Home Blog Page 204

Create Resume : प्रभावी Resume बनविण्यासाठी AI करेल मदत; या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा मेसेज

Create Resume

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीसाठी अर्ज करताना (Create Resume) तुमचा रेझ्युमे महत्वाची भूमिका बजावतो. आता प्रभावी रेझ्युमे तयार करण्यासाठी तुमची मदत करणार आहे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्रज्ञान. AI च्या मदतीनं दर्जेदार आणि आकर्षक रेझ्युमे बनवण्यासाठी खास उपक्रम कौशल्य विकास मंत्रालयानं सुरु केला आहे. यामाध्यमातून होतकरु तरुणांना डिजिटल रेझ्युमे बनवून मिळणार आहे. याबाबत राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माहिती दिली आहे.

या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा मेसेज
अनेकांकडे चांगला रेझ्युमे नसल्यामुळं नोकरीच्या शोधात असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सॅपीओ अनालिस्टिक्सच्या सहकार्यातून हा उपक्रम कौशल्य विकास विभागाकडून राबवण्यात येत आहे. युवकांना कृत्रिम बुध्दीमत्तेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे रिझ्युमे तयार करुन देण्यात येणार आहेत. यासाठी 86558 26684 हा क्रमांक देण्यात आला आहे. मंत्रालयानं या व्हॉट्सअप क्रमांकावर Hi असा मेसेज पाठवण्याचं आवाहन उमेदवारांना केलं आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून एक लाखाहून अधिक (Create Resume) युवकांना ही सेवा मिळणार आहे. या रेझ्युमेच्या सहाय्याने त्यांना चांगल्या नोकरीची संधी मिळू शकेल आणि आर्थिक विकासामध्ये त्यांचा महत्वपूर्ण हात भार लागणार आहे; असा विश्वास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे. या नव्या उपक्रमामुळे भरती प्रक्रीया सुलभ होणार असून त्याचा फायदा उमेदवार आणि कंपन्या या दोघांनाही होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BMC Recruitment 2023 : आहारतज्ञ, समुपदेशक, स्टाफ नर्स पदावर भरती; बृहन्मुंबई महापालिकेने मागवले अर्ज 

BMC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment 2023) अंतर्गत भरती निघाली आहे. आहारतज्ञ आणि समुपदेशक, स्टाफ नर्स पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
भरली जाणारी पदे –
1. आहारतज्ञ – 1 पद
2. समुपदेशक, स्टाफ नर्स – 1 पद
पद संख्या – 02 पदे
नोकरी ठिकाण – मुंबई
वय मर्यादा –
आहारतज्ञ आणि समुपदेशक – १८ ते ३८ वर्षे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता (पदानुसार) –
1. आहारतज्ञ आणि समुपदेशक – लो. टी. म. स. रुग्णालयाच्या आवक जावक विभागात
2. स्टाफ नर्स – बालरोग, खोली क्रमांक १२९, पहिला मजला कॉलेज बिल्डींग, एलटीएमएम कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, सायन, मुंबई

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BMC Recruitment 2023)
1. आहारतज्ञ आणि समुपदेशक – एम. एस. सी. न्युट्रिशन आणि डायटेटिक्स किंवा पी. जी. डिप्लोमा न्युट्रिशन आणि डायटेटिक्स
2. स्टाफ नर्स – GNM
मिळणारे वेतन –
1. आहारतज्ञ आणि समुपदेशक – Rs. 25,000/- दरमहा
2. स्टाफ नर्स – Rs. 20,000/- दरमहा

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे (BMC Recruitment 2023) अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CRIS Recruitment 2023 : गोल्डन चान्स!! सॉफ्टवेअर इंजिनियर्ससाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिममध्ये नोकरीची संधी

CRIS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे माहिती प्रणाली केंद्र अंतर्गत (CRIS Recruitment 2023) सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 21 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – रेल्वे माहिती प्रणाली केंद्र
भरले जाणारे पद – सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता
पद संख्या – 18 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 21 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (CRIS Recruitment 2023)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता BE/B.Tech in Computer Science & Engineering or Computer Science or Computer Technology or Information Technology or Computer Science & Information Technology or Computer Applications, or MCA or B Sc


