Wipro Layoff : विप्रोच्या ‘या’ कठोर निर्णयाचा 800 फ्रेशर्सना फटका; थेट कामावरूनच काढले

करिअरनामा ऑनलाईन । एका मीडिया रिपोर्टनुसार, देशातील टॉप (Wipro Layoff) पाच आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोने अंतर्गत चाचणीनंतर खराब कामगिरीमुळे शेकडो फ्रेशर्सना कामावरून काढून टाकले आहे. या संदर्भात कंपनीने आपली भूमिका मांडली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार; कंपनीने सेट केलेल्या मानकांच्या अनुषंगाने प्रत्येक एंट्री-लेव्हल कर्मचार्‍याने त्यांच्या नियुक्त केलेल्या कार्यक्षेत्रात निपुण असण्याची अपेक्षा कंपनी करते.

मूल्यांकन प्रक्रियेमध्ये कर्मचार्‍यांना संस्थेची व्यावसायिक उद्दिष्टे आणि ग्राहकांच्या गरजा यांच्याशी संरेखित करण्यासाठी मूल्यांकन समाविष्ट आहे. आयटी कंपनीच्या या कठोर निर्णयामुळे 800 नवीन कर्मचाऱ्यांना फटका बसला आहे. चाचणी घेतल्यानंतर त्यांना कामावरून (Wipro Layoff) काढून टाकण्यात आले मात्र संख्या कमी असल्याचा कंपनीचा दावा आहे. चाचण्यांमध्ये खराब कामगिरी केल्यामुळे कंपनी सोडण्यास सांगितले गेलेल्या फ्रेशर्सची संख्या विप्रोने उघड केली नाही.

बिझनेस टुडेने कंपनीने काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेली टर्मिनेशन लेटर्स ऍक्सेस केली आहेत. कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणासाठी खर्च केलेले 75,000 रुपये देण्यास ते जबाबदार होते, परंतु कंपनीने ही रक्कम माफ केली असल्याचे पत्रात लिहलेल्या (Wipro Layoff) मजकुरावरून लक्षात येथे. या पत्रात असे म्हटले आहे; “आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की प्रशिक्षणाचा खर्च रु.75,000/- जो तुम्ही भरण्यास जबाबदार आहात, माफ केले जाईल.”

कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष (Wipro Layoff)

एका अहवालानुसार, कंपनीतून काढून टाकण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, “मला जानेवारी 2022 मध्ये ऑफर लेटर मिळाले होते, परंतु काही महिन्यांच्या विलंबानंतर त्यांनी मला कामावर घेतले आणि आता ते मला चाचणीच्या बहाण्याने काढून टाकत आहेत.” कंपनी गेल्या (Wipro Layoff) वर्षीच्या याच तिमाहीत रु. 2,969 कोटींच्या तुलनेत निव्वळ नफ्यात 2.8 टक्क्यांनी वाढ होऊन रु. 3,052.90 कोटी झाला आहे. स्थिर चलन अटींमध्ये (CC) IT सेवा महसुलात 11.5-12.0 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com