UPSC Result 2022 : UPSCमध्ये ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली; निकालात मराठी मुलांचा दबदबा; पहा यादी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC Result 2022) नुकताच नागरी सेवा 2022 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परिक्षेत इशिता किशोरने संपूर्ण भारतातून पहिला क्रमांक मिळवला आहे; तर ठाण्याची कश्मिरा संखे हिने महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला आहे. लोकसेवा आयोगाने २४ एप्रिल ते १८ मे २०२३ या कालावधीत ५८२ उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखत घेतली होती. त्यानंतर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्राने मारली बाजी
यंदाच्या यूपीएससी निकालात मराठी मुलांनी बाजी मारल्याचं पहायला मिळतंय. यामध्ये संपूर्ण देशात वसंत दाभोळकरने ७६ वा क्रमांक, प्रतिक जराड १२२ वा क्रमांक, जान्हवी साठे १२७ वा क्रमांक, गौरव कायंदे-पाटील १४६ वा क्रमांक, ऋषिकेश शिंदे १८३ वा क्रमांक, अमर राऊत २७७ वा क्रमांक, अभिषेक दुधाळ २७८ वा क्रमांक, श्रुतिषा पाताडे २८१ वा क्रमांक, स्वप्नील पवारने २८७ वा क्रमांक, अनिकेत हिरडेने ३४९ वा क्रमांक, संकेत गरुड ३७० वा क्रमांक, ओमकार गुंडगेने ३८० वा क्रमांक, परमानंद दराडे ३९३ वा क्रमांक, मंगेश खिलारीने ३९६ वा क्रमांक पटकावला आहे.
तसेच सागर खराडे ४४५ वा क्रमांक, करण मोरे ४४८ वा क्रमांक, पल्लवी सांगळे ४५२ वा क्रमांक, (UPSC Result 2022) आशिष पाटील ४६३ वा क्रमांक, अभिजीत पाटील ४७० वा क्रमांक, शशिकांक नरवडे ४९३ वा क्रमांक, प्रतिभा मेश्राम ५२७ वा क्रमांक, शुभांगी केकाण ५३० वा क्रमांक, प्रशांत डगळे ५३५ वा क्रमांक, लोकेश पाटील ५५२ वा क्रमांक, प्रतीक्षा कदम ५६० वा क्रमांक, मानसी सकोरे ५६३, जितेंद्र कीर ५६९ वा क्रमांक, अक्षय नेर्ले ६३५ वा क्रमांक, मानसी साकोरे ५६३ वा क्रमांक, अमित उंदिरवादेने ५८१ वा क्रमांक, अक्षय नेर्ले ६३५ वा क्रमांक, प्रतिक कोरडे ६३८, करण मोरे ६४८ वा क्रमांक, शिवम बुरघाटे ६५७ तर केतकी बोरकरने ६६६ वा क्रमांक, सुमेध जाधवने ६८७ वा क्रमांक पटकावला आहे.

शिवहर चक्रधर मोरे ६९३ वा क्रमांक, सिद्धार्थ भांगे ७०० वा क्रमांक, स्वप्नील डोंगरे ७०७ वा क्रमांक, उत्कर्षा गुरव ७०९ वा क्रमांक, राजश्री देशमुख ७१९, महारुद्र जगन्नाथ (UPSC Result 2022) भोर ७५० वा क्रमांक, स्वप्नील सैंदणे ७९९ वा क्रमांक, संकेत कांबळे ८१० वा क्रमांक, निखिल कांबळे ८१६ वा क्रमांक, गौरव प्रकाश अहिरराव ८२८ वा क्रमांक, श्रुती उत्तम श्रोते ८५९ वा क्रमांक, तुषार पवार ८६१ वा क्रमांक, दयानंद रमाकांत तेंडोलकर ९०२ वा क्रमांक, आरव गर्ग ९१९ व्या क्रमांकावर आहे.

असा पहा UPSC CSE निकाल (UPSC Result 2022)
निकाल पाहण्यासाठी, सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in आणि upsconline.nic.in ला भेट द्या. त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि होमपेजवर उपलब्ध असलेल्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस रिझल्ट २०२२ वर क्लिक करा. यानंतर स्क्रीनवर UPSC निकाल २०२२ ची PDF दिसेल.
यात निवड झालेल्या उमेदवारांच्या रोल नंबरची यादी पाहता येईल.
रोल नंबर शोधण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट Ctrl+F वापरा. जर उमेदवाराचा रोल नंबर यादीत असेल तर तो/ती पात्र असणे आवश्यक आहे. यानंतर निकालाची प्रिंट आउट डाउनलोड करता येईल.

देशातील टॉप 10 उमेदवारांची यादी
१) इशिता किशोर
२) गरिमा लोहिया
३) उमा हरति एन
४) स्मृति मिश्रा (UPSC Result 2022)
५) मयूर हजारिका
६) गहना नव्या जेम्स
७) वसीम अहमद
८) अनिरुद्ध यादव
९) कनिका गोयल
१०) राहुल श्रीवास्तव

अशी असते UPSC मार्किंग योजना
ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी यूपीएससीची प्राथमिक परीक्षा देणे आवश्यक आहे. एकूण १७५० गुणांची लेखी परीक्षा असते. UPSC CSE लेखी परीक्षेत एकूण ९ पेपर असतात (UPSC Result 2022) परंतु त्यापैकी केवळ ७ पेपर्समध्ये मिळालेले गुण अंतिम गुणवत्ता क्रमवारीत समाविष्ट केले जातात. एकूण २५० गुणांचे ७ पेपर आहेत. ज्याच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते (UPSC मार्किंग स्कीम). २७५ गुणांची आयएएस मुलाखत दिल्लीतील UPSC कार्यालयात घेतली जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com