Ayodhya Ram Mandir Bharti 2023 : 20 पदांच्या भरतीसाठी 3 हजार जण इच्छुक; भव्य-दिव्य राम मंदिरात पुजाऱ्यांची मुलाखतीने होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण देशाला उत्सुकता (Ayodhya Ram Mandir Bharti 2023) लागून राहिलेल्या राम मंदिराचं उद्घाटन लवकरच होणार आहे.  आजपासून दोन महिन्यानंतर राम मंदिरामध्ये रामलल्लाची स्थापना होणार आहे. दि. 22 जानेवारीला राम मंदिरात मूर्तीची  प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या भव्यदिव्य राम मंदिरासाठी पुजारी पदांवर भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या पदांसाठी तब्बल 3 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानंतर उमेदवारांची मेरिट लिस्ट जारी करण्यात आली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून उमेदवारांची मुलाखत घेण्यास सुरुवात झाली आहे.

20 पदांसाठी 3 हजार अर्ज
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात पुजाऱ्यांच्या भरतीसाठी मेरिट लिस्ट तयार करण्यात आली असून त्यासाठी मुलाखती सुरु झाल्या आहेत. राम मंदिरातील पुजारी पदांसाठी एकूण तीन हजार जणांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यानंतर गुणवत्ता यादीच्या आधारे 225 जणांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली आहे. मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

225 उमेदवार मेरिट लिस्टमध्ये (Ayodhya Ram Mandir Bharti 2023)
ट्रस्टला मिळालेल्या 3000 अर्जांपैकी 225 उमेदवारांची त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर निवड करण्यात आली आहे. त्यांना ट्रस्टने मुलाखतीसाठी बोलावलं आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार वृंदावनचे प्रसिद्ध हिंदू धर्मोपदेशक जयकांत मिश्रा यांचाही मुलाखतकारांच्या तीन सदस्यीय पॅनेलमध्ये समावेश आहे. मुलाखतकारांचे तीन सदस्यीय पॅनेल अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेचे मुख्यालय कारसेवक पुरम येथे या निवडक उमेदवारांची मुलाखत घेत आहे.

मुलाखत पॅनेलमध्ये या महंतांचा समावेश
मुलाखतकारांच्या तीन सदस्यीय पॅनेलमध्ये वृंदावनचे प्रसिद्ध हिंदू धर्मोपदेशक जयकांत मिश्रा आणि अयोध्येचे दोन महंत, मिथिलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास यांचा समावेश आहे.
पुजाऱ्यांना घ्यावं लागणार 6 महिन्यांचे प्रशिक्षण 
मुलाखतीनंतर पुजारी पदावर निवड झालेल्या 20 उमेदवारांना (Ayodhya Ram Mandir Bharti 2023) अयोध्येतील पुरम येथे सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे प्रशिक्षण धार्मिक अभ्यासक्रमावर आधारित असेल. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना मोफत राहण्याची सोय आणि भोजन मिळेल, तसेच दोन हजार रुपये मानधनही मिळणार आहे.

26 जानेवारीपासून खुले होणार नवे राम मंदिर
26 जानेवारीपासून राम मंदिर भक्तांसाठी खुले केले जाणार आहे. त्यानंतर रामभक्तांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे. अयोध्येतील राम मंदिरात दररोज सुमारे 75 हजार भाविक दर्शन घेऊ शकतील; अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com