ICSE ISC Result 2023 : ICSE आणि ISC परीक्षेत मुलींचा डंका; महाराष्ट्राच्या मुली देशात अव्वल

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय मंडळाच्या ICSE आणि ISC परीक्षांचा (ICSE ISC Result 2023) निकाल जाहीर झाला असून यंदाही मुलींनीच  बाजी मारली आहे. या दोन्ही बोर्डाच्या निकालात महाराष्ट्राच्या मुली देशात अव्वल आल्या आहेत.
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CICSE) या केंद्रीय मंडळाच्या ICSE 10वी आणि ISC 12वी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ICSE 10वी बोर्डाचा निकाल हा 98.94 टक्के लागला आहे. तर ISC 12 वी बोर्डाचा निकाल 96.93 टक्के लागला आहे. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cisce.org आणि results.cisce.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात.

महाराष्ट्रातील मुलींचा देशात डंका (ICSE ISC Result 2023)
ISCISC 12वी बोर्ड परीक्षेत देशातून 5 विद्यार्थी पहिल्या रँकवर आले आहेत. तर 10वी बोर्ड परीक्षेत 9 विद्यार्थी पहिल्या रँक वर आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी सरशी केली आहे. 10वी बोर्ड परीक्षेत महाराष्ट्रातून ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया शाळेची इप्शिता भट्टाचार्य 10वी बोर्ड परीक्षेत देशात पहिली आली आहे. तर 12वी बोर्ड परीक्षेत महाराष्ट्रातून मुंबईच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेची विद्यार्थिनी श्रेया (ICSE ISC Result 2023) उपाध्ये देशात पहिली आली आहे.
यावर्षी 10वीच्या परीक्षेत एकूण 98.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 12वीच्या परीक्षेत एकूण 96.93 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.आयसीएसई (दहावी) बोर्डात 99.21% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 98.71% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. ISC 12वी बोर्डामध्ये देखील मुलींची सरशी झाली आहे. 12वीत 98.01टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 95.96 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत.

जर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत काही आक्षेप असल्यास ते पुन्हा तपासणीसाठी अर्ज करु शकतात. ही सुविधा 21 मे पर्यंत उपलब्ध राहिल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी (ICSE ISC Result 2023) बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. केंद्रीय मंडळाच्या ICSE 10वी आणि ISC 12वी च्या परीक्षा मार्च आणि फेब्रुवारी महिन्यांत घेण्यात आल्या होत्या.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com