Home Blog Page 205

ITPO Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी!! वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ITPO अंतर्गत जाहीर केली भरती

ITPO Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने (ITPO Recruitment 2023) तरुण व्यावसायिकांसाठी नोकरीची संधी निर्माण केली आहे.  इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) अंतर्गत ‘यंग प्रोफेशनल्स’च्या पदांसाठी रिक्त पदावर भरती जाहीर झाली आहे. यासाठी आयटीपीओने अधिसूचनाही जारी केली आहे. या भरतीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

संस्था – इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO)
भरले जाणारे पद – यंग प्रोफेशनल्स
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
19 नोव्हेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (ITPO Recruitment 2023)
1. सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / IT / कॉम्प्युटर सायन्स) क्षेत्रातील B.E. / B.Tech, 70 टक्के किंवा त्याहून अधिक गुणांसह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या भरतीसाठी पात्र असतील.
2. मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून किमान 60 % गुणांसह किंवा समतुल्य ग्रेड किंवा दोन वर्षांची पदव्युत्तर पात्रता सरकार / राज्य सरकार / CPSE / स्वायत्त संस्था / विद्यापीठातून दोन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा / व्यवस्थापनातील पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम / एमबीए / अनुभव असणे आवश्यक आहे.
3. संशोधन संस्थेत काम करण्याचा अनुभव असावा

मिळणारे वेतन – दरमहा 60,000/- रुपये
वय मर्यादा – उमेदवारचे वय 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
असा करा अर्ज –
1. तुम्ही या पदांसाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज करू शकता.
2. तुम्ही अर्जाची PDF फाइल आवश्यक (ITPO Recruitment 2023) कागदपत्रांच्या डिजिटल फाइल्ससह [email protected] वर ईमेलद्वारे दि. 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज मेल करणे आवश्यक आहे.
3. मेल करताना Mail Subject मध्ये “ITPO मध्ये तरुण व्यावसायिकांसाठी अर्ज” लिहिणे अनिवार्य असेल.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.indiatradefair.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SBI Recruitment 2023 : महाभरती!! या संधीचं सोनं करा… स्टेट बँक ऑफ इंडियाची क्लर्क पदावर भरती जाहीर

SBI Recruitment 2023 (11)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (SBI Recruitment 2023) आणि बँकेत लिपिक पदावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ही महत्वाची अपडेट आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदांच्या तब्बल 8773 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – लिपिक (कनिष्ठ सहकारी)
पद संख्या – 8773 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 17 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 डिसेंबर 2023

वय मर्यादा – (SBI Recruitment 2023)
1. SC / ST – ३३ वर्षे
2. ओबीसी – ३१ वर्षे
3. अपंग व्यक्ती (सामान्य) – ३८ वर्षे
4. अपंग व्यक्ती (SC/ST) – ४३ वर्षे
5. अपंग व्यक्ती (OBC) – ४१ वर्षे
अर्ज फी –
1. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस : रु. ७५०
2. ST/SC/PWD : —

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. Candidate must be a graduate of a recognized university in any discipline
मिळणारे वेतन – Rs. 26,000 – to Rs. 29,000 दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील (SBI Recruitment 2023) दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SEEPZ Recruitment 2023 : मुंबईमध्ये सरकारी नोकरीची संधी; SEEPZ अंतर्गत ‘ही’ पदे रिक्त

SEEPZ Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई अंतर्गत (SEEPZ Recruitment 2023) रिक्त पदे भरायची आहेत. या माध्यमातून सीमाशुल्क अधीक्षक, प्रतिबंधक अधिकारी (सीमाशुल्क) पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई
भरले जाणारे पद – सीमाशुल्क अधीक्षक, प्रतिबंधक अधिकारी (सीमाशुल्क)
पद संख्या – 08 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विकास आयुक्त, SEEPZ विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, SEEPZ सेवा केंद्र इमारत, अंधेरी (E), मुंबई-४०००९६
आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरीचे ठिकाण – मुंबई

भरतीचा तपशील – (SEEPZ Recruitment 2023)

पद पद संख्या 
सीमाशुल्क अधीक्षक 01
प्रतिबंधक अधिकारी (सीमाशुल्क) 07

मिळणारे वेतन –

पद वेतन
सीमाशुल्क अधीक्षक Grade Pay Rs. 4800/- equivalent to Level 8 of the Pay Matrix under 7th CPC
प्रतिबंधक अधिकारी (सीमाशुल्क) (Rs.9300-34800/-) Grade Pay Rs. 4600/- equivalent to Level 7 of the Pay Matrix under 7th CPC.