असा करा अर्ज –

1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
3. दिलेल्या मुदतीनंतर (CRIS Recruitment 2023) प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अर्ज प्रक्रिया 21 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होईल.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (21 नोव्हेंबर 2023 पासून लिंक सुरु) – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://cris.org.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Air Force Recruitment 2023 : सर्वात मोठी खुषखबर!! इंडियन एअर फोर्समध्ये 316 पदावर भरती; यादिवशी सुरु होणार अर्ज

Air Force Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय हवाई दलात सामील (Air Force Recruitment 2023) होण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दल अंतर्गत हवाई दल सामायिक प्रवेश चाचणी (AFCAT)- (01/2024) करीता एकूण 316 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – भारतीय हवाई दल
भरले जाणारे पद – फ्लाइंग शाखा, ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक), ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल)
पद संख्या – 316 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 01 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2023
वय मर्यादा – 20 ते 26 वर्षे

भरतीचा तपशील – (Air Force Recruitment 2023)

पद पद संख्या 
फ्लाइंग शाखा 38 पदे
ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक) 165 पदे
ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल) 114 पदे

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करू शकतात.
3. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे. (Air Force Recruitment 2023)
4. अर्ज करण्यापूर्वी नोटीफीकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. अर्ज प्रक्रिया 01 डिसेंबर 2023 पासून सुरु होईल.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://afcat.cdac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahagenco Recruitment 2023 : पात्रता फक्त ITI पास; महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रात भरतीची संधी; त्वरा करा

Mahagenco Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती (Mahagenco Recruitment 2023) कंपनी मर्यादित भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 200 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर
भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 200 पदे
वय मर्यादा – 18 ते 43 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार ITI पास असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – (Mahagenco Recruitment 2023)
1. पहिले वर्ष – रुपये 6,000/-
2. दुसरे वर्ष – रुपये 6,500/-

असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
2. उमेदवाराकडे वैयक्तिक ईमेल (Mahagenco Recruitment 2023) आयडी नसल्यास, अर्ज करण्यापूर्वी त्याने/तिने नवीन ईमेल आयडी तयार करावा.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SAIL Recruitment 2023 : ITI/Diploma धारकांसाठी SAIL मध्ये भरती; सरकारी नोकरीची संधी सोडू नका

SAIL Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन ।  सरकारी नोकरीच्या शोधात (SAIL Recruitment 2023) असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 110 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.
पद संख्या – 110 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – राउरकेला

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) ऑपरेटर-कम-टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर) – 20 पदे
शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी उत्तीर्ण तसेच मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/केमिकल/पॉवर प्लांट/प्रोडक्शन/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा, प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
2) ऑपरेटर-कम-टेक्निशियन (इलेक्ट्रिकल सुपरवाइजर) – 10 पदे
शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी उत्तीर्ण तसेच 50% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, इलेक्ट्रिकल सुपरवाइजरी (माइनिंग) प्रमाणपत्र असणे आवश्यक.
3) अटेंडंट-कम-टेक्निशियन ट्रेनी – 80 पदे
शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी उत्तीर्ण, ITI (इलेक्ट्रिशियन/फिटर/इलेक्ट्रॉनिक्स/मशीनिस्ट/डिझेल मेकॅनिक/COPA/IT) असावा.

वय मर्यादा –
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असावे.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – (SAIL Recruitment 2023)
1. पद क्र.1 & 2 –
General/OBC/EWS: ₹500/-
[SC/ST/PWD/ExSM: ₹150/-]
2. पद क्र.3 –
General/OBC/EWS: ₹300/-
[SC/ST/PWD/ExSM: ₹100/-]

मिळणारे वेतन –
1. ऑपरेटर-कम-टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर) – 26,600/- ते 38,920/- रुपये दरमहा
2. ऑपरेटर-कम-टेक्निशियन (इलेक्ट्रिकल सुपरवाइजर) – 12,900/- ते 15,000/- रुपये दरमहा
3. अटेंडंट-कम-टेक्निशियन ट्रेनी – 25,070/- ते 35,070/- रुपये दरमहा

