बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! SBI मध्ये २००० जागांसाठी भरती, २५ हजार पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय स्टेट बँक समूहाने पुढच्या सहा महिन्यात कनिष्ठ पातळीपासून मध्यम पातळीपर्यंत २००० एक्झिक्युटिव्ह नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या बद्दल माहिती असणाऱ्या दोन लोकांनी ग्रामीण भागात चांगली प्रगती करण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. ज्यासाठी ते लोकांकडून पैसे घेतात त्या विभागात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-१९ मुळे कमी उत्पन्नाच्या कारणास्तव बँकेने हा निर्णय घेतला आहे.

ही भरती सेल्स आणि कॉल सेंटर मध्ये होणार आहे जेणेकरून कंपनीच्या क्रेडिट कार्ड व्यवसायाला वाढविता येईल. यासाठी ग्रामीण आणि कृषी क्षेत्रातील अनुभवी लोकांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. फायनान्शिअल एक्सक्लुजन वर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक वेगळे व्हर्टिकल करण्यात आले असून यासाठी ४०० लोकांची भरती केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच एसबीआय चे कार्ड शेअर बाजाराच्या यादीत आले आहेत आता ते आपला व्यवसाय वाढवू पाहत आहेत.

केवळ सेल्स किंवा कॉल सेंटर मध्येच जवळपास १५०० लोकांची भरती केली जाणार असून काही कनिष्ठ तर काही मध्यम अधिकारी असणार आहेत. भरती केलेल्याना १५ ते २५ हजाराच्या दरम्यान पगार दिला जाणार आहे. मागच्या वर्षी एसबीआयने २००० अधिकारी आणि साधारण ८००० क्लार्क भरती केली होती. एसबीआय ने सेवा गुणवत्ता आणि बँकिंग सेवा यांच्या उपलब्धता अधिक चांगल्या बनविणार असल्याचे म्हंटले आहे. ज्यासाठी ते ६८००० ग्राहक पॉईंट चा वापर करणार आहेत.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com