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी (SEEPZ Recruitment 2023) आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत.
3. उमेदवारांचे Hard Copy मध्ये सादर केलेले अर्ज विचारात घेतले जातील.
4. ई–मेल किंवा इतर माध्यमातून केलेले Soft Copy मधील अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://seepz.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mumbai Port Trust Recruitment 2023 : इंजिनियर्स आणि डिग्रीधारकांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत निघाली नवीन भरती 

Mumbai Port Trust Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई येथे (Mumbai Port Trust Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सुरक्षा अधिकारी, कल्याण अधिकारी, वरिष्ठ कल्याण अधिकारी, Dy. व्यवस्थापक (कल्याण), हिंदी अधिकारी, हिंदी अनुवादक Gr.-II पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई
भरले जाणारे पद – सुरक्षा अधिकारी, कल्याण अधिकारी, वरिष्ठ कल्याण अधिकारी, Dy. व्यवस्थापक (कल्याण), हिंदी अधिकारी, हिंदी अनुवादक Gr.-II
पद संख्या – 14 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – (Mumbai Port Trust Recruitment 2023)
1. सुरक्षा कार्यालय आणि कल्याण अधिकारी – २१ वर्षांपेक्षा जास्त – ३० वर्षांपेक्षा कमी
2. वरिष्ठ कल्याण अधिकारी आणि हिंदी अधिकारी — २१ वर्षांपेक्षा जास्त – ३५ वर्षांपेक्षा कमी वर्षे
3. उपव्यवस्थापक (कल्याण) – २१ वर्षांपेक्षा जास्त – ४० वर्षांपेक्षा कमी वर्षे
4. हिंदी अनुवादक Gr.-II – २० वर्षांपेक्षा जास्त – ३० वर्षांपेक्षा कमी वर्षे
भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
सुरक्षा अधिकारी 03
कल्याण अधिकारी 01
वरिष्ठ कल्याण अधिकारी 03
Dy. व्यवस्थापक (कल्याण) 01
हिंदी अधिकारी 01
हिंदी अनुवादक Gr.-II 05


आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
सुरक्षा अधिकारी A degree in Engineering/ Technology/ Physics/ Chemistry from a recognised University; or a diploma in Mechanical Engineering/ Electrical Engineering (obtained after passing a course of not less than 3 years duration) awarded by the State Directorate of Technical Education.
कल्याण अधिकारी
  • Degree from a recognised University/ Institution.
  • Degree or diploma in Social Science from a recognised University/ Institution.
  • Knowledge of Marathi.
वरिष्ठ कल्याण अधिकारी
  • Degree from a recognised University/ Institution.
  • Degree or diploma in Social Science from a recognised University/ Institution.
  • 5 years experience as a labour Welfare Officer/Industrial Relations Officer in an Industrial/ Commercial/ Govt.Undertaking.
  •  Knowledge of Marathi.
Dy. व्यवस्थापक (कल्याण)
  • Degree from a recognised University.
  • Degree or diploma in Social Science from a recognised University/ Institution.
  • 9 years experience as a LabourWelfare Officer/Industrial Relations Officer in an Industrial/Commercial Govt. Undertaking.
  • Knowledge of Marathi.
हिंदी अधिकारी Degree of recognised university in Hindi with English as a subject or Degree of a recognized University in English with Hindi as a subject or Degree of a recognised university in any subject with Hindi and English as subjects or Degree of a recognised University in any subject with Hindi medium and English as a subject.
हिंदी अनुवादक Gr.-II Degree of a recognised University with Hindi and English as elective subjects.


