Career Mantra : असिस्टंट कमांडंट व्हायचंय? काय असते पात्रता? कधी होते परीक्षा? जाणून घ्या…

करिअरनामा ऑनलाईन । आजकाल तरुणांना त्यांच्या (Career Mantra) भविष्याची चिंता सतावत आहे. भविष्याबद्दल काळजी करत ते अनेकदा अनेक परीक्षांचे अभ्यास आणि तयारी करत असतात. मायभूमी विषयी प्रेम वाटणाऱ्या अनेकांना देशाच्या सुरक्षा एजन्सीमध्ये दाखल होण्याची इच्छा असते. जर तुम्हालाही असिस्टंट कमांडंट बनून तुमचे भविष्य सुधारायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. जर तुमचं वय 20 ते 25 वर्षे असेल तर तुम्ही भारत सरकारच्या विविध सुरक्षा संस्थांमध्ये ‘असिस्टंट कमांडंट’ म्हणून करिअर करू शकता. भारत सरकारच्या अंतर्गत अनेक सुरक्षा एजन्सी आहेत, ज्या देशाच्या विविध सीमांच्या सुरक्षेसाठी देशभरात तैनात आहेत जसे की समुद्रावरील बंदरे, विमानतळ, विज्ञान आणि संशोधन केंद्रे, विविध भारतीय वारसा स्थळे, अवकाश संशोधन केंद्रे आणि सरकारी कार्यालये आणि संस्था यांचा समावेश होतो.

यामध्ये BSF (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स), CRPF (केंद्रीय राखीव पोलीस दल), CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल), ITBP (इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स), NSG (राष्ट्रीय सुरक्षा रक्षक), SSB (सशस्त्र सीमा बल) इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये सहाय्यक कमांडंटची दरवर्षी अ आणि ब श्रेणीतील (Career Mantra) अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते. यासाठी दरवर्षी UPSC द्वारे CAPF नावाची भरती परीक्षा आयोजित केली जाते.
कधी होते परीक्षा?
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया मार्च-एप्रिलमध्ये सुरू होते आणि परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या आसपास घेतली जाते. अर्ज प्रक्रियेविषयी अपडेट मिळवण्यासाठी मार्च महिन्यापासून UPSC च्या वेबसाईटवर लक्ष ठेवत रहा.

असं आहे परीक्षेचे स्वरूप (Career Mantra)
या भरतीसाठी सर्वप्रथम लेखी परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) साठी बोलावले जाते. त्यानंतर पीईटी उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. हे लक्षात घेणं गरजेचं आहे; की निवडीची अंतिम गुणवत्ता यादी लेखी परीक्षेत मिळालेले गुण आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाते.

लेखी परीक्षेची गुण विभागणी
1. या लेखी परीक्षेत पेपर I आणि पेपर II असे दोन पेपर असतात.
2. पेपर I मध्ये सामान्य क्षमता आणि बुद्धिमत्ता याविषयी प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा 250 गुणांची असते. वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये येतात.
3. पेपर II मध्ये सामान्य अध्ययन आणि निबंध आणि आकलन याविषयी प्रश्न विचारले जातात. हे पेपर एकूण 200 गुणांचे आहेत.

शारीरिक चाचणी
1. पुरुषांसाठी – 100 मीटर धावणे शर्यत 16 सेकंदात पूर्ण करावी लागते. 800 मीटर शर्यत 3 मिनिटे 45 सेकंदात पूर्ण करावी लागते. लांब उडी 3.5 मीटर, यासाठी 3 संधी दिल्या (Career Mantra) जातात. तसेच 7.26 किलोचा गोळा 4.5 मीटर अंतरावर टाकावा लागेल ज्यासाठी 3 संधी देण्यात येतात.
2. महिलांसाठी – 100 मीटर धावणे शर्यत 18 सेकंदात पूर्ण करावी लागते. 800 मीटर शर्यत 4 मिनिटे 45 सेकंदात पूर्ण करावी लागते. 3 मीटर लांब उडी मारण्यासाठी तीनवेळा संधी देण्यात येणार आहेत.
आवश्यक उंची –
1. पुरुष उमेदवाराची उंची किमान 165 से. मी. आणि छाती 81 सेमी असावी. याशिवाय 5 सेमी विस्तार असावा.
2. महिला उमेदवारांची उंची किमान 157 सेमी असावी.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com