राफ्ट्समन, वायरलेस/रेडिओ ऑपरेटर, वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, परिरक्षण पर्यवेक्षक, सहाय्यक मायक्रोफोटोग्राफ, झेरॉक्स ऑपरेटर, कनिष्ठ ग्रंथपाल, पुस्तक बाइंडर, ग्रंथालय परिचर, परिचारिका श्रेणी – अ, विशेष शिक्षण शिक्षक, आर्किटेक्चरल असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, सहाय्यक आहारतज्ज्ञ, रेडिओग्राफर, कॉम्प्युटर लॅब/आयटी असिस्टंट, ऑपरेशन थिएटर असिस्टंट, डेंटल हायजिनिस्ट, पशुवैद्यकीय हॉस्पिटलसाठी ओटी असिस्टंट, प्लास्टर असिस्टंट, सहाय्यक सेक्शन ऑफिसर, फोरमन (वर्क्स), प्रयोगशाळा परिचर, क्लोरीनेटर ऑपरेटर, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक माहिती अधिकारी, व्यवस्थापक, कार्य सहाय्यक (उद्यान), ड्राफ्ट्समन Gr.III, लिब्रानन, सहाय्यक अधीक्षक, मॅट्रॉन, वार्डर, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, विद्युत पर्यवेक्षक पदांच्या तब्बल 863 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ
पद संख्या – 863 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2023

भरतीचा तपशील – (DSSSB Recruitment 2023)

पदाचे नाव पद संख्या 
फार्मासिस्ट, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ रेडिओथेरपी तंत्रज्ञ, सब स्टेशन अटेंडंट, सहाय्यक. इलेक्ट्रिक फिल्टर, कनिष्ठ जिल्हा राज्य अधिकारी, ड्राफ्ट्समन, वायरलेस/रेडिओ ऑपरेटर, वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, परिरक्षण पर्यवेक्षक, सहाय्यक मायक्रोफोटोग्राफ, झेरॉक्स ऑपरेटर, कनिष्ठ ग्रंथपाल, पुस्तक बाइंडर, ग्रंथालय परिचर, परिचारिका श्रेणी – अ, विशेष शिक्षण शिक्षक, आर्किटेक्चरल असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, सहाय्यक आहारतज्ज्ञ, रेडिओग्राफर, कॉम्प्युटर लॅब/आयटी असिस्टंट, ऑपरेशन थिएटर असिस्टंट, डेंटल हायजिनिस्ट, पशुवैद्यकीय हॉस्पिटलसाठी ओटी असिस्टंट, प्लास्टर असिस्टंट, सहाय्यक सेक्शन ऑफिसर, फोरमन (वर्क्स), प्रयोगशाळा परिचर, क्लोरीनेटर ऑपरेटर, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक माहिती अधिकारी, व्यवस्थापक, कार्य सहाय्यक (उद्यान),  ड्राफ्ट्समन Gr.III, लिब्रानन, सहाय्यक अधीक्षक, मॅट्रॉन, वार्डर, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, विद्युत पर्यवेक्षक 863 पदे

 

असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही मार्गाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
3. अर्ज करण्यापुर्वी (DSSSB Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरुन अर्ज करायचा आहे.
5. नोंदणीसाठीच्या सूचना मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://dsssb.delhi.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICMR Recruitment 2023 : पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये नोकरीची संधी; दरमहा 1,12,400 पगार

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे (ICMR Recruitment 2023) अंतर्गत तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ – १  पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे
भरले जाणारे पद – तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ – १
पद संख्या – 80 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

भरतीचा तपशील – (ICMR Recruitment 2023)

पदाचे नांव पद संख्या 
तांत्रिक सहाय्यक 49
तंत्रज्ञ – १ 31

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
तांत्रिक सहाय्यक Level-6 Rs. 35400-112400
तंत्रज्ञ – १ Level-2 Rs. 19900-63200

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (ICMR Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
4. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

जाहिरात पहा –
ICMR Pune
काही महत्वाच्या लिंक्स – 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – niv.icmr.org.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MahaTransco Recruitment 2023 : महापारेषणची 2541 पदांवर मेगाभरती!! ऑनलाईन करा अर्ज

MahaTransco Recruitment 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco Recruitment 2023) अंतर्गत मोठी भरती होणार आहे. विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 पदांच्या एकूण 2541 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी
भरले जाणारे पद – विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2
पद संख्या – 2541 पदे
वय मर्यादा – १८ वर्षे ते ३८ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2023

