HSC Results 2023 : 12वी च्या निकालात यंदाही मुलींचीच बाजी; राज्याचा निकाल 91.25 टक्के

HSC Results 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक दिवसांपासून प्रतीक्षा (HSC Results 2023) असणाऱ्या 12 वीचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली.  यंदा राज्याचा 12वी बोर्डाचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. या निकालात पुणे, कोकण विभागाने दमदार कामगिरी केली असून सर्वात कमी निकाल मुंबई … Read more

HSC Result 2023 : प्रतीक्षा संपली!! 12 वीचा निकाल उद्या दुपारी 2 वाजता होणार जाहीर; इथे पहा निकाल

HSC Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च (HSC Result 2023) माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल उद्या दि. 25 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाबाबत विद्यार्थी … Read more

SSC HSC Results 2023 : 10वी/12 वीच्या निकालाबाबत मोठी अपडेट!! ‘या’ दिवशी जाहीर होणार निकाल

SSC HSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । 12वी बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात एक महत्वाची (SSC HSC Results 2023) अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12वीच्या निकालाची तयारी सुरु झाली आहे. बारावीचा निकाल 31 मे च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी सुरु झाली आहे. तर दहावीचा निकाल 10 जूनला  लागण्याची शक्यता आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची … Read more

ICSE ISC Result 2023 : ICSE आणि ISC परीक्षेत मुलींचा डंका; महाराष्ट्राच्या मुली देशात अव्वल

ICSE ISC Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय मंडळाच्या ICSE आणि ISC परीक्षांचा (ICSE ISC Result 2023) निकाल जाहीर झाला असून यंदाही मुलींनीच  बाजी मारली आहे. या दोन्ही बोर्डाच्या निकालात महाराष्ट्राच्या मुली देशात अव्वल आल्या आहेत. कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CICSE) या केंद्रीय मंडळाच्या ICSE 10वी आणि ISC 12वी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ICSE … Read more

SSC HSC Results 2023 : 10 वी-12 वीचा निकाल ‘या’ दिवशी; वाचा मोठी अपडेट

SSC HSC Results 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी (SSC HSC Results 2023) आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. आता प्रतीक्षा आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या निकालाची. निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये दिसत आहे. दरम्यान विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे निकाल … Read more

SSC HSC Board Results : 10वी 12वी निकालासंदर्भात मोठी अपडेट!! कधी जाहीर होणार निकाल?

SSC HSC Board Results

करिअरनामा ऑनलाईन । 10वी आणि 12वी परीक्षेच्या निकलाविषयी (SSC HSC Board Results) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या यंदाच्या हायस्कूल आणि इंटरमिजिएटचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र बोर्डाने या महितीला अधिकृत दुजोरा दिला नाही. … Read more

SSC HSC Exam Result 2023 : खुषखबर!! 10वी आणि 12वी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होणार! पहा तारखा

SSC HSC Exam Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे (SSC HSC Exam Result 2023) दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर होणार की नाही याबाबत साशंकता असतानाच विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यंदा दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेतच जाहीर होणार आहेत. बारावी बोर्डाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल … Read more

Board Exam : उत्तर पत्रिका स्विकारण्यास शिक्षकांचा नकार; 10 वीच्या 50 लाख तर 12 वीच्या 80 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून

Board Exam

करिअरनामा ऑनलाईन । जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी (Board Exam) सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या संपाचा दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला फटका बसला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे दहावीच्या सुमारे 50 लाख उत्तरपत्रिका, तर बारावीच्या सुमारे 80  लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून … Read more

HSC SSC Board Results : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका; 10 वी/12 वीच्या 75 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून; निकाल लांबणार?

HSC SSC Board Results (1)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या (HSC SSC Board Results) मान्य करण्यासाठी संप पुकारून सामान्य जनतेला वेठीस धरले आहे. आज संपाचा सलग चौथा दिवस आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी मंगळवारपासून संपावर आहेत. एकीकडे रुग्णालयांमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे अतोनात हाल होत आहेत तर दुसरीकडे संप कायम राहिल्यास दहावी बारावी बोर्डाचा निकाल लांबण्याची शक्यता … Read more

Teachers Strike : ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षक गेले संपावर, विद्यार्थ्यांना सोसावे लागणार नुकसान

Teachers Strike

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी (Teachers Strike) जुनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये शिक्षकही सहभागी झाले आहेत. परिणामी 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेवर संपाचे सावट आहे. त्यातच आज, मंगळवारपासून शाळांचे वर्ग भरणार नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अन्य वर्गांच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा तोंडावर आल्या असताना अभ्यासाचे नुकसान सोसावे लागत आहे. राज्य सरकारी … Read more