UPSC Success Story : भावांनी सांगितलं म्हणून MBBS नंतर UPSC दिली; एकाच वर्षात क्रॅक केली परीक्षा; पती-पत्नी दोघे आहेत IAS

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षेच्या तयारीसाठी अर्तिका शुक्लाने (UPSC Success Story) कोणताही कोचिंग क्लास लावला नाही; तर यामध्ये तिच्या भावांनी तिला अभ्यासात पूर्ण मदत केली. 2015 मध्ये, अर्तिकाने UPSC परीक्षेत संपूर्ण देशात चौथा क्रमांक मिळवला आणि ती टॉपर ठरली. हा तिचा पहिलाच प्रयत्न होता. UPSC करण्यापूर्वी अर्तिकाने एमबीबीएसची पदवी मिळवली आहे. जाणून घेवूया तिच्या प्रवासाविषयी…

UPSC पास होण्यासाठी दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी काही मोजकेच या परीक्षेत यशस्वी होतात. त्यापैकी काही उमेदवार असे असतात जे आपल्या कामगिरीतून नव्या उमेदवारांना प्रेरणा देतात. अर्तिका शुक्ला त्यापैकीच एक आहे. ती एमबीबीएस (MBBS) सारखी पदवी मिळवून नंतर आयएएस (IAS) अधिकारी झाली आहे.

वडील आहेत डॉक्टर (UPSC Success Story)
अर्तिका शुक्ला (IAS Artika Shukla) मूळची उत्तर प्रदेशातील वाराणसीची आहे. तिचे वडील डॉक्टर आहेत आणि आई गृहिणी आहे. तिला मोठे भाऊ देखील आहेत; ज्यांनी UPSC परीक्षा पास केली आहे. अर्तिकाने आपले सुरुवातीचे शिक्षण सेंट जॉन स्कूलमधून घेतले. ती सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होती. शिक्षण घेत असताना तिने आपल्या वडिलांप्रमाणेच डॉक्टर बनण्याचा विचार केला. यासाठी तिने मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवीही मिळवली.

भावांच्या करिअरचाही अर्तिकावर प्रभाव
अर्तिका शुक्लाने एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर एमडीची तयारी सुरू केली. जेव्हा तिच्या भावाने तिला UPSC ची तयारी करण्यास सांगितले तेव्हा अर्तिका अजूनही MD शिक्षण घेत होती. त्यानंतर तिने यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी सुरू केली. यावेळी तिने कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही. तर UPSC पास (UPSC Success Story) करण्यासाठी अभ्यासात तिला तिच्या भवांनी मार्गदर्शन केले. दोन्ही भावांच्या करिअरचाही अर्तिकावर प्रभाव होता. अर्तिकाला गौरव शुक्ला आणि उत्कर्ष शुक्ला हे दोन मोठे भाऊ आहेत. दोन्ही भावांनीही यूपीएससी परीक्षा पास केली आहे. मोठा भाऊ गौरव 2012 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण झाला होता. उत्कर्ष हा UPSC उत्तीर्ण झाल्यानंतर IRTS अधिकारी देखील आहे.

एका वर्षात पास केली UPSC (UPSC Success Story)
UPSC परीक्षेत 2015 मध्ये, अर्तिकाने तिच्या पहिल्याच प्रयत्नात चौथा क्रमांक मिळवला आणि तिची IAS प्रशिक्षणासाठी निवड झाली. अवघ्या एक वर्षाच्या मेहनतीने तिने UPSC पास केली आहे.

ट्रेनिंग दरम्यान प्रेम अन् नंतर विवाह
अर्तिका शुक्ला आयएएसचे प्रशिक्षण घेत होती. यादरम्यान ती आयएएस अधिकारी जसमीत सिंग संधूच्या (IAS Jasmeet Singh Sandhu) प्रेमात पडली. ते दिल्लीतील रहिवासी आहेत. जसमीत सिंह यांनी UPSC परीक्षेत 2015 मध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे. प्रशिक्षणांनातर दोघांना कॅडर देण्यात आले. जसमीतला राजस्थान आणि अर्तिकाला भारतीय प्रशासकीय सेवा केंद्रशासित प्रदेश केडर मिळाले. नंतर 2017 मध्ये IAS अर्तिका आणि IAS जसमीत सिंह यांचा विवाह झाला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com