भरतीचा तपशील – (MahaTransco Recruitment 2023)

पद पद संख्या 
विद्युत सहाय्यक (पारेषण) 1903 पदे
वरिष्ठ तंत्रज्ञ 124 पदे
तंत्रज्ञ 1 200 पदे
तंत्रज्ञ 2 314 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यक (पारेषण) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान | केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
वरिष्ठ तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक
तंत्रज्ञ 1 शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक
तंत्रज्ञ 2 शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
विद्युत सहाय्यक (पारेषण) अ) प्रथम वर्ष – एकत्रित मानधन रुपये १५०००/- दरमहा
ब) द्वितीय वर्ष – एकत्रित मानधन रुपये १६०००/- दरमहा
क) तृतीय वर्ष एकत्रित मानधन रुपये १७०००/- दरमहा
वरिष्ठ तंत्रज्ञ रु. ३०८१०-१०६०-३६११०-११६०- ४७७१०-१२६५-८८१९०
तंत्रज्ञ 1 रु. २९९३५-९५५-३४७१०-१०६०- ४५३१०-११६०-८२४३०
तंत्रज्ञ 2 रु.२९०३५-७१०- ३२५८५-९५५-४२१३५- १०६०-७२८७५

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (MahaTransco Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1 
PDF 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIIMS Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी मोठी बातमी!! अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत तब्बल 3036 पदांवर भरती सुरु

AIIMS Recruitment 2023 (10)

करिअरनामा ऑनलाईन । ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल (AIIMS Recruitment 2023) सायन्सेस अंतर्गत शिक्षकेतर गट-ब आणि गट-क पदांच्या तब्बल 3036 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही उत्तम संधी निर्माण झाली आहे.

संस्था – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS)
भरले जाणारे पद – शिक्षकेतर गट-ब आणि क
पद संख्या – 3036 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 डिसेंबर 2023
वय मर्यादा – 21-30 वर्षे

अर्ज फी – (AIIMS Recruitment 2023)
1. General/OBC Candidates – Rs.3000/-
2. SC/ST Candidates/EWS – Rs.2400/-
3. Persons with Disabilities – Exempted
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Degree from recognized University or its equivalent
Proficiency in Computers

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज खाली दिलेल्या लिंक (AIIMS Recruitment 2023) वरून सादर करायचा आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.aiimsexams.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : वय16 वर्षं… कर्ज 12 हजार; व्हायचं होतं डॉक्टर पण झाले जगविख्यात सोन्याचे व्यापारी 

Career Success Story of Rajesh Mehta

करिअरनामा ऑनलाईन । आज आपण ‘राजेश एक्सपोर्ट्सचे’ मालक (Career Success Story) राजेश मेहता यांच्याबद्दल बोलत आहोत. आम्ही तुम्हाला सोन्याच्या अशा एका व्यापाऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्याने केवळ 12 हजार रुपयांचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांच्या कंपनीची एकूण संपत्ती 2.5 लाख कोटी रुपये आहे.  मूळचे गुजरातचे असलेले राजेश मेहता यांचे वडील जसवंतरी मेहता कर्नाटकात दागिन्यांच्या व्यवसायासाठी आले होते. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी राजेश यांनी आपल्या वडिलांबरोबर काम करायला सुरुवात केली आणि आज केवळ देशातच नव्हे तर जगात एक यशस्वी सोने निर्यातदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

डॉक्टर होण्याचं होतं स्वप्न
राजेश मेहता यांनी बंगळुरू येथील सेंट जोसेफ शाळेत शिक्षण घेतले. ते अभ्यासात हुशार होते. त्यांना डॉक्टर व्हायचे होते, पण नंतर ते वडिलांच्या दागिन्यांच्या व्यवसायात रुजू झाले. त्यांनी आणि त्यांचा भाऊ प्रशांत यांनी वडिलांचा व्यवसाय वाढवण्याचा संकल्प केला. राजेश मेहता यांनी त्यांचा भाऊ बिपीन यांच्याकडून चांदीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी १२ हजार रुपयांचे कर्ज घेतले. यादरम्यान राजेश मेहता चेन्नईहून दागिने आणून राजकोटमध्ये विकायचे. यानंतर त्यांनी गुजरातमधील घाऊक विक्रेत्यांना दागिने विकण्यास सुरुवात केली.