मिळणारे वेतन –

पद वेतन
सुरक्षा अधिकारी Rs.50000-160000
कल्याण अधिकारी Rs.50000-160000
वरिष्ठ कल्याण अधिकारी Rs.50000-160000
Dy. व्यवस्थापक (कल्याण) Rs.60000-180000
हिंदी अधिकारी Rs.50000 – 160000
हिंदी अनुवादक Gr.-II Rs.29600-81100

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी (Mumbai Port Trust Recruitment 2023) अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
5. मुदती नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही .
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY 
अधिकृत वेबसाईट – https://www.mumbaiport.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Konkan Railway Recruitment 2023 : कोकण रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी; इंजिनियर्स/डिप्लोमा/पदवीधर यांच्यासाठी भरती सुरु

Konkan Railway Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्या (Konkan Railway Recruitment 2023) तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. कोकण रेल्वे अंतर्गत पदवीधर शिकाऊ/तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ पदांच्या एकूण 190 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – रेल्वे, भारत सरकार
भरले जाणारे पद – पदवीधर शिकाऊ/तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ
पद संख्या – 190 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2023
वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे

अर्ज फी –
1. सामान्य/ओबीसी – ₹100/-
2. [SC/ST/EWS/PWD/अल्पसंख्यक/महिला: फी नाही]
मिळणारे वेतन – दरमहा Rs.8,000/- ते 9,000/-
भरतीचा तपशील – (Konkan Railway Recruitment 2023)

पद पद संख्या 
पदवीधर अप्रेंटिस 80
 टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस 30
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस 80

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटिस Engineering degree in relevant discipline
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस Diploma in Engineering in relevant discipline.
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस BA /B.Com/ B.Sc /BBA /BMS/Journalism & Mass Communication / Bachelor of Business Studies

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
4. एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात.
5. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY 
अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ISRO Recruitment 2023 : 10 वी पास उमेदवारांना ISRO मध्ये मिळणार नोकरी; ‘या’ पदांसाठी भरती सुरु

ISRO Recruitment 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. चालक पदांच्या 18 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Researh Organisation)
भरले जाणारे पद – चालक
पद संख्या – 18 पदे
1. हलके वाहन चालक – 9 पदे
2. अवजड वाहन चालक – 9 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार10 वी पास असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी ISRO VSSC च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
2. त्यानंतर ISRO VSSC Recruitment 2023 या लिंकवर क्लिक करा.
3. याठिकाणी रजिस्ट्रेशन करा. (ISRO Recruitment 2023)
4. पुढे गेल्यानंतर अर्ज भरा आणि आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा.
5. अर्जाची फी भरा.
6. फॉर्म तपासून सबमिट बटणावर क्लिक करा. हा फॉर्म प्रिंट करून घ्या.

ISRO Bharti

काही महत्वाच्या तारखा –

IMPORTANT DATES VSCC Isro Bharti 2023

CRUCIAL DATE OF ELIGIBILITY 27.11.2023, Time: 1700 Hrs
OPENING DATE OF ONLINE APPLICATION 13.11.2023, Time: 1000 Hrs
CLOSING DATE OF SUBMISSION OF ONLINE APPLICATION 27.11.2023, Time: 1700 Hrs
TENTATIVE DATE OF WRITTEN TEST TO BE ANNOUNCED IN VSSC WEBSITE

 

आवश्यक कागदपत्रे –
1. उमेदवाराकडे वैध एलव्हीडी लायसन्स असणं गरजेचं आहे. तसंच तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव देखील आवश्यक आहे.
2. अवजड वाहन चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावाराकडे वैध एचव्हीडी लायसन्स असणं गरजेचं आहे. सोबतच, उमेदवाराकडे वैध सार्वजनिक सेवा परवाना असणं गरजेचं आहे.
3. या दोन्ही पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी/एसएसएलसी/एसएससी/मॅट्रिक उत्तीर्ण असणं गरजेचं आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (ISRO Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY 
अधिकृत वेबसाईट – www.isro.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Teachers Recruitment : संतापजनक!! मराठी शाळांमध्ये इंग्रजी डी. एड्. शिक्षक नेमण्याच्या हलचाली; शिक्षक म्हणतात ‘हा तर अन्याय…’

Teachers Recruitment (3)

करिअरनामा ऑनलाईन । मराठी भाषेतून डी. एड्. चे शिक्षण पूर्ण (Teachers Recruitment) केलेल्या उमेदवारांमधून संताप व्यक्त होत आहे. राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठीशाळांमध्ये इंग्रजी माध्यमातील डी. एड्. (D. Ed.) धारकांना नियुक्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. हा शासन निर्णय रद्द करून माध्यमानुसार विशेष सवलत न देता अभियोग्यता चाचणीतील गुणांनुसार भरती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

30 हजार शिक्षकांची भरती करण्याचा शासनाचा विचार
राज्यभरात 30 हजार शिक्षकांची भरती करण्याचा शासनाचा विचार आहे. याबाबतची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी अभियोग्यता चाचणी (भरती परीक्षा) फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आली. त्यातील शिक्षकांच्या नेमणुका देण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू झाल्या आहेत.