अशी होईल निवड –
1. पात्र उमेदवारांना नियोजित तारखेला संगणक आधारित चाचणी (CBT) हिंदी/इंग्रजीमध्ये बसणे आवश्यक आहे. CBT मध्ये 2 विभागांमध्ये 100 वस्तुनिष्ठ प्रश्न असतील जसे की 50 तांत्रिक ज्ञानावर आणि 50 सामान्य जागरूकता.
2. CBT चा कालावधी 90 मिनिटे असेल. CBT मधील किमान पात्रता गुण अनारक्षित/EWS पदांसाठी 50 टक्के गुण आणि SC/ST/OBC (नॉन-क्रिमी लेयर)/PWD पदांसाठी 40 पर्सेंटाइल स्कोअरच्या आधारे निर्धारित केले जातील. पात्रता गुण प्रत्येक पोस्ट/विषयासाठी स्वतंत्रपणे मोजले जातील.
3. वरील पदांसाठी CBT मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना (SAIL Recruitment 2023) गुणवत्तेच्या क्रमाने कौशल्य चाचणी/व्यापार चाचणीसाठी, प्रत्येक पोस्ट/शिस्त/व्यापारासाठी 1:3 च्या गुणोत्तराने निवडले जाईल. असे आलेले कट-ऑफ गुण एकापेक्षा जास्त उमेदवारांनी प्राप्त केल्यास, त्या सर्वांना कौशल्य चाचणी/व्यापार चाचणीसाठी बोलावले जाईल.
4. कौशल्य चाचणी/व्यापार चाचणी ही केवळ पात्रता स्वरूपाची असेल. अंतिम निवडीसाठी, CBT च्या गुणांचे वजन 100% असेल. आरक्षणाचे निकष लक्षात घेऊन, CBT मध्ये जास्त गुण असलेल्या उमेदवाराला ऑफर लेटर जारी केले जाईल. कट-ऑफ गुणांमध्ये बरोबरी असल्यास, पात्रता पात्रतेमध्ये जास्त गुण असलेल्या उमेदवाराची निवड केली जाईल.
5. उमेदवारांना CBT/कौशल्य चाचणी/ट्रेड टेस्टसाठी कॉल लेटर/प्रवेशपत्र, एक सरकार मान्यताप्राप्त फोटो ओळख पुरावा आणि कार्यक्रमस्थळी बायोमेट्रिक प्रमाणीकरण केल्यानंतर परवानगी दिली जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.sail.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RCFL Recruitment 2023  : RCFL मध्ये सरकारी नोकरी!! ‘या’ पदांवर भरतीसाठी आजच करा अर्ज

RCFL Recruitment 2023 (8)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCFL Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत मुंबई येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 25 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई
पद संख्या – 25 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (RCFL Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 डिसेंबर 2023
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (साहित्य)- 23 पदे
शैक्षणिक पात्रता – बी.ई./बी.टेक. अभियांत्रिकी पदवीधर
2) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (कायदेशीर) – 02 पदे
शैक्षणिक पात्रता – 3 वर्षे पदवी सह कायद्यातील नियमित आणि पूर्ण-वेळ पदवी

वय मर्यादा – (RCFL Recruitment 2023)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी 27 वर्षापर्यंत असावे
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – 100/- रुपये
[SC/ST/PwBD/ExSM/महिला – शुल्क नाही
मिळणारे वेतन – 30,000/- ते 81,900/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : आधी शिक्षक… नंतर पत्रकार; जिद्दीला पेटली आणि IPS झाली; कोण आहे ही जांबाज ऑफिसर?

Career Success Story of IPS Priti Chandra

करिअरनामा ऑनलाईन । भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (Career Success Story) यांनी दिलेल्या शिकवणीनुसार, ‘स्वप्न अशी बघा, जी तुम्हाला झोपू देणार नाहीत.’ प्रिती चंद्रा यांनी ही शिकवण सार्थ करुन दाखवली आहे. प्रिती चंद्रा या पत्रकार होत्या. पत्रकारिता करत असताना त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचं मनाशी ठरवलं. आयपीएस अधिकारी होऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न रात्री झोपेत पाहिलेले स्वप्न नव्हते. तर उघड्या डोळ्यांनी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची वाटचाल सुरु होती. प्रिती चंद्रा यांचा हा प्रवास म्हणजे जिद्दीचे जिवंत उदाहरण आहे.

रोज करावा लागत होता नव्या आव्हांनाचा सामना
प्रिती या आधी शिक्षिका आणि नंतर पत्रकार म्हणून काम करत होत्या. पत्रकारिता करत असताना रोज नव्या आव्हानांचा सामना त्यांना करावा लागत होता. या जोडीला रोजच्या आयुष्यातील संघर्षही होताच, पण त्यांची जिद्द कमी होत नव्हती. त्यांना  IPS अधिकारी व्हायचं होतं. खूप मेहनत घेवून त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण केले. हे स्वप्न जागेपणी दृश्यनिश्चयाने पाहिलेले स्वप्न होते.

