Talathi Bharti 2023 : उत्सुकता लागलेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरात पार पडलेल्या तलाठी भरती (Talathi Bharti 2023) परीक्षेच्या निकालाबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. १० लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभाग प्रयत्नशील आहे.

तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले (Talathi Bharti 2023) आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्यात आली. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट दरम्यान पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर दरम्यान तिसरा टप्पा; अशा पद्धतीने परीक्षा घेण्यात आली.

ही परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीच्या सर्व्हरमध्ये निकालाची माहिती एकत्रित जमा आहे. त्यानंतर कंपनीकडून उत्तरपत्रिका जाहीर करण्याची मागणी भूमी अभिलेख (Talathi Bharti 2023) विभागाकडे केली जाणार आहे. त्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या लॉगइनमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिसणार आहे. त्यानुसार उमेदवारांना काही आक्षेप असल्यास तो नोंदविता येणार आहे. त्याकरिता मुदत दिली जाणार आहे. प्राप्त आक्षेप, हरकती टीसीएस कंपनीच्या समितीकडे जाऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिवाळीच्या पूर्वी परीक्षेचा निकाल लावण्याचा प्रयत्न आहे, असं वृत्त आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com