पवित्र पोर्टलद्वारे होणार शिक्षक भरती (Teachers Recruitment)
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया होणार आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह बिगर इंग्रजी माध्यमाच्या सेमी इंग्रजी शाळांवर इंग्रजी माध्यमातून डी. एड्. धारकांना नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणशास्त्र पदविका असणार्‍या मुलांना विशेष सवलत दिली जाणार असल्याचे पत्रकसुद्धा काढण्यात आले. या निर्णयामुळे मराठी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविका घेतलेल्या उमेदवारांवर अन्याय ठरणार आहे.

मराठी माध्यमाचा शिक्षक इंग्रजीमधून शिकवण्यास सक्षम
हे पत्रक 2013 च्या शासन निर्णयाचा संदर्भ घेऊन काढण्यात आले (Teachers Recruitment) असून सुधारित 2018 च्या शासन निर्णयाकडे दुर्लक्ष केले गेले आहे. सुधारीत 2018 च्या GR नुसार इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची आवश्यकता नाही. मराठी माध्यमाचा शिक्षक इंग्रजीमधून शिकवण्यास सक्षम आहे; असे त्यात स्पष्ट नमूद केले आहे. असे असताना इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना ही विशेष सवलत देणे योग्य नाही.

हा तर न्यायालयाचा अवमान
मुळातच इंग्रजी माध्यमाच्या मुलांची संख्या मराठी माध्यमाच्या उमेदवारांच्या तुलनेत कमी आहे. न्यायालयाने नुकतेच इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना दिले जाणारे 20% आरक्षण रद्द ठरवले. तरीही इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणशास्त्र पदविकाप्राप्त शिक्षकांची सेमी इंग्रजी शाळांवर नियुक्ती करणे हा न्यायालयाचा अवमान नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. माध्यम वेगळे आहे म्हणून विशेष सवलत दिली जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवले असतानाही त्याची पायमल्ली होत आहे.

इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना शिक्षक भरतीत (Teachers Recruitment) पूर्ण मराठी, पूर्ण इंग्रजी, सेमी इंग्रजी या सर्वच ठिकाणी संधी उपलब्ध आहे. परंतु मराठी माध्यमाच्या उमेदवारांना फक्त एकाच ठिकाणी संधी आहे. 2017 च्या अभियोग्यता चाचणी परीक्षेचा निकाल पाहता अत्यंत कमी गुण असणारा इंग्रजी माध्यम असणारा उमेदवार शाळेवर नियुक्त झालेला आहे. परंतु तुलनेने जास्त गुण असणारा मराठी माध्यमाचा उमेदवार नोकरीपासून वंचित आहे.
महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर होणार हा अन्याय विचार करायला लावणारा आहे. शासनाने याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे आणि इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना दिली जाणारी विशेष सवलत थांबवून हे पत्रक रद्द करावे; अशी मागणी होत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Business Success Story : घरोघरी पेन विकून शिक्षण पूर्ण केलं; एक आयडिया अन् नशीब पालटलं; आज त्यांची कंपनी करते कोटीत उलाढाल

Business Success Story of Kunwar Sachdeva

करिअरनामा ऑनलाईन । शाळेचा खर्च झेपत नव्हता. शिक्षण (Business Success Story) थांबवायचं नव्हतं म्हणून त्यांनी पेन विकायला सुरुवात केली. एक काळ असा होता ज्यावेळी ते बसमध्ये आणि घरोघरी जावून पेन विकायचे. यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. पण दिवस पालटायला वेळ लागला नाही. एकेकाळी पेन विकणारी व्यक्ती आज हजारो कोटींच्या कंपनीची मालक बनली आहे. भारतातील ‘इन्व्हर्टर मॅन’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

