IT Jobs : नोकऱ्यांचा धमाका!! 50 हजारापेक्षा जास्त लोकांच्या हाताला मिळणार काम; ‘इथे’ होतेय जम्बो भरती

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर (IT Jobs) तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. IT हार्डवेअर क्षेत्रात लवकरच मोठी भरती होणार आहे. यामाध्यमातून येत्या काळात 50,000 लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. आयटी क्षेत्रातील नामांकित डेल, एचपी, लेनोवो, फॉक्सकॉन अशा 27 कंपन्यांना सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेसाठी मंजुरी मिळाली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. PLI IT हार्डवेअर योजनेद्वारे एकूण 27 कंपन्यांना मंजुरी मिळाली असल्याचे ते म्हणाले.

27 कंपन्या सुरु करणार उत्पादन
बिझनेस टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अश्विनी वैष्णव यांनी (IT Jobs) सांगितले आहे की, पीएलआय योजनेंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतर जवळपास 95 टक्के कंपन्या पहिल्या दिवसापासून उत्पादन सुरू करणार आहेत. अशा स्थितीत 23 कंपन्या हे काम लवकरात लवकर करतील. उर्वरित चार कंपन्या येत्या 90 दिवसात या योजनेअंतर्गत उत्पादन सुरु करतील.
50हजारहून अधिक नोकऱ्या निर्माण होणार (IT Jobs)
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार 27 कंपन्या आयटी हार्डवेअर योजनेद्वारे 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक आयटी हार्डवेअरमध्ये करतील. या गुंतवणुकीतून एकूण 50 हजार लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. एकूण 1.50 लाख लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी संगीतेल. आयटी हार्डवेअर योजनेंतर्गत ज्या कंपन्यांना मंजुरी मिळाली आहे, यामध्ये डेल, फॉक्सकॉन, लेनोवो, फ्लेक्सट्रॉनिक्स, पेजेट, सोजो, व्हीव्हीडीएन, सिरमा, भगवती, पेजेट, सोजो, निओलिंक या कंपन्यांचा समावेश आहे.

सरकार 17,000 कोटी रुपये खर्च करणार
देशात आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने उत्पादन-लिंक्ड प्रोत्साहन योजना 2.0 सुरु केली आहे. याद्वारे, सरकार देशात आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याद्वारे या क्षेत्रात नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी 17,000 कोटी रुपये खर्च करणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com