SSC HSC Results 2023 : 10वी/12 वीच्या निकालाबाबत मोठी अपडेट!! ‘या’ दिवशी जाहीर होणार निकाल

करिअरनामा ऑनलाईन । 12वी बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात एक महत्वाची (SSC HSC Results 2023) अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12वीच्या निकालाची तयारी सुरु झाली आहे. बारावीचा निकाल 31 मे च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी सुरु झाली आहे. तर दहावीचा निकाल 10 जूनला  लागण्याची शक्यता आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान पार पडली होती. यावर्षी 14 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.

इयत्ता 10 वीचा निकाल 10 जूनला लागेल; अशी माहिती  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाडून देण्यात आल्याने 10 वी च्या विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे. मात्र 12 वीच्या (SSC HSC Results 2023) निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये धाकधूक वाढली होती. ही चिंता आता मिटली आहे. 12वीचा निकाल 31 मे दरम्यान लागण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी सुरू झाली आहे.

दरम्यान विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शिक्षकांनी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर जुन्या पेन्शनच्या मागणीमुळे काही दिवस शैक्षणिक काम होऊ शकले नाही. त्यामुळे सुमारे आठवडाभर बारावीच्या उत्तरपत्रिका तपासता आल्या नाहीत. त्यामुळे निकाल (SSC HSC Results 2023) उशिरा लागणार का अशी चर्चा होती. मात्र राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल मे महिन्यातच तर दहावीचा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकलाबाबत असलेली उत्सुकता संपली आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com