वडिलांसोबत 16 व्या वर्षी सुरु केलं काम (Career Success Story)
वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी राजेश यांनी आपल्या वडिलांबरोबर काम करायला सुरुवात केली आणि आज देशात, जगात एक यशस्वी सोने निर्यातदार म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. ते राजेश एक्सपोर्ट्सचे मालक आणि कार्यकारी अध्यक्ष आहेत. केवळ आपल्या देशातच नव्हेतर इतर देशांमध्ये त्यांनी ओळख निर्माण केली आहे.

गॅरेजमध्ये सुरु केले सोन्याचे उत्पादन युनिट
व्यवसायातील यशानंतर राजेश मेहता यांनी आपला विस्तार बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद येथे वाढवला. १९८९ मध्ये त्यांनी सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवसायात पाऊल टाकले आणि बंगळुरूमध्ये त्यांच्या गॅरेजमध्ये सोन्याचे उत्पादन युनिट सुरू केले. त्यांनी ब्रिटन, दुबई, ओमान, कुवेत, अमेरिका आणि युरोपमध्ये सोने निर्यात करण्यास सुरुवात केली. १९९२ पर्यंत त्यांचा व्यवसाय दरवर्षी २ कोटी रुपयांपर्यंत वाढला.

स्वित्झर्लंड आणि भारतात आहेत रिफायनरी
१९९८ पर्यंत व्यवसायाने वेग पकडला आणि वार्षिक १२०० कोटी रुपयांची उलाढाल सुरू झाली. पुढे त्यांनी शुभ ज्वेलर्स नावाचे दुकान उघडले. कंपनीची आता कर्नाटकात अशी अनेक (Career Success Story) दुकाने आहेत. कंपनीने जुलै २०१५ मध्ये स्विस रिफायनरी वाल्कम्बी ताब्यात घेतली. आता त्यांच्याकडे स्वित्झर्लंड आणि भारतातही रिफायनरी आहेत. ही जगातील सर्वात मोठी सोने निर्यात करणारी कंपनी आहे. २०२१ मध्ये कंपनीचा महसूल २.५८ लाख कोटी रुपये होता. कंपनी भारत, स्वित्झर्लंड आणि दुबई येथून सोन्याचे दागिने आणि सोन्याची उत्पादने निर्यात करते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IT Jobs : नोकऱ्यांचा धमाका!! 50 हजारापेक्षा जास्त लोकांच्या हाताला मिळणार काम; ‘इथे’ होतेय जम्बो भरती

IT Jobs (1)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर (IT Jobs) तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. IT हार्डवेअर क्षेत्रात लवकरच मोठी भरती होणार आहे. यामाध्यमातून येत्या काळात 50,000 लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. आयटी क्षेत्रातील नामांकित डेल, एचपी, लेनोवो, फॉक्सकॉन अशा 27 कंपन्यांना सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेसाठी मंजुरी मिळाली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. PLI IT हार्डवेअर योजनेद्वारे एकूण 27 कंपन्यांना मंजुरी मिळाली असल्याचे ते म्हणाले.

27 कंपन्या सुरु करणार उत्पादन
बिझनेस टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अश्विनी वैष्णव यांनी (IT Jobs) सांगितले आहे की, पीएलआय योजनेंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतर जवळपास 95 टक्के कंपन्या पहिल्या दिवसापासून उत्पादन सुरू करणार आहेत. अशा स्थितीत 23 कंपन्या हे काम लवकरात लवकर करतील. उर्वरित चार कंपन्या येत्या 90 दिवसात या योजनेअंतर्गत उत्पादन सुरु करतील.
50हजारहून अधिक नोकऱ्या निर्माण होणार (IT Jobs)
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार 27 कंपन्या आयटी हार्डवेअर योजनेद्वारे 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक आयटी हार्डवेअरमध्ये करतील. या गुंतवणुकीतून एकूण 50 हजार लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. एकूण 1.50 लाख लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी संगीतेल. आयटी हार्डवेअर योजनेंतर्गत ज्या कंपन्यांना मंजुरी मिळाली आहे, यामध्ये डेल, फॉक्सकॉन, लेनोवो, फ्लेक्सट्रॉनिक्स, पेजेट, सोजो, व्हीव्हीडीएन, सिरमा, भगवती, पेजेट, सोजो, निओलिंक या कंपन्यांचा समावेश आहे.

सरकार 17,000 कोटी रुपये खर्च करणार
देशात आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने उत्पादन-लिंक्ड प्रोत्साहन योजना 2.0 सुरु केली आहे. याद्वारे, सरकार देशात आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याद्वारे या क्षेत्रात नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी 17,000 कोटी रुपये खर्च करणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com