म्हणतात ना, अडचणीशिवाय आयुष्य नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या स्वरूपात अडचणी येत असतात. पण या अडचणीवर मात केली तर निश्चितपणे मोठे यश मिळू शकते. जगात असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या आयुष्यात अडचणी आल्या की धीर सोडतात. त्यांना सर्व काही संपल्यासारखे वाटते. परंतु असे अनेक लोक आहेत जे मोठ्या अडचणींनाही धैर्याने सामोरे जातात आणि यश मिळवतात. त्यापैकीच एक आहेत कुंवर सचदेव…
आम्ही बोलत आहोत Su-Kam कंपनीचे संस्थापक कुंवर सचदेव यांच्याविषयी. त्यांच्या कंपनीत तयार होणाऱ्या सोलर उत्पादनांना केवळ भारतातच नाही तर परदेशातही मोठी मागणी आहे. पण त्यांच्यासाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पेन विकले (Business Success Story)
कुंवर सचदेव यांनी प्राथमिक शाळेपर्यंतचे शिक्षण खासगी शाळेत पूर्ण केले. त्यांनंतर त्यांना आर्थिक अडचणीमुळे पुढील शिक्षण सरकारी शाळेत पूर्ण करावे लागले. कुंवर यांना डॉक्टर व्हायचे होते. पण मेडिकलची प्रवेश परीक्षा पास न झाल्यामुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. त्याकाळी कुंवर यांनी अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी घरोघरी जावून, बसचे धक्के घेत पेन विकले होते.
असा सुरु झाला व्यवसाय 
शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका केबल कम्युनिकेशन कंपनीच्या मार्केटिंग विभागात कुंवर नोकरी करू लागले. देशातील केबल व्यवसाय भविष्यात खूप फायदेशीर ठरू शकेल असे त्यांना वाटले. नोकरी सोडून त्यांनी यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कुंवर सचदेव यांनी Su-Kam कम्युनिकेशन सिस्टीम या नावाने व्यवसायास सुरुवात केली.

या कल्पनेतून सुरु केली इन्व्हर्टर कंपनी
लाईट गेल्यानंतर बॅक अपसाठी घरोघरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी इन्व्हर्टरचा वापर होतोच. कुंवर यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या घरात इन्व्हर्टर होता. जो सतत खराब व्हायचा. एक दिवशी (Business Success Story) दुरुस्तीसाठी त्यांनी तो इन्व्हर्टर स्वतः उघडला तेव्हा त्यांना समजले की ही समस्या खराब क्वालिटीच्या सामानामुळे निर्माण झाली आहे. यानंतर कुंवर यांनी स्वतः इन्व्हर्टर बनवण्याचा विचार केला आणि 1998 मध्ये त्यांनी Su-Kam पॉवर सिस्टम नावाची कंपनी स्थापन केली आणि इन्व्हर्टर बनवण्यास सुरुवात केली.

आज आहेत करोडोच्या कंपनीचे मालक
कुंवर सचदेव आज सुमारे 2300 कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या कंपनीत सोलर प्रोडक्ट तयार केली जातात. ही उत्पादने दिवसातील 10 तास वीज देऊ शकतात. एका अहवालानुसार त्यांची उत्पादने आतापर्यंत भारतातील एक लाखाहून अधिक घरांमध्ये बसवण्यात आली आहेत. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या उत्पादनांना मोठी मागणी आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Group Discussion Tips : ग्रुप डिस्कशनमधून इम्प्रेस करण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो; होईल कौतुकाचा वर्षाव!

Group Discussion Tips

करिअरनामा ऑनलाईन । कोणत्याही प्रकारची भरती परीक्षा असो (Group Discussion Tips) किंवा कॉलेजमधील लेखी परीक्षा, उमेदवारांना लेखी परीक्षेचे इतके टेन्शन नसते जेवढे ते ग्रुप डिस्कशनच्या वेळी घेतात. ग्रुपसमोर आपली मते कशी मांडणार, अशी भीती अनेक उमेदवारांना सतावत असते, तिथे केवळ आपले म्हणणे मांडायचे नसते तर प्रभावीपणे आपले मत मांडायचे असते. ग्रुप डिस्कशनच्या फेरीसाठी अनेक उमेदवार चिंताग्रस्त असतात. उमेदवारांचा हा संभ्रम दूर करण्यासाठी आज आम्ही काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहोत, ग्रुप डिस्कशनवेळी याचे पालन केले तर तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या पद्धतीने सादर करू शकता.

