Interview Tips : UPSC/MPSC मुलाखत देताना ‘हे’ करु नका; पहा उपयोगी टिप्स

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा (Interview Tips) परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यातील मुलाखतींच्या तारखा जाहीर केल्या आहेत. वेळापत्रकानुसार येत्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये या मुलाखतीचे आयोजन केले जाईल. उमेदवारांनी मुलाखत फेरीत चांगली कामगिरी करावी यासाठी आज आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. उपयुक्त टिप्ससाठी पुढे वाचत रहा…

छोट्या छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या
मुलाखतीवेळी उत्तर देण्यापुर्वी प्रश्न काळजीपूर्वक ऐका आणि नंतर साध्या आणि सरळ शब्दात उत्तरे द्या. अनावश्यकपणे उत्तरे देणे टाळा कारण ते तुमच्यातील अनिश्चितता आणि आत्मविश्वासाची कमतरता दर्शवू शकतात. त्यामुळे तुम्हाला उत्तराबाबत जेवढी माहिती आहे तेवढीच माहिती द्या. या छोट्या छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
मतभेद व्यक्त करताना नम्रता दाखवा
पॅनेलच्या सदस्याने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीशी तुम्ही असहमत असल्यास, कृपया त्याबाबत तुम्ही नम्रपणे सांगा. दीर्घकाळ वाद घालणे टाळा. मुलाखत पॅनेल वरील सदस्यांना सन्मान द्या.

कोणत्याही विषयावर नकारात्मक टीका करु नका
खाजगी क्षेत्रातील कोणत्याही किंवा सरकारी, यंत्रणा तसेच इतर कोणत्याही क्षेत्राबाबत तुम्हाला तुमची प्रतिक्रिया विचारण्यात आली तर त्यावर नकारात्मक टिप्पणी (Interview Tips) करु नका. त्यासंबंधित काही सूचना किंवा उपाय सुचवा. थेट टीका तुमच्या प्रतिमेवर परिणाम करु शकते.

आत्मविश्वास ठेवा (Interview Tips)
कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत उत्तीर्ण होण्यासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यातील आत्मविश्वास. तुम्हाला तुमच्या तयारीबद्दल पूर्ण विश्वास असायला हवा, कारण अनेकदा असे घडते की उमेदवारांच्या तयारीत कोणताही दोष नसतो, पण विचारातील अस्वस्थतेमुळे चुकीची उत्तरे दिली जावू शकतात. त्यामुळे घाबरणे टाळा आणि आत्मविश्वासाने सामोरे जा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com