UPSC Success Story : अंडी विकून शिक्षणाची फी भरली; गरिबीवर मात करत अभ्यास केला; अशी क्रॅक केली UPSC 

करिअरनामा ऑनलाईन । मनोजचा जन्म बिहारमधील सुपौल येथे (UPSC Success Story) एका गरीब कुटुंबात झाला. तो लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. मात्र त्यावेळी सरकारी शाळेची अवस्था बिकट होती. शिक्षकांची कमतरता होती. फाटक्या जुन्या पुस्तकांमधून मुलं अभ्यास करायची. अशा परिस्थितीत मुलांनी पुढे जाणे खूप आव्हानात्मक होते. मनोजसाठीही ते सोपे नव्हते. मग त्याकाळी अभ्यासापेक्षा पैसे कमवणं जास्त महत्त्वाचं; या गोष्टीवर त्याच्या आई – वडिलांचा भर होता.
सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मनोज नोकरीच्या शोधात दिल्लीला गेला. त्यावेळी मनोजला पुढील शिक्षण घेण्याची कल्पना नव्हती. नोकरी करून कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावायचा होता. मनोज घर चालवण्यासाठी मदत करेल, अशी कुटुंबीयांचीही अपेक्षा होती.

UPSC Success Story of IAS Manoj Kumar Rai

नोकरीसाठी पायपीट (UPSC Success Story)
1996 मध्ये मनोज दिल्लीत आला. एका साध्या खेडूत मुलासाठी मोठ्या शहराच्या जीवनशैलीशी जुळवून घेणं खूप आव्हानात्मक होतं. नोकरीच्या शोधात दिवस पुढे जात होते पण नोकरी मिळत नव्हती. असे असूनही त्याने हिंमत ठेवली. मनोजने दिल्लीतच राहण्याचा निर्णय घेतला. हळुहळु (UPSC Success Story) गोष्टी सुरळीत होतील या आशेने. मग त्यांनी भाजी आणि अंड्याचे दुकान सुरु करायचे ठरवले. यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू झाला.

मित्राच्या साथीने बदलले आयुष्य
पुढे, मनोजने जेएनयूमध्ये रेशनचे साहित्य पोहोचवण्याचे कामही सुरू केले. तिथे त्याला आयुष्यात अशी व्यक्ती भेटली; ज्या व्यक्तिने त्याला पुन्हा अभ्यास करण्याची प्रेरणा दिली. उदय कुमार असे (UPSC Success Story) त्या विद्यार्थ्याचे नाव होते. याबद्दल बोलताना मनोज त्याच्या एका मुलाखतीत सांगतो की, “उदय आणि आम्ही बिहारमधील सुपौलचे रहिवासी होतो. आम्ही दोघे घट्ट मित्र झालो. त्यांनी मला माझा अभ्यास पूर्ण करण्याचा सल्ला दिला. अभ्यास पूर्ण केल्यावर चांगली नोकरी मिळेल असे मलाही वाटत होते.”

UPSC Success Story of IAS Manoj Kumar Rai

अंडी आणि भाजी विकून फी भरली
त्यानंतर मनोज कुमारने श्री अरबिंदो कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तो संध्याकाळच्या वर्गाला हजेरी लावायचा. अंडी आणि भाजी विकून त्याने आपली फी भरली. आणि 2000 साली पदवी प्राप्त केली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचा मित्र उदयने त्याला यूपीएससी परीक्षेला बसण्याचा सल्ला दिला. गरीब आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी प्रथम माघार घेतली. त्यानंतर काही दिवस विचार करून मनोजने यूपीएससी (UPSC Success Story) परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले.
2005 मध्ये मनोज पहिल्यांदा UPSC परीक्षेत बसला होता. पण त्याला अपयश आले. यानंतर मनोज दिल्लीला परतला. मनोजने आशा सोडली नाही. तो अभ्यास करतच राहिला. मनोज हा हिंदी माध्यमाचा विद्यार्थी होता. त्याने परीक्षेत हिंदीत उत्तरे लिहिण्याचा पर्याय निवडला. पण तयारीसाठी हिंदीत फारसा मजकूर उपलब्ध नव्हता. ही बाब मनोजसाठी खूपच आव्हानात्मक होती.

UPSC Success Story of IAS Manoj Kumar Rai

आपयशावर केली मात
मनोजचं इंग्रजी खूप कमकुवत होतं. मनोज सांगतात, “यूपीएससीमध्ये इंग्रजी आणि प्रादेशिक भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य होते. अशा परिस्थितीत मनोजने इंग्रजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. तरीही त्याच्या पदरी अपयश आले. पूर्व परीक्षा पास केली मात्र मुख्य (UPSC Success Story) परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळत नव्हतं. कितीही अपयश आलं तरी  मनोजने UPSC पास करण्याचा निर्धार पक्का केला होता.

NCERT ची पुस्तके उपयोगी ठरली
चौथ्या वेळेस UPSC परीक्षा देत असताना त्याने वयाची तीस वर्षे पूर्ण केली होती. 33 वय झाल्यानंतर परीक्षेला बसता येणार नाही; या भीतीने त्याने परीक्षेच्या तयारीचा मार्ग बदलला. प्रिलिमची तयारी करण्याऐवजी मनोजने आधी मुख्य परीक्षेची तयारी केली. याचा त्याला फायदा झाला. त्यादरम्यान (UPSC Success Story) त्याच्या प्रिलिमच्या 80 टक्के अभ्यासक्रमाची तयारीही पूर्ण झाली होती. यासोबतच मनोजने 6वी ते 12वीपर्यंतची NCERT पुस्तके वाचली, ज्यामुळे त्याचा सामान्य अभ्यास मजबूत झाला.
मनोज सांगतात; “इंग्रजी वर्तमानपत्रे आणि मासिके वाचून मला चालू घडामोडींचे चांगले ज्ञान मिळाले. अशा रीतीने इंग्रजी विषयाची तयारी चांगली झाली. उत्तरलेखनाचा सरावही मी नियमित करत असे. अभ्यासाची रणनीती बदलली तेव्हा माझे  नशीब बदलले.”

UPSC Success Story of IAS Manoj Kumar Rai

गरीब मुलांना देतात मोफत शिक्षण (UPSC Success Story)
मनोज यांनी 2010 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची पहिली पोस्टिंग बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील राजगीर ऑर्डनन्स फॅक्टरीत प्रशासकीय अधिकारी म्हणून झाली होती. गरिबीतून बाहेर पडून तो इथपर्यंत पोहोचला होता. ज्याची त्यांना जाणीव होती. याच जाणिवेतून त्याने गरीब मुलांना मोफत नागरी सेवा प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. अशा मुलांना शिकवण्यासाठी मनोज आठवड्याच्या शेवटी नालंदा ते पटणा शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात. नंतर कामाच्या व्यापामुळे त्यांना अध्यापनाचे काम थांबवावे लागले. मनोजची पत्नी पाटण्यात उप जिल्हाधिकारी होती. त्यांनीही त्यांना या कामात खूप साथ दिली.
मनोजने शिकवलेली अनेक मुले आज देशात विविध (UPSC Success Story) ठिकाणी नागरी संस्थांमध्ये कार्यरत आहेत. मनोजने आपले स्वप्न तर पूर्ण केलेच पण इतरांचीही स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करत आहे; जी बाब तरुणांसाठी प्रेरणा देणारी आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com