Home Blog Page 206

ANM and GNM Training : सातार्‍यात ANM प्रशिक्षणासाठी निघाली जाहिरात; 12वी पास करु शकतात अर्ज 

ANM and GNM Training

करिअरनामा ऑनलाईन । परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, सातारा (ANM and GNM Training) अंतर्गत ANM पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, सातारा
भरले जाणारे पद – ANM
पद संख्या – 12 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नर्सिंग स्कूल जिल्हा रुग्णालय, सातारा
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा

वय मर्यादा – 17 ते 35 वर्षे
अर्ज फी –
मागासवर्गीयांसाठी – रु. 200/-
खुल्या प्रवर्गासाठी – रु.400/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ANM and GNM Training)
महाराष्ट्र राज्य, उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक (१०+२) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या शास्त्रविषयांसह कमीत कमी ४० टक्के गुणाने पास असणे आवश्यक आहे. मात्र मागासवर्गीय गटासाठी ३५ टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (PDF पहा)

आवश्यक कागदपत्रे –
1. शाळा सोडल्याचा दाखला
2. १० वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
3. १२ वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
4. अर्हताकारी परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण झाले याबाबतचे प्रमाणपत्र ( Attempt Certificate)
5. महाराष्ट्र राज्याचे अदिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
6. भारतीय नागरिकत्वाचा दाखला (Nationality Certificate)
7. जात प्रमाणपत्र
8. जात वैधता
9. नॉन क्रिमीलेअर दाखला
10. आधार कार्ड
11. राखीव गटातील उमेदवारांनी त्यांची आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
12. अपंग व्यक्ती फक्त पायाने अपंग (४० ते ५० टक्के) सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक.
13. अनाथ उमेदवारांसाठी महिला व बालकल्याण विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक.
14. अपूर्ण भरलेले अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
15. प्रत्यक्ष अर्ज घेताना शाळा सोडल्याचा दाखला, १२ वी मार्क लिस्ट व जातीचा दाखला, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचा अधिवास दाखला आवश्यक आहे.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. विहीत नमुन्यातील अर्ज परिचारिका (ANM and GNM Training) प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, सातारा येथे मिळतील
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अपूर्ण अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.
ANM Satara Training Vacancy 2023 details

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.satara.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : 10वी, 12वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ‘या’ बँकेत नोकरीची संधी; थेट द्या मुलाखत 

Job Alert (85)

करिअरनामा ऑनलाईन । दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट (Job Alert) को-ऑप क्रेडिट सोसायटी, अकोला अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा अधिकारी, कायदेतज्ज्ञ, वसुली अधिकारी, वाहनचालक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.

बँक – दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी, अकोला
भरली जाणारी पदे – शाखा अधिकारी, कायदेतज्ज्ञ, वसुली अधिकारी, वाहनचालक
पद संख्या – 04 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – अकोला
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 19 नोव्हेंबर 2023
मुलाखतीची वेळ – सकाळी 10:30 वाजता
मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यालय मनपा संकुल, उमरी रोड, जठारपेठ
भरतीचा तपशील – (Job Alert)

पद पद संख्या 
शाखा अधिकारी 01
कायदेतज्ज्ञ 01
वसुली अधिकारी 01
वाहनचालक 01

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
शाखा अधिकारी Graduate
कायदेतज्ज्ञ LLB/ LLM
वसुली अधिकारी Graduate
वाहनचालक 10th or 12th pass

 

निवड प्रक्रिया –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने संबंधित तारखेला (Job Alert) मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.
4. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
Job Alertअधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Swiggy Jobs : Swiggy मध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी!! फ्रेशर्स उमेदवार करु शकतात अर्ज 

Swiggy Jobs

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला कामाचा कोणताही अनुभव (Swiggy Jobs) नसेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनी Swiggyमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. Swiggy ने खाते व्यवस्थापक पदावर भरती जाहिर केली आहे. ही भरती कंपनीच्या रिटेल विभागामध्ये होणार आहे.

