Layoff : Meta मध्ये दुसऱ्यांदा मोठी कपात; तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांना दिला डच्चू

Layoff (1)

करिअरनामा ऑनलाईन । फेसबुकची पालक कंपनी असलेल्या (Layoff) मेटाव्हर्सने आणखी 10 हजार जणांना कामावरून काढत असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. कामकाज खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे कंपनीत खुल्या असलेल्या 5 हजार जागांसाठी आगामी काळात भरती होणार नाही, असेही स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे नोकरकपात करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे मेटाव्हर्सचे सीईओ मार्क … Read more

Anganwadi Recruitment : अंगणवाडी भरती संदर्भात मोठी अपडेट!! सेविकांच्या मानधनात 20 टक्क्यांची वाढ अन् ‘या’ महिन्यात 20 हजार पदे भरणार

Anganwadi Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील (Anganwadi Recruitment) पाचव्या दिवशी मोठी घोषणा करण्यात आली. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्क्यांची वाढ आणि मे महिना अखेर 20 हजार नव्या अंगणवाडी सेविका भरती करणार असल्याची घोषणा बालकल्याण विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या मे महिन्यांपर्यंत 10 हजार नव्या अंगणवाडी सेविकांची … Read more

Career News : नोकरी शोधणाऱ्यांसाठी अच्छे दिन!! कंपन्या करणार मोठी नोकर भरती; ‘या’ 5 कंपन्या कोणत्या?

Career News (10)

करिअरनामा ऑनलाईन । जागतिक मंदिचे संकट दिवसेंदिवस (Career News) गडद होत आहे. सध्या जगभरातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी नोकरकपात सुरु केली आहे. त्यामुळे आता शिकलेल्या तरुणांमध्ये चिंतेच वातावारण आहे. कारण अनेक विद्यार्थी आपलं शिक्षण पुर्ण करुन नोकरीच्या शोधात असतानाच जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जात असल्यामुळे आपणाला नोकरी कशी मिळणार? असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना सतावत आहे. पण … Read more

Career News : ‘या’ कंपनीत शिफ्टची वेळ संपली की कंप्युटर होतो आपोआप बंद; कर्मचारी आहेत बेहद खुश!!

Career News (9)

करिअरनामा ऑनलाईन । काही कंपन्यांमध्ये नियम इतके कडक असतात (Career News) की प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना काम करत असताना शिफ्ट संपेपर्यंत जागेवरून उठता सुद्धा येत नाही. ऑफिसमध्ये बॉसचे दडपण इतके असते की एखादा महत्वाचा फोन आल्यास त्या कर्मचाऱ्याला फोन घेताना दडपण येते. पण काही ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांची मानसिकता चांगली ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. मध्य प्रदेशातील एका IT … Read more

Old Pension Scheme : राज्यातील 17 लाख कर्मचारी ‘या’ दिवशी जाणार बेमुदत संपावर; जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा पुन्हा भडकला

Old Pension Scheme

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात एक (Old Pension Scheme) मोठी बातमी आहे. 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करावी; या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एकूण 17 लाख कर्मचारी संपावर जाणार आहेत. 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस योजना लागू झाली आहे. … Read more

7th Pay Commission : मोठी अपडेट!! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार

7th Pay Commission

करिअरनामा ऑनलाईन । 2023 मधील होळी सण लवकरच येत आहे. मात्र (7th Pay Commission) त्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. कारण केंद्र सरकारकडून होळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षातील DA (Dearness Allowance) वाढ अजूनही झालेली नाही. या कर्मचाऱ्यांना आशा होती की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर DA वाढ … Read more

Budget 2023-24 : सर्वात मोठी बातमी!! देशावरचं नोकर कपातीचं टेन्शन झालं दूर; बजेटच्या आधी आली गुड न्यूज

Budget 2023-24

करिअरनामा ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Budget 2023-24) उद्या 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याने मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर होणार आहे. मात्र त्याआधी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International … Read more

Wipro Layoff : विप्रोच्या ‘या’ कठोर निर्णयाचा 800 फ्रेशर्सना फटका; थेट कामावरूनच काढले

Wipro Layoff

करिअरनामा ऑनलाईन । एका मीडिया रिपोर्टनुसार, देशातील टॉप (Wipro Layoff) पाच आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोने अंतर्गत चाचणीनंतर खराब कामगिरीमुळे शेकडो फ्रेशर्सना कामावरून काढून टाकले आहे. या संदर्भात कंपनीने आपली भूमिका मांडली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार; कंपनीने सेट केलेल्या मानकांच्या अनुषंगाने प्रत्येक एंट्री-लेव्हल कर्मचार्‍याने त्यांच्या नियुक्त केलेल्या कार्यक्षेत्रात निपुण असण्याची अपेक्षा कंपनी करते. मूल्यांकन प्रक्रियेमध्ये कर्मचार्‍यांना … Read more

Layoff : Microsoft कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात!! अमेरिकेत आर्थिक मंदीची चाहूल

Layoff

करिअरनामा ऑनलाईन । मागणीत झालेली घट आणि जागतिक आर्थिक (Layoff) घडामोडींमधील बदलांमुळे अमेरिकेसह अनेक देशांमधील टेक्नॉलॉजी सेक्टर अडचणीत आलं आहे. अनेक मोठ्या कंपन्यांपाठोपाठ मायक्रोसॉफ्टनंदेखील कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टनं घेतलेल्या भूमिकेवरून असं लक्षात येतं की भविष्यात टेक सेक्टरमधील नोकऱ्या आणखी कमी होऊ शकतात. अमेरिकेमधील टेक्नॉलॉजी सेक्टरमधील अनेक लहानमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा धडाका सुरू … Read more

Maharashtra Jobs : अंगणवाडी सेविकांना लागली लॉटरी!! मानधनात दुपटीने वाढ अन् नवीन 20 हजार पदे भरणार

Maharashtra Jobs

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात लवकरच 20 हजार अंगणवाडी सेविकांची (Maharashtra Jobs) भरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली होती. यापाठोपाठ अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुप्पट वाढ, नवे मोबाइल, जागेच्या भाड्याच्या तुटपुंज्या रकमेमध्ये बदल, अंगणवाड्यांची संख्या वाढवणे यासारख्या बदलांबाबतही राज्य सरकारच्या पातळीवर विचार सुरू असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. अंगणवाडी सेविकांना लवकरच नवे … Read more