परीक्षा पास होणं सोपं नव्हतं (Career Success Story)
UPSCची परीक्षा देणं काही सहज सोपं नाही. अहोरात्र घेतलेली मेहनत, अभ्यास, स्मार्ट स्टडी, परीक्षा देताना येणाऱ्या आव्हानांवर मात या सर्व गोष्टी पार केल्यानंतर UPSC परीक्षा पास होता येते. प्रिती यांना या सर्वांची कल्पना होती. पत्रकार म्हणून कार्यरत असतानाची आव्हाने, घरची सामान्य परिस्थिती आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणी या सर्वावर त्यांनी मात केली. त्यांच्याकडे परिस्थितीला जुळवून घेण्याची ताकद आणि चिकाटी होती.

प्रिती चंद्रा यांची उल्लेखनीय कामगिरी पाहूया…
1. प्रिती चंद्रा या मूळ राजस्थानच्या कुंदन गावातील आहेत. त्यांचा जन्म १९७९ साली झाला. घरची परिस्थिती बेताचीच होती. मुलींना शिक्षण देणारा समाज आसपास नव्हता. त्यांचे शालेय शिक्षण सरकारी शाळेत झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण जयपूरच्या महाराणी कॉलेजमध्ये झाले. प्रिती चंद्रा यांनी एम.ए, एमफिलपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आधी शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले, नंतर त्या पत्रकार म्हणून काम करत होत्या.
2. प्रिती यांच्या घरचे शिक्षित नव्हते. त्यांच्या आईचे शिक्षणही कमीच झाले होते. तरीही त्यांनी आपल्या मुलीला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.
3. उच्च शिक्षित प्रिती यांचा विवाह वरिष्ठ पोलीस अधिकारी विकास पाठक यांच्याशी झाला.

4. पत्रकार म्हणून काम करत असताना त्यांनी UPSC परीक्षा देण्याचे ठरवले. या परिक्षेत त्यांनी संपूर्ण देशातून 255 वा क्रमांक मिळवला. यूपीएससीसाठी त्यांनी कोणतीही शिकवणी लावली नाही. स्वतः अभ्यास करुन त्यांनी या परिक्षेत यश मिळवले आहे. हे यश मिळवल्यानंतर त्यांनी अनेक उच्च पदे भूषविली आहेत. त्यांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. यामुळे त्यांना ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखले जाते.
5. कर्तव्यदक्षता, प्रामाणिकता आणि सचोटीने काम करण्याची वृत्ती ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी विविध पदे भूषवली आहेत. एएसपी (ASP) म्हणून अलवरमध्ये, एसपी (SP) म्हणून कोटा येथे तर बुंदीमध्ये एसपी म्हणून त्या कार्यरत होत्या. बुंदी येथे लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीचा त्यांनी पर्दाफाश (Career Success Story) केला. हरिया गुर्जर आणि राम लखना या कुख्यात गुन्हेगारांना त्यांच्या नेतृत्वाखाली शोधण्यात यश आले. या घटनेनंतर त्यांना ‘लेडी सिंघम’ म्हटले जाऊ लागले.

6. करौली येथे त्या एसपी म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गुन्हेगारांना पकडले आहे. करौली शहर गुंड आणि जुगारी लोकांसाठीच प्रसिद्ध होते. हे गुंड चोऱ्या करून, अपहरण करून लपण्यासाठी अन्यत्र जात. प्रिती यांनी या सर्वांवर लक्ष ठेवले. कडक योजना आखून त्यांनी अनेक जुगारी आणि गुन्हेगारांना तुरुंगाची हवा खायला लावली.
7. परिस्थितीपुढे हतबल होणारी (Career Success Story) आजची पिढी आहे. त्यांच्यासाठी ‘लेडी सिंघम’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या IPS प्रिती चंद्रा यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे. घरची बिकट परिस्थिती, दैनंदिन आयुष्यातील आव्हाने या सर्वांवर मात करत, कोणत्याही शिकवणीचा आधार न घेता त्यांनी UPSC परिक्षेत नशीब आजमावले आहे. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. तुमहयातील जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्ती तुम्हाला नक्कीच यशाच्या शिखरावर पोहचवते; हे यातून सिद्ध होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Chandrakant Patil : ओबीसी मुलींची 100 टक्के फी शासन भरणार; आर्थिक मागास प्रवर्गाच्या मुलींनाही होणार फायदा

