Layoff : Meta मध्ये दुसऱ्यांदा मोठी कपात; तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांना दिला डच्चू

करिअरनामा ऑनलाईन । फेसबुकची पालक कंपनी असलेल्या (Layoff) मेटाव्हर्सने आणखी 10 हजार जणांना कामावरून काढत असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. कामकाज खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे कंपनीत खुल्या असलेल्या 5 हजार जागांसाठी आगामी काळात भरती होणार नाही, असेही स्पष्ट झाले आहे.

अशा प्रकारे नोकरकपात करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे मेटाव्हर्सचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. इतक्या जणांना कामावरून कमी करणे याचा अर्थ झोकून देऊन (Layoff) काम करणाऱ्यांना, तसेच गुणवत्ताधारक व्यक्तींना मुकण्यासारखे आहे, असेही झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. कंपनीने कॅलिफोर्निया येथील दि मेनलो पार्क येथे अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे.

कंपनीने फेब्रुवारीत कमी नफ्याची नोंद केली होती. ऑनलाइन जाहिरात बाजारपेठ आणि टिकटॉकसारख्या प्रतिस्पर्ध्यांमुळे नफ्यावर परिणाम झाल्याचे कंपनीने म्हटले होते. त्यापूर्वीच नोव्हेंबर 2022 मध्ये मेटाव्हर्सने 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते.

गुगलकडून भारतात कर्मचारी कपात (Layoff)

हे पण वाचा -
1 of 30

गुगलने आता भारतातही कर्मचारी कपात सुरू केली आहे. अमेरिकेतील या दिग्गज टेक कंपनीने भारताच्या विविध विभागांतील 450 ते 480 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांच्याकडे थेट व्यवस्थापक नव्हते त्यांना काढून टाकण्यात आले. यातील अनेक (Layoff) कर्मचारी हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये लेव्हल फोर सॉफ्टवेअर डेव्हलपर, बॅकएंड डेव्हलपर, क्लाउड इंजिनीअर आणि डिजिटल मार्केटर म्हणून काम करत होते. सूत्रांनी असेही सांगितले की, अमेरिकेत घडल्याप्रमाणे, भारतातील कर्मचाऱ्यांनाही मेल्सद्वारे कपातीची बातमी देण्यात आली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com