महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिलासा! शेवटचे सेमिस्टर सोडून सर्व परीक्षा रद्द – उदय सामंत

मुंबई । लॉकडाऊनमुळे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांसंबंधी संभ्रम होता. त्यामुळं राज्य सरकारनं याबाबत निर्णय घेतला आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा सोडून अन्य परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. UGC ने दिलेल्या निर्देशांनुसार सगळे निर्णय घेण्यात येत आहेत असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. या निर्देशांनुसार … Read more

पुण्यात अडकलेल्या स्पर्धापरिक्षा विद्यार्थ्यांसाठी खूषखबर; आज पहिली बस सुटणार

पुणे प्रतिनिधी | लाॅकडाउनमुळे राज्यातील विविध भागांत अनेकजण अडकून पडले आहेत. अशांसाठी एसटी बस ची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिली होती. त्यानुसार आज पुण्यातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पहिली बस नगरला जाणार असल्याचे समजत आहे. या निर्णयामुळे पुण्यात अडकून पडलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे. पुण्यात सुमारे … Read more

विद्यापीठ आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसांत जाहीर होणार- उदय सामंत

मुंबई । विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येईल. राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परीक्षेसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. बैठकीत पदवी आणि पदवीत्तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षा 1 जुलै ते … Read more

हुश्श! एकदाचं ठरलं; विद्यापीठांच्या परीक्षा जुलैमध्ये

नवी दिल्ली | विद्यापीठांना सोयीनुसार जुलैमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षा घेता येतील. त्यासाठी कोविड १९ च्या आगामी काळातल्या परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेचा कालावधी २ तासापर्यंत कमी करता येईल, अशी शिफारस विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीनं केली आहे. पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन एकतर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे केले जाऊ शकते किंवा मागील सत्रातील त्यांच्या … Read more

विद्यापीठ, महाविद्यालय अन् CET परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर होणार

मुंबई । राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च … Read more