Anganwadi Recruitment : अंगणवाडी भरती संदर्भात मोठी अपडेट!! सेविकांच्या मानधनात 20 टक्क्यांची वाढ अन् ‘या’ महिन्यात 20 हजार पदे भरणार

करिअरनामा ऑनलाईन । अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील (Anganwadi Recruitment) पाचव्या दिवशी मोठी घोषणा करण्यात आली. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्क्यांची वाढ आणि मे महिना अखेर 20 हजार नव्या अंगणवाडी सेविका भरती करणार असल्याची घोषणा बालकल्याण विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.

मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या मे महिन्यांपर्यंत 10 हजार नव्या अंगणवाडी सेविकांची भरती होणार असून त्यांच्या मानधनात 20 टक्के वाढ केली जाणार (Anganwadi Recruitment) आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल देण्यासाठी 150 कोटी खर्च केले जाणार आहेत. याशिवाय महापालिका क्षेत्रात 200 कंटेनर अंगणवाड्या सुरू करणार असून अंगणवाडी भाडेदर वाढवला जाणार आहे.

दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी प्रश्नोतराच्या तासात अंगणवाडी सेविकांचा विषय उपस्थित केला गेला. यावेळी विरोधकांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रश्न उचलून धरला. तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर बालविकास (Anganwadi Recruitment) मंत्री लोढा यांनी न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला होता. यावेळी अजित पवार यांनी राज्यातील अंगणवाडी सेविकांना 15 हजार रुपये मानधन आणि मदतनीसांना 10  हजार रुपये मानधन देणार का? असा सवाल केला होता.

यापूर्वी राज्यकर्त्यांनी केलेल्या घोषणेनुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची सुमारे 32 हजार पदे 31 मार्चपर्यंत भरली जातील; असे सांगण्यात आले होते. मात्र आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या घोषणेनुसार भरती केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आवश्यक शैक्षणीक पात्रता अशी आहे – (Anganwadi Recruitment)

1. या भरतीसाठी महिला उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. 18 ते 35 वयोगटातील उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येईल. विधवांसाठी 40 वयाची अट आहे. या भरतीसाठी 100 गुणांचे समीकरण वर आधारित असणार आहे.

2. अंगणवाड्यांमधील मदतनीस किंवा सेविका पदांसाठी अर्ज करणाऱ्या महिलेला दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास त्यांना अर्ज करता येणार नाही. त्यासाठी छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मराठी भाषेशिवाय त्या उमेदवारास उर्दू, हिंदी, गोड, कोकणी, पावरी, कन्नड, कोरकू, तेलगू, भिल्लोरी, बंजारा यापैकी किमान एक भाषा यायला हवी.

अशी होईल गुणवत्ता यादीची पडताळणी –

उमेदवारांच्या गुणवत्ता यादीची पडताळणी जिल्ह्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व शहरातील उपायुक्त करतील. उमेदवारांची अंतिम निवड करण्यापूर्वी गुणवत्ता पडताळणी समितीकडून त्या नावांची खातरजमा केली जाईल. त्या समितीत दुसऱ्या तालुक्यातील (Anganwadi Recruitment) बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्पातील एक कर्मचारी, एक पर्यवेक्षिका किंवा मुख्यसेविका आणि इतर प्रकल्पातील एक कर्मचारी नेमले जातील. भरतीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका क्षेत्रात महिला व बालविकासचे उपायुक्त यांचे निरीक्षण असणार आहे.

निवडी संदर्भातील काही ठळक मुद्दे –

  1. एकापेक्षा अधिक उमेदवारांना सारखेच गुण मिळाल्यास सर्वाधिक शिक्षण झालेल्यांची निवड होईल.
  2. शैक्षणिक पात्रता समान असल्यास जास्त वय असलेल्या महिला उमेदवारालार संधी मिळेल.
  3. शैक्षणिक पात्रता, वय अशा सर्वच बाबींमध्ये साम्य असल्यास चिठ्ठीद्वारे उमेदवाराची निवड होईल.
  4. 30 दिवसांत प्राप्त हरकती किंवा आक्षेप प्राप्त झाल्यास निवड यादीतील उमेदवारांची फेर पडताळणी होणार.
  5. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तालुक्यातील उमेदवारांच्या अंतिम निवडीचे अधिकार; प्रतीक्षा यादी प्रसिद्ध होईल. (Anganwadi Recruitment)

असे आहे 100 गुणांचे समीकरण –

1. इयत्ता 12 वीमध्ये 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास भरतीसाठी संबंधित महिलेला 60 गुण मिळतील. 70० ते 80 टक्क्यांसाठी 55 गुण तर 60  ते 70 टक्क्यांपर्यंत 50 गुण आणि 50 ते 60 टक्क्यांसाठी 45 गुण, तर 40 ते 50 टक्क्यांसाठी 40 गुण दिले जाणार आहेत. पदवीधर उमेदवारासाठी 80 टक्क्यांसाठी अतिरिक्त पाच गुण आणि त्यानंतर प्रत्येक दहा टक्क्यांसाठी (70 ते 80 टक्क्यांपर्यंत चार गुण, 60 ते 70 टक्क्यांसाठी 3 गुण असे) एक गुण कमी होणार आहे.

2. पदव्युत्तर शिक्षण, डीएड, बी-एड आणि ’एम-एसआयटी’ अशा प्रत्येक पदवीसाठी दोन गुण अतिरिक्त मिळणार आहेत. त्यानंतर विधवा, अनाथ आणि (Anganwadi Recruitment) अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवाराला प्रत्येकी दहा गुण जास्त मिळतील. यापूर्वीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असल्यास आणि आर्थिकदृष्ट्या मागास, भटक्या जाती-जमाती, ओबीसी उमेदवारांना प्रत्येकी पाच गुण जास्त मिळतील.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com