कंपनी – Swiggy, Food Delivery Company
भरले जाणारे पद – खाते व्यवस्थापक (Account Manager)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
कामाचा अनुभव –
1. सल्लागार, ई-कॉमर्स किंवा स्टार्टअपमध्ये १ वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार या जागांसाठी अर्ज करू शकतात.
2. शिवाय, फ्रेशर्स (कोणताही) अनुभव नसलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
इतका मिळणार पगार –
येथे निवड होणार्‍या उमेदवारला वर्षाला ३ लाख ते १०.५ लाख रुपयांच्या दरम्यान पगार मिळू शकतो.

आवश्यक कौशल्ये – (Swiggy Jobs)
1. उमेदवार कामाच्या वेळेच्या बाबतीत लवचिक असावा.
2. उमेदवार स्वतःवर आणि कामावर आत्मविश्वासपूर्ण असावा.
3. उमेदवार कोणत्याही परिस्थितीत काम करण्यास तयार असणे आवश्यक आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण – गुरुग्राम, हरियाणा
जॉब प्रोफाईल –
1. नियुक्त केलेल्या प्रदेशासाठी रेस्टॉरंट ऑनबोर्डिंग आणि टीम वाढवण्याला प्राधान्य देणे.
2. याव्यतिरिक्त, व्यवसाय व्यवस्थापित करण्यासाठी आणि परस्पर वाढण्यासाठी रेस्टॉरंट भागीदारांसाठी सल्लागार म्हणून काम करणे.
3. रेस्टॉरंट खात्यांचा (Swiggy Restaurant Accounts) पोर्टफोलिओ तयार आणि आवश्यकतेनुसार अपडेट करणे.
4. विक्री लक्ष्ये आणि कामगिरीवर आधारित लक्ष्ये वाढवणे.
5. सर्वोत्कृष्ट स्थानिक आणि राष्ट्रीय रेस्टॉरंटसाठी काम करण्याच्या इच्छेसह उमेदवारांना अन्न आणि पेय उद्योगात रस असणे आवश्यक आहे. (Swiggy Jobs)
6. उमेदवार हा स्थानिक बाजार तज्ञ असावा.
7. रेस्टॉरंट फीडबॅक गोळा करणे.
8. कोल्ड कॉल आणि वॉक-इन आयोजित करणे, वैयक्तिक मीटिंग शेड्यूल करणे आणि रेस्टॉरंट्सना डायनआउट उत्पादन पोर्टफोलिओ विकणे.

इथे करा अर्ज –
तुम्ही येथे दिलेल्या लिंकवरुन थेट अर्ज करू शकता – APPLY

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : राज्याच्या उत्पादन शुल्क विभागात 717 पदांवर मेगाभरती!! 7 वी ते 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी

Government Job (30)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य उत्पादन शुल्क (Government Job) विभागा अंतर्गत मेगाभरती जाहीर झाली आहे. यामुळे तरुण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क, चपराशी पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2023 आहे.

विभाग – राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र शासन
भरले जाणारे पद – लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी
पद संख्या – 717 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

भरतीचा तपशील – (Government Job)

पद पद संख्या 
लघुलेखक (निम्नश्रेणी) 05 पद
लघुटंकलेखक 18 पदे
जवान, राज्य उत्पादन शुल्क 568 पदे
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क 73 पदे
चपराशी 53 पदे


आवश्यक शैक्षणिक पात्रता –

लघुलेखक (निम्नश्रेणी) १) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, 

२) लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट,

(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

लघुटंकलेखक १) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, 

२) लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट,

(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

जवान, राज्य उत्पादन शुल्क माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क १) इयत्ता ७ वी उत्तीर्ण 

२) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)

चपराशी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
लघुलेखक (निम्नश्रेणी) S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
लघुटंकलेखक S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान, राज्य उत्पादन शुल्क S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
चपराशी S-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

 