ग्रुप डिस्कशन करताना……

1. परिचयाकडे लक्ष द्या
बहुतेक गट चर्चा परिचयाने सुरु होतात. म्हणून, सर्वप्रथम (Group Discussion Tips) तुम्ही तुमचा प्रभावी परिचय तयार करणे महत्त्वाचे आहे. परिचय खूप मजबूत आणि संतुलित असावा. उदाहरणार्थ, सीव्ही बनवताना अनावश्यक माहिती देणे टाळावे. बरं, त्याच प्रकारे, परिचय तयार करताना ही गोष्ट लक्षात ठेवा. मर्यादित शब्दात स्वतःबद्दल खरी आणि अचूक माहिती द्या.
2. आत्मविश्वास महत्वाचा
आत्मविश्वासाने आपले मत व्यक्त करा. या चर्चेत तुम्ही जे काही बोलत आहात त्यामधून तुमच्यातील आत्मविश्वास दिसला पाहिजे. यावेळी देहबोलीची काळजी घेणंही महत्वाचं आहे. तुम्ही बोलता तेव्हा तुमचे लक्ष दुसरीकडे असेल; असं अजिबात करू नका. यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते.

3. फॅक्टसचा समावेश करा (Group Discussion Tips)
गट चर्चेच्या विषयासाठी चांगली तयारी करा. हे लक्षात ठेवा की तुमच्या चर्चेमध्ये फॅक्टस समाविष्ट असतील. असे केल्याने तुमच्या मुद्द्याला अधिक महत्त्व मिळेल. म्हणून, या विषयावर भरपूर संशोधन करा, कारण शेवटी असे म्हणतात की ज्ञान हे सर्व काही आहे. या विषयावर चांगली आणि अचूक माहिती नसेल तर काही उपयोग होणार नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Online Attendance System : शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती होणार ऑनलाईन; कोणत्या ‘अ‍ॅप’चा होणार वापर?

Online Attendance System

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील तमाम शालेय विद्यार्थी (Online Attendance System) आणि शिक्षकांसाठी महत्वाची बातमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांतील 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदवली जाणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी आदेश दिले आहेत. शिक्षकांना यापुढे मोबाईलवर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविणे अनिवार्य आहे.

कोणत्या तारखेपासून सुरु होणार ऑनलाईन नोंदणी 
दि. 1 डिसेंबरपासून विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंद केली जाणार आहे. स्विफ्ट चॅट या अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाणार आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व  सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे पुण्यात विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदविण्यासाठी ‘अटेंडन्स बॉट’च्या वापराचे प्रशिक्षण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण विभाग, तालुका, केंद्रस्तरावरील शिक्षकांना देण्यात येणार असल्याचे निर्देश परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी दिले आहेत.

‘या’ अ‍ॅपचा होणार वापर (Online Attendance System)
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती त्या त्या वर्ग शिक्षकांनी ‘SwiftChat’ अ‍ॅप डाऊनलोड करून त्यामधील अटेंडन्स बॉटद्वारे ऑनलाइन नोंदविणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ क्रमांक उपलब्ध शिक्षकांना अटेंडन्स बॉटद्वारे उपस्थिती नोंदविता येईल.
उपस्थिती नोंदविताना शिक्षकांनी शाळेचा यू-डायस क्रमांक आणि स्वतःच्या शालार्थ क्रमांकाचा वापर करायचा आहे.  शालार्थ क्रमांकासाठी वापरलेलाच मोबाईल क्रमांक शिक्षकांना वापरावा लागणार आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील. दोन सत्रांत भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी 7 ते दुपारी 12, तर शाळांसाठी 10 ते 5 या वेळेत विद्यार्थी उपस्थितीची नोंद अटेंडन्स बॉटवर करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असल्यास त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकांचा शालार्थ क्रमांक वापरून (Online Attendance System) नोंदवावी, चॅटबॉटद्वारे उपस्थिती नोंदविताना शालेय क्रमांकासाठी अडचणी आल्यास इतर शिक्षकांचा शालेय क्रमांक वापरून ऑनलाइन उपस्थिती नोंदवायची आहे. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना अडचणी येत असल्यास शालेय संकेतस्थळ, सरल संकेतस्थळ, यू-डायस या सर्व संकेतस्थळांतील माहिती अद्ययावत करावी. सर्व संकेतस्थळांवरील अडचणी दूर होतील, असे शिक्षण परिषदेने स्पष्ट केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com