Chandrakant Patil

करिअरनामा ऑनलाईन । ओबीसी तसेच आर्थिक मागास (Chandrakant Patil) प्रवर्गातील विद्यार्थीनींसाठी महत्वाची बातमी आहे. आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग तसेच आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाचे 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती सरकारमार्फत करण्याचा निर्णय शुक्रवारी मराठा आरक्षण व इतर सोयीसुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे; अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्याचप्रमाणे मागील तीन वर्षांत प्रलंबित राहिलेल्या शुल्क प्रतिपूर्तीची 100 टक्के परतफेड करण्यासाठी येत्या अधिवेशनात तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण व इतर सोयी सुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तसेच सारथी महामंडळाची आढावा बैठक पार पडली.

मराठा समाजाला स्वत:चे स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी सव्‍‌र्हे करण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले (निवृत्त) उच्च न्यायालय अलाहाबाद, न्यायमूर्ती मारोती गायकवाड (निवृत्त), न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) या तीन सदस्यीय समितीचे कामकाज सुरु झाले असून त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

ही समिती टाटा सामाजिक विज्ञान संस्था, गोखले शैक्षणिक (Chandrakant Patil) संस्था आणि ऑल इंडिया पॉप्युलेशन सायन्स या तीन नामांकित संस्थाच्या माध्यामातून सर्वेक्षणाचे काम करणार आहे. तसेच आतापर्यंत सुरू असलेल्या नोंदीच्या कामात मराठवाडय़ात 22 हजार कुणबी नोंदी नव्याने आढळल्या असल्याचे पाटील यांनी सांगितले. मराठा समाजातील लाभार्थींना उद्योग व्यवसायासाठीच्या कर्जाचा व्याज परतावा करण्याची सुविधा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांच्या जिल्हास्तरीय यंत्रणेच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात सुरू आहे. सर्व जिल्ह्यात महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करावे, त्याचसोबत महामंडळाच्या विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून मराठा समाजातील रोजगार इच्छुकांसाठी रोजगार नोंदणी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना मंत्री पाटील यांनी संबंधितांना दिल्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC Net Exam Time Table : UGC NET चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ आहेत परीक्षेच्या तारखा

UGC Net Exam Time Table

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (UGC Net Exam Time Table) यूजीसी राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दि. 6 ते 14 डिसेंबर 2023 या कालावधीत ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. परीक्षेसाठी निश्चित केलेल्या शहरांची यादी परीक्षेच्या 10 दिवस आधी जाहीर केली जाणार आहे. एनटीए (NTA) च्या अधिकृत संकेतस्थळावर याविषयी माहिती उपलब्ध होणार आहे. यापूर्वी जून 2023 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.
NTA कडून परीक्षेसाठीचे केंद्र निश्चित केलेल्या शहरांची (UGC Net Exam Time Table) माहिती परीक्षेच्या दहा दिवस आधी प्रसिध्द केली जाणार आहे. www.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली जाणार आहे. उमेदवारांनी परीक्षेविषयी अद्ययावत माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी; असे आवाहन NTAकडून करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार दि. 6 डिसेंबर 2023 रोजी दोन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे.

अशी होणार परीक्षा (UGC Net Exam Time Table)
पहिल्या सत्रात इंग्रजी, हिंदू स्टडीज, कोकणी व इतर काही परिकीय भाषांची परीक्षा असेल. तर दुसऱ्या सत्रात इतिहास, मणिपुरी, जर्मन, सिंधी या विषयांच्या परीक्षा असतील. वाणिज्य विषयाची परीक्षा सात डिसेंबरला पहिल्या सत्रात तर शारीरिक शिक्षण, भारतीय संस्कृती, संगीत, फ्रेंच, संगणकशास्त्र आदी विषयांच्या परीक्षा दुसऱ्या सत्रात नियोजित केल्या आहेत. अशाचप्रकारे दररोज दोन सत्रांमध्ये विविध विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com