आवश्यक कागदपत्रे –
1. अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
2. वयाचा पुरावा
3. शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
4. नावात बदल झाल्याचा पुरावा
5. मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे ज्ञान असल्याचा पुरावा
6. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
7. वकिली व्यवसायाचा विहीत केलेला किमान अनुभव असल्याचा पुरावा.
अशी होईल निवड –
1. वरील पदांसाठी निवड प्रक्रिया वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. प्राप्त अर्जाची पात्रतेच्या निकषावर अर्जाची छाननी करून मुलाखतीसाठी पात्र / अपात्र उमेदवारांची यादी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maha rashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. ३०.०५.२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. (Government Job)
3. पात्र ठरलेल्या उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल.
4. पात्र उमेदवारांनी मुलाखतीस येताना मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित रहायचे आहे. तसेच मुलाखतीची वेळ व दिनांक याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्धी देण्यात येईल, तसेच ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.

वय मर्यादा –

Application Fees –

Post Name General Category Other Category
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्नश्रेणी)) Rs. 900 Rs. 810
Steno Typist (लघुटंकलेखक) Rs. 900 Rs. 810
Jawan (जवान) Rs. 735 Rs. 660
Jawan cum Driver (जवान-नि-चालक) Rs. 800 Rs. 720
Peon (चपराशी) Rs. 800 Rs. 720

असा करा अर्ज –
1. Go to official website stateexcise.maharashtra.gov.in.
2. Click on State Excise Department Recruitment Process 2023.
3. Notification will open, read it & check eligibility.
4. Fill the application form carefully.
5. Make a payment of fee.
6. Submit the form & take a copy for future use.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY (17 नोव्हेंबर पासून सुरु होणार)
अधिकृत वेबसाईट – stateexcise.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : “परीक्षेचं सिक्रेट कोणाला सांगू नका.” 4 वेळा नापास झालेल्या IPS तरुणाने दिला यशाचा कानमंत्र 

Career Success Story of Roshan Kumar

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन पोलिस सर्व्हिसचा तरुण (Career Success Story) अधिकारी रोशन कुमार याने 2013 मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. यानंतर तो सलग चार वेळा नापास झाला. अखेर 2018 मध्ये त्याने आपले ध्येय साध्य केले. रोशन कुमारने या परिक्षेत संपूर्ण भारतातून 114 वा क्रमांक मिळवला आहे. या रँकसह त्याला भारतीय पोलीस सेवा देण्यात आली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा अनिश्चित मानली जाते. तरीही दरवर्षी हजारो तरुण IAS-IPS होण्याचे स्वप्न उराशी बाळगतात. अनेकजण नोकरी करत असताना या परीक्षेची तयारी करतात आणि यशही मिळवतात. IPS रोशन कुमार  त्यापैकीच एक आहे. नोकरीसोबतच त्याने UPSC ची तयारी केली आणि अनेकवेळा अपयश आले तरी त्याने हार मानली नाही. जाणून घेऊया त्यांच्या इथपर्यंतच्या प्रवासाची कहाणी….

नोकरी करत असताना सलग 5 वेळा दिली लोकसेवा आयोगाची परीक्षा
रोशन कुमार याची कथा ही अनेक अपयशांची कहाणी आहे. तो पडत होता, धडपडत होता पण थांबत नव्हता. रोशन कुमारने नोकरी करत असतानासुध्दा UPSC चा अभ्यास सुरु ठेवला. रोशनच्या (Career Success Story) परीक्षेच्या प्रयत्नांबद्दल सांगायचे तर, पहिल्या दोन प्रयत्नांत तो पूर्व परीक्षा पासही होऊ शकला नाही. त्यानंतरच्या प्रयत्नांमध्ये तो पूर्व परीक्षा पास झाला पण मुख्य परिक्षेत सफल होवू शकला नाही. अखेरीस परीक्षेच्या पाचव्या प्रयत्नात 2018 मध्ये त्याला परीक्षेत यश आले.

परीक्षेचा विषय सिक्रेट ठेवा
IPS रोशन कुमार म्हणतो; “काही खास लोक सोडले तर इतर कोणालाही UPSC च्या तयारीबद्दल सांगू नका. या परीक्षेला खूप मागणी असून त्यात यश मिळणे खूप अवघड आहे; त्यामुळे इतरांना सांगून त्यांच्या अपेक्षांचे ओझे स्वतःवर लादून घेवू नका. परीक्षेचा विषय सिक्रेट ठेवा;” असं त्याचं मत आहे.
रडण्याऐवजी मिळेल त्या वेळेचा सदुपयोग करा
रोशन कुमारने स्वत: नोकरी करत असताना या परीक्षेची तयारी केली आहे. त्याचे म्हणणे आहे की जर तुम्हाला नोकरीसोबतच UPSC द्यायची असेल तर तुमच्या अभ्यासाला व्यावसायिक जिवनक्षी जोडून घ्या. हे समजून घ्या की तुम्ही कार्यरत व्यावसायिक असल्याने तुम्हाला वेगळा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही. अभ्यास आणि नोकरी यामध्ये तुम्हाला सांगड घालायची आहे. त्यामुळे रडण्याऐवजी, मिळेल त्या वेळेचा सदुपयोग करा.

तुमचे ऑफीस आणि सहकाऱ्यांचे ऋणी रहा
रोशन कुमार सांगतात की, ऑफिसमध्ये अनेक समस्या असल्याने आणि अभ्यासासाठी वेळ मिळत नसल्यामुळे गोंधळ घालू नका. ऑफिसमध्ये असताना तिथले काम हे तुमचे प्रथम कर्तव्य आहे. तुमची नोकरी आणि सहकाऱ्यांबद्दल कृतज्ञ रहा. नोकरीतून मिळालेला अनुभव परीक्षेच्या काळात खूप उपयोगी पडणार आहे. विशेषतः मुलाखतीच्या वेळी नोकरीशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात.
कार्यक्रम, संमेलनापासून दूर रहा (Career Success Story)
IPS रोशन कुमार सल्ला देतात की तुम्ही UPSC ची तयारी करत असाल, मग ते कार्यालयीन संमेलन असो किंवा कौटुंबिक कार्यक्रम, सर्वांपासून लांब रहा. जिथे तुमच्याशिवाय काम होऊ शकते तिथे जाऊ नका. जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा फक्त अभ्यासाला वेळ द्या. ऑफिसच्या लंच ब्रेकमध्ये 10 मिनिटांत जेवण पूर्ण करा आणि उरलेल्या वेळेत अभ्यास करा.

लिखानाचा सराव करा
रोशनचा असा विश्वास आहे की नोकरी करत अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना त्यांची तयारी पूर्ण झाल्याचे समाधान होत नाही. म्हणूनच उत्तर लेखनाचा सराव सुरु ठेवा. उत्तरे लिहिण्याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. मॉक टेस्ट देणं हे देखील फायद्याचं ठरत असल्याचं तो म्हणतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IGIDR Recruitment 2023 : प्राध्यापकांसाठी मुंबईच्या ‘या’ संस्थेत नोकरी; त्वरीत करा अर्ज 

IGIDR Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई (IGIDR Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई
भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक
पद संख्या – 12 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 65 वर्षे (IGIDR Recruitment 2023)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Candidates with at least three years of post-Ph.D. Research/Teaching experience.
मिळणारे वेतन –

पद वेतन
सहायक प्राध्यापक Level 11 Cell No. 3 (INR 73,100/-) and a total gross salary of INR 1,33,763/- (including HRA) as per 7th CPC


असा करा अर्ज –
(IGIDR Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्जाविषयी सविस्तर सूचना www.igidr.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.
IGIDR Vacancy 2023

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.igidr.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CTET Preparation 2024 : भावी शिक्षकांनो!! चुटकीसरशी क्रॅक होईल CTET परीक्षा; अभ्यास करताना ‘या’ टिप्स करा फॉलो

CTET Preparation 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET Preparation 2024) ही सरकारी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची परीक्षा समजली जाते. या परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार नवोदय आणि केंद्रीय विद्यालयांमध्ये वेळोवेळी जारी केलेल्या शिक्षक भरतीसाठी अर्ज करु शकतात. यामुळे दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसून नशीब आजमावतात.

नवीन वर्षात होणार परीक्षा
जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या सीटीईटी परीक्षेसाठी सध्या नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज स्विकारले जात आहेत. आता जर तुम्हीही या परीक्षेसाठी फॉर्म भरला असेल तर आज आम्ही तुम्हाला या परीक्षेशी संबंधित काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत; ज्या तुम्हाला अभ्यासासाठी  निश्चित मदत करु शकतात.
अभ्यासक्रम समजून घ्या (CTET Preparation 2024)
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अजून परीक्षेचा अभ्यासक्रम समजला नसेल तर आधी तो समजून घ्या. CTET पेपर 1 आणि 2 चा अभ्यासक्रम काय आहे ते जाणून घ्या. जर तुम्ही दोन्ही पेपरसाठी अर्ज केला असेल तर तपशीलवार अभ्यासक्रम अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे, तुम्ही त्याबद्दल माहिती गोळा करु शकता. तसेच परीक्षेचा पॅटर्न नीट समजून घ्या.

अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा
परीक्षेला खूप कमी वेळ शिल्लक आहे, त्यामुळे अभ्यासक्रमानुसार तुमची विभागणी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही किती दिवसात किती भाग तयार कराल ते ठरवा. त्यानुसार तुमचे (CTET Preparation 2024) पूर्ण वेळापत्रक तयार करा. अभ्यासक्रम समजून घेतल्यावर, ज्या विषयांचा सराव कमी असेल त्या विषयांना तुम्ही जास्त वेळ देऊ शकता. उदाहरणार्थ, जर तुमचे भाषेवर चांगले प्रभुत्व असेल तर तुम्ही इतर विषयांसाठी अधिक वेळ देऊ शकता.
प्रश्नपत्रिका सोडवण्यावर भर द्या
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका कोणत्याही परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरतात, त्यामुळे जर तुम्ही शेवटच्या वर्षाची परीक्षा सोडवली तर तुम्हाला पास होण्यासाठी खूप मदत होईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : ‘या’ कारणामुळे स्कूल बस पिवळ्या रंगाच्या असतात 

GK Updates 15 Nov.

करिअरनामा ऑनलाईन । मानवी आयुष्यात प्रत्येक रंगाला (GK Updates) स्वतःचं वेगळं अस्तित्व प्राप्त झालं आहे. असंच काहीसं आहे शाळेच्या बस विषयी. ज्या बस मुलांना घरातून शाळेत घेवून जातात आणि शाळेतून घरात आणून सोडतात या बस रस्त्यावरुन धावताना दररोज पाहतो. तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल की, प्रत्येक स्कुलबसचा रंग पिवळा असतो. पण, तुम्ही कधी विचार केला की शाळेच्या बसचा रंग पिवळाच का असतो? आपण  अनेकदा शाळेची बस बघितली आहे पण पिवळ्या रंगामागील कारण शोधण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो की शाळेच्या बसला पिवळा रंग देण्यामागे नेमकं काय कारण आहे. चला तर पाहूया…

शाळेच्या बसला पिवळा रंग देण्याचं कारण काय?
1. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिला जातो पिवळा रंग –
पाऊस, धुके किंवा दवबिंदू असो पिवळा रंग दुरवरुनही दिसतो. पिवळया रंगाची परिघीय दृष्टी लाल रंगापेक्षा जास्त असते. शाळेच्या बसचा अपघात होण्याचा धोका टळावा, यासाठी शाळेच्या बसचा रंग पिवळा असतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विचार करुन शाळेच्या बसला पिवळा रंग दिला आहे.
2. लाल रंगाची वेवलेन्थ जास्त असते त्यामुळे लाल रंग दूरवरून लवकर दिसून येतो. त्यामुळे धोका टाळण्यासाठी लाल रंग वापरला जातो. वेवलेन्थचा विचार केला तर लाल रंगाच्या खाली पिवळा रंग येतो. त्याची वेवलेन्थ लाल रंगापेक्षा कमी असते पण इतर रंगापेक्षा जास्त असते.

3. सुप्रीम कोर्टाची गाईड लाईन – (GK Updates)
सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, शाळेची बस पिवळ्या रंगाची असावी याशिवाय या बसवर दोन्ही बाजूला आडवी हिरव्या रंगाची पट्टी असावी. बसच्या पुढे आणि मागे दोन्ही बाजूला ‘School Bus’ लिहिणे गरजेचे आहे.
झेब्रा क्रॉसिंग किंवा रस्त्यावरील गावांची नावे किंवा सुचना सुद्धा पिवळ्या रंगामध्ये दिल्या जातात. रात्रीच्या अंधारात पिवळा रंग लवकर दिसून येतो.
चालकाला दुरवरुन स्टेशनचे नाव दिसावे, यासाठी रेल्वे स्टेशनचे नाव सुद्धा बोर्डवर पिवळ्या रंगांमध्ये लिहिले जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : पदवीधर उमेदवारांसाठी बँकेत नोकरी; पटापट करा अर्ज 

Banking Job (15)

करिअरनामा ऑनलाईन । पाचोरा पीपल्स को (Banking Job) ऑपरेटिव्ह बँक, पाचोरा जि. जळगाव अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, ऑपरेशन, क्रेडिट, आयटी व्यावसायिक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2023 आहे.

बँक – पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक, पाचोरा जि. जळगाव
भरली जाणारी पदे – मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक अ) ऑपरेशन बी) क्रेडिट, आयटी व्यावसायिक
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – जळगाव
वय मर्यादा – ३५ ते ७० वर्षे

भरतीचा तपशील – (Banking Job)

पद पद संख्या 
मुख्य कार्यकारी अधिकारी 01
महाव्यवस्थापक अ) ऑपरेशन बी) क्रेडिट 02
आयटी व्यावसायिक 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी graduate with, CAIIB/DBF/MBA (Finance)/ Diploma
महाव्यवस्थापक अ) ऑपरेशन बी) क्रेडिट Any Graduate, JAIIB/CAIIB, M.B.A. Finance/C.A. Must have knowledge of Computer and Banking.
आयटी व्यावसायिक  Graduate / Post Graduate, M.C.A/M.C.M & Must have knowledge of Banking

असा करा अर्ज –
1. या पदांसाठी अर्ज ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने करायचा आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
3. अर्ज करण्यापुर्वी (Banking Job) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.ppcbank.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IRCON Recruitment 2023 : डिग्री धारकांसाठी आनंदाची बातमी!! IRCON अंतर्गत ‘या’ पदावर नवीन भरती सुरु

IRCON Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । IRCON इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये (IRCON Recruitment 2023) विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हिंदी अनुवादक, हिंदी सहाय्यक आणि एचआर सहाय्यक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023आहे.

संस्था – IRCON इंटरनॅशनल लिमिटेड
भरली जाणारी पदे – हिंदी अनुवादक, हिंदी सहाय्यक आणि एचआर सहाय्यक करारावर
पद संख्या – 07 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – JGM/HRM, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, C-4, जिल्हा केंद्र, साकेत, नवी दिल्ली – 110017
वय मर्यादा – 35 ते 45 वर्षे

भरतीचा तपशील – (IRCON Recruitment 2023)

पद पद संख्या 
हिंदी अनुवादक 01
हिंदी सहाय्यक 01
एचआर सहाय्यक करारावर 05

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
हिंदी अनुवादक
  • Master’s degree in Hindi with English as one of the subjects at graduation level.
  • Post Graduate Diploma in Translation of minimum oneyear duration
हिंदी सहाय्यक
  • Graduation degree in Hindi with English as one of the subjects.
  • Post Graduate Diploma in Translation of minimum three months duration
एचआर सहाय्यक करारावर 2 Years full-time post-graduate degree / diploma in HR/Personnel/ IR /PM & IR with not less than 60% marks from a recognized university/ institution approved by UGC/AICTE

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी Hard Copy मध्ये सादर (IRCON Recruitment 2023) केलेले अर्जच विचारात घेतले जातील.
3. ई–मेल किंवा तत्समद्वारे सादर केलेले Soft Copy मधील